नगर : महापालिका पाणी योजनेचा पाणीपुरवठा बंद राहिल्याने पाणीपुरवठा विस्कळीत

November 24, 2022 0 Comments

https://ift.tt/cSKdx2F

नगर : पुढारी वृत्तसेवा :  मुळानगर, विळद पंपिंग स्टेशन परिसरातील बुर्‍हाणनगर चाळीसगाव पाणी योजनेच्या केंद्रावर बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे महापालिका पाणी योजनेचा पाणीपुरवठा बंद राहिल्याने दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळित होणार आहे, असे मनपातर्फे सांगण्यात आले.

दि. 24 रोजी रोटेशननुसार तोफखाना, सिद्धार्थनगर, लालटाकी, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, माणिक चौक, आनंदी बाजार, नवीपेठ, कापड बाजार या भागाला उशिराने व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. तसेच, सारसनगर, बुरूडगाव भागातील पाणीपुरवठा शुक्रवारी नियमित वेळेत होईल. मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, माळीवाडा, कोठी या भागात गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर सिव्हील हाडको प्रेमदान हाडको भागाला शुक्रवारी नेहमीच्या वेळेत पाणीपुरवठा होईल.

The post नगर : महापालिका पाणी योजनेचा पाणीपुरवठा बंद राहिल्याने पाणीपुरवठा विस्कळीत appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/AzZHjO4
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: