महत्वाची बातमी ! खासगी ट्रॅवल्सनी दिवाळीत जादा भाडे घेतल्यास इथे करा तक्रार

November 04, 2023 0 Comments

नगर : पुढारी वृत्तसेवा : दिवाळीत हंगामात जादा भाडे आकारणी करु नका असा इशारा प्रादेशिक परिवहन विभागाने खासगी प्रवासी वाहतूकदारांना दिला आहे. प्रवाशांनी तक्रार केल्यास कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे. जादा भाडे आकारणी झाल्यास तत्काळ तक्रार दाखल करा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी केले आहे.


महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळाचे त्या त्या संवर्गाचे टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडेदर विचारात घेऊन खासगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणार्‍या प्रतिकिलोमीटर भाडे दराच्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर शासनाने सन 2018 रोजी शासननिर्णय निर्गमित करुन निश्चित केले आहेत. दिवाळीत गर्दीच्या हंगामाच्या काळात खासगी प्रवासी बसेसकडून जादा भाडे आकारणी केली जात असल्यास संबंधित प्रवाशांनी dycommr.enf2gmail.com या इमेल वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन त्यांनी प्रवाशांना केले. खासगी बस मालकांनी शासन निर्णयानुसार पूर्ण बससाठी आकारावयाचे महत्तम भाड्याबाबतचा विहित नमुन्यात तक्ता तयार करावा. प्रतीआसन दर दर्शवून खासगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात, त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात यावा. तसेच प्रवाशांच्या माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांकही प्रदर्शित करावा, असेही त्यांनी निर्देश दिले.


हे ही वाचा :* Nagar : ग्रामपंचायतींचा प्रचार थंडावला ; रविवारी मतदान

* Pimpri News : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो; केंद्राकडून 410 कोटी


The post महत्वाची बातमी ! खासगी ट्रॅवल्सनी दिवाळीत जादा भाडे घेतल्यास इथे करा तक्रार appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SyM3MP

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: