मोठी बातमी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी! Threat call to Nitin Gadkari

January 14, 2023 0 Comments

 भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

 या प्रकरणामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली असून नितीन गडकरी यांच्या खामला येथील जनसंपर्क कार्यालयात तब्बल तीनवेळा हा फोन आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 

नेमके प्रकरण काय?

▪️ भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी साडेअकराच्या सुमारास धमकीचा कॉल आला. यामध्ये काही दाऊद या नावाचाही उल्लेख केल्याची प्राथमिक माहिती आहे. 

▪️ तसेच कॉलवर मला खंडणी द्या अन्यथा मी सोडणार नाही अशा आशयाची धमकी देण्यात आल्याची माहिती आहे. या कॉलनंतर जनसंपर्क कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी लगेच वरिष्ठ पोलिसांना घटनेची माहिती दिली.

▪️ तसेच पोलिसांचा ताफा तपासासाठी गडकरींच्या कार्यालयात पोहोचला. तसेच सायबर सेललाही या संदर्भात माहिती देण्यात आली असून कॉलबद्दल अधिक तपास सुरु असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.

 दरम्यान, सध्याच्या घडीला गडकरी यांचे वर्धा रोडवरील घर आणि खामल्यातील जनसंपर्क कार्यालयासमोर पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला असून या धमकीच्या कॉलमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: