‘पीएम विश्वकर्मा’त नगरची घोडदौड

नगर : पुढारी वृत्त्तसेवा :  केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेतील सरपंच नोंदणी अभियानात नगर जिल्हा परिषद राज्यात चौथ्या स्थानी आहे. तर एक हजारांपुढील ग्रामपंचायतींच्या मोठ्या 10 जिल्ह्यांत नगर पहिल्या स्थानावर असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, 2273 कारागिरांनी आपले अर्जही सादर केले असून, ही आकडेवारी दररोज वाढत असल्याचे दिसत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2023 रोजी विश्वकर्मा जयंतीनिमित्त ‘पीएम विश्वकर्मा’ योजना सुरू केली. ज्या अंतर्गत पारंपरिक कारागीर आणि शिल्पकारांना तारण न घेता कमी व्याजदरावर कर्ज प्रदान केले जाणार आहे.


या योजनेतून 18 प्रकारच्या कारागिरांना कौशल्य प्रशिक्षणासह कर्ज मिळणार आहे. या लाभार्थ्यांची नोंदणी करण्यापूर्वी ग्रामपंचायतींची नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यानंतर कारागिरांची नोंदणी केली जाते. राज्यातील 34 जिल्हा परिषदांमध्ये ही नोंदणी सुरू आहे.

दरम्यान, ग्रामपंचायत नोंदणीची जबाबदारी ही सरपंचांची आहे. त्यासाठी सर्वप्रथम सरपंचांनी पोर्टलवर नोंदणी करणे अपेक्षित आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ यांनी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी उत्कृष्ट नियोजन केले आहे. परिणामी, सरपंच नोंदणीत नगर जिल्ह्याने 97 टक्के काम पूर्ण करत राज्यात चौथे स्थान पटकावले आहे.


सरपंचांकडून पडताळणी

पहिल्या स्टेजसाठी आतापर्यंत 2272 कारागिरांनी आपले अर्ज ग्रामपंचायतींमध्ये सादर केले आहेत. याची स्थानिक सरपंच पडताळणी करून संबंधित अर्जदार हा कारागिर आहे का, याची खात्री करून तो प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविणार आहे.


बँककडे जाणार प्रस्ताव

जिल्हाधिकारी कार्यालयातून संबंधित प्रस्ताव पडताळणीनंतर खादी ग्रामोद्योग विभागाकडे पाठविला जाईल. तेथून आवश्यक पूर्ततेनंतर संबंधित बँकेकडे हा प्रस्ताव दिला जाणार आहे. त्या ठिकाणाहूनच अर्जदारास योजनेचा लाभ मिळणार आहे.


राज्यात पहिल्या स्थानी नगर!


राज्यात एक हजारांपेक्षा जास्त ग्रामपंचायती असलेले 10 जिल्हे आहेत. यात पुणे, नाशिक, बीड, जळगाव, नांदेड, यवतमाळ, सातारा, सोलापूर, कोल्हापूर या नऊ जिल्ह्यांपेक्षा नगर पहिल्या स्थानी पोहोचला आहे. ही गती यापुढेही कायम राहील, असा आशावाद गुंजाळ यांनी व्यक्त केला.


लाभ काय, कोणासाठी, ही कागदपत्रे हवीत


सुतार, लोहार, कुंभार, न्हावी, मूर्तीकार, चर्मकार, धोबी, शिंपी, मिस्तरी, इत्यादी 18 पारंपरिक उद्योगांचा यात समावेश आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, जातीचा दाखला, रेशन कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर आवश्यक आहे. प्रशिक्षण कालावधीत 500 रुपये मानधन देण्यात येणार आहे. योजनेतून सुरुवातीला 1 लाख, त्यानंतर 2 लाख, व नंतर 5 लाखांपर्यंत 5 टक्के व्याजदाराने कर्ज दिले जाणार आहे. त्यामुळे या योजनेच्या नोंदणीसाठी कारागिरांमधून प्रतिसाद मिळत आहे.


 योजनेचा आढावा

ग्रामीण भागातील पारंपारिक कारागिरांसाठी अर्थसहाय्य देणारी पीएम विश्वकर्मा योजनेच्या अंमलबजावणीबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही वेळोवेळी आढावा घेतला आहे. ग्रामीण भागातील कारागिरांना योजनेतून लाभ मिळाला पाहिजे, यासाठी त्यांनी प्रशासनाला विशेष सूचना केल्याचेही सूत्रांकडून समजले.


योजनेचा लाभ घ्या ः दादासाहेब गुंजाळ

सीईओंच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात गतिमान पद्धतीने पीएम विश्वकर्मा योजना राबविली जाणार आहे. ग्रामीण कारागिरांनी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी दादासाहेब गुंजाळ यांनी केले.


The post ‘पीएम विश्वकर्मा’त नगरची घोडदौड appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T0m8hS

अंधारासोबत तिने झेलले वखवखल्या नजरांचे डंख

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा :  श्रीरामपूर बसस्थानकावर रात्री दहा ते साडेदहाच्या दरम्यान थांबलेल्या महाविद्यालयीन तरुणीला अंधारात थांबून बसची वाट पाहावी लागलीच; शिवाय त्या अंधारातही वासनेने वखवखलेल्या टोळक्यांच्या नजरांचे डंखही पचवावे लागले. त्यांतून स्वतःला सोडवत ती बसस्थानकाच्या बाहेर आली, तेव्हा काही तरुणांनी तिचे पालक येईपर्यंत तिला सोबत करत दिलासा दिला.

या प्रकारामुळे येथील एसटी बसस्थानकाच्या दुरवस्थेचा आणि रात्रीच्या वेळी बसस्थानक आवारात होणारा दारुडे आणि टवाळांच्या अड्ड्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


त्याचे असे झाले… नाशिकहून नेवाशाकडे जाणारी शेवटची बस रात्री बाभळेश्वरमध्ये बंद पडली. त्या बसमधील थोडेफार प्रवासी मिळेल त्या वाहनाने श्रीरामपूरपर्यंत रात्री नऊ-साडेनऊच्या आसपास आले. मात्र रात्री आठच्या नंतर श्रीरामपूर बसस्थानकातून एकही बस बाहेर जात नसल्याने आणि रात्री प्रवाशांना मार्गदर्शक सूचना देणारा एसटीचा एकही कर्मचारी तेथे नसल्याने एका महाविद्यालयीन तरुणीला काहीच उलगडा होईना. बसस्थानकात अंधार आणि शुकशुकाट. त्यातहीआपल्याला गावी जाण्यासाठी एखादी तरी बस मिळेल या भोळ्या आशेवर ती बसस्थानकात खूप वेळ बसून राहिली. तिची नजर बससाठी आसुसलेली, तर बसस्थानकात कोपर्‍यात बसलेल्या तळीरामांच्या आणि टवाळांच्या वखवखलेल्या नजरा तिच्यावर रोखलेल्या. थोड्या वेळाने या टवाळांनी मुलीच्या अवतीभवती चकरा मारायला सुरवात केली. त्यामुळे मुलगी भेदरली आणि बसस्थानकाच्या बाहेर येऊन उभी राहिली.


त्यादरम्यान श्याम घाडगे व रितेश खाबिया या येथील हिंदुत्ववादी संघटनेेच्या कार्यकर्त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी मुलीची विचारपूस केली आणि तिच्या पालकांशी संपर्क साधून तिला धीर देत शेजारच्याच एका हॉटेलमध्ये बसवून ठेवले. थोड्या वेळाने सावरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित मुथा, योगेश ओझा यांनीही तेथे येऊन मुलीला आधार दिला. चहा-नाश्ता दिला. रात्री उशिरा मुलीचे पालक मोटारसायकलवरून आले, तेव्हा ती आपल्या गावी रवाना झाली. तोपर्यंत कार्यकर्ते तिच्या सोबत राहिले.


या सर्व प्रकाराने मात्र एसटी महामंडळाला नागरिकांनी शिव्यांची लाखोली वाहिली. बस खराब झाल्यावर पर्यायी बसची व्यवस्था महामंडळाने करायलाच हवी; पण असे घडत नसल्याने सामान्य प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. त्यातच येतील बसस्थानकात ना उजेड ना रात्री माहिती देणारी व्यवस्था. या समस्यांकडे लक्ष वेधणार असल्याचे संबंधित कार्यकर्त्यांनी सांगितले.


The post अंधारासोबत तिने झेलले वखवखल्या नजरांचे डंख appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T0kBnV

पिण्याच्या पाण्यासाठी पंचायत समितीच्या कार्यालयात हंडा मोर्चा

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : पिण्यासाठी पाणी मिळावे, या मागणीसाठी निवडुंगे येथील महिलांनी पाथर्डी पंचायत समितीच्या कार्यालयात हंडा मोर्चा काढला. गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर ठिय्या मांडत महिलांनी जोरदार घोषणाबाजी करीत प्रशासनाचा निषेध केला. पाणी आमच्या हक्काचं, मिळायलाच पाहिजे. पाणी न देणार्‍या अधिकार्‍यांचा धिक्कार असो, अशा जोरदार घोषणा देत महिला व कार्यकर्त्यांनी कार्यालय दणाणून सोडले. आसाराम ससे, सरपंच वैभव देशमुख, अमोल मरकड, सोमनाथ शिरसाठ, माणिक सावंत, सीताराम बोरूडे, देवा पवार यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.


सुशिला चन्ने, रंजना क्षीरसागर, चंद्रकला बादल, नगिनी शेख, विजया राउत, उषा शिंदे, यास्मिन पठाण, कोमल मरकड, वैशाली कोकणे, बेबी कोकणे, हौसाबाई काळे, शांताबाई आगळे, प्रयागा चिकणे, चंद्रकला मरकड आदी महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

गेल्या अनेक दिवसांपासून निवडुंगे गावाला पिण्याचे पाणी मिळत नाही. याबद्दल वारंवार प्रशासनाकडे तक्रार करूनही अधिकारी गाांभीर्याने घेत नाहीत. हक्काच्या पाण्यासाठी आम्हाला वेळोवेळी आंदोलन करण्याची वेळ येत आहे. पाण्याशिवाय कोणतेही काम होत नाही. त्यात नादुरूस्त किंवा छोटे-मोठे प्रश्न पाण्यासंदर्भात उद्भवले, तर अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देऊन आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ग्रामस्थ, महिला संतप्त झाल्या होत्या.


अधिकार्‍यांनी आमच्या पाण्याच्या प्रश्नासाठी डोळेझाक करू नये. अन्यथा आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू, असा इशारा महिलांनी यावेळी दिला. गावातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आवश्यक ती दुरूस्ती करून नियमित पाणीपुरवठा केला जाईल, असे लेखी आश्वासन ग्रामीण पुरवठा उपविभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.


पाण्याशिवाय संसार कसा करायचा?
पाणी नाही तर आम्ही संसार कसा करायचा, शेतीतील कामे कशी करायची, पाणी भरायचे की शेतीमधील कामे करायची, असा संतप्त सवाल करीत महिलांनी हंडे वाजवून गावात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचा निषेध व्यक्त केला.


हेही वाचा* Nagar: पोलिस मित्रांची वारी..ठाण्याच्या दारी!

* बारामतीतील दहा शेतकर्‍यांना वन विभागाकडून भरपाई

* Pune News : लाल कांद्यांची उपबाजारात मोठी आवक; मात्र दर घसरलेलेच


The post पिण्याच्या पाण्यासाठी पंचायत समितीच्या कार्यालयात हंडा मोर्चा appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T0h48v

त्यांच्याही जीवनात फुलला जोडीदाराच्या सोबतीचा प्रकाश

राजेश गायकवाडआश्वी : भांडी आणि फ्रीजपर्यंत मोठ्या हौसेने सजविलेले रुखवत, बँडच्या तालावर नाचणारे वर्‍हाडी आणि पारंपरिक उत्साहात लागलेले लग्न… असेच सर्वसाधारण चित्र असते तर कदाचित त्याकडे कोणाचे लक्षही गेले नसते. पण ते केवळ लग्न नव्हते, तो होता एक उत्सव. दोन अंधारलेली आयुष्य एकमेकांच्या साथीने प्रकाशमय करण्याचा उत्सव. त्यांना दृष्टीचे तेज भलेही नियतीने नाकारले असेल, पण आपल्या बुद्धिमत्तेच्या, प्रज्ञेच्या तेजाने डोळसांनाही मानवतेची दिशा दाखविणार्‍या दोन जीवांच्या नव्या जीवनारंभाचा उत्सव… दोन विभिन्न जातिधर्माच्या दृष्टिहीन वधू-वराच्या रेशीमगाठीचा उत्सव… म्हणूनच त्या सोहळ्यात हातांतील अक्षदा त्यांच्या डोक्यावर पडत होत्याच; शिवाय बहुतेकांच्या डोळ्यांतून आसवांचा अभिषेकही त्यावर होत होता.


नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील गोंकुदा येथील तेजस्विनी आणि अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील चास (नळी) येथील सागर दगू निकम या दृष्टिहीन जोडप्याचा हा विवाह सोहळा अनेक अर्थांनी आणि कारणांनीही लक्षवेधी ठरला. जातीधर्माच्या बेड्या तोडून आधुनिक मानवताधर्म जागविणार्‍या आणि एकमेकांच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी आयुष्यभराची साथ करण्याचे ठरविलेल्या या दाम्पत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


नियतीने डोळ्यांनी हे जग पाहण्याचे सुख नाकारलेल्या आणि पितृसुखालाही पारखी झालेल्या तेजस्विनीचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण अंधशाळेत झाले. नंतर पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करून आता ती ‘एमपीएससी’ची तयारी करत आहे. सागर दगू निकम याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण श्रीरामपूर येथील अंध मुलामुलींच्या शाळेत आणि पुढे पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधून ‘एमए’पर्यंत शिक्षण झाले. सध्या तो आयडीबीआय बँकेच्या कोपरगाव येथील शाखेत अधिकारी म्हणून कार्यरत आहे. तोही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे. कुटुंबीयांनी मोठ्या कष्टातून त्याला उभे केले आहे. या नवदाम्पत्याने अंधत्वावर मात करून उच्च शिक्षण घेऊन प्रशासकीय अधिकारी बनण्याची इच्छाशक्ती ठेवत आरंभलेले हे नवोन्मेषी सहजीवन आदर्श आणि इतरांनाही प्रेरणादायी ठरणार आहे


The post त्यांच्याही जीवनात फुलला जोडीदाराच्या सोबतीचा प्रकाश appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T0dvZR

शिर्डी: राहता तालुका वैद्यकीय माहिती पुस्तिकेचे प्रकाशन ना. विखेंच्या हस्ते
http://dlvr.it/T0cZS0

शिर्डी: नमो चषक मध्ये होणाऱ्या विविध राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या नावनोंदणीला सुरुवात
http://dlvr.it/T0cZ8Q

पिंपरनेजवळ एक्सल तुटल्याने एसटी बस पलटी; विद्यार्थी जखमी

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर व राहुरी तालुक्याच्या सरहद्दी वरील म्हैसगाव येथून पहाटेच्या सुमारास निघालेली संगमनेर आगाराची एसटी बस शिबलापुर मार्गे संगमनेरकडे येत होती. ही बस पिंपरणे गावाजवळ आली असतात्या बसचा अचानक एक्सल तुटला असता ती एस टी बस पलटी झाली .या अपघातात कुठली जीवितहानी झाली नाही, मात्र महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी मात्र किरकोळ स्वरूपात जखमी झाले असल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली.


राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथून निघालेली संगमनेर आगाराची एसटी बस क्रमांक एम एच 07 सी 9146 बस शिबला पुरमार्गे बस संगमनेरकडे येत होती. या बसमध्ये शिबलापूर हंगेवाडी व कनोली येथील महाविद्यालयीन शिक्षण घेत असंणारे विद्यार्थी बसलेले होते. ही बस पिंपरणे गावात आली असता, अचानक एसटी बसचा एक्सेल तुटला असता एसटी बस चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि बस पलटी झाली आहे.


या अपघातात बसमधील विद्यार्थी किरकोळजखमी झाली आहे अपघाताची माहिती मिळताच पोलीस संगमनेर उप विभागाचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे पोलीस निरीक्षक देविदासढुमणे घटनास्थळी दाखल झाले होते .त्यानंतर जखमी विद्यार्थ्यांना संगमनेरच्या खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. अपघातात विद्यार्थी किरकोळ स्वरूपात जखमी झाले आहे त्यामुळे पालकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दै.पुढारीशी बोलताना केले आहे


हेही वाचा* Australia vs Pakistan : डेव्‍हिड वॉर्नरने पाकिस्‍तान विरुद्ध रचला इतिहास, नव्‍या विक्रमाची नोंद

* नॅचरल गॅसच्या किमतीवर अमेरिकेचा प्रभाव

* ‘पुढारी’ शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलचा आज अखेरचा दिवस


The post पिंपरनेजवळ एक्सल तुटल्याने एसटी बस पलटी; विद्यार्थी जखमी appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T0bz9M

दोघांत ‘तिसरा’ ! शिर्डीत उमेदवारीबद्दल ‘अंदाज अपना अपना’

संदीप रोडेनगर :   माजी मंत्री बबनराव घोलप, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे ठाकरे सेनेचे दावेदार मानले जात असतानाच आता माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांच्या रूपाने तिसर्‍या दावेदारानेही शड्डू ठोकला आहे. शिर्डीवरचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी रणनीतीचा भाग म्हणून पदाधिकार्‍यांची खांदेपालट केली; मात्र उमेदवारीचे ‘पिक्चर क्लीअर’ व्हायला अजूनही तयार नाही. मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या होमपिचवर भाजपला ‘ग्राऊंड क्लीअर’ असले तरी शिंदे सेनेकडे असलेली जागा ‘स्पीडब्रेकर’ ठरू पाहतेय. आता त्यावर काय अन् कसा तोडगा निघणार, यावरच शिर्डीचे कोडे सुटणार असले तरी जो तो ‘अंदाज अपना अपना’ मांडताना दिसत आहेत.


2009 च्या निवडणुकीत रामदास आठवले यांच्यासारख्या मातब्बर प्रतिस्पर्ध्याचा पराभव करत भाऊसाहेब वाकचौरे यांच्या रूपाने शिर्डीत सेनेचा पहिला खासदार झाला. 2014 च्या निवडणुकीत वाकचौरे यांनी सेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत काँग्रेसचा हात धरला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी सदाशिव लोखंडे यांना शिर्डीत आणले अन् अवघ्या पंधरा दिवसांत लोखंडे यांची लॉटरी लागली. काँग्रेसचे वाकचौरे यांचा पराभव करत लोखंडे यांनी शिर्डीत सेनेचा गड राखला. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांचा पराभव करत लोखंडे दुसर्‍या टर्मला खासदार झाले. शिवसेना दुभंगली तेव्हा लोखंडे यांनी शिंदे सेनेचा रस्ता निवडला.


सलग तीन टर्म शिवसेनेचा खासदार अन् लोखंडेंचा बदलेला ट्रॅक पाहता शिर्डी उद्धव ठाकरे यांच्या नजरेतून सुटणार तरी कशी? शिर्डी जिंकण्याचा निर्धार म्हणूनच निष्ठावंतांच्या हाती धुरा देत सहा तालुक्यांत पदाधिकार्‍यांची खांदेपालट केली. ठाकरे यांच्यावर उमेदवार शोधण्याची वेळ आली, तेव्हा माजी मंत्री बबनराव घोलप हे एकमेव नाव समोर आले. पुढे भाऊसाहेब वाकचौरे यांची घरवापसी झाली अन् ते घोलपांच्या बरोबरीने दावेदारी करू लागले. दोघांत कोण, याचा फैसला होण्यापूर्वीच माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांनीही ‘शिर्डी लढविण्याचा इरादा’ जाहीर केला. आता ठाकरे सेनेचा उमेदवार कोण, याकडे नगरच नव्हे, तर राज्याच्या नजरा लागून आहेत.


द़ृष्टिक्षेपात शिर्डी लोकसभा

विधानसभा मतदारसंघ : संगमनेर, अकोले, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा

कोणाचे किती आमदार : काँग्रेस 2, उबाठा सेना 1, भाजप 1, राष्ट्रवादी (अजित पवार) 2


The post दोघांत ‘तिसरा’ ! शिर्डीत उमेदवारीबद्दल ‘अंदाज अपना अपना’ appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T0ZPC5

राहुरीत सरते वर्षही गुन्हेगारीचे !

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : पोलिस प्रशासनाच्या क्राईम डायरीमध्ये गुन्ह्यांची वाढती नोंद पोलिस अधिकार्‍यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सरत्या वर्षाला गुडबाय करताना येथील पोलिस डायरीत तब्बल 851 गुन्ह्यांची नोंद झाली. सर्वाधिक 245 चोरीच्या घटनांचा उच्चांक आहे. महिला अत्याचाराचे 100 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. दंगलीच्या 37 घटना तर 2 खून झाले आहेत. अपघातांमध्ये 50 जणांचा बळी गेले. पोलिस डायरीची नोंद अधिकारी बदलुनसुद्धा थांबत नसल्याचे चित्र दिसत आहे.


पोलिस ठाण्यामध्ये 5 वर्षांमध्ये 11 पोलिस निरीक्षकांनी कामकाज पाहिले. अधिकारी खुर्चीवर तग धरीत नसल्याने हलत्या खुर्चीला अनेक पोलिस अधिकार्‍यांचा आधार लाभला, मात्र गुन्हेगारी कमीच होत नसल्याचे दुर्दैवी चित्र दिसत आहे. नगर जिल्ह्यात सर्वाधिक शांत समजल्या जाणार्‍या राहुरी हद्दीत गुन्हेगारीच्या घटना क्वचित घडत होत्या. शांत व समृद्ध राहुरी तालुक्यात नोकरीची संधी मिळावी म्हणून अनेक धाव घेत होते. गुण्या- गोविंदाने नांदणार्‍या या तालुक्याचे मुळा- प्रवरा पाण्याने समृद्धतेचे नंदनवन फुलविले, परंतू गेल्या 10 वर्षांमध्ये तालुक्याच्या शांततेला अक्षरशः गालबोट लावण्याचे प्रकार गुन्हेगारांकडून सर्रास होत आहेत. वाळू तस्करी, दुचाकी चोर्‍या, शेती पिकांसह विजेची केबल, पंप चोरीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाल्याचे पहावसाय मिळत आहे.


राहुरी तालुक्यामध्ये महिला व तरूणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. क्राईम डायरीतील नोंद वाढतच असल्याचे चित्र दिसते. या पोलिस ठाण्याने सन 2022 चे क्राईम रेकॉर्ड मोडल्याचे आकडेवारीतून दिसत आहे. गेल्यावर्षी पोलिस डायरीमध्ये 751 गुन्ह्यांची नोंद होती. यंदा वर्ष संपायला आठवडा शिल्लक असताना गुन्ह्यांची आकडेवारी तब्बल 851 पर्यंत पोहोचली आहे. गतवर्षी खुनाचे 4 तर यंदा 2 गुन्हे दाखल झाले. खुनाचे प्रयत्न गतवर्षी 9 तर यंदा 7 घडले. गेल्यावर्षी 3 दरोडे पडले. यंदा 5 दरोड्यांची नोंद झाली. दरोड्याच्या तयारी असणार्‍यांवर 9 गुन्हे नोंदले. यंदा एकच नोंद आहे. गतवर्षी घरफोडी 45 तर यंदा 18 झाल्या. गतवर्षापेक्षा यंदा चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली. गेल्यावर्षी 218 चोर्‍या झाल्या यंदा 245 गुन्हे नोंदविले आहेत. दंगलीच्या गतवर्षी 30 घटना घडल्या यंदा वाढ होवून 37 घटना घडल्या. हाणामारीने दुखापतग्रस्तांच्या गतवर्षी 130 घटना घडल्या. यात वाढ होऊन यंदा 143 गुन्हे नोंदविले आहेत. मुली पळवून नेण्याचे गतवर्षी 40 तर यावर्षी 43 गुन्ह्यांची नोंद झाली.


गेल्या काही वर्षांप्रमाणेच सरते वर्षही गुन्हेगारांचेच ठरल्याचे स्टेशन डायरीतील आकडेवारीतून दिसते. शेतकर्‍यांना हमी भाव, औषधे व रासायनिक खतांच्या किमती, नैसर्गिक आपत्ती, शासकीय दुर्लक्षित धोरण असे अनेक संकटे आ वासून उभे असताना चोरट्यांनीही शेतकर्‍यांना हैराण करून सोडल्याचे वास्तव दिसत आहे. राहुरी तालुक्यामध्ये सर्वाधिक विद्यूत पंप व केबल चोरीचे प्रमाण आहे. उभ्या पिकांवर डल्ला मारण्याचे पाप चोरटे करीत आहेत. याबाबत पोलिसात तक्रारी देऊनही चोरट्यांची किमया थांबत नसल्याचे चित्र दिसते.

पुर्वी दुचाकी चोरीस जाण्याचे प्रकार घडले. यंदा चक्क चाकी वाहने चोरट्यांच्या डोळ्यावर आले आहेत. राहुरीतून दुचाकींसह चारचाकी वाहनांची चोरी वाढल्याने वाहन मालक धास्तावले आहेत. शालेय मुलींना कशहरासह ग्रामीण भागात करावा लागणारा टपोरी, टारगटांचा सामना जैसे-थे आहे. मुलींना होणारा टारगटांचा वाढता त्रास पाहता अर्धवट शिक्षणातून ‘हात पिवळे’ करावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. गुन्ह्यांची उक्कल होण्याचे प्रमाण केवळ 70 टक्के आहे. यंदा 532 पैकी 542 गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.


हिवाळी अधिवेशनात तापली कायदा-सुव्यवस्था

राहुरीत साधारणतः 6 महिन्याला बदलणार्‍या पोलिस अधिकार्‍यांसह शेतकर्‍यांच्या तक्रारींना ‘बोगस’ हिणावणार्‍या अधिकार्‍यांच्या जवाबावरून आ. प्राजक्त तनपुरे यांनी अधिवेशनात सत्ताधार्‍यांना चांगलेच फैलावर घेतले. राहुरी मतदार संघात सर्वसामान्य, महिला, तरुणींसह शेतकर्‍यांची सुरक्षितता महत्वाची आहे. नको त्या ‘गोष्टीं’कडे लक्ष देण्यापेक्षा कायदा- सुव्यवस्था अबाधित राखण्याकडे थोडेसे पहा, असे आ. तनपुरे यांनी सत्ताधार्‍यांना सुनावले. अधिवेशनातील ही वादळी चर्चा राहुरीच्या कायदा- सुव्यवस्थेला जागेवर आणणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


संपता-संपेना खुर्चीचा खेळ अन् तडजोडीच्या भानगडी समजेना..!

राहुरी तालुक्यात दुचाकी चोरट्यांचे मोठे रॅकेट आहे. अनेक टोळ्या पकडल्या, परंतू जामीन मंजुर होताच पहिले पाढे पंचावन्न सुरू होतात. परिणामी दुचाकी चोरी कमी होत नसल्याचे चित्र दिसत आहे. दुचाकी चोरीला गेल्यानंतर थेट मालकाशी संपर्क करुन ‘तडजोडी’ची रक्कम घेतली जाते. काही वर्षांपूर्वी राहुरी पोलिस प्रशासनाला दुचाकी चोरी गेल्यानंतर ‘तडजोडी’चा निर्णय घ्यावा लागला, परंतु अजुनही चोरट्यांचा प्रताप सुरूच आहे. पोलिस अधिकारी खुर्ची सांभाळताना कसरत करत असताना दुचाकी चोरीच्या तडजोडी मात्र संपत नसल्याचे दिसते.


 


The post राहुरीत सरते वर्षही गुन्हेगारीचे ! appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T0XjzJ

सोलापूर महामार्गाचे नवीन वर्षात लोकार्पण : खासदार सुजय विखे

रूईछत्तीशी : पुढारी वृत्तसेवा :  नगर-सोलापूर महामार्गाचे काम गेल्या दोन वर्षांपासून अतिशय वेगाने सुरू आहे. नवीन वर्षात या महामार्गाचे लोकार्पण होणार आहे. उत्तर व दक्षिण भारताला जोडणारा हा महामार्ग असल्याने, नगर शहरातील व्यापारही गतिमान होणार आहे पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर अशी देवस्थाने या महामार्गामुळे प्रकाशझोतात आलेली आहेत. गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून या महामार्गाची अवस्था अतिशय दयनीय झाली होती. खासदार सुजय विखे यांनी लोकसभेत वारंवार हा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे रस्त्याच्या कामासाठी मोठा निधी उपलब्ध झाला असून, महामार्गाचे काम मार्गी लागत आहे. मागील दहा ते बारा वर्षांपासून नगरकडे येणारी वाहतूक स्थानिकमार्गे जात होती. आता ही सर्व वाहतूक महामार्गाने शहराकडे येणार असल्याने मार्गावरील सर्व गावे प्रकाशझोतात येणार आहेत.


या महामार्गामुळे शैक्षणिक गुणवत्ता देखील सुधारणार आहे. उच्च शिक्षणासाठी ग्रामीण भागातील मुलांना शहराकडे धाव घ्यावी लागते. विशेषत मुलींना शिक्षण घेण्यासाठी आता हा मार्ग सुलभ झाला आहे. मध्यंतरी रस्ता खराब असल्याने पालक वर्ग मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करत होते. आता रस्ता सुसाट झाल्याने मुलींच्या शिक्षणाचे दरवाजे जास्त खुले झाले आहेत. ग्रामीण भागात आरोग्य सुविधा पुरेशा मिळत नव्हत्या. आता शहराकडे आरोग्य सुविधा घेण्यासाठी वेळेवर पोहोचता येणार असल्याने लोकांच्या जीवनात नगर-सोलापूर महामार्ग गतिशील आणि कृतिशील ठरणार आहे.


नवीन वर्षात या महामार्गाचे लोकार्पण होणार आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात लोकसभेच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध केला असून, येत्या दोन महिन्यांत अनेक विकासकामांचे भूमिपूजन केले जाणार आहे.

                                                 – खा.सुजय विखे, नगर दक्षिण लोकसभा.


The post सोलापूर महामार्गाचे नवीन वर्षात लोकार्पण : खासदार सुजय विखे appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T0W45c

दुध भेसळीच्या छाप्याने काटा कोणाचा?

रियाज देशमुखराहुरी : अन्न, औषध प्रशासनाच्या नाशिक व नगर येथील संयुक्त पथकाने राहुरी तालुक्यातील शिलेगाव व माहेगाव येथे दूध भेसळ करीत असल्याच्या कारणास्तव छापा टाकला. छाप्यावेळी सकाळीच अधिकार्‍यांना मारहाण होऊनही सायंकाळच्या तक्रारीत बदल झाला. भेसळीचे घातक रसायन समजल्या जाणार्‍या पॅराफिन लिक्विडचेही सायंकाळी पाणी झाल्याने अन्न, औषध प्रशासनाच्या छाप्याने भेसळखोरांचा काटा निघाला की सर्वसामान्यांचा? या चर्चेचे गुर्‍हाळ जिल्हाभर गाजत आहे.


अन्न, औषध प्रशासनाकडून 15 डिसेंबर रोजी सकाळीच दोन ठिकाणी भेसळखोरांवर कारवाई केली. कारवाईच्या वेळी एका ठिकाणी अधिकार्‍याला मारहाण झाल्याची चर्चा पसरली. अन्न, औषध प्रशासनाकडूनही तशी माहिती पत्रकारांना देण्यात आली. त्यानुसार राहुरी पोलिस ठाण्यात दूध भेसळीचे साहित्य दोन वाहनांमध्ये भरून आणण्यात आले. कॅनमध्ये पॅराफिन लिक्विड, घातक रसायने व व्हे पावडर असल्याची माहिती दिली जात होती. तसेच पवार नामक अन्नसुरक्षा अधिकार्‍यावर दूध भेसळखोराकडून हल्ला झाल्याने त्यांचे फाटलेले कपडेे, हाताला झालेल्या जखमा दाखविल्या जात होत्या.


पांढर्‍याशुभ्र दुधाला काळा डाग लावण्यासाठी दुधात घातक रसायन, व्हे पावडर टाकून लोकांच्या आरोग्यावर संक्रांत आणणार्‍या भेसळखोरांवर कठोर कारवाई व्हावी, दूधभेसळ थांबवावी यासाठी अन्न, औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. त्याच अधिकार्‍यांना मारहाणीची माहिती मिळाल्यानंतर सर्वसामान्यांनीही संताप व्यक्त केला. सकाळी 10 वाजेपासून 10 ते 12 अधिकारी राहुरी पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते. घटनेची माहिती मागितल्यानंतर एकमेकांच्या कानात कुजबुजत ‘गुन्हा दाखल केल्यानंतर सविस्तर माहिती देऊ’ असे सांगत होते. सायंकाळ होत आली तरी गुन्हा दाखल होत नसल्याने बाहेर चर्चा, तर्क-वितर्क सुरू झाली. मारहाणीचा विषय असतानाही अधिकार्‍यांची जहाल भाषा सायंकाळी मवाळ झाली. मारहाणीचा प्रकारच तक्रारीतून गायब झाला. ‘पॅराफिन लिक्विड नसून ते पाणी होते’ असा खुलासा देण्यात आला. घातक रसायन नसून, केवळ व्हे पावडरीच्या गोण्या जप्त केल्याची माहिती देत अन्न, औषध प्रशासनाने छाप्याची सविस्तर माहिती सांगितली.


सर्वसामान्यांचाच काटा?

तेव्हापासून राहुरीच्या कारवाईबाबत तर्कवितर्कांच्या चर्चेचे गुर्‍हाळ चांगलेच पेटल्याचे दिसत आहे. अन्न, औषध प्रशासनाच्या कारवाईने दूध भेसळखोरांचा काटा निघाला, की दूधभेसळ करूनही गुन्ह्याची तीव्रता कमी करीत लपवालपवी होऊन सर्वसामान्यांचा काटा काढला गेला? याबाबत चर्चेला उधाण आले आहे.


राहुरी तालुक्यातील शिलेगाव व माहेगाव येथील दूध भेसळखोरांवरील छाप्यांकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. सकाळच्या सत्रात मारहाण झाल्याचे सांगत कठोर कारवाई करणार असल्याचे सांगत पुढाकार घेणारे अधिकारी नरमले कसे? सकाळच्या सत्रात जे द्रव्य घातक होते त्याचे पाणी झाले कसे? मारहाण करणार्‍यांवर कठोर कारवाई होईल अशी शक्यता असताना केवळ सही न देता शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार दाखल करून बचाव कोणाचा केला? सकाळपासून नाशिक व नगर येथील अन्न, औषध प्रशासनाचे अधिकारी पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते, ते सांयकाळी गुन्हा दाखल होत असताना कोठे गायब झालेे? अशा अनेक प्रश्नांचे काहूर सर्वसामान्यांच्या मनात उठले आहे. त्यामुळेच अन्न, औषध प्रशासनाच्या छाप्याने दूध भेसळखोरांचा काटा निघाला की सर्वसामान्यांचा, हा प्रश्न तेवढाच महत्त्वाचा ठरत आहे.


तक्रारीत केवळ ‘शासकीय कामात अडथळा’

आरोपीने पाण्यामध्ये व्हे पावडर टाकून कृत्रिमरित्या दुधाचा एसएनएफ वाढवत भेसळयुक्त दूध तयार केले. तेथे मोठ्या प्रमाणात व्हे पावडरचा साठा आढळून आला. दूध व्हे पावडरचे नमुने घ्यायचे आहेत, असे अन्नसुरक्षा अधिकारी प्रदीप पवार यांनी सांगताच, आरोपी कोठेही सही न करता पळून गेला. त्यामुळे नमुने घेण्याच्या शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यासाठी अन्न, औषध प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी राहुरी पोलिस ठाण्यात 8 तास बसून होते. त्यामुळे या कारवाईची चर्चा होत आहे.


ते सायंकाळपर्यंत पंचनामा करीत होते!

हा गुन्हा दाखल करण्यासाठी शासकीय अधिकार्‍यांना आठ तास बसवून ठेवल्याची चर्चा असल्याबाबद राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय सोनवणे यांनी सांगितले, की अन्न, औषध प्रशासनाचे अधिकारी सकाळपासूनच पोलिस ठाण्यात बसून होते. मात्र तक्रार दाखल करण्यापूर्वी पंचनामा केला जाईल, असे त्यांनी सांगितले होते. सायंकाळपर्यंत पंचनामा केल्यानंतर त्यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा सायंकाळी दाखल केला.


अंगावर हात टाकण्याची हिंमत येते कशी?

अवैध धंद्यांच्या ठिकाणी छापा पडल्यास आरोपींकडून अधिकार्‍यांवर हल्ला होणे ही मोठी गोष्ट आहे. अधिकारी व आरोपींमध्ये काही तरी देवाणघेवाण होत असेल आणि देवाण घेवाण होऊनही कारवाई होत असल्यास अवैध धंदे करणारे अधिकार्‍यांवर हात उचलण्यास मागेपुढे पाहत नाहीत, अशी चर्चा आहे. त्यामुळे अधिकार्‍यावर हात उचलूनही गुन्हा दाखल न झाल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.


‘मी तर पाठलाग करताना पडलो’

अन्न, औषध प्रशासनाचे सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार यांनी ‘पुढारी’ला सांगितले, की मला मारहाण झाली नाही. सही न करता आरोपी पळत असताना मी पाठलाग करताना पडलो. त्यामुळे कपडे फाटले व हाताला लागले. संबंधित ठिकाणाहून भेसळयुक्त दूध, कॅनमधील द्रव्यसाठा, व्हे पावडर जप्त केली आहे. मात्र लॅब अहवाल येईपर्यंत भेसळीबाबत कारवाई करता येणार नाही.


कारवाई होते; पण गुन्हा दाखल होत नाही!

दोन वर्षांमध्ये अन्न, औषध प्रशासनाने राहुरी तालुक्यात अनेक ठिकाणी छापेमारी केली. परंतु छापेमारीनंतर रसायन व साहित्य नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठविली जातात. नमुन्यांचा अहवाल येईपर्यंत पुलाखालून बरेचसे पाणी वाहून जाते आणि नंतर कारवाईची तीव्रताही कमी होते. छापेमारीनंतर नमुना अहवालाकडे बोट दाखवून गुन्हे दाखल न झाल्याने भेसळखोरांची हिंमत वाढत असल्याचे बोलले जात आहे.


The post दुध भेसळीच्या छाप्याने काटा कोणाचा? appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T0SrT3

बोगस डॉक्टरांचा प्रश्न लोकसभेत

नगर : पुढारी वृत्तसेवा : सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून, लोकसभेत बोगस डॉक्टरांचा अतारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. जिल्ह्यात यंदाच्या आर्थिक वर्षात एक बोगस डॉक्टर आढळून आला. गेल्या पाच वर्षांत 9 बोगस डॉक्टर आढळून आले असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाकडे पाठविली जाणार आहे.

ग्रामीण आणि डोंगराळ भागात बनावट डॉक्टर दवाखाने उघडून गोरगरिबाच्या आरोग्याशी खेळत आहेत. याबाबत जिल्हा आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात आहे. प्रसंगी या डॉक्टरांकडे कानाडोळा देखील केला जात आहे. अनेकदा बोगस डॉक्टरांवर जुजबी कारवाई केली जाते. परंतु राज्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचे प्रमाण वाढले असल्याचे पुढे आले आहे. या बोगस डॉक्टरांबाबतचा अतारांकित प्रश्न थेट संसदेचे हिवाळी अधिवेशनात उपस्थित करण्यात आलेला आहे.


यंदा किती बोगस डॉक्टर आढळून आले, त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली. गेल्या पाच वर्षांत किती जण आढळून आले असून त्यांच्यावर काय कारवाई केली आहे. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने राज्य शासनाकडे मागितली आहे. राज्य शासनाने तत्काळ जिल्हास्तरावरुन माहिती मागवली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने माहिती गोळा करण्यास धावपळ सुरु झाली.


जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जिल्हा प्रशासनाकडे अहवाल पाठविला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक विभागाकडे एकही बोगस डॉक्टर आढळून आला नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. जिल्ह्यात 120 प्राथमिक आरोग्य केंद्र व 555 उपकेंद्र आहेत. ग्रामीण भागात 993 खासगी दवाखाने आहेत. अशा परिस्थितीत देखील बोगस डॉक्टर आढळून आले आहेत. यंदाच्या वर्षी 2023-24 मध्ये अवघा एक बोगस डॉक्टर आढळला असून, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सन 2018-19 मध्ये 2, 2019-20 वर्षात 4 बोगस डॉक्टर आढळून आले. 2020-21 या वर्षात मात्र, एकही बोगस डॉक्टर आढळला नाही. 2021-22 मध्ये 1 तर 2022-23 या वर्षात 2 बोगस डॉक्टर आढळून आले आहेत. या सर्व बोगस डॉक्टरांवर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.


तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत बोगस डॉक्टर शोध मोहीम राबवली जात असल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने लवकरच अहवाल राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे.


The post बोगस डॉक्टरांचा प्रश्न लोकसभेत appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T0QRWZ

अहमदनगर : निळवंडे धरणाचा डावा कालवा फोडण्याचा प्रकार; २९ जणांवर कारवाई

अकोले; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील निळवंडे धरणाचा डावा कालवा फोडण्याचा आंदोलकांनी प्रयत्न करुन जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. याप्रकरणी आज (दि. १९) अकोले पोलिसांत २९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


गाव शिवार ते खानापुर शिवारादरम्यान निळवडे धरणाच्या डाव्या कालव्याच्या बांधावर आज (दि.१९) सकाळी आंदोलक जमा झाले. व त्यांनी येथील ओढयाजवळ टिकाव खोऱ्याच्या सहाय्याने खोदण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर खानापुर गर्दणी डाव्या कालव्याच्या पुलावर बैठक मांडुन त्यांनी आंदोलन केले. खानापूर परिसरात कलम १४४ लागू असतानाही खानापूर येथे आदोलन करत आंदोलकांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. म्हणुन सुनिता अशोक भांगरे, मिनानाथ सखाराम पांडे, अमित अशोक भांगरे, सुरेश संपत गडाख, बाळासाहेब बाबुराव भांगरे, माधव राजाराम भांगरे, अनिकेत धर्मनाथ थिटमें, बबनराव पुंजाजी तिकांडे, रामहारी तिकांडे, कविता भांगरे, इंदुबाई शिवाजी थिटमे, अनुसयाबाई थिटमे, भाग्यश्री विजय आवारी, विनोद हांडे, विकास बंगाल, संत तिकांडे, महेश भानुदास तिकांडे, राजेंद्र कुमकर, राजेंद्र शेवाळे यासह २९ जणांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.


हेही वाचा :* सांगली : पांढरेवाडीतील अवैध वाळू वाहतूक रोखल्याने पोलीस पाटीलला मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

* आई-बाबा जेव्हा ओझे होतात… तीन वर्षांत 102 वृद्धांची ‘भरोसा’कडे धाव

* Nandurbar Police: मुलींची छेड काढणाऱ्या १७ टवाळखोरांना पोलिसांचा दणका


The post अहमदनगर : निळवंडे धरणाचा डावा कालवा फोडण्याचा प्रकार; २९ जणांवर कारवाई appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T0Mz73

शेतकर्‍यांना कर्जमाफीचे वेध ! तूर्त दिलासा; त्यानंतर परतफेड कशी ?

नगर : पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही वर्षांपासून निसर्गाचा वाढता असमतोल आणि शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शेती व शेतकरी अडचणीत सापडला आहे. परिणामी, जिल्हा बँकेच्या सभासद असलेले 1 लाख 11 हजार 379 शेतकरी थकबाकीदार झाले असून, त्यांच्या डोक्यावरील 1089 कोटींचा कर्जाचा डोंगर वाढताच आहे. दरम्यान, जिल्हा बँकेशिवाय अन्य राष्ट्रीयीकृत बँकांच्या थकीत आकड्याची यात भर पडणार आहे. तर्तू सरकारने कर्जवसुलीला स्थगिती दिली असली, तरी पुढे तरी हे कर्ज कसे परत करणार, या चिंतेतील शेतकर्‍यांना विधिमंडळ अधिवेशनातील संभाव्य कर्जमाफीचे वेध लागले आहेत.


या वर्षी अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे नद्या, नाले वाहिलीच नाही, तलावातही पाणी कमी आहे. धरणातील पाणीदेखील जायकवाडीला सोडले. या दुष्काळी परिस्थितीत पीकविमा कंपनीने हात वर केले. त्यात मध्यंतरी अवकाळीने शेतीपिकांचे नुकसान केले. पंचनाम्याची कागदे रंगली, त्यातही शेतकर्‍याच्या हाती भोपळाच. यातून कशाबशा हाती आलेल्या कपाशीला भाव नाही, सोयाबीनही कवडीमोल दरात विकले गेले, कांद्याचे भाव कोसळले, इथेनॉलच्या निर्णयामुळे ऊसदराचा प्रश्नही समोर उभाच, जोडधंदा असलेल्या दुधाचे भावही पडले, तर दुसरीकडे रासायनिक खते, पशुखाद्य, मजुरी व दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तू मात्र महागल्या, त्यामुळे शेतीचा खर्च आणि त्यातून मिळणारे उत्पन्न याचे गणित न जुळल्याने शेतकर्‍याला आपले कर्ज वेळेवर परत करता आलेले नाही.


जिल्हा बँकेकडून गेल्या वर्षी रब्बीचे आणि त्यानंतर खरिपासाठी पीककर्ज दिले होते. मात्र 2020 पासून शेतकर्‍यावर दुष्टचक्र फिरल्याने थकबाकीदार शेतकर्‍यांची संख्या वाढतीच आहे. आजअखेर जिल्हा बँकेतून शेतीचे कर्ज उचललेले सुमारे 1 लाख 11 हजार 379 शेतकरी ‘एनपीए’त गेले आहेत. त्यांच्याकडे 1089 कोटींची थकबाकी असल्याची माहिती प्रशासनाकडून समजली आहे. आता अगोदरच थकबाकी असल्याने बँक त्यांना पुन्हा दारात उभे करणार नाही, त्यामुळे रब्बीच्या पिकांची, त्याच्या मशागतीचेच आव्हान त्याच्यासमोर असल्याने ही थकबाकी मेटाकुटीस आलेला हा शेतकरी शासनाची कागदावरील ‘दुष्काळसदृश सवलती’नंतर तरी परत कसा करणार, याविषयी प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे शासनानेच अधिवेशनात कर्जमाफीचा निर्णय घेऊन दिलासा द्यावा, यासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या नजरा अधिवेशनाकडे आणि त्यामध्ये शेतकर्‍यांची बाजू मांडणार्‍या आमदारांकडे लागल्या आहेत.


खरिपासाठी 5067 कोटींचे वाटले कर्ज!

जिल्ह्यातील एकूण 22 बँकांमधून शेतकर्‍यांना पीककर्ज दिले जाते. खरीप हंगामासाठी 6 लाख 30 हजार 816 शेतकर्‍यांना 5980 कोटींचे कर्ज देण्याचे उद्दिष्ट होते. यापैकी प्रत्यक्षात 4 लाख 64 हजार 561 शेतकर्‍यांना 5067 कोटींचे कर्जवाटप झालेले आहे.


रब्बीचे अवघे 13 टक्के कर्जवाटप!

रब्बी हंगामासाठी 2 लाख 86 हजार 597 शेतकर्‍यांना 2673 कोटी कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात गेल्या आठवड्यातील एका आकडेवारीनुसार आतापर्यंत केवळ 23 हजार 423 शेतकर्‍यांना 359 कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. ही टक्केवारी अवघी 13.46 टक्के असल्याचेही समोर आले आहे.


 


सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे शेतीमालाचे भाव सातत्याने पाडले जात आहेत. कांदा, दूध, सोयाबीनसारख्या शेतमालाला भाव न मिळाल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. अशा परिस्थितीत सरकारने सहाय्य न केल्यास शेतकरी आत्महत्या आणखी वाढतील. सरकारने शेतकर्‍यांचे संपूर्ण कर्ज माफ केले पाहिजे.

                                                                      -डॉ. अजित नवले, किसान सभा


The post शेतकर्‍यांना कर्जमाफीचे वेध ! तूर्त दिलासा; त्यानंतर परतफेड कशी ? appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T0KTQR

Vlog#1 | प्रभू श्रीरामांची शोभायात्रा | शिर्डीतून अक्षदांचे कलश अयोध्येला पाठविले

Vlog#1 | प्रभू श्रीरामांची शोभायात्रा | शिर्डीतून अक्षदांचे कलश अयोध्येला पाठविले

ह्या व्हिडीओ पासून मी माझे चॅनेल पुन्हा सुरू करत आहे. 300 वर्षांच्या प्रतिक्षे नंतर अयोध्येत प्रभू श्री रामांचे भय मंदिर साकारले गेले आहे, 22 जानेवारीला प्रभू श्रीराम तिथे विराजमान होणार आहेत, त्यासाठी शिर्डीतून सर्व हिंदूंनी अक्षदांचे कलश अयोध्येला पाठविले. तीच शोभायात्रा आजच्या व्लॉग माघे आपण बघू. #jaishreeram #shirdi #modi #vlog #saibaba #rss #bjp #hindu
via YouTube https://www.youtube.com/watch?v=cSXIBTRV92s

अहमदनगर : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी नजीक अपघात, ४ ठार

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी जवळ भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने रस्त्यावरी पलटी झालेल्या कारला धडक दिल्याने दुहेरी अपघाताची घटना घडली. या भीषण अपघातात कारमधील चार जण ठार झाले तर चारजण गंभीर जखमी आहेत. रविवारी (दि. १७) सायंकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास ही हा दुहेरी अपघात झाला.


पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगावकडून संगमनेरच्या दिशेने अकोले तालुक्यातील काहीजण कारने (क्र.एमएच १७एजे२६९६) येत होते. चंदनापुरी शिवारातील जावळे वस्तीजवळ असणाऱ्या हॉटेल पांडुरंग जवळ ही कार पलटी होऊन अपघात झाला. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने नाशिककडे जाणाऱ्या मालवाहतूक कंटेनरने (युपी 24 टी. 8550) थेट पलटी झालेल्या कारला धडक दिली. कंटेनरखाली कार चेपल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात सुरेश धारणकर (वय४२), सुनील धारणकर (वय ६५), अभय सुरेश धारणकर (वय ४५) आणि ओजवी धारणकर (वय वर्ष २) हे सर्व रा कुंभेफळ ता. अकोले येथील असून चारही जण गंभीरित्या जखमी झाले.


अपघाताची माहिती मिळताच डोळा सणे महामार्ग पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली परिसरातील नागरिकांनी व पोलिसांनी, कंटेनर खाली दबलेल्या कारमधील वरील सर्व बाहेर काढले आणि तात्काळ संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले मात्र उपचारापूर्वीच कारमधीलवरील चारही जण मयत झाले असल्याचे राष्ट्रीय महा मार्ग विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले.


The post अहमदनगर : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी नजीक अपघात, ४ ठार appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T0GGpV

Crime News : दूध भेसळखोरांचा अधिकार्‍यांवर हल्ला

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात दोन ठिकाणी दूध भेसळखोरीचा प्रकार शुक्रवारी (दि. 15)अन्न, औषध भेसळ प्रतिबंधक विभागाने टाकलेल्या छाप्यांमध्ये उघडकीस आला. मात्र त्या वेळी दूधसंकलन केंद्रावर छापा टाकणार्‍या अधिकार्‍यावर हल्ला करण्यात आला. त्याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील शिलेगाव व माहेगाव येथे दूध भेसळ होत असल्याची तक्रार गुप्त खबर्‍यामार्फत अन्न, औषध भेसळ प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. त्यानुसार नाशिक विभागाचे सहआयुक्त संजय वारघुडे व नगरचे सहायक आयुक्त भूषण मोरे यांनी संयुक्त पथक तयार करून, शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास शिलेगाव येथे छापा टाकला. तेथे विजय विठ्ठल कातोरे यांच्या शेती क्षेत्रात दूध भेसळ सुरू असल्याचे निदर्शनास आले. पथकाने भेसळीचे रसायन, तसेच व्हे पावडर जप्त करण्याचा प्रयत्न केला असता कातोरे बंधूंनी अडथळा आणला व अधिकार्‍यांवर हल्ला केला. त्यात अन्न, औषध भेसळ प्रतिबंधक विभागाचे सुरक्षा अधिकारी डॉ. प्रदीप पवार यांच्या हाताला दुखापत झाल्याचे समजते. दरम्यान, विजय कातोरे तेथून पळून गेला. साहिल अजय कातोरे (वय 20) यास ताब्यात घेण्यात आले.


संबंधित बातम्या :* Devendra Fadnavis : मराठा समाजाच्या आरक्षणाला शरद पवारांचा सर्वाधिक विरोध : देवेंद्र फडणवीस 

* Devendra Fadnavis : ड्रग्ज प्रकरणात फडणवीसांकडून आमदार देवयानी फरांदे यांची पाठराखण

* Nagar : काष्टीचा बाजार अवैध धंद्यांच्या विळख्यात


पथकाने नंतर माहेगाव येथेही छापा टाकला. तेथे बाळासाहेब हापसे यांच्या शेती क्षेत्रात दूध भेसळीचे रसायन व व्हे पावडर मोठ्या प्रमाणात आढळली. त्या वेळी हापसे पसार झाला. पथकाने जप्त केलेले भेसळीचे दूध, रसायन, व्हे पावडर राहुरी पोलिस ठाण्यात आणली. गुन्हा दाखल करण्यासाठी पथकाने सकाळपासून रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला होता. दरम्यान, मोरे यांनी पत्रकारांना सांगितले, की दंडात्मक कारवाईनंतर हापसे व कातोरे यांच्यावर नमुने अहवाल मिळाल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल. विजय कातोरे यांनी धक्काबुक्की केल्याने त्याच्याविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अन्न, औषध प्रशासनाचे सुरक्षा अधिकार्‍यांच्या पथकातील प्रदीप कुटे, राजेश बडे, डॉ. प्रदीप पवार, योगेश देशमुख, नमुना सहायक प्रसाद कुसळेकर यांनी पत्रकारांना कारवाईची माहिती दिली.


त्या पॅराफिनचे पाणी झाले का?

सकाळीच दूध भेसळीचे साहित्य ताब्यात घेऊन अन्न, औषध भेसळ प्रतिबंधक विभागाचे अधिकारी राहुरी पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी अधिकार्‍यावर हल्ला होऊन व्हे पावडर व पॅराफिन लिक्विड जप्त केल्याची माहिती दिली. परंतु रात्रीच्या वेळी पॅराफिन लिक्वीड नसून भेसळ करताना पाणी वापरत असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. त्यामुळे सकाळी जप्त केलेले पॅराफिन लिक्विडचे सायंकाळी पाणी झाले का? अशी चर्चा राहुरीत सुरू आहे.


The post Crime News : दूध भेसळखोरांचा अधिकार्‍यांवर हल्ला appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T0Db7M

Shirdi: अयोध्येत निर्माण झालेल्या भव्य श्रीराम मंदिराच्या अक्षदांच्या कलश पूजनाची मिरवणूक शिर्डीतून
http://dlvr.it/T0DF97

स्वस्तात सोन्याचे आमिष; सराईत आरोपी गजाआड

नगर : पुढारी वृत्तसेवा :  स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून दरोडा टाकणार्‍या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नान्नज (ता. जामखेड) शिवारातून ताब्यात घेतले. त्याला अटक करून जामखेड पोलिसांच्यात ताब्यात दिले. नकुल उर्फ कारभारी अरुण भोसले (वय 25, रा. टाकमुकवाडी, ता. परांडा, जि. धाराशिव) असे आरोपीचे नाव आहे. अधिक माहिती अशी, फिर्यादी रघुनाथ ऋषिकेश शिंदे (वय 48, रा. संतोषनगर, कात्रज, पुणे) यांना अनोळखी 4 पुरुष आरोपी व 2 अनोळखी आरोपी यांनी स्वस्तामध्ये सोने देतो असे सांगून राजुरी शिवार (ता. जामखेड) येथे बोलावून घेतले. तिथे आल्यानंतर त्यांना काठ्याने मारहाण करून 10 लाख 11 हजार रुपये दरोडा टाकून चोरून नेले. याबाबत जामखेड पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता.


पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना माहिती मिळाली, वरील गुन्हा नकुल अरुण भोसले (रा. उस्मानाबाद) याने त्याच्या साथीदारांसह केला आहे. संशयित आरोपी नकुल भोसले नान्नज शिवारात येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी नान्नज शिवारात सापळा लावला. संशयित व्यक्ती दिसताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. विचारपूस केल्यानंतर त्याने वरीलप्रमाणे नाव सांगितले. त्याने इतर साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात, विश्वास बेरड, रविंद्र कर्डिले, भिमराज खर्से, विशाल दळवी, फुरकान शेख, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, सागर ससाणे, रोहित मिसाळ, मेघराज कोल्हे, अरुण मोरे यांच्या पथकाने केली.


हेही वाचा :* जिद्दीला सलाम ! 13 किमी अंतरावरील बससाठी 23 वर्षं केला पाठपुरावा

* इकडे लक्ष द्या ! पास नसेल तर शिर्डीतील मंदिरात मिळणार नाही प्रवेश


The post स्वस्तात सोन्याचे आमिष; सराईत आरोपी गजाआड appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T0BhPK

Nagar : रक्त सांडू नका, भरीव निधी देतो : उपमुख्यमंत्री अजित पवार

नगर : पुढारी वृत्तसेवा : भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या छत्रपती चौथे शिवाजी महाराजांचे स्मारक स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष सुरू झाले, तरी उपेक्षित राहिले याचे दुःखद आहे. परंतु, निधी नाही म्हणून रक्त सांडू नका. चौथे शिवाजी महाराजांच्या आठवणी तेवत ठेवण्यासाठी त्यांच्या नावे सुरू असलेल्या विद्यार्थी साह्यता केंद्राचे काम अभिमानास्पद आहे. याकामी 80 लाखांचा निधी त्वरित उपलब्ध करू देऊ, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी चौथे शिवाजी महाराजांच्या स्मारकाला निधी मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहिले होते.


त्या पार्श्वभूमीवर स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात भेट घेऊन निधीची मागणी केली. यावेळी आमदार संग्राम जगताप, संघटनेचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल, बांधकाम व्यावसायिक धिरज कुमटकर, विनीत गाडे, मयुर ढगे आदी उपस्थित होते. यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी विद्यार्थी संघटनेने गेल्या पंधरा वर्षापासून छत्रपती चौथी शिवाजी महाराज स्मारकासाठी केलेल्या कामाची माहिती दिली.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यार्थी संघटनेच्या निवेदनाची तात्काळ दखल घेत भरीव निधी देण्याची हमी दिली. ते म्हणाले, यापुढे चौथे शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ सर्वांना प्रेरणास्थळ म्हणून परिचित होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करू. शासन स्तरावरून छत्रपती चौथी शिवाजी महाराज स्मारकासाठी यापुढे निधी कमी पडणार नाही याची दक्षता घेऊ. दरम्यान, स्मायलिंग अस्मिताचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल यांनी उपमुख्यमंत्र्यांना अहमदनगरच्या दौर्‍यावर आल्यावर स्मारकास भेट देण्याची विनंती केली. यावरही पवारांनी होकार भरला.


हेही वाचा :* Nagar : स्वच्छ भारत मिशन ‘कचर्‍यात’! घनकचर्‍याचे अनेक प्रकल्प हरवले काटेरी झुडपांत

* Nagar : शासकीय कागदपत्रांसाठी मागितली हजाराची लाच


The post Nagar : रक्त सांडू नका, भरीव निधी देतो : उपमुख्यमंत्री अजित पवार appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T08Fwq

Shirdi : शाहरुख खान शिर्डीच्या साई चरणी | Shahrukh Khan Spotted in Shirdi
http://dlvr.it/T08CQG

Nagar : ‘त्या’ संस्थेचा ठेका संपला, कुत्रे मोकाट

 नगर : पुढारी वृत्तसेवा : शहरात मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. त्यामुळे नगरसेवक व स्थानिक पदाधिकार्‍यांनी वारंवार मनपा अधिकार्‍यांना धारेवर धरले. त्यामुळे मनपाने पहिल्याच संस्थेला तीन महिन्यासाठी मुदत वाढ दिली होती. आता त्या संस्थेची तीन महिन्यांची मुदत संपली. एकीकडे मोकाट कुत्र्यांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असताना पुन्हा कुत्रे मोकाट झाले. नगर शहरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे. कुत्र्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना रस्त्याने पायी चालणे मुश्किल झाले आहे. शाळकरी मुलांना कुत्र्याने चावा घेतल्याच्याही अनेक घटना शहरात घडत आहेत.


स्थायी समिती, सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवकांनी मोकाट कुत्र्यांवरून अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले होते. मोकाट कुत्रे पकडण्याचा आणि निर्बिकरण करण्याचा ठेका पुण्याच्या पीपल्स फॉर अ‍ॅनिमल संस्थेला देण्यात आला होता. त्या संस्थेचा करार संपल्यानंतरही मनपाने दुसरी निविदा केली नव्हती. नगरसेवकांनी स्थायी समिती व सर्वसाधार सभेत धारेवर धरल्याने मनपा अधिकार्‍यांनी घाई-घाईत त्याच संस्थेला तीन महिन्यांची मुदत वाढ दिली होती. आता त्या संस्थेची तीन महिन्याची मुदत वाढ संपली असून, संस्थेने तसे पत्र महापालिकेला दिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महापालिकेच्या हद्दीतील कुत्रे मोकाट झाले. दरम्यान, मोकाट कुत्रे पकडणे व निर्बिकरण करणे याबाबच ठेका नवीन संस्थेला देण्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू आहे. लवकरच नवीन संस्थेला काम देण्यात येईल, असे मनपा अधिकार्‍यांनी सांगितले.


The post Nagar : ‘त्या’ संस्थेचा ठेका संपला, कुत्रे मोकाट appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T05nBQ

मराठा-ओबीसी नेत्यांच्या वक्तव्याने मनाला वेदना : छत्रपती संभाजीराजे

संगमनेरः पुढारी वृत्तसेवा : सध्या मराठा- ओबीसी समाजाच्या नेत्यांमध्ये वाद सुरु आहे. ते करीत असलेल्या वक्तव्यांमुळे छत्रपतींचा एक वंशज म्हणून मला मनापासून वेदना होत असल्याची खंत छत्रपती संभाजी राजे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

छत्रपती संभाजी राजे एका खासगी कार्यक्रमानिमित्त संगमनेरला आले होते. प्रारंभी स्वराज्य पक्षाच्या वतीने त्यांचे ढोल- ताशांच्या गजरात स्वागत केले. संभाजी राजे यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.


यानंतर संगमनेर बस स्थानकावर सकल मराठी समाजाच्या वतीने 47 दिवसांपासून सुरू असलेल्या साखळी उपो षणास त्यांनी भेट दिली. ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे,’ या घोषणांनी परिसर दणाणला. छत्रपती संभाजी राजे म्हणाले, मराठा व ओबीसी समाज हे दोघे एकमेकांचे भावंडे आहेत. एकाच छताखाली आणि एका गावात राहणारे हे लोक आहेत. त्या दोन्ही समाजाचे नेते एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करीत आहेत. यामुळे या दोन्ही समाजामध्ये एकमेकांविरुद्ध दरी निर्माण होत आहे.


सामान्य मराठा व सामान्य ओबीसी यांच्यात बाधा येईल, अशी वक्तव्य व शब्दरचना दोन्ही समाजाच्या नेत्यांनी करू नये, असा सल्ला देत छत्रपती संभाजी राजे म्हणाले, सध्या महाराष्ट्रात मराठा- ओबीसी दोन समाजातून वक्तव्य येत आहेत. इंदापूर येथे धनगर समाजाचे नेते आ. गोपीचंद पडळकर यांच्यादिशेने चप्पल फेकून मारली. हे काही सध्या चालले आहे, ते महाराष्ट्राच्यादृष्टीने अशोभनीय असल्याची खंत छत्रपती संभाजी राजे यांनी व्यक्त केली. यावेळी सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषणाची माहिती छत्रपती संभाजी राजे यांना दिली. यावेळी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


हेही वाचा* Nagar Crime News : किलर अण्णा वैद्य मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल होणार

* जागतिक बाजारपेठेत भारतीय शेअर बाजाराचा डंका! हाँगकाँगला टाकले पिछाडीवर

* Dhule Pimpalner : कर्म.आ.मा. पाटील महाविद्यालयात एच.आय.व्ही. सप्ताह 


The post मराठा-ओबीसी नेत्यांच्या वक्तव्याने मनाला वेदना : छत्रपती संभाजीराजे appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T03Gxl

म्हाळुंगी पूल निधीवरून भाजप-काँग्रेसमध्ये श्रेयवाद

संगमनेर: पुढारी वृत्तसेवा :  राज्य सरकारने म्हाळुंगी नदीच्या नवीन पुलासाठी निधी मंजूर केला असून काम सुरू होणे अद्याप बाकी आहे. त्यापूर्वीच भाजप-काँग्रेस समर्थकांत श्रेयवाद सुरू झाला आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे आणि काँग्रेसचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात समर्थकांकडून निधी मंजुरीवरून दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. पुलाचे श्रेय कुणीही घ्या, परंतु पुलाचे काम सुरू करण्यासाठी पुढाकार घ्या, अशी मागणी घोडेकर मळा पंपिंगस्टेशन व साईनगर परिसरातील नागरिक व शालेय विद्यार्थ्यांनी केली आहे.

संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीवर नवीन पूल बांधावा, त्यासाठी निधी मिळावा म्हणून महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगत त्यामुळे या पुलासाठी निधी मंजूर झाल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे.


विरोधक निधी मंजूर झाल्याचा दावा करत असेल तर त्यांनी पाठपुरावा केल्याचा पुरावा दाखवावा, असे आवाहन भाजपने पत्रकार परिषदेत केला. पुराव्यानिशी बोलत असून मंत्री विखे यांनीच निधी वळविण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांना सूचना केली. त्यानंतरच शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठीचा मंजूर निधी म्हाळुंगी नदी पुलासाठी वळविण्यात आला. त्यामुळे श्रेय भाजपचेच असे विखे समर्थक ठणकावून सांगत आहे. नदीवरील जुना पुल माजी खा. स्व बाळासाहेब विखे यांनी मंजूर करून बांधकाम केले होते. जुन्या-नव्या पुलाच्या बांधकाम निधीसाठी विखेंचे श्रेय असल्यानेच पुलास स्व. बाळासाहेब विखे पाटील यांचे नाव देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, तालुकाध्यक्ष वैभव लांडगे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ, जावेद जहागीरदार, राहुल भोईर यांनी सांगितले.


म्हाळुंगी नदी नवीन पुलास निधी मंजूर करून त्याचे काम तत्काळ सुरू करावे अशा मागणीचे पत्र काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 30 नोव्हेंबर 2022 ला दिले होते. मात्र हा निधी मिळू नये, यासाठी भाजप नेत्यांकडून अडथळे आणत निधी अडविण्याचा प्रयत्न केल्याचा प्रतिदावा आ. थोरात समर्थकांनी केला आहे. आता प्रत्यक्षात पुलाच्या कामाला सुरुवात होणार असल्याने भाजपचे श्रेयासाठी पुढे सरसावली आहे. ‘त्यांनी’ एक तरी चांगले काम केले का? असा सवाल उपस्थित करत फक्त पत्रकबाजी करण्यात तसेच खोट्या बातम्या पसरविण्यात ते पुढे आहेत.


भाजप नेत्याचे आणि पक्षाचे संगमनेरातील विकासकामांमध्ये योगदान काय?, असा परखड सवाल युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष निखिल पापडेजा यांनी उपस्थित केला. आ. बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातूनच म्हाळुंगी नदी पुलाचे काम होणार असल्याचे सर्व नागरिकांना माहिती आहे. भाजप नेत्यानी केलेल्या खोट्या प्रसिद्धीला संगमनेरकर भुलणार नाही, असे ही पापडेजा यांनी ठणकावून सांगितले.


‘आम्ही संगमनेरकर पूल बनाव समिती’चेही योगदान

संगमनेर शहरातील साईनगर पंपिंगस्टेशन, घोडेकर मळा भागातील नागरिकांनी एकत्रित येत ‘आम्ही संगमनेरकर पुल बनाव समिती’च्या वतीने आंदोलने केल्यानेच प्रशासनाला व सरकारला निधी मंजूर करण्यास भाग पाडले. तांत्रिक मंजुरीही मिळाली होती, परंतू पुलासाठी निधी मंजूर केल्याचा दावा करणारे भाजप, काँग्रेस पदाधिकारी श्रेयवादासाठी सरसावले आहेत. पुलाच्या कामासाठी निधी मिळविण्यात दोन्ही राजकीय पक्षाच्या नेत्यांचे जितके योगदान आहे, तितकेच आंदोलनकर्त्यांचेही आहे. त्यामुळे श्रेयावादावरून लढण्यापेक्षा आता प्रत्यक्षात काम सुरू करण्यासाठी या दोन्ही पक्षाच्या या नागरिकांनी केली आहे.


 


The post म्हाळुंगी पूल निधीवरून भाजप-काँग्रेसमध्ये श्रेयवाद appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T00ljG

मराठा ओबीसी नेत्यांच्या वादाची मला वेदना होते : संभाजीराजे छत्रपती

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : छत्रपतींचा एक वंशज म्हणून मला सध्या मराठा आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांमध्ये जो वाद चालू आहे त्याचा मला मनापासून वेदना होत असल्याची खंत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली. संगमनेर येथे माध्यमांशी बोलताना असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.


संभाजीराजे छत्रपती एका खाजगी कार्यक्रमाच्या निमित्ताने संगमनेरला आले होते. सर्वप्रथम स्वराज्य पक्षाच्या वतीने त्यांची ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर संगमनेर बस स्थानकावर सकल मराठी समाजाच्या वतीने 47 दिवसापासून सुरू असणाऱ्या साखळी उपोषणास त्यांनी भेट दिली. एक मराठा लाख मराठा मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. त्यांच्या समवेत स्वराज्याचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस डॉ धनंजय जाधव जिल्हाप्रमुख आशिष कानवडे होते.


संभाजीराजे छत्रपती म्हणाले की सध्या मराठा समाज आणि ओबीसी समाजाचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. त्यामुळे या दोन्ही समाजामध्ये एक मेकां विरुद्ध दरी निर्माण होत आहे. त्यामुळे त्यांनी मराठा ओबीसी समाजामध्ये बाधा येणार नाही अशी वक्तव्य करू नये दोन्ही समाजाच्या नेत्यांनी वक्तव्य करत असतांना समाजाच्या भावना लक्षात घेतल्या पाहिजे, असा सल्ला संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा ओबीसी समाजाच्या नेत्यांना दिला यावेळी छावा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष खंडू सातपुते यांनी सकल मराठा समाजाच्या उपोषणाबाबतची माहिती छत्रपती संभाजी राजे यांना दिली यावेळी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संगमनेर बस स्थानकावर सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असणाऱ्या साखळी उपोषणास छत्रपती संभाजी राजे यांनी भेट दिली तेव्हा माध्यमांशी ते बोलत होते.


The post मराठा ओबीसी नेत्यांच्या वादाची मला वेदना होते : संभाजीराजे छत्रपती appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SzySWj

शिधापत्रिका होणार लवकरच ऑनलाईन

नगर : पुढारी वृत्तसेवा :  शासनाकडून गोरगरीब जनतेला स्वस्त दरात दरमहा धान्य उपलब्ध केले जात आहे. त्यासाठी घरटी एक शिधापत्रिका दिली जात आहे. कित्येक वर्षांपासून वापरात असलेल्या शिधापत्रिका जुन्या आणि जीर्ण होत आहेत. अशा शिधापत्रिका गोरगरीब जनतेला सांभाळणे कठीण होत आहे. सध्या तंत्रज्ञानाने भरारी घेतली. या तंत्रज्ञानाचा उपयोग ई-शिधापत्रिका तयार करण्यासाठी केला जाणार आहे. त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील आठ ते दहा लाख रेशनकार्डधारकांना ई-शिधापत्रिका उपलब्ध होणार आहेत.

देश स्वतंत्र झाल्यापासूनच राष्ट्रीय अन्नधान्य सुरक्षा योजनेच्या माध्यमातून गोरगरीब आणि गरजू व्यक्तींना स्वस्त दरात धान्य वाटप केले जात आहे. धान्य घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला एक शिधापत्रिका दिली जात आहे. यामध्ये कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचा उल्लेख असतो. सदस्यसंख्येवरून शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वाटप केले जात आहे. सध्या पिवळी, केशरी आणि पांढर्‍या रंगाच्या शिधापत्रिका वाटप केल्या आहेत. एके काळी नागरिकांची ओळख पटविण्यासाठी शिधापत्रिकेचा वापर केला जात होता. गोरगरीब जनतेसाठी शिधापत्रिका एक मौल्यवान दस्तावेज आहे.


आजमितीस सगळीकडे संगणक, लॅपटॉप युग अवतरले आहे. शिधापत्रिकाधारकांच्या नावे आता संगणकीकृत करण्यात आली आहेत. त्यामुळे आता पॉज मशीनद्वारे धान्यवाटप केले जात आहे. त्यामुळे धान्याचा काळाबाजार थांबून गरजूंना धान्य उपलब्ध होत आहे.

या तंत्रज्ञानाचा उपयोग आता ई-शिधापत्रिकेसाठी केला जाणार आहे. शासनाने प्रत्येक शिधापत्रिका ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लवकरच प्रत्येक नागरिकांची शिधापत्रिका ऑनलाईन होणार आहे.


जिल्ह्यात आजमितीस 30 ते 35 लाख जनतेला स्वस्त धान्य उपलब्ध होते. त्यामुळे जवळपास 8 ते 10 लाख शिधापत्रिकाधारक आहेत. या शिधापत्रिका टप्प्याटप्प्याने ई-शिधापत्रिका होणार आहेत. त्यासाठी सेतू, महा-ई-सेवा केंद्र आणि आपले सरकार या केंद्रचालकांना पहिले प्रशिक्षण दिले जाणार आहे. लवकरच अधिकारी व कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. नवीन अर्जदारांना पब्लिक लॉगिंग सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे घरी बसून मोबाईल व संगणकाद्वारे ई- शिधापत्रिकेसाठी अर्ज करता येणार आहे.


The post शिधापत्रिका होणार लवकरच ऑनलाईन appeared first on पुढारी.


http://dlvr.it/Szwm9s

देवळाली पालिकेच्या पाणी घोटाळ्याची चौकशी

राहुरीः पुढारी वृत्तसेवा :  देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या प्रशासकाने खुर्चीचा गैरवापर केल्याचे सांगत, मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी कर्तव्यात कसूर करून नगरपरिषदेचे नुकसान केल्याची तक्रार प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख आप्पासाहेब ढूस व जिल्हा प्रमुख अभिजीत पोटे यांनी केली. दरम्यान, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी तथा प्रांत यांची याकामी चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. याप्रकरणी 7 दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे साळीमठ यांनी आदेश दिल्याचे ढुस यांनी सांगितले. या आदेशाने देवळाली प्रवरा नगरपालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.


देवळाली प्रवरा पालिकेतील अनागोंदी कारभार व पाणी घोटाळा उघडकीस येण्यास यामुळे मदत होणार असल्याचे तक्रारदार ढूस म्हणाले. दरम्यान, ढुस व पोटे यांच्या मागणीवरून प्रहारचे संस्थापक- अध्यक्ष तथा आ. बच्चुभाऊ कडु यांनी नाशिक विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती. मुळा धरण ते देवळाली प्रवरा नळ पाणी पुरवठा योजनेच्या मुख्य पाईप लाईनवर एअर व्हॉल्वच्याखाली होल पाडून सुमारे 12 ठिकाणी अनधिकृत नळजोड दिले होते.


यातुन प्रतिदिन 70 लाख लिटर पाणी वाया जात होते. प्रहारने सदर नळ जोड बंद करण्यासाठी पालिकेला एक महिन्याचा अवधी दिला होता, तथापी ते बंद न केल्याने प्रहारने पालिकेवर मोर्चाचा इशारा दिला होता. ‘प्रहार’च्या मोर्चाच्या एक दिवसआधी पालिकेने नळ जोड बंद केल्याचे पत्र दिले, तथापि प्रहारचे ढूस यांनी पाईपलाइनचा समक्ष फेर सर्वे केला असता सदर नळ जोड सुरु असल्याचे दिसले. ढूस यांनी जीपीएस लोकेशन कॅमेर्‍याने चित्रीकरण केले होते.


सात दिवसांत चौकशी अहवाल सादर करा!

मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी कर्तव्यात कसूर करून पालिकेचे आर्थिक नुकसान केल्यासह खोटी माहिती दिल्याची तक्रार ‘प्रहार’चे आप्पासाहेब ढूस यांनी दाखल केली होती. प्रशासकाची नेमणूक असताना स्थानिक राजकीय व्यक्तीने या खुर्चीचा वापर केल्याचे ढूस यांनी चित्रीकरण करून तक्रार केली होती. राजकीय व्यक्तीस प्रशासकीय खुर्ची, दालन व सभागृह वापरण्यास प्रतिबंध करावा, असे आ. कडू यांनी नाशिक विभागीय आयुक्तांना पत्र दिले होते. दरम्यान, नगरचे जिल्हाधिकारी साळीमठ यांनी या दोन्ही घटनांच्या चौकशीसाठी उपविभागीय अधिकार्‍यांची नेमणूक केली. 7 दिवसांत चौकशी अहवाल सादर करावा, असे आदेश दिले आहेत.


The post देवळाली पालिकेच्या पाणी घोटाळ्याची चौकशी appeared first on पुढारी.


http://dlvr.it/Sztss7

shirdi: कर्नाटक काँग्रेस सरकारचे मंत्री प्रियांका खर्गे विरोधात जोडे मारो आंदोलन
http://dlvr.it/SzsYsp

Nagar : प्लास्टिक व्यवस्थापनासाठी 2.84 कोटींची खरेदी !

नगर : पुढारी वृत्तसेवा : पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टिक कचर्‍याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रत्येक तालुक्यात एक प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 14 प्रकल्पासाठी 2 कोटी 84 लाखांचा खर्च केला जाणार आहे. साहित्य खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, त्यात सर्वात कमी दराच्या नगरच्याच एका कंपनीला हे काम देण्याच्या हालचाली सुरू आहेत. प्लास्टिक ही अविघटनशील वस्तू असल्याने या वस्तूंचा किमान वापर व्हावा, तसेच ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतलेला आहे. जानेवारी 2023 मध्ये याबाबतचा तसा शासन आदेश निघाला होता. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात वर्षभरापूर्वीच तालुकानिहाय प्रकल्प उभारण्यासाठी प्रशासनाने तशा हालचाली सुरू केल्या होत्या.


शासनाच्या तत्कालिन अध्यादेशानुसार, राज्यात एकूण 357 तर नगर जिल्ह्यात 14 प्लास्टिक व्यवस्थापन प्रकल्प उभे केले जात आहेत. त्यासाठी प्रत्येक प्रकल्पाला सुमारे 16 लाखांचा निधी अंदाजित धरण्यात आला होता. त्यानंतर मात्र या रक्कमेत वाढ झाल्याचे दिसून येते. आता ही वाढ कोणाच्या मान्यतेने झाली, हे गुलदस्त्यात आहे.


जिल्ह्यातील 14 प्रकल्पातील मशिनरी खरेदीसाठी 16 मे 2023 रोजी निविदा ओपन केल्या असता भारतीय मानक संस्थेने प्रमाणित केलेल्या मशिनरी प्रमाणपत्र अटीची पूर्तता नसल्याने 8 पैकी एकही निविदा पात्र ठरली नाही. त्यानंतर 19 जुलै 2023 रोजी दुसर्‍यांदा निविदा मागविली. त्यात 6 निविदा आल्या. त्यातील दोनच निविदा पात्र ठरल्या. यात सर्वात कमी दर असलेल्या ‘त्या’ कंपनीला प्रकल्पाचे काम देण्याच्या हालचाली आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपुर्वी झालेल्या ई रिक्षाच्या खरेदीतही ‘ती’च कंपनी स्पर्धेत होती, मात्र त्यावेळी ते काम त्यांना मिळालेले नव्हते, आता मात्र प्रकल्पाचे काम दिले जाऊ शकते, असेही कानावर येते.


‘या’ मार्गदर्शनानुसार देणार कार्यारंभ

जेईएमवरील खरेदीत दुसर्‍या फेरीत दोनच निविदा पात्र ठरल्याने कार्यारंभ आदेशाबाबत संभ्रम होता. त्यातच शासनाच्या ग्रीन सिग्नल नंतर तसेच 2016 च्या मार्गदर्शक सूचनांचा आधार घेतला जात आहे. जेईएमवर दोन निविदा तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरल्यास खरेदीची वास्तविक किंमत व अगोदर ठरलेली अंदाजित किंमत यामध्ये वजा 20 टक्के ते अधिक 10 टक्के तफावत असल्यास ती मान्य करण्यास खरेदीदार विभागास मुभा राहील. या महत्वपूर्ण चार ओळींचा आधार घेवून सर्वात कमी दर आलेल्या कंपनीला कार्यारंभ आदेश दिला जाणार आहे. मात्र याविषयीही भविष्यात काही कायदेशीर प्रश्न निर्माण झाल्यास नवल वाटू नये.


‘या’ आहेत त्या चार मशिनरी !

तालुक्यातील एका-एका ग्रामपंचायत हद्दीत उभारलेल्या जाणार्‍या या प्रकल्पात चार-चार मशिनरी खरेदी केल्या जातील. प्लास्टीक कचरा स्वच्छ करण्यासाठी एक मशिनरी असेल. त्यानंतर दुसरी मशिन ही कचर्‍याचे बारीक तुकडे करणार आहे. तिसर्‍या मशिनरीतून झालेले तुकडे एकत्रित करून त्याचा गठ्ठा किंवा पॅकींग केल जाईल. त्यानंतर वजनकाट्यावर त्याचे मोजमाप होवून त्याची भंगार किंवा एमआयडीसी सारख्या ठिकाणी पुर्नवापरासाठी विक्री केली जाईल. त्याचे उत्पन्न प्रकल्पाला जागा दिलेल्या ग्रामपंचायतीला मिळणार आहे. तसेच चौथी मशिन ही सॅनेटरी पॅड जाळून टाकण्याचे काम करणारी आहे. 31 जानेवारी 2024 पर्यंत हे सर्व प्रकल्प पूर्ण करण्याचेही कंपनीला बंधनकारक असेल, असे सूत्रांनी सांगितले.


The post Nagar : प्लास्टिक व्यवस्थापनासाठी 2.84 कोटींची खरेदी ! appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SzrRJh

शिर्डी : भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष योगेश गोंदकर यांचा जन्मदिवस उत्साहात साजरा
http://dlvr.it/Szr7ZT

अकोलेत शंभर बेडचे उपजिल्हा रुग्णालय

अकोले : पुढारी वृत्तसेवा :  अनेक वर्षापासून अकोले तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयासाठी शासन दरबारी पाठपुरावा केल्याने महायुती सरकारने 37 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येऊन 100 बेडची व्यवस्थेमुळे सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या सोई सुविधा मिळणार आहेत. अकोले तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र 10 तर 72 उपकेंद्रे असून सुमारे अडीच लाख जनतेची आरोग्यसेवा या केंद्रावर अवलंबून आहे. आदिवासी भागातील मोलमजुरी करणार्‍या सर्वसामान्य कुटुंबियांना मजुरी बुडवून शहरात उपचार घेणे परवडत नसल्याने या आरोग्य केंद्रावर अवलंबून राहावे लागते. परंतु अकोले तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर, कर्मचार्‍यांच्या रिक्त पदांमुळे आरोग्यसेवेचा बोजवारा उडाला आहे.


तर आरोग्य कर्मचार्‍यांना मुख्यालयाच वावड असल्याने रात्रीच्या वेळी आरोग्य केंद्र, उपकेंद्राना कुलूप असल्याचा प्रत्यक्ष अनुभव रुग्णांना येत आहे. तालुक्यात राजूर, समशेरपुर, कोतूळ, अकोले या चार ग्रामीण रुग्णालये आहेत. अकोल्यात फक्त 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय असुन फक्त 30 खाटा, 10 कर्मचारी, 1 रूग्णवाहिका, 2 डॉक्टरावर सध्या सरकारी दवाखाना सुरु आहे. त्यामुळे, गेली कित्तेक वर्षे तालुक्यातील जनता आरोग्याच्या समस्यांना तोंड देत होती. उपजिल्हा रुग्णालयासाठी शासन दरबारी पाठपुरावा केल्याने महायुती सरकारने 37 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी, भुलतज्ज्ञ, एमडी मेडिसिन, एक सर्जन, एक स्त्रीरोगतज्ञ, 15 मेडिकल ऑफिसर, कर्मचारी, आयसीयु कक्ष, स्केक बाईट कक्ष, सर्जरी विभाग, महात्मा फुले योजना अंतर्गत सोईसुविधा तसेच 100 बेडची व्यवस्था, यांसह अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत.


यामुळे, उपजिल्हा रुग्णालय झाल्यानंतर अकोले तालुक्यातील आरोग्याची सुविधा सुटणार आहे. तसेच सध्याची इमारत पाडून त्याचे निर्लेखन केले जाईल आणि नव्याने इमी उभारली जाईल. त्यासाठी पहिला हाप्ता म्हणून 10 कोटी रुपये वर्ग केले जाणार आहेत. तर पहिल्या टप्प्यात 37 कोटी 85.11 लक्ष रुपये दिले जाणार आहेत. ही दोन मजली इमारत असेल, 7326.48 चौरस मिटरचे बांधकाम असून त्याचा दर 28 हजार असणार आहे. हा प्रस्ताव 2022-23 मधील असेल, त्यासाठी सर्व मंजुर्‍या घेणे बंधनकारक असेल, या कामाचे तुकडे न पाडता निविदा एकसंघ होणार असल्याचे शासनाच्या आदेशात नमुद केले आहेत. आदिवासी भागात सुसज्य रुग्णालय होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.


मला आमदार म्हणून आत्तापर्यंत जे 4 वर्षे मिळाले, त्यात मी 40 वर्षांची तुलना करु शकतो, इतके काम मी केले आहे. मात्र, ज्यांना काविळ झाली आहे, ते लोक सोडून तालुक्यातील भोळी भाबडी जनता विकास अनुभवत आहे. गेल्या 40 वर्षांतील हा बॅकलॉक भरुन काढणे माझ्यासाठी फार मोठे आव्हान होते. तो भरुन काढण्याचा प्रयत्न मी 70 ते 80 टक्के अल्पकाळात केला आहे. अकोल्यात उपजिल्हा रुग्णालयाचा साधा प्रस्ताव देखील 40 वर्षांमध्ये कोणी दाखल केला नव्हता, परंतु मी सर्व नव्याने सादर करुन त्याला मंजुरी आणली. यात अजित दादांचे फार मोठे योगदान आहे.

                                                           – आ. डॉ. किरण लहामटे, अकोले


The post अकोलेत शंभर बेडचे उपजिल्हा रुग्णालय appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SzmN7J

Nagar : टाकळीभानचे आरोग्य केंद्र ‘सलाईन’वर

टाकळीभान : पुढारी वृत्तसेवा : तालूक्यातील टाकळीभान येथील प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचार्‍यांच्या मनमानी कारभारामुळे सलाईनवर आले आहे. रुग्णांना सुविधाच मिळत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून आरोग्य केंद्राचा दर्जा घसरला आहे. त्यामुळे रुग्ण कल्याण समिती व ग्रामस्थांनी आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी व कर्मचार्‍यांची चांगलीच झाडाझडती घेत काम काजात सुधारणा करा, अन्यतः बदली करुन घ्या, अशी तंबी देवून वरीष्ठांकडे तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.


टाकळीभान व ग्रामिण परीसरातील नागरीकांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी सुमारे 30 वर्षांपुर्वी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करण्यात आले आहे. वर्षानुवर्षे रुग्णांच्या प्रतिसादामुळे सुमारे चार एकर जागेच्या परीसरात सुसज्ज इमारत सर्व सोयींनी युक्त उभी राहिलेली आहे. आरोग्य सुविधेसाठी आतापर्यंतच्या येथे आलेल्या सर्वच वैद्यकिय अधिकार्‍यांनी रुग्णांना सुविधा पुरवण्यात कसुर केलेला नाही. मात्र गेल्या दोन वर्षात आरोग्य केंद्राचा दर्जा सुमार झाला आहे.


आरोग्य केंद्रात बरीच प्रकारची औषधे उपलब्ध नसल्याने रुग्णांना बाहेरुन औषधे घेण्याचाच सल्ला दिला जात आहे. याबाबत विचारणा केली आसता औषधांचा पुरवठाच होत नसल्याचे सांगितले जाते. येथील वैद्यकिय आधिकारी व कर्मचार्‍यांच्या मनमानीमुळे यापुर्वी जिल्ह्यात पहील्या दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या या आरोग्य केंद्राने तळ गाठला आहे. रुग्णांच्या सातत्याने येणार्‍या तक्रारीमुळे रुग्ण कल्याण समितीच्या सदस्यांनी अचानक आरोग्य केंद्राला भेट दिली असता सकाळचे सव्वा आकरा वाजले असतांनाही एकही कर्मचारी आरोग्य केंद्रात उपस्थित नसल्याचे आढळून आल्याने याबाबत तालुका आरोग्य अधिकार्‍यांकडे तक्रार करण्यात आली होती. रुग्णकल्याण समिती, ग्रामस्थ व ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांनी बैठक घेवून कर्मचार्‍यांची चांगलीच झाडाझडती घेत लवकरच याबाबत विषेश ग्रामसभा घेवून वरीष्ठांकडे तक्रार दाखल करणार आसल्याचे उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी सांगितले. एकूणच आरोग्य केंद्रांचा दर्जा अत्यंत सुमार झाला आसल्याने आरोग्य केंद्र ‘असून आडचण नसून खोळंबा’ अशी परीस्थिती निर्माण झालेली आहे.


कर्मचार्‍यांचा कामकाजात चुकारपणा

आरोग्य अधिकार्‍यांचे कर्मचार्‍यांवर नियंत्रण नसल्याने कर्मचारी कामकाजात चुकारपणा करीत आहेत. वेळेचे बंधन पाळले जात नसल्याने सर्वच कर्मचारी 11 ते 12 वाजता आरोग्य केंद्रात येतात व फक्त हजेरी लावून तास दोन तासात माघारी फिरतात. रुग्ण मात्र आरोग्य केंद्रात चकरा मारुन बेजार होतात. आरोग्य केंद्राचा परीसर तर अस्वच्छ झाला आहेच तर अंतर्गतही अस्वच्छता पहावयास मिळत आहे.


The post Nagar : टाकळीभानचे आरोग्य केंद्र ‘सलाईन’वर appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SzjsT7

संगमनेर : घारगावला दिंडीत कंटेनर घुसला, ३ वारकरी ठार तर ९ जखमी

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : शिर्डी येथून आळंदीला निघालेल्या दिंडीमध्ये भरघाव वेगाने आलेला कंटेनर घुसल्याची घटना घडली. या भीषण अपघातात ३ वारकरी ठार तर ९ वारकरी गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे. रविवारी सायंकाळी ही घटना पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव जवळील १९ मैल या ठिकाणी सुमारास घडली.


पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाने शिर्डी येथून साई नामाचा गजर करत आळंदीकडे दिंडी निघालेली होती. आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास नांदूर खंदरमाळ फाट्याजवळील १९ मैलावर या दिंडीत भरधाव वेगात आलेला कंटेनर (क्र. MH 12 VT 1455) घुसला. चालकाला झोप लागल्याने कंटेनर महामार्गाने चाललेल्या दिंडीत घुसल्याचे सांगितले जात आहे. या भीषण अपघातात तीन वारकरी जागीच ठार झाले तर नऊजण जखमी झाले.


या अपघातातील मृत्यू पावलेल्या वारकऱ्यांची अद्याप ओळख पटली नसून कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वारकऱ्यांना चिरडणाऱ्या कंटेनरची परिसरातील संतप्त झालेल्या नागरिकांनी तोडफोड केली. दरम्यान आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ मदत करत जखमींना आळेफाटा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. कार्तिकी एकादशीला आळंदीला जाणाऱ्या वारकऱ्यांवर काळाने घाला घातला असल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


The post संगमनेर : घारगावला दिंडीत कंटेनर घुसला, ३ वारकरी ठार तर ९ जखमी appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SzgNJP

मुळा धरणातून जायकवाडीस विसर्ग बंद !

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : मुळा धरणातून जायकवाडी धरणात समन्यायी कायद्यानुसार सोडलेले 2.1 टिएमसी पाण्याचे आवर्तन अखेर गुरूवारी थांबले, परंतु धरणाचे 11 दरवाजे उघडेच ठेवून बंधारे भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. धरणामध्ये शिल्लक 21 हजार 48 दलघफू पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. दरम्यान, अवकाळीने समन्यायीच्या आकडेवारीत बदल होऊन 1,960 दलघफू पाणी जायकवाडीस देण्यात आले. नगर जिल्ह्याची जलदायिनी ठरणार्‍या मुळा धरणावर यंदा समन्यायीची संक्रांत कोसळली. धरणातून 2.1 टिएमसी पाणी सोडण्याचा आदेश आला.


मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सायली पाटील, उप अभियंता विलास पाटील, शाखाभियंता राजेंद्र पारखे, सहाय्यक सलीम शेख यांच्या नियोजनानुसार 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वा. जायकवाडीच्या दिशेने विसर्ग सोडण्यात आला. रविवारी पाणी 2 हजार क्यूसेकने सोडलेल्या विसर्गात वाढ करीत सुमारे 6 हजार क्यूसेकपर्यंत जायकवाडीच्या दिशेने वाहिले. अशाच ‘अवकाळी’चा धो- धो वर्षाव पाहता मुळा धरणातून सोडलेल्या पाण्याची कोणतीही अधिक नासाडी न होता बहुतांश पाणी जायकवाडीच्या साठ्यात जमा झाले. दरम्यान, गुरूवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास जायकवाडीस 2.1 टिएमसी पाणी पूर्ण सोडल्यानंतर बंधार्‍यावर फळ्या टाकण्यात आल्या. विसर्ग न थांबविता मुळा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या मुळा नदी पात्रावरील डिग्रस, वांजूळपोई, मानोरी, मांजरी या बंधार्‍यांमध्ये पाणी जमा करण्यासाठी आवर्तन सुरूच ठेवण्यात आले. काल शुक्रवारी उशिरापर्यंत आवर्तनाने बंधारे भरून देत विसर्ग थांबविणार असल्याची माहिती मुळा पाटबंधारे विभागाकडून मिळाली.


नगर व नाशिक जिल्ह्यातून धरणांवर ‘समन्यायी’ची टांगती तलवार कोसळल्याने आगामी काळात दुष्काळाची दाहकता वाढली आहे. यावर्षी मुळा धरणाच्या पाणलोट व लाभक्षेत्रावर मान्सूनने अवकृपा दर्शविली. परिणामी धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही. त्यातच ‘समन्यायी’चा तिढा सोसत 2.1 टिएमसी पाणी जायकवाडीस दिले. मुळा धरणातून शेतकर्‍यांसाठी एका आवर्तनाचे पाणी कमी झाल्याने मोठे जलसंकट उभे राहण्याची चिन्हे दिसत आहेत.


मुळा धरणातून शेतकर्‍यांसाठी पहिले रब्बीचे आवर्तन डिसेंबर महिन्यात 20 तारखेला सोडले जाणार होते, परंतु अवकाळी पावसाचा वर्षाव पाहता ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची आवर्तनाची मागणी लवकर होणार नसल्याचे चित्र दिसत आहे. मुळा पाटबंधारेकडून 1 जानेवारीपासून पहिले रब्बी आवर्तन सोडण्याची तयारी असल्याचे समजते. मुळातून 30 हजार हेक्टर क्षेत्रास उजव्या कालव्यासाठी पहिले रब्बीचे आवर्तन 45 दिवसांसाठी सोडण्याचे निश्चित झाले. यासाठी 5 हजार दलघफू पाणी जाणार होणार असल्याचे अपेक्षित आहे. उन्हाळी हंगामात 25 मार्च ते 13 एप्रिल असे 20 दिवसांचे आवर्तन निश्चित केले आहे. यासाठी 2.61 दलघफू पाणी उजव्या कालव्यातून पाणी जाणार आहे. मुळा डावा कालव्यासाठीही दोनच आवर्तने निश्चित झाले. डाव्या कालव्यातून पहिले रब्बी आवर्तन 20 डिसेंबर ते 15 जानेवारी 2024 पर्यंत सोडले जाणार होते. ते 1 जानेवारीपासून सुटेल असे चित्र दिसते. डावा कालव्यावर 4 हजार हेक्टर क्षेत्रास पहिल्या 27 दिवस आवर्तनास 600 दलघफू पाणी आरक्षित आहे. दुसरे आवर्तन 10 ते 28 फेब्रवारी असे निश्चित केले आहे.


समन्यायीने मारले, परंतु अवकाळीने तारले..!

मुळा धरणाच्या 11 दरवाजांद्वारे जायकवाडीला समन्यायी पाणी वाटपानुसार 2.1 टिएमसी पाणी गेले. धरण साठ्यात घट झाल्यानंतर अवकाळी बरसला. दरम्यान, या पावसाने 350 दलघफू पाण्याची वाढ झाली. राज्यभर अवकाळी कोसळल्याने ‘समन्यायी’च्या आकड्यात घट होऊन 1,960 दलघफू पाणी जायकवाडीच्या दिशेने वाहिल्यानंतर विसर्ग थांबविण्यात आला.


मुळा धरणाचे यंदा पाण्याचे नियोजन..!

*मुळा धरण क्षमता-26 हजार दलघफू *मान्सून हंगाम अंतिम काळातील पाणी साठा-23, 157 दलघफू *मृत साठा-4500 दलघफू *गाळ साठा-2020 दलघफू *बाष्पीभवन-1187 दलघफू *पिण्यासाठी पाणी आरक्षण-1190 दलघफू *औद्योगिक मंजूर-250 दलघफू *वांबोरी पाईप चारी-406 दलघफू *भागडा चारी-60 दलघफू *म. फुले कृषी विद्यापीठास आरक्षित-372 दलघफू *जलाशय उपसा-299 दलघफू *कालव्यांद्वारे पिण्यास पाणी-800 दलघफू *आकस्मिक आरक्षण-1000 दलघफू* मुळा डावा सिंचन-1251 दलघफू* मुळा उजवा सिंचन-7619 दलघफू


The post मुळा धरणातून जायकवाडीस विसर्ग बंद ! appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SzdZ6T

नगर शहरात धडकले लाल वादळ !

नगर : पुढारी वृत्तसेवा :  ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस महाराष्ट्र (आयटक) च्या वतीने शाहू महाराजांचे जन्मगाव कोल्हापूर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दीक्षाभूमी नागपूर दरम्यान निघालेली राज्यव्यापी महासंघर्ष यात्रेचे शहरात गुरुवारी डावे, पुरोगामी पक्ष व भाजप विरोधातील समविचारी पक्ष आणि संघटनांच्या वतीने स्वागत करून रॅली काढण्यात आली. लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथून रॅलीचे प्रारंभ झाले. यामध्ये आयटकचे राज्य सरचिटणीस कॉ. शाम काळे, राष्ट्रीय कामगार नेते कॉ. कारभारी उगले, आशा गटप्रवर्तक संघटनेचे अध्यक्ष कॉ. राजू देसले, राष्ट्रीय सदस्य तथा निमंत्रक कॉ. अ‍ॅड. सुधीर टोकेकर, कॉ. सुरेश पानसरे, कॉ. सुभाष लांडे, कॉ. अ‍ॅड. बन्सी सातपुते, कॉ. भैरवनाथ वाकळे, सुवर्णा थोरात, भारती न्यालपेल्ली, कॉ. निवृत्ती दातीर, कॉ. संजय नांगरे, सतीश पवार, संजय डमाळ, मारुती सावंत, जयश्री गुरव आदी उपस्थित होते.


20 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान आयटकच्या वतीने राज्यव्यापी जनजागरण संघर्ष यात्रा सुरू आहे. ही यात्रा गुरुवारी शहरात दाखल झाली. रॅलीने जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, माळीवाडा येथील महात्मा फुले यांचा पुतळा, वाडियापार्क येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शहरातून मार्गक्रमण केले. रॅलीत सहभागी कामगार वर्गाने भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या रॅलीचा समारोप स्वस्तिक चौकातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात झाला. रॅलीत जिल्हा आशा व गटप्रवर्तक संघटना, लालबावटा विडी कामगार संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य पतसंस्था व जिल्हा कर्मचारी संघटना, लालबावटा जनरल कामगार, तलरेजा फर्म कर्मचारी, अवतार मेहेरबाबा कामगार युनियन, मोहटादेवी कामगार संघटना, लालगीर बुवा ट्रस्टचे कामगार वर्ग, आयटक आणि डावे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


लाल वादळाने लक्ष वेधले

जनविरोधी भाजप सरकार हटाव देश बचाव…, भाजप हटाव संविधान बचाव….च्या घोषणा देत व हातात लाल झेंडे घेऊन निघालेल्या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधल्याचे दिसले.


The post नगर शहरात धडकले लाल वादळ ! appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SzbnzG

Crime News : संगमनेरला गावठी कट्ट्यासह गुन्हेगार पकडला

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  कोल्हार घोटी राज्य मार्गावरील वडगाव पान ते समनापूर दरम्यान आजु उर्फ अजीम अन्वर पठाण, (वार्ड नंबर १ मिल्लतनगर, श्रीरामपूर) याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल व दोन राऊंड मिळून आले आहेत. त्यास पोलिसांनी पकडून त्यास गजाआड केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू या शनीशिंगणापूर येथे दर्शनासाठी आल्या होत्या. यावेळी बंदोबस्ताच्या अनुषंगाने हद्दीतील हॉटेल लॉजेस चेकिंग व नाकाबंदी करत असताना वडगावपान ते समनापूर दरम्यानच्या कोल्हार घोटी राज्यमार्गावर एक संशयित इसमाकडे गावठी बनावटीचे पिस्तूल व दोन राऊंड असल्याबाबतची गोपनीय माहिती पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना समजली. त्यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे, पोलीस उपनिरीक्षक सॅलोमन सातपुते, पो कॉ राजेंद्र डमाळे, राहुल डोके, विशाल सारबंदे यांनी त्या इसमास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता पठाण याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्तूल व दोन राऊंड मिळून आले.


The post Crime News : संगमनेरला गावठी कट्ट्यासह गुन्हेगार पकडला appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SzYDlC