कोपरगाव : शेती पाण्यासाठी एकजूट दाखवावी

November 05, 2023 0 Comments

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : लाखांचा पोशिंदा हा शेतकरी आहे. त्याच्या शेतीच्या हक्काच्या पाण्यासाठी आणि तुटीच्या गोदावरी खोर्‍यात पाण्यांची उपलब्धता निर्माण होण्यासाठी पंथ, झेंडे, आपसातील मतभेद बाजुला ठेवून सर्वपक्षीयांनी नगर- नाशिकची एकजूट दाखवावी, असे प्रतिपादन भाजपाच्या नेत्या स्नेहलता कोल्हे यांनी केले. गोदावरी खोर्‍यासाठी अन्यायकारी असणारा समन्यायी पाणी वाटपाचा कायदा रद्द करावा. मेंढेगिरी समितीने बारमाही गोदावरी कालवे लाभधारक शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले.


तेव्हा या समितीच्या शिफारशीनुसार चालु वर्षी पर्जन्यमान अत्यल्प झाल्याने जायकवाडीला उर्ध्व गोदावरी खोर्‍यातून पाणी सोडू नये, असेही त्या म्हणाल्या. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसिल कार्यालयासमोर शुक्रवारी गोदावरी खोरे पाणी कृती समितीच्यावतीने एकदिवसीय लाक्षणीक उपोषण करण्यात आले. त्याचे निवेदन नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे व तहसिलदार संदिप भोसले यांना देण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. गोदावरी खोरे पाणी कृती समितीच्या झेंड्याचे यावेळी अनावरण करण्यात आले.


प्रारंभी कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे यांनी उपस्थितांना लाक्षणिक उपोषणाची भूमिका समजावली. संजीवनी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रदिप नवले यांनी प्रास्तविकात कोल्हे कुटुबियांनी पाणी संघर्ष व जलसमृध्दीसाठी काय कामे केली याची माहिती दिली. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पुजन करून लाक्षणिक उपोषणास सुरुवात करण्यात आली. कोपरगाव बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोस, माजी सभापती सुनिल देवकर, उत्तमराव चरमळ यांनी ‘गोदावरी कालव्यांना हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे’ आदी घोषणांनी तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला होता.


सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष विवेक कोल्हे म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी तुटीच्या गोदावरी खोर्‍यात पाण्याची समृध्दी निर्माण करण्यासाठी त्याचप्रमाणे वाढत्या शहरीकरण, औद्योगिकीकरणामुळे दारणा गंगापूर धरणांवर वाढणारे बिगर सिंचन आरक्षणामुळे हक्काच्या गोदावरी कालव्यांच्या 11 टीएमसी पाण्यात घट झाली. त्याची तुट भरून काढीत 9 टीएमसी पाणी उपलब्ध केले. त्यामुळे 35 वर्षे गोदावरी कालवे लाभधारक शेतकर्‍यासह पिण्यासाठी व औद्योगिकीकरणासाठी कमतरता कधीच जानवू दिली नाही. यावेळी शेतकरी उपस्थित होते.


पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे वळवा : विवेक कोल्हे
गोदावरी खोर्‍यावर सातत्याने बिगर सिंचन पाण्याचे आरक्षण टाकून

मायबाप सरकारने शेतकर्‍यांना हक्काच्या शेती पाण्यापासून वंचित ठेवू नये, आमच्या व्यथा समजुन घ्या. जायकवाडीला पाणी सोडू नका, ज्याप्रमाणे नागपूर- मुंबई समृध्दी महामार्ग बनविला. त्याच धर्तीवर पश्चिमेचे पाणी पुर्वेकडे वळवून शेतकर्‍यांच्या जीवनांत आनंद निर्माण करून नगर- नाशिक विरुद्ध मराठवाडा प्रादेशिक पाणी वाद कमी करावा, असे विवेक कोल्हे म्हणताच लाक्षणिक उपोषणकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात त्याला प्रतिसाद दिला.


आमदार जागे व्हा, झोपेचे सोंग घेऊ नका
जायकवाडीच्या पाण्यासाठी तेथील लोकप्रतिनिधींची एकजूट आहे, मग

आम्ही सातत्याने आवाहन करून येथील आमदार झोपेचे सोंग घेत आहेत काय? सर्वांनी एक व्हा, बळीराजाचा टाहो त्यांनी ऐकावा. आम्हाला पाऊस नाही, पाणी नाही, हक्काचे ब्लॉक नाही, शेती सिंचन व्यवस्थेसाठी अधिकारी नाही, तेव्हा चालू हंगामात जेमतेम पाणी आहे ते तरी सोडू नका, कालवे सल्लागार बैठक तात्काळ घेवून रब्बीचे तीन आणि उन्हाळ दोन असे पाच आर्वतने तात्काळ द्या, असे स्नेहलता कोल्हे म्हणाल्या.


हेही वाचा 


छत्रपती संभाजीनगर: पैठणमध्ये कृषी सेवा केंद्रे बंद, रब्बी हंगामाची कामे ठप्प


Nagar News : जिल्हा दुष्काळी उपायोजनांपासून वंचित; आमदार नीलेश लंके यांचा आरोप


Nagar News : खंडपीठाची जिल्हाधिकार्‍यांना नोटीस


The post कोपरगाव : शेती पाण्यासाठी एकजूट दाखवावी appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SyNzHl

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: