संगमनेर : बनावट सोने ठेवत बँकेची 22 लाखांची फसवणूक
संगमनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : बनावट सोने तारण ठेवून इंडियन ओव्हरसीज बँकेची 21 लाख 91 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत गोल्ड व्हॅल्यूअरसह पाच जणांविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोने मुल्यांकनकार जगदीश सुभाष म्हसे व चार सोने तारण कर्जदारांनी संगनमताने पुर्वनियोजित कट करुन इंडियन ओव्हरसीज बँकेची 10 सोने तारण कर्ज प्रकरणात 21 लाख 91,677 रुपयांची फसवणूक केली. बनावट व खोटे सोने खरे असल्याचा बँकेस खोटा दाखला देत बँकेची फसवणूक केली. याबाबत इंडियन ओव्हरसीज बँकेचे शाखा शाखाधिकारी निवृत्ती नव्हाटे यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी जगदीश सुभाष म्हसे (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर), उत्तम विश्वनाथ पानसरे (रा. वाघापूर, ता. संगमनेर), लहानू किसन नेहे (रा. नांदूर दुमाला ता. संगमनेर), मंगेश सपंत दिघे (रा. कोल्हे वाडी, ता. संगनमेर), जगदीश लक्ष्मण शहाणे (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर पोलिस करीत आहेत. संगमनेरमध्ये यापूर्वीही अशा काही घटना घडल्याने मोठा असंतोष निर्माण झाला आहे. हेही वाचा सांगली : कडेगावात मोहरमची भावपूर्ण वातावरणात सांगता; जियारात होऊन ताबूतांचे विसर्जन माळीण दुर्घटनेला 9 वर्षे पूर्ण; ग्रामस्थांकडून मृतांना श्रद्धांजली पीक विम्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात 5.91 लाख नोंदणी The post संगमनेर : बनावट सोने ठेवत बँकेची 22 लाखांची फसवणूक appeared first on पुढारी.http://dlvr.it/SszdH5