`
6/ticker

वाळकी : महामार्गावर वाहनचालकास लुटले

https://ift.tt/kJtIcNe

वाळकी : पुढारी वृत्तसेवा :  पिकअप गाडीला मोटारसायकल आडवी लावून थांबवत तीन चोरट्यांनी वाहनचालकाला चाकूचा धाक दाखवत त्याच्या जवळील एक लाख 13 हजार रुपयांची रोकड लुटून नेल्याची घटना नगर-पुणे महामार्गावर चास (ता.नगर) शिवारात मंगळवारी (दि.22) पहाटे 5.30 वाजता घडली. याबाबत अरविंद रामदास डरंगे (रा.रांजणी, हल्ली रा.सारसनगर) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डरंगे वाहनचालक असून, त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांनी शेतकर्‍यांचा शेतीमाल विक्रीसाठी पुण्याला नेला होता. या शेतीमालाच्या विक्रीतून मिळालेली रोकड घेऊन ते नगरकडे परतत होते.

मंगळवारी पहाटे 5.30 वाजता चास शिवारात असलेल्या माथेरान हॉटेलजवळ एका पल्सर मोटारसायकलवर तीन युवक आले. त्यांनी पल्सर मोटारसायकल पिकअपला आडवी लावत, त्यांना वाहन थांबविण्यास भाग पाडले. त्यातील एकजण डरंगे यांना शिवीगाळ करू लागला. तसेच, गाडीला कट का मारला? म्हणून त्यांना गाडीतून खाली ओढले. अंधारात रस्त्याच्या बाजूला ओढत नेले. दोघांनी त्यांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्या खिशातील पाकीट बळजबरीने हिसकावून घेतले. तिसर्‍या व्यक्तीने मोबाईलच्या उजेडात पिकअप गाडीत उचका-पाचक करत चालकाच्या सिटच्या मागे ठेवलेली रोकड काढून घेत तिघेही पल्सरगाडीवर बसून पुण्याच्या दिशेने पसार झाले. या चोरट्यांनी डरंगे यांची तब्बल एक लाख 13 हजार रुपयांची रोकड लुटून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

The post वाळकी : महामार्गावर वाहनचालकास लुटले appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/9JujKdX
via IFTTT

Post a Comment

0 Comments