गोमांस वाहणार्‍या ‘द बर्निंग कार’चा थरार !

https://ift.tt/3rGuYfl

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर संगमनेर तालुक्यातील सायखिंडीजवळ गोवंश मांस वाहतूक करणार्‍या अलिशान कारने अचानक पेट घेतल्यामुळे ‘द बर्निंग कार’चे चित्त थरारक सिनेस्टाईल दृश्य दिसले. दरम्यान, या निमित्ताने संगमनेर शहरात राजेरोसपणे कत्तलखाने आजही सुरुच असल्याचे पितळ उघडे झाले आहे.  याबाबत संगमनेर तालुका पोलिसांनी सांगितले की, पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील सायखिंडी शिवारात बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास संगमनेरातून कत्तल केलेल्या गोवंश जनावरांचे मांस भरून अलिशान स्विफ्ट कार (क्र. एम एच.43ए.एफ.9598) मध्ये भरुन मुंबईच्या दिशेने निघाली होती, मात्र कार सायखिंडीफाटा शिवारातून जात असताना कारने अचानक पेट घेतला.

त्यामुळे चालकाने कार भर रस्त्यात सोडून देत तेथून पलायन केले. परिसरातील आसपासच्या नागरिकांनी धाव घेत पेटलेली कार विझविली. या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी जाऊन कारची तपासणी केली असता कारच्या डिक्कीत सुमारे 400 किलो गोवंश मांस भरल्याचे आढळले. याबाबत पो. काँ. ओंकार मेंगाळ यांच्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी अज्ञात कार चालकावर महाराष्ट्र गोवंश हत्याबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. जळालेली कार जप्त केले आहे. कारमधील अर्धवट जळालेल्या गोवंश मांसाची विल्हेवाट लावण्यात आली आहे.

The post गोमांस वाहणार्‍या ‘द बर्निंग कार’चा थरार ! appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/pfw48Lz
via IFTTT

Hindi Diwas: अमेरिकी दूत माइक हैंकी बोले- भारत-अमेरिका संबंध और मजबूत करने में हिंदी पत्रकारिता की भूमिका अहम

मुंबई हिंदी पत्रकार संघ और महावाणिज्य दूतावास, मुंबई के संयुक्त तत्वावधान में आयोजित हिंदी दिवस समारोह में संघ के पत्रकारों को हिंदी में संबोधित करते हुए हैंकी ने कहा, “मुझे आप सभी के साथ हिंदी दिवस मनाते हुए खुशी हो रही है। https://ift.tt/VnyTDSJ

रेखा जरे हत्याकांड : आरोप निश्चिती प्रक्रिया लांबणीवर ; गुन्ह्यातून वगळण्यावर 10 ला सुनावणी

नगर :  पुढारी वृत्तसेवा : रेखा जरे हत्याकांडातील बाळ बोठे याला फरार असताना कोणतीही मदत केली नसल्याने, गुन्ह्यातून वगळण्याच्या मागणीचा अर्ज आंध्र प्रदेशातील तीन आरोपींनी न्यायालयात केला आहे. या मागणीवर 10 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, गुन्ह्यातील आरोपींवर आरोप निश्चितीची प्रक्रिया या अर्जावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच होणार आहे.  राजशेखर अजय चाकाली, शेख इस्माईल शेख … The post रेखा जरे हत्याकांड : आरोप निश्चिती प्रक्रिया लांबणीवर ; गुन्ह्यातून वगळण्यावर 10 ला सुनावणी appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SZFngy

श्रीगोंदा : कांदाप्रश्नी आमदारांची डोळेझाक : राहुल जगताप; ढोकराई येथे रस्त्यावर कांदा ओतून रास्ता रोको

https://ift.tt/LA8ejfD
onion new www.pudhari.news

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा :  गेल्या तीन दिवसांपासून कांदा प्रश्नावर आंदोलन सुरू आहे. मात्र, तालुक्याच्या विद्यमान आमदारांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्याऐवजी, या आंदोलनाकडे डोळेझाक केली असल्याची टीका माजी आमदार राहुल जगताप यांनी दिली केली.
सध्या कांद्याला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे शेतकरी बांधव पुरता अडचणीत आलेला आहे. कांद्याला हमीभाव मिळाला पाहिजे, यासाठी लिंपणगाव येथील शेतकरी तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलेले आहेत.

त्यांच्या समर्थनार्थ त्यांना पाठिंबा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष घनःश्याम शेलार, माजी आमदार राहुल जगताप, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांच्या नेतृत्वाखाली नगर-दौंड महामार्गावरील ढोकराई येथे गुरुवारी (दि.29) सकाळी 10 वाजता रस्त्यावर कांदा ओतून रास्ता रोको करण्यात आला. यावेळी राहुल जगताप म्हणाले, तालुक्याच्या आमदारांनी आजारी असल्याचे सांगत शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे पाठ फिरवली आहे. मागील चार दिवसांपासून कांद्याला हमीभाव मिळण्यासाठी शेतकर्‍यांनी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. विद्यमान आमदारांचे सरकार राज्यात असल्याने त्यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नांबाबत पत्राद्वारे सरकारकडे पाठपुरावा करणे अपेक्षित होते. मात्र, तसे झालेले दिसत नाही. आजारी असले तरी त्यांनी पत्राद्वारे या उपोषणाला पाठिंबा देण्याची गरज होती.

यावेळी घनश्याम शेलार, बाबासाहेब भोस, संजय आनंदकर, ऋषिकेश गायकवाड यांची भाषणे झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. या आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नायब तहसीलदार डॉ.योगिता ढोले यांच्याकडे मागण्यांचे निवेदन देण्यात आले.त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

The post श्रीगोंदा : कांदाप्रश्नी आमदारांची डोळेझाक : राहुल जगताप; ढोकराई येथे रस्त्यावर कांदा ओतून रास्ता रोको appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/jQiOvPw
via IFTTT

रेखा जरे हत्याकांड : आरोप निश्चिती प्रक्रिया लांबणीवर ; गुन्ह्यातून वगळण्यावर 10 ला सुनावणी

https://ift.tt/Dxzulem

नगर :  पुढारी वृत्तसेवा : रेखा जरे हत्याकांडातील बाळ बोठे याला फरार असताना कोणतीही मदत केली नसल्याने, गुन्ह्यातून वगळण्याच्या मागणीचा अर्ज आंध्र प्रदेशातील तीन आरोपींनी न्यायालयात केला आहे. या मागणीवर 10 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, गुन्ह्यातील आरोपींवर आरोप निश्चितीची प्रक्रिया या अर्जावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच होणार आहे.  राजशेखर अजय चाकाली, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहेमान अब्दुल आरिफ (तिघेही रा. आंध्र प्रदेश) या आरोपींनी पत्रकार बाळ बोठे याला फरार असताना कोणतीही मदत केली नाही. तसेच, आमचा त्याच्याशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे आम्हाला गुन्ह्यातून वगळण्यात यावे, अशी मागणी केली होती.

या मागणीवर रेखा जरे यांचे चिरंजीव रूणाल जरे यांच्या वतीने काम पाहणारे अ‍ॅड. सचिन पटेकर यांनी हरकत घेतली होती. दि.28 रोजी झालेल्या सुनावणीत आरोपींना गुन्ह्यातून का वगळण्यात येऊ नये, यावर सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला. न्यायालयाने दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून घेतले असून, आरोपींना गुन्ह्यातून वगळण्यात यावे किंवा नाही याचा निकाल येत्या 10 ऑक्टोबर रोजी लागणार आहे. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे राज्याचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. यादवराव पाटील व त्यांचे सहायक अ‍ॅड. सचिन पटेकर काम पाहत आहेत.

गैरहजर आरोपींना फटकारले
याप्रकरणी दि.28 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीला आरोपी क्र.7 जनार्दन अकुला व आरोपी क्र.9 राजशेखर अजय चाकाली हे दोन आरोपी गैरहजर होते. न्यायालयाने गैरहजर राहणार्‍या आरोपींना फटकारत सर्व आरोपींना पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

The post रेखा जरे हत्याकांड : आरोप निश्चिती प्रक्रिया लांबणीवर ; गुन्ह्यातून वगळण्यावर 10 ला सुनावणी appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/jThUD52
via IFTTT

यंदा रब्बीचे क्षेत्र 25 टक्के वाढणार ! कृषी विभागाची तयारी

https://ift.tt/PHEF4Mu

नगर : पुढारी वृत्तसेवा : यंदा चांगला पाऊस झाल्याने छोटी-मोठी धरणे ओव्हर फ्लो झाली. ओढे, नाले वाहते झाले, त्यामुळे विहिरी, बोअरवेल्सचाही पाणीसाठा समाधानकारक आहे. रब्बीसाठी शाश्वत पाणी उपलब्ध असल्याने पेरणीच्या सरासरी क्षेत्रातही 25 टक्के वाढ होऊ शकते. यात ज्वारीचे क्षेत्र यावर्षीही घटणार असून, गहू, हरभरा, कांदा पिकांखालील क्षेत्रात मात्र विक्रमी वाढ होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामाचे 4 लाख 58 हजार 636 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. यामध्ये ज्वारी, गहू, मका इत्यादी रब्बी तृणधान्य हे 3 लाख 68 हजार 513 हेक्टर आहे. हरभरा व अन्य असे कडधान्याखाली 89 हजार 637 हेक्टर क्षेत्राची सरासरी आहे. त्यामुळे कडधान्याखाली 4 लाख 58 हजार 150 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असल्याचे कृषी विभागच्या आकडेवारीनुसार दिसते. याशिवाय करडई, मोहरी, तीळ, जवस, सूर्यफूल, याखालीही 486 हेक्टर लागवड होऊ शकते. त्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामात 4 लाख 58 हजार 636 हेक्टरवर पिक पेरणी होईल, असा तर्क आहे.

गेल्या काही वर्षांपासून ज्वारीचे क्षेत्र दरवर्षी घटताना दिसत आहे. यावर्षीही वापसा नसल्याने ज्वारीचे क्षेत्र घटणार आहे. या उलट गहू, हरभरा इतर पिकांच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. साधारणतः 27 सप्टेंबरनंतर वातावरणात गारवा निर्माण होऊन हरभरा पेरणीसाठी पोषण वातावरण तयार होणार आहे. तर नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये गहू पेरणीला खर्‍याअर्थाने वेग येणार आहे. खरीप कांदाही कमी होता. त्यामुळे रब्बी हंगामात कांद्याचे क्षेत्र वाढू शकते.

सध्या अनेक शेतकर्‍यांनी कपाशी लागवड केलेली आहे. कपाशीखाली तब्बल 1 लाख 11 हजारापेक्षा अधिक हेक्टर क्षेत्र आहे. त्यामुळे जानेवारीपर्यंत तीन वेचण्या झाल्यानंतर गव्हासाठी रानं मोकळ करण्याचे शेतकर्‍यांचे नियोजन आहे. त्यावेळी गहू पेरणीला उशीर होणार असला तरी वातावरण पोषण राहील, या अपेक्षेने शेतकरी गहू पेरणी करू शकणार आहे.

 

पाऊस चांगला झालेला असल्याने रब्बीचे क्षेत्र वाढणार आहे. त्यात, ज्वारीचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. तर गहू, हरभरा आणि कांद्याच्या क्षेत्रात मोठी वाढ अपेक्षित आहे. शेतकर्‍यांना शाश्वत पाणी उपलब्ध असल्याने रब्बी सरासरी ओलांडेल.
                                              – शिवाजीराव जगताप,  जिल्हा कृषी अधीक्षक

The post यंदा रब्बीचे क्षेत्र 25 टक्के वाढणार ! कृषी विभागाची तयारी appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/r4Wh5P8
via IFTTT

कोपरगाव नगरपालिकेच्या पाच लिपिकांना केले निलंबित; कर अहवाल तपासणीत हलगर्जीपणाचा ठपका

कोपरगाव; पुढारी वृत्तसेवा: नगरपालिकेच्या प्रभारी लिपिक पदावर काम करणार्‍या पाच लिपिकांना मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी २८ सप्टेंबरला तडकाफडकी निलंबीत केले. घरपट्टीबाबत एस. आर. कन्स्ट्रक्शन कंपनीने दिलेला अहवाल तपासणी कामी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. राजेंद्र इंगळे, राजेंद्र शेलार, रवींद्र वाल्हेकर, आर. आर. अमोलिक व संजय तिरसे (सर्व प्रभारी लिपिक) अशी निलंबित … The post कोपरगाव नगरपालिकेच्या पाच लिपिकांना केले निलंबित; कर अहवाल तपासणीत हलगर्जीपणाचा ठपका appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SZBLpF

संगमनेर : शेतकर्‍याला व्यापार्‍याची मारहाण प्रकरणी बाजार समितीच्या गेटवर दोन तास आंदोलन

https://ift.tt/f2mTSqz

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो विक्रीसाठी आलेल्या रणखांबच्या शेतकर्‍यास टोमॅटो व्यापार्‍याने मारहाण केल्याच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांसह शेतकर्‍यांनी सुमारे दोन तास संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे गेट बंद आंदोलन केले. अखेर पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतरच सदरचे गेट बंद आंदोलन मागे घेण्यात आले. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील रणखांब येथील शेतकरी किरण शिवाजी बारवे हे आपल्या शेतातील टोमॅटो घेऊन बुधवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टोमॅटो मार्केटमधील व्यापारी आयुब सय्यद यांच्याकडे गेले. त्या ठिकाणी आयुब पठाण यांची गाडी उभी होती. शेतकरी बारवे यांनी तुमची गाडी थोडी पुढे घ्या, असे आयुब पठाण यांना म्हणाला. याचा राग पठाण याला आल्याने त्यांनी शेतकर्‍यास शिवीगाळ केली.

त्यानंतर जवळ असलेला त्याचा नातेवाईक अरबाल आयुब पठाण यांनी त्याची गच्ची पकडून त्यास लाथा बुक्यांनी मारहाण केली. ‘आम्ही कुरणचे आहे आमच्या नादी लागू नको, तुला जीवे ठार मारून टाकू’ अशी जीवे मारण्याची धमकी दिली. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टोमॅटो मार्केटमध्ये पठार भागातील शेतकर्‍याला मारहाण झाल्याची माहिती समजतात युवासेनेचे तालुकाप्रमुख गुलाब भोसले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, शिवसेनेचे शहर प्रमुख प्रसाद पवार, महिला तालुकाप्रमुख शितल हासे, पप्पू कानकाटे, साहेबराव हासे, रणजीत ढेरंगे यांच्यासह शिवसैनिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटजवळ जमा झाले.
सुमारे अर्धा ते एक तास गेट बंद आंदोलन केले. जोपर्यंत शेतकर्‍याला मारहाण करणार्‍या दोघांवर गुन्हे दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही आणि गेट बंद आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी घेतला होता.

या आंदोलनाची माहिती समजताच पोलिस उपाधीक्षक राहुल मदने आणि संगमनेर शहराचे प्रभारी पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. शेतकर्‍याला मारहाण करणार्‍यांवर तात्काळ गुन्हा दाखल करू, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी गेट बंद आंदोलन मागे घेतले. याबाबत किरण बारवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आयुब पठाण व अरबाल पठाण या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शेतकर्‍यांना दादागिरी केल्यास सेनास्टाईलने उत्तर
येथून पुढील काळात जर बाजार समितीत शेतकर्‍यांवर व्यापार्‍यांनी दादागिरी केली तर ते खपवून घेतले जाणार नाही. जो व्यापारी शेतकर्‍यांवर दादागिरी करेल, त्याला शिवसेना स्टाईलने जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा युवा सेनेचे तालुकाप्रमुख गुलाब भोसले यांनी दिला.

The post संगमनेर : शेतकर्‍याला व्यापार्‍याची मारहाण प्रकरणी बाजार समितीच्या गेटवर दोन तास आंदोलन appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/yTcx0JG
via IFTTT

दुसरा हप्ता दिवाळीपूर्वी देणार ; ‘कुकडी’चे अध्यक्ष राहुल जगताप

https://ift.tt/YFgat5e

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : कर्मयोगी कुंडलिकराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखान्याचा कारभार काटकसरीने चालू आहे. कारखान्याची एफआरपी 2 हजार 160 रुपये आहे. पहिला हप्ता 2 हजार 250 रुपये दिला आहे. दिवाळीपूर्वी दुसरा हप्ता आणि कामगारांना बोनस देणार अशी ग्वाही कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांनी दिली. पिंपळगाव पिसा येथे बुधवारी कारखान्याची 25 वी सर्वसाधारण सभा अध्यक्ष जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते.

माजी आ. जगताप म्हणाले की, कुंडलिक तात्यांच्या निधनानंतर कुकडी कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार बबनराव पाचपुते, राजेंद्र नागवडे, घन:श्याम शेलार, दिनकर पंधरकर यांनी मोलाची मदत केली. मी त्यांचा आभारी आहे. कुकडी कारखाना सांडपाण्यावर नियंत्रणासाठी पावले उचलणार आहे. शेतकी विभागाबाबत तक्रार आल्यास तत्काळ कारवाई केली जाईल. लमानबाबा डोंगरावर कारखान्याचे संस्थापक कुंडलिकराव जगताप यांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस घन:श्याम शेलार म्हणाले, ऊस लागवडीची नोंद घेऊन ऊसतोडणी व्यवस्थित करणे गरजेचे आहे. त्यातच कारखान्याचा फायदा आहे. काही कर्मचारी आपणच मालक आहोत, असे वागतात. त्यांना जमिनीवर आणण्याची गरज आहे.

दिनकर पंधरकर म्हणाले, कामगार व इतरांची देणी 92 कोटींवर गेली आहेत. समारंभ खर्च कोरोनात वाढला आहे. ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त भाव कसा देता येईल, याकडे लक्ष द्यावे. यावेळी सुरेश लोखंडे, प्रमोद इथापे, भास्कर कदम, बंडू पंधरकर, सुभाष काळोखे, विश्वास थोरात, तानाजी बोरुडे, अ‍ॅड. बाळासाहेब पवार, दादा भापकर, सोमनाथ खेडेकर, गणेश बेरड, भाऊ कदम यांची भाषणे झाली. खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष संभाजी घुटे, सुरेश सुडगे, संजय आनंदकर, बिभीषण उगले, शरद गलांडे, धोंडीबा लगड, अंकुश रोडे, नितीन डुबल, संजय नलगे, श्रीपाद कवाष्टे यांच्यासह शेतकरी, सभासद, ऊस उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक उपाध्यक्ष विवेक पवार यांनी केले. सूत्रसंचलन नारायण शिंदे यांनी, आभार बाळासाहेब उगले यांनी मानले. मागील वर्षाचा अहवाल वाचन करताना कार्यकारी संचालक दत्तात्रय मरकड यांनी कारखान्याच्या ध्येयधोरणांचा लेखाजोखा सभासदांसमोर मांडला.

उगाच दिशाभूल करू नका
कारखान्या संदर्भात सूचना अगर आरोप करणार्‍यांचा मी नेहमी आदर करतो. पण काही जण उगीच आवाज वाढवतात. खोटे बोलून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका, कारखान्याचे सभासद हुशार आहेत, असा टोला जगताप यांनी लगावला.

The post दुसरा हप्ता दिवाळीपूर्वी देणार ; ‘कुकडी’चे अध्यक्ष राहुल जगताप appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/H38NjaC
via IFTTT

कोपरगाव नगरपालिकेच्या पाच लिपिकांना केले निलंबित; कर अहवाल तपासणीत हलगर्जीपणाचा ठपका

https://ift.tt/TGogpDE

कोपरगाव; पुढारी वृत्तसेवा: नगरपालिकेच्या प्रभारी लिपिक पदावर काम करणार्‍या पाच लिपिकांना मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी २८ सप्टेंबरला तडकाफडकी निलंबीत केले. घरपट्टीबाबत एस. आर. कन्स्ट्रक्शन कंपनीने दिलेला अहवाल तपासणी कामी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. राजेंद्र इंगळे, राजेंद्र शेलार, रवींद्र वाल्हेकर, आर. आर. अमोलिक व संजय तिरसे (सर्व प्रभारी लिपिक) अशी निलंबित कर्मचार्‍यांची नावे असून, त्यांना पालिकेच्या आस्थापना विभागामार्फत नोटिसा बजावल्या आहेत.

वसुली विभागातील पाच प्रभारी लिपिकांनी कर अधीक्षक श्वेता शिंदे व पल्लवी सूर्यवंशी यांनी सूचना केलेली असताना त्यांनी कामाकडे दुर्लक्ष केले. या कारणास्तव त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई केली. सध्या कोपरगाव नगरपालिकेच्या व अवास्तव घरपट्टीचा मुद्दा ऐरणीवर असून याबद्दल गावातील नागरिकांत तीव्र रोष असून भाजपा शिवसेना रिपाइ (आठवले गट) यांनी मंगळवारपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. या साखळी उपोषणाच्या ठिकाणी मुख्याधिकारी शांताराम गोसावी हे संध्याकाळी चर्चेसाठी गेले असता उपोषणकर्त्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांमुळे मुख्याधिकारी अडचणीत सापडले होते.

त्यात उपस्थित असलेल्या एस. आर. कंपनी एस. आर. कन्स्ट्रक्शनच्या अधिकार्‍याने सर्व्हेमध्ये दहा टक्के चूक झाल्याचे जाहीरपणे मान्य केले होते. यावर मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनीही सर्व्हेमध्ये मोठ्या चुका झाल्याचे मान्य केले होते. यावर उपोषणकर्त्यांनी सदर ठेकेदाराकडून 75 लाख रुपये वसूल करावेत, त्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे व 2022- 23 सालामागील प्रमाणेच घरपट्टी वसूल करावी. ज्यावेळेस नवा सर्व्हे होईल, त्यावेळेस त्यानुसार पट्टी आकारावी, अशी मागणी केली होती. या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असे ठणकावून सांगितले होते. मात्र मुख्याधिकारी यांनी असे करणे आपल्या हातात नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे हा तिढा कायम राहिला होता.

या प्रकरणाची तीव्रता लक्षात घेता मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी बुधवारी वसुली विभागातील वरील पाच प्रभावी लिपिकांना कर अधीक्षक यांच्या अहवालाचा हवाला देत तडकाफडकी निलंबित केले असल्याचे समजते. दरम्यान सदर कंपनीला 40 लाख 72 हजार 538 रुपये अदा केल्याचे समजते. त्यामुळे ही रक्कम वसूल होणे शक्य नसल्याने प्रशासन अडचणीत आल्याचे दिसते. त्यामुळे ‘वड्याचे तेल वांग्यावर’ या उक्तीप्रमाणे सदर पाच लिपिकांचा बळी दिले असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.

ज्या वसुली विभागाच्या पाच लिपिकांना मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी बुधवारी निलंबित केले. त्या वसुली विभागाच्या कर अधीक्षक श्वेता शिंदे व पल्लवी सूर्यवंशी या आहेत. त्यांच्या शिफारशी व अहवालानंतरच सर्व्हे करणार्‍या आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीला 40 लाख 72 हजार 538 रुपये अदा केले आहेत. जर या अधिकार्‍यांच्या हाताखालील लिपिकांनी कामात हलगर्जीपणा केला. हे माहीत असतानाही या विभागाच्या कर अधीक्षक यांनी सदर आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीला 40 लाख 72 हजार 538 रुपयांची रक्कम कशी अदा करण्याची शिफारस कशी केली. आज अवास्तव घरपट्टीने गाव पेटले नसते तर हा विषय झाला असता का?

असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. ? कारण ही रक्कम लिपिकांच्या आदेशाने कंपनीला दिली नाही हे सत्य आहे, मग या लिपिकांना दोषी धरले मग कक्ष अधिकारी यांचे काय? हाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, कोपरगाव नगर परिषद प्रशासनाने सन 2022-23 साठी घरपट्टीमध्ये भरमसाठ वाढ केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ही अवास्तव घरपट्टी रद्द करून पूर्वीप्रमाणेच घरपट्टी आकारणी करावी यासह इतर मागण्यांसाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपाइं (आठवले गट) ने मंगळवार (27 सप्टेंबर) पासून सुरू केलेल्या साखळी उपोषणाला नागरिकांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. विविध संस्था आणि संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी उपोषणकर्त्यांना भेट देऊन पाठिंबा दर्शविला.

मुख्याधिकार्‍यांची उडवाउडवीचे उत्तरे
मुख्याधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधितांना याबाबत विचारणा करण्याकरता फोन केला असता, या अधिकार्‍यांना फोन उचलले नाहीत व माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्याबाबतही पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

The post कोपरगाव नगरपालिकेच्या पाच लिपिकांना केले निलंबित; कर अहवाल तपासणीत हलगर्जीपणाचा ठपका appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/jo9tJvB
via IFTTT

सैराट फेम प्रिन्स उर्फ सुरज पवारला दिलासा

https://ift.tt/WITuEbR

राहुरी; पुढारी वृत्तसेवा :  सैराट फेम प्रिन्स उर्फ सुरज पवार यास पोलीस चौकशीमध्ये मोठा दिलासा मिळाला आहे. बँक खात्यांसह इतर दस्ताऐवज पाहता पोलिसांकडून एक प्रकारे क्लिनचिट मिळाली. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी फसवणूक प्रकरणात पवार याचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

महेश बाळकृष्ण वाघडकर या तरूणाच्या तक्रारीनंतर दत्तात्रेय अरूण क्षीरसागर (रा. नाशिक) यासह आकाश विष्णू शिंदे व ओंकार नंदकुमार तरटे (दोघे रा.संगमनेर) विजय बाळासाहेब साळे (रा. खडांबे ता. राहुरी) यास अटक केल्यानंतर पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू आहे. अनेक तरूणांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आम्हालाही नोकरीच्या अमिषाने फसवणूक केल्याचे सांगितले.

दरम्यान, या प्रकरणामध्ये आरोपींकडून पोलिसांना दिलेल्या जबाबात प्रिन्स उर्फ सुरज पवार याचे नाव घेण्यात आले होते. शिक्के बनविण्यासाठी प्रिन्सने शॉर्ट फिल्मचे कारण सांगितल्याचे सांगण्यात आले होते. सैराट चित्रपटात भूमिका साकारणार्‍या अभिनेत्याचे नाव प्रकरणात आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली होती. राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दराडे व पोलीस उपनिरीक्षक सज्जन नर्‍हेडा यांनी पवार यांच्याशी संपर्क साधत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते.

कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. दीपक शामदिरे यांसह सुरज पवारने उपस्थित राहूनत कागदपत्रांसह सर्व पुरावे सादर केले. पवारने आपले तीन ते चार वर्षांपासूनचे बँक खात्याचे सर्व तपशिल तसेच डॉ. डेरे यांच्या संविधान चित्रपटाबाबतचे सर्व कागदपत्रे सादर केली. नोकरी फसवणूक प्रकरणी अनेक तक्रारी दाखल झालेल्या आहेत. त्यांमध्ये कोणत्याही तक्रारदारांनी पवार यांचे नाव घेतलेले नाही. त्यामुळे नोकरी फसवणूक प्रकरणात पवार यांचा सहभाग पोलिसांना आढळून आलेला नाही. त्यानुसार पोलिसांकडून एकप्रकारे पवार यांना क्लिनचिट मिळाल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा;

The post सैराट फेम प्रिन्स उर्फ सुरज पवारला दिलासा appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/FiUKJWO
via IFTTT

पारनेर : बातमीनंतर दुय्यम निबंधकांकडून मागवला खुलासा

https://ift.tt/1qVHWbB

शशिकांत भालेकर: 

पारनेर : पुढारी वृत्तसेवा : ‘पारनेर दुय्यक निबंधक कार्यालयाचा अंदाधुंदी कारभार’ या मथळ्याखाली दैनिक ‘पुढारी’मध्ये बातमी प्रसिद्ध करण्यात आली. यामुळे पारनेरचे प्रभारी पदभार असलेल्या दुय्यम निबंधक पदावरील अधिकार्‍याला हटवून, दुसर्‍या प्रभारी अधिकार्‍यांकडे या कार्यालयाचा पदभार देण्यात आला. तूर्तास प्रभारी दुय्यम निबंधकांची तात्पुरती नेमणूक केली असून, लवकरच कायमस्वरुपी दुय्यम निबंधकांची नेमणूक केली जाईल, असे जिल्हा निबंधक कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी एस. बी. झोटिंग यांनी सांगितले.  कार्यालयात साखळी पद्धतीने नागरिकांची आर्थिक पिळवणूक केली जाते. दलालांची कामे प्राधान्याने केले जाते. यामुळे अनेकांना हेलपाटे मारावे लागतात. या तक्रारी वरिष्ठ पातळीवर करण्यात आल्या.

तुकडे बंदी नियमाचे सर्रास उल्लंघन होऊन नोंदवले गेलेल्या प्रकरणांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यामुळे तडकाफडकी संबंधित अधिकार्‍याचा पदभार काढून घेऊन दुसर्‍या अधिकार्‍याकडे देण्यात आला; मात्र कार्यालयात असणार्‍या दलालांचा वावर, काही कर्मचारी कंत्राटी पद्धतीने कार्यालयात काम करत आहेत. त्यांच्यावर कोणतेही बंधन नसून ते खुलेआम दलालांना सहकार्य करत असल्याच्या तक्रारी आहेत. यावर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता लागली. तसेच, कायमस्वरुपी दुय्यम निबंधक मिळावा, अशी मागणी नागरिकांनी केली.

प्रभारी राज संपवा!
पारनेर येथे गेल्या काही कालावधीपासून दुय्यम निबंधकाचा पदभार हा प्रभारीकडे दिला जात आहे. त्यामुळे कार्यालयात अंदाधुंदी कारभार, सर्वसामान्यांची पिळवणूक होते. कर्मचारी व दलालांचे साटेलोटे होते. कायमस्वरुपीचा सक्षम अधिकारी नसल्याने हा प्रकार वाढतो. त्यासाठी प्रभारी राज संपवून कायमस्वरुपी दुय्यम निबंधक मिळावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

‘ठोस कारवाई व्हावी’
संबंधित दुय्यम निबंधकांच्या निलंबनाची मागणी, ‘आम्ही केली होती. अनेक प्रकरणांमध्ये गैरव्यवहार झाला, याची कसून चौकशी केली जावी यापूर्वीही या कार्यालयाचा प्रभारी चार्ज दिला गेला. येणार्‍या अधिकार्‍याकडून गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास त्याला येथून पुन्हा जिल्हा कार्यालयात नेमणूक दिली जाते; मात्र त्याच्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नाही. ती झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे, असे अमोल ठुबे म्हणाले.

The post पारनेर : बातमीनंतर दुय्यम निबंधकांकडून मागवला खुलासा appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/jMTIcnx
via IFTTT

करंजी : भगरीच्या पिठातून 15 जणांना विषबाधा

करंजी : पुढारी वृत्तसेवा  : नवरात्रीच्या उपवासात खालेल्या भगरीच्या भाकरीतून करंजीसह लगतच्या गावातील पंधरा जणांना विषबाधा झाली. सोमवारी रात्री विषबाधेचा हा प्रकार घडला. गावातीलच किराणा दुकानातून भगरीचे पीठ खरेदी करण्यात आल्याचे सांगत त्यातूनच विषबाधा झाल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान ज्या-ज्या लोकांनी या दुकानातून पीठ खरेदी केले त्यांनाही त्रास होत असल्याचे समजते. करंजी येथील प्रकाश … The post करंजी : भगरीच्या पिठातून 15 जणांना विषबाधा appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SZ6wMh

पूल असून अडचण, अन् नसून खोळंबा ! निमजेवाडी येथील रस्ता एकीकडे अन् पूल भलतीकडे

https://ift.tt/f9XomjR

कोळगाव : पुढारी वृत्तसेवा : निमजेवाडी (कोळगाव) येथील पुलाची अवस्था म्हणजे रस्ता एकीकडे तर पूल दुसरीकडे, दोन ओढ्यांपैकी एका ओढ्याचे पाणी पुलाखालून जाते, तर एका ओढ्याचे पाणी थेट पुलावर येते. रस्ता खाली अन् पुलाची उंची वर. या पुलामुळे सोय होण्याऐवजी गैरसोयच झाल्याच्या तक्रारी निमजेवाडी येथील ग्रामस्थांनी केल्या आहेत. निमजेवाडी येथील पुलाचे बांधकाम पाच महिन्यांपूर्वी सुरू झाले. या पुलाच्या बांधकामाच्या वेळी रस्त्यापासून एक मीटर भराव टाकण्यात आला व त्यावर दीड मीटरचा पूल बांधण्यात आला. त्यामुळे रस्त्याची व पुलाची उंची यांचा ताळमेळ बसत नाही. या ठिकाणी दोन ओढे एकत्र येतात. त्यातील एकाचे पाणी सरळ पुलावर व काही ग्रामस्थांच्या घरात शिरते. त्या ग्रामस्थांनी स्वखर्चाने तेथे भराव टाकला.

परंतु, पुलामुळे रस्ता चालू नसल्याने लहान मुले, आबालृद्ध, शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. येथील ग्रामस्थांनी ग्रामसभेत म्हणणे मांडूनही काही उपयोग झाला नाही.  सदर पुलाचे काम ग्रामपंचायतीच्या वतीने ठेकेदार पाहत आहे. तो जास्तीचा खर्च करण्यास तयार नाहीत. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने जाणारे पाणी स्वतंत्र खोदाई करून पुलाची उंची वाढवून काढून द्यावे. पुलाचा कठडा तोडून रॅम्प बांधून मुले व शिक्षकांसाठी रस्ता तयार करून द्यावा.

सध्या मुले व शिक्षक शाळेमध्ये पाण्यातून मार्ग काढत येत आहेत. पुलामध्ये मुरमाऐवजी माती टाकण्यात आली आहे. तेथे मुरूम टाकण्यात यावा, अशा मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहेत.ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्यांंनी पाहणी करूनही कामामध्ये सुधारणा दिसून येत नाही. या पुलाचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास सदर ठेकेदाराचे बिल अदा करण्यात येऊ नये. पंचायत समिती, जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीकडे वेळोवेळी अर्ज करूनही दखल न घेतल्याने सिंधुबाई नलगे, अशोक नलगे, विठ्ठल नलगे, संजय नलगे, राजेंद्र नलगे, बापू नलगे या ग्रामस्थांनी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

The post पूल असून अडचण, अन् नसून खोळंबा ! निमजेवाडी येथील रस्ता एकीकडे अन् पूल भलतीकडे appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/ib3ZT15
via IFTTT

घारगाव- कोठे बुद्रुक रस्त्याची चाळण

https://ift.tt/53uxTOh

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर तालुक्यातील घारगाव ते कोठे बुद्रुक हा डांबरी रस्ता उखडला असून ठिक ठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे या रस्त्याच्या अत्यंत दुरावस्था झाली आहे. तर रस्त्याच्या दुरूस्तीचे काम व्हावे म्हणून वारंवार मागणी करूनही या मागणीकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव, बोरबन, कोठे बुद्रुक व वनकुटे हा संपूर्ण डांबरी रस्ता दळण वळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा रस्ता म्हणून ओळखला जात आहे.

या रस्त्यावरून रात्रंदिवस छोट्या-मोठ्या वाहनांची वर्दळ होत असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून परिसरात होत असलेल्या पावसाचे डोंगर ओढे नाल्याचे पाणी थेट या रस्त्यावर येत येत असल्यामुळे या रस्त्याचे डांबर निघाले आहे. त्यामुळे रस्ता खराब झाला आहे.
सध्या या रस्त्यावरून ठिकठिकाणी पाणी वाहत आहे.त्यामुळे रस्त्यावर ठिक-ठिकाणी मोठ खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे वाहन चालकांमधून तीव्र स्वरूपाचा संताप व्यक्त केला जात आहे. हा रस्ता दुरुस्ती करण्याबाबत वारंवार मागणी करूनही या रस्त्याच्या दुरुस्तीकडे खासदार, आमदार तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य सुद्धा लक्ष देत नसल्याने त्यांच्याविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

The post घारगाव- कोठे बुद्रुक रस्त्याची चाळण appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/h1xNEMz
via IFTTT

नगर : ‘नागेबाबा’त पुन्हा नकली सोने! एकूण 6.83 किलो बनावट सोने

https://ift.tt/1f5cAld

नगर : पुढारी वृत्तसेवा  : श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीमध्ये मंगळवारी (दि.27) झालेल्या तपासणीत आणखी 14 खात्यांमध्ये 230 तोळे बनावट सोने आढळून आले आहे. नागेबाबा सोसायटीतील फसवणुकीचा आकडा 2.29 कोटींच्या घरात गेला असून, आतापर्यंत 6836 ग्रॅम म्हणजेच पावणेसात किलो बनावट सोने असल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, पोलिसांना संशय असलेल्या आणखी काही खात्यांची तपासणी सुरू असून, फसवणुकीचा आकडा वाढणार असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.
बनावट सोनेतारण प्रकरणी रविवारी अटक केलेल्या सचिन लहानबा जाधव (रा. निमगाव वाघा, ता. नगर) याच्या खात्यात 10.83 लाखांचे सुमारे 32 तोळे बनावट सोने आढळून आले होते.

मंगळवारी झालेल्या तपासणीत नागेबाबाच्या 14 खात्यांमध्ये 81 लाख 11 हजार रूपये किंमतीचे 230 तोळे बनावट सोने आढळून आले आहे. नागेबाबाच्या बनावट सोनेतारण गुन्ह्यातील आरोपींची संख्या आता 42 वर जाऊन पोहोचली आहे. शहर सहकारी बँकेतील आरोपीच नागेबाबाच्या प्रकरणात आरोपी आहे. गुन्ह्याचा तपास कोतवालीचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे करीत आहेत.

आरोपींना न्यायालयीन कोठडी
अजय किशोर कपाले, सुनिल ज्ञानेश्वर अळकुटे, श्रीतेश रमेश पानपाटील, संदीप सिताराम कदम, सचिन लहानबा जाधव या पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मंगळवारी संत नागेबाबा पतसंस्थेची 14 खाती तपासण्यात आली. त्यामध्ये 81 लाख 11 हजार रूपये किंमतीचे 2385 गॅ्रम बनावट सोने आढळून आले आहे.
                                                 -गजेंद्र इंगळे, पोलिस उपनिरीक्षक, कोतवाली

The post नगर : ‘नागेबाबा’त पुन्हा नकली सोने! एकूण 6.83 किलो बनावट सोने appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/4ULhO5F
via IFTTT

नगर : दोन अभियंत्यांची महिनाभरात उचलबांगडी

https://ift.tt/9te7OkW

नगर : पुढारी वृत्तसेवा : जलजीवन मिशनला गती देण्यासाठी जिल्हा परिषद सीईओ आशिष येरेकर यांनी पाणी पुरवठ्याचे तत्कालिन कार्यकारी अभियत्यांची तडकाफडकी बदली केलेल्या महिना उलटत नाही, तोच पुन्हा सोमवारी तेथे नियुक्त केलेल्या दुसर्‍या कार्यकारी अभियंत्यांचीही सीईओंनी उचलबांगडी केली. दरम्यान राहुरी-संगमनेरचे उपअभियंता एस.एस.गडदे यांच्याकडे पाणी पुरवठ्याचा तात्पुरता पदभार देण्यात आला आहे. महिनाभरात तिसरे कार्यकारी अभियंता आल्याने पाणी पुरवठा विभागातील कर्मचारीही गोंधळून गेले आहेत.

जिल्हा परिषदेत जलजीवन मिशन राबविण्यासाठी कायमस्वरुपी कार्यकारी अभियंता नसल्याने ‘प्रभारी’ अधिकार्‍यावर भार टाकला जातो. नेवाश्याचे आनंद रुपनर यांच्याकडील प्रभारी पदभार महिनाभरापूर्वीच सीईओंनी बांधकाम उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण जोशी यांच्याकडे देत रुपनर यांची मूळ जागी बदली केली. सोमवारी सीईओंनी पुन्हा जोशी यांनाही तडकाफडकी मूळ जागी धाडले. जोशी यांचा पुरवठ्याचा ‘कार्यकारी अभियंता’ पदभार संगमनेर-राहुरीचे शाखा अभियंता गडदे यांच्याकडे देण्यात आला आहे.

ते पदभार स्वीकारण्यासाठी मंगळवारी येण्यापूर्वीच संगमनेर व राहुरीचे ठेकेदार त्यांच्या दालनात पुष्पगुच्छ घेवून उपस्थित असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ‘कोल्हार-चिंचोली’सह अन्य योजनांच्या कामांमुळे गडदे चर्चेत आहेत. लवकरच सीईओंना पुन्हा नवीन कार्यकारी अभियंता शोधावा लागणार का? अशी शंका उपस्थित होत आहे.

रुपनर, जोशींना ‘कर्जत-जामखेड’ भोवले?
जलजीवन ही केंद्र व राज्याची संयुक्त योजना आहे. ही कामे देताना राजकीय दबावतंत्राचा वापर होतो, अशी चर्चा आहे. महिनाभरापूर्वी रुपनर यांची तडकाफडकी बदली आणि बल्लाळ नावाच्या कर्मचार्‍यावर झालेल्या निलंबनालाही भाजप-राष्ट्रवादीच्या दोन आमदारांच्या संघर्षाची किनार असल्याची चर्चा आहे. जोशी यांच्या बदलीमागेही कर्जत-जामखेडची एक फाईलच कारणीभूत असल्याची चर्चा दबक्या आवाजात आहे.

The post नगर : दोन अभियंत्यांची महिनाभरात उचलबांगडी appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/6XgIoSN
via IFTTT

नगर : ‘मोकाट’वरून नगरसेवक भडकले, सभापतींच्या प्रश्नांवर प्रशासन निरुत्तर

https://ift.tt/MioWR8D
भटक्‍या कुत्र्यांचा हल्‍ला

नगर : पुढारी वृत्तसेवा : मोकाट कुत्र्याने चावा घेल्याने नागापूर येथे लहान मुलाचा जीव गेला. कुत्र्याने चावा घेतल्याने नगर शहरात पाच बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मोकाट हिंस्त्र कुत्र्यांच्या बंदोबस्तावरून स्थायी समितीच्या सभेत सभापतीसह नगरसेवक प्रशासनावर भडकले. मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासंदर्भात उपायोजना करा, अशा सूचना स्थायी समिती सभापती कुमार वाकळे यांनी अधिकार्‍यांना दिल्या. आयुक्तांशी चर्चा करून शास्त्रीय पद्धतीने उपाययोजनेचा निर्णय घेण्यात येईल, असे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी सांगितले. महापालिकेची स्थायी समितीची सभा सभापती कुमार वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक गणेश कवडे, रवींद्र बारस्कर, समद खान, नगरसेविका रुपाली वारे, संध्या पवार, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त यशवंत डांगे यांच्यासह अधिकारी उपस्थत होते.

शहरातील रस्त्यावर आणि सीना नदी कडेला मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या आहेत. मोकाट कुत्रे पकडून नेमके कोठे सोडले जातात. अ‍ॅनिमल वेस्ट रस्त्यावर टाकल्याने कुत्र्यावर त्यावर ताव मारतात आणि हिंस्त्र बनतात. गेल्या काही दिवसांमध्ये पाच जणांचा कुत्र्याने चावा घेतल्याने मृत्यू झाला आहे. याला जबाबदार कोण, हिंस्त्र कुत्र्याला मारणार कोण त्या मुलाच्या कुटुंबियांना मदत करणार कोण असा सवाल सभापती कुमारसिंह वाकळे यांनी उपस्थित केला.

नगरसेवक गणेश कवडे यांनी नालेगाव, काटवन खंडोबा भागातील मोकाट कुत्रे पादचारी नागरिकांना चावा घेत आहेत. दुचाकीस्वारांच्या मागे लागतात. अ‍ॅनिमल वेस्टमुळे कुत्रे चपाती, भाकरी खात नाहीत, परिणामी ते हिंस्त्र बनले आहेत. या कुत्र्यांचा बंदोबस्त कोण करणार, यावर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. नगरसेवक रवींद्र बारस्कर यांनी शहरांत ‘डॉगबाईट’च्या घटना वाढल्याकडे लक्ष वेधले. कुत्रे मागे लागल्याने अनेकांचे अपघात झाले आहेत. त्यामुळे मोकाट कुत्र्यांसंदर्भात ठोस निर्णय घ्यावा. जीव गमवलेल्या मुलाच्या कुटुंबियांना मदत करावी, अशी मागणी केली.

कोंढवाडा विभागप्रमुख हंस यांनी उत्तरादाखल 2001 च्या प्राणीसंरक्षण कायद्याप्रमाणे कुत्र्यांचे फक्त निर्बिजिकरण केले जाते. पैदाशीवर प्रतिबंध करतो मात्र, त्यांना मारण्याची तरतुद कायद्यात नाही. आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे म्हणाले, कायद्यानुसार कुत्र्यांना मारता येत नाही किंवा कायद्यात तशी तरतूद नाही. याबाबत आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे. त्यात हिंस्त्र कुत्र्यांना शास्त्रीय पद्धतीने बंदोबस्त करण्याबाबत निर्णय घेणयात येईल.

दहा लाखांच्या प्रस्तावाला मंजुरी
पावसाळ्यापूर्वी शहरात नालेसफाई करण्यात आली मात्र, काही ठिकाणी पूर्ण काम झाले नाही तर काही ठिकाणी काम करण्यास निधीची कमतरता निर्माण झाली. त्यामुळे जास्तीच्या निधीसाठी प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. त्यास मान्यता देण्यात आली. त्या निधीतून अभियंता कॉलनी येथील नाला, सीना नदी, खोकर नालाची साफसफाई करण्यात येणार असल्याचे उपअभियंता आर. जी. सातपुते यांनी सांगितले.

बाकड्यांचे प्रस्ताव स्थागित
शहरातील 7 व 11 प्रभागांत सार्वजनिक उद्यानामध्ये बाकडे बसविण्यासंदर्भात ऑफिस रिपोर्ट मंजुरीसाठी स्थायी समितीत ठेवण्यात आला. मात्र, त्यावर सदस्यांनी आक्षेप घेतला. तीन महिन्यांपासून बाकड्यांचे प्रस्ताव सादर केले आहेत. त्याला अद्याप मंजुरी नाही. या प्रस्तावाला मंजुरी देणार असाल तर आमच्याही प्रस्तावांना मंजुरी द्यावी, असा अन्य नगरसेवकांनी आग्रह धरला. सभापती कुमार वाकळे यांनी बाकड्याचे दोन्ही प्रस्ताव तुर्त स्थगित करून सर्वच प्रभागांच्या प्रस्तावाबरोबर हे प्रस्ताव मंजुरीसाठी देण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले.

सावेडीचे केडगावात, बोल्हेगावचे मुकुंदनगरात
मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम जोरात सुरू आहे. सावेडीमधील कुत्रे पकडल्यानंतर ते केडगावमध्ये साडले जातात. केडगावचे कुत्रे बोल्हेगावमध्ये सोडले जातात. तर, बोल्हेगावचे कुत्रे मुकुंदनगरमध्ये सोडले जातात. मग संबंधित ठेकेदार कुत्रे पकडून नेमके काय करतो असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला.

छत्रपती संभाजीराजे, आमदार जगतापांचे अभिनंदन
न्यू आर्टस महाविद्यालयासमोरील हुतात्मा स्मारकामध्ये माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या निधीतून दोन मजली इमारत व सुशोभिकरण करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी स्मारकासाठी निधी उपलब्ध करून दिल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. आमदार संग्राम जगताप यांनी बुरूडगाव परिसरातील साईनगरमध्ये म्युझिकल गार्डनसाठी एक कोटी सहा लाखांचा निधी मिळवून दिल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करण्यात आले.

The post नगर : ‘मोकाट’वरून नगरसेवक भडकले, सभापतींच्या प्रश्नांवर प्रशासन निरुत्तर appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/DAa4Mg0
via IFTTT

करंजी : भगरीच्या पिठातून 15 जणांना विषबाधा

https://ift.tt/M2h9P0x

करंजी : पुढारी वृत्तसेवा  : नवरात्रीच्या उपवासात खालेल्या भगरीच्या भाकरीतून करंजीसह लगतच्या गावातील पंधरा जणांना विषबाधा झाली. सोमवारी रात्री विषबाधेचा हा प्रकार घडला. गावातीलच किराणा दुकानातून भगरीचे पीठ खरेदी करण्यात आल्याचे सांगत त्यातूनच विषबाधा झाल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान ज्या-ज्या लोकांनी या दुकानातून पीठ खरेदी केले त्यांनाही त्रास होत असल्याचे समजते. करंजी येथील प्रकाश गोवर्धन राठोड, लिलाबाई लक्ष्मण चव्हाण, अनिता प्रकाश राठोड, रामदास रावजी चव्हाण, गीताबाई रामदास चव्हाण, अशोक तारू चव्हाण, सुशीला अशोक चव्हाण, रमेश संतोष चव्हाण या आठ जणांवर तिसगाव येथील श्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

करंजीसह परिसरातील अनेक महिला पुरुषांनी नवरात्रीचे उपवास धरले आहेत. उपवासाच्या पहिल्याच दिवशी गावातील काही महिलांनी करंजी येथील एका किराणा दुकानातून भगरीचे पीठ आणले. रात्री या पिठापासून भाकरी तयार केल्या. या भाकरी खाल्ल्यानंतर रात्री दहाच्या सुमारास काही लोकांना उलट्या जुलाबाचा त्रास होऊ लागला. घरातील इतरांनी त्यांना तात्काळ तिसगाव येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. भगरीच्या पिठामुळे करंजीसह परिसरातील खंडोबावाडी,मराठवाडी येथील काही लोकांना त्रास झाला असून नगर येथील खाजगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे समजते.

अन्नातून विषबाधेमुळे सोमवारी रात्री करंजीच्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. दोन दिवसात त्यांना डीस्चार्ज दिला जाईल.
                                                – डॉ. गणेश साळुंखे,  डॉ. वैशाली क्षीरसागर

संबंधित कंपनीवर कारवाईची मागणी
करंजीतील जवळपास 15 लोकांना भगरीच्या भाकरीतून विषबाधा झाली आहे. हे पीठ तयार करणार्‍या कंपनीचा शोध घेऊन गुन्हा दाखल करून रुग्णांना न्याय द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते छानराज क्षेत्रे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश शेलार, छत्रपती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक मोरे, माजी सरपंच भाऊसाहेब क्षेत्रे, राजेंद्र क्षेत्रे, पै. नामदेव मुखेकर, माजी चेअरमन उत्तम अकोलकर, संभाजी ब्रिगेडचे सुभाष अकोलकर यांनी केली.

The post करंजी : भगरीच्या पिठातून 15 जणांना विषबाधा appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/Vpl079E
via IFTTT

नगर: शिक्षक बँकेची 16 ला निवडणूक! स्थगिती उठवली; गुरुजी पुन्हा सिमोल्लंघनाच्या तयारीत

https://ift.tt/rAX8ISe
Ahmednagar shikshak bank election will be on 16 october 2022

नगर, पुढारी वृत्तसेवा: शिक्षक बँक निवडणुकीवरील स्थगिती सोमवारी (दि.26) न्यायालयाने अखेर उठविली. न्यायालयाच्या आदेशाने 16 ऑक्टोबर रोजी मतदान, आणि दुसर्‍या दिवशी 17 ला मतमोजणी घेण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. शिवाजीराव शेळके यांनी दिली. दरम्यान, घटस्थापनेपासूनच बँकेवरील सत्ता स्थापनेसाठीही सत्ताधारी तसेच विरोधकांनी पुन्हा एकदा मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे बँकेची चौरंगी लढत चांगलीच चुरशीचे होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिक्षक बँकेवरील सत्तेसाठी सुरुवातीपासूनच विरोधक सीमोल्लंघनाच्या तयारीत आहेत. मात्र, 30 सप्टेंबरपर्यंत सहकारातील निवडणुकांना बे्रेक लागल्याने इच्छुकांची निराशा झाली होती. न्या. रवींद्र घुगे व न्या. अर्जून पेडणेकर यांच्यासमोर काल सुनावणी झाली. सत्ताधारी बापूसाहेब तांबे यांच्या गुरुमाऊलीकडून उमेदवार बाळासाहेब सरोदे, रामेश्वर चोपडे, महेश भनभने, गोरक्षनाथ विटनोर, बाळासाहेब मुखेकर हे सुनावणीवेळी हजर होते. यांच्यावतीने अ‍ॅड. शिवाजीराव शेळके यांनी युक्तिवाद केला. तर यापूर्वी रोहोकले गुरुजींकडून प्रवीण ठुबे, गणेश वाघ, विकास डावखरे, दशरथ ढोले, संतोष खामकर आदींनी निवडणूक घेण्याबाबत याचिका दाखल केली होती. त्यांच्या वतीने अ‍ॅड. गुलाबराव राजळे, अ‍ॅड. राजेंद्र टेमकर यांनी बाजू मांडली. या सुनावणीत न्यायालयाने निवडणुकीवरील स्थगिती उठविण्याचा निर्णय घेतला असून, 16 ऑक्टोबरला निवडणूक घेण्यासाठी हिरवा कंदिल दर्शविला आहे.

निवडणूक निश्चित होताच, सत्ताधारी नेतेमंडळी आजपासून पुन्हा आपल्या प्रचाररुपी अजेंड्यातून सभासदांना जणू विचारांचे ‘सोने’ वाटण्याच्या तयारीत आहे. तर, विरोधी गुरुजींनीही कालच मेळावा घेऊन त्यात बँकेतील अपहार, भ्रष्टाचाररुपी रावणाचे दहन करण्याची भीष्मप्रतिज्ञाच केली आहे. याउलट, डॉ. कळमकर यांचा गट संधी समजून दोन्ही गुरुमाऊलींवर लक्ष ठेवून आहे, तर तिकडे चौथी आघाडीही कंबर कसून आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची तितकीच चुरशीची होणार आहे.

दरम्यान, विकास मंडळाची निवडणुकही बँकेसोबतच घेतली जाणार आहे. या ठिकाणीची चौरंगी लढत रंगलेली आहे. येथे सत्ताधारी रोहोकले गट आहे. या चौरंगी लढतीत 10 हजार 706 सभासद विकास मंडळासाठी मतदान करणार आहेत. ही निवडणुकही बँकेइतकीच प्रतिष्ठेची बनलेली आहे. त्यामुळे विकास मंडळ कोणाच्या ताब्यात जाणार, याकडेही सभासदांचे लक्ष असणार आहे.

विकास मंडळाच्या 18 जागांसाठी चुरस

विकास मंडळाच्या 18 जागांसाठीही उमेदवारी अर्जाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. बँकेची निवडणूक थांबल्याने विकास मंडळाचीही निवडणूक रखडली होती. मात्र, आता 16 तारखेला बँकेसोबत विकास मंडळाचीही निवडणूक होणार आहे. येथेही चौरंगी लढती रंगलेल्या आहेत.

सुनावणीनंतर आरोप-प्रत्यारोप सुरू!

सुनावणीत सत्ताधार्‍यांनी सभासदांना दिलेला लाभांशाला एका गटाने वकिलामार्फत विरोध केल्याचे निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. तर, दुसरीकडून ‘तो’ वकील आमचा नव्हता, कदाचित ‘डॉक्टरांचा’ असावा, असे सांगून ‘गुरुजी’च्या एका नेत्याने हात झटकले.

रोहोकले गुरुजीप्रणित गुरुमाऊली मंडळाच्या निष्ठावंत 130 कार्यकर्त्यांनी निधी गोळा करून बँकेची निवडणूक त्वरीत घ्यावी, यासाठी याचिका दाखल केली होती. त्याचा आज निकाल लागला. आम्ही बँकेतील भ्रष्टाचाररुपी रावणाचे दहन करण्याचा संकल्प केला आहे.

– विकास डावखरे, गुरूमाऊली, रोहोकले गट

विरोधकांनी वेगवेगळ्या मार्गाने आणि चुकीच्या पद्धतीने ‘गुरुकुल’वर आरोप करण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्याचा काही फायदा होणार नाही. प्रचारामध्ये कुठेही चिखलफेक न करता शिक्षकांचे पावित्र्य जपण्याचे काम ‘गुरुकुल’ करणार आहे. सभासद आमच्यासोबत आहेत.

– भास्करराव नरसाळे, गुरुकुल मंडळ

बँकेची निवडणूक घ्यावी, यासाठी आम्ही आग्रही होतोे. त्यासाठी याचिकाही दाखल केलेली होती. काल सुनावणीसाठी आमचे काही उमेदवारही तेथे हजर होते. आता 16 ला निवडणूक होणार आहे. चांगल्या कारभाराच्या जोरावर 17 तारखेला आमचा विजय निश्चित आहे.

– सलीम खान पठाण, गुरुमाऊली, तांबे गट

गुरुमाऊलीला सत्ता देऊन यांनी आपल्याच पोळ्यांवर तूप ओढले आहे. त्यामुळे बँकेतील भ्रष्टाचारात दोन्ही गुरुमाऊली सहभागी आहेत. कळमकर यांनाही एकदा सत्ता देऊन पाहिली आहे. त्यांचाही कडू अनुभव सभासदांना आहे. त्यामुळे सभासद यंदा आमचा पर्याय स्वीकारतील.
– एकनाथ व्यवहारे, चौथी आघाडी

The post नगर: शिक्षक बँकेची 16 ला निवडणूक! स्थगिती उठवली; गुरुजी पुन्हा सिमोल्लंघनाच्या तयारीत appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/8pLYgFy
via IFTTT

नगर: हुमणीग्रस्त उसाला चौदाशे रुपये भाव, साखर कारखान्यांनी वेळेत गाळप हंगाम सुरू करण्याची शेतकर्‍यांची मागणी

https://ift.tt/EglZ7Ii
1400 rupees per tonw for humani sugarcane in Ahmednagar

भेंडा, पुढारी वृत्तसेवा: हुमणी अळीचा वेळेत बंदोबस्त न केल्यामुळे सध्या आडसाली व खोडवा उसाचा मोठ्या प्रमाणात हुमणी अळीने फडशा पाडला आहे. त्यामुळे या उसास 1 हजार 200 ते 1 हजार 400 रुपये प्रतिटन चार्‍यासाठी भाव मिळत असल्याने साखर कारखाने वेळेत सुरू होऊन शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान टाळावे,अशी अपेक्षा ऊस उत्पादाकांतून व्यक्त होत आहे.

दरवर्षी जूनच्या सुरुवातीस हुमणी अळीचे भुंगे शेतात अंडी घालतात. याच कालावधीत जर शेतकर्‍यांनी कृषी खात्याच्या सल्ल्याने योग्य उपाययोजना केली तर हुमणी अळी तयारच होणार नाही. परंतु बहुतेक शेतकरी याकडे दुर्लक्ष करत असल्याने नंतर हुमणी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसू लागतो. प्रादुर्भाव दिसू लागल्यानंतर कितीही उपाययोजना केली, औषधासाठी मोठा खर्च केला, तरी त्यास फारसा अटकाव होत नाही. पर्यायने अतिशय मोठ्या प्रमाणात खर्च केलेल्या ऊस पिकाचे नुकसान होते व अल्प दराने विकण्याची वेळ येते. उसास एकरी 40 ते 50 हजार रुपये खर्च करूनही शेवटी पंधरा ते वीस हजार रुपये पदरात पाडून घेण्याची नामुष्की त्यामुळे शेतकर्‍यावर येते. एकच हुमणीची अळी 8 ते 10 ऊसाचे बेट मुळासकट उखडून टाकते. त्यामुळे 3-4 दिवसांत ऊस वाळण्यास सुरुवात होते. असे हळूहळू पूर्ण ऊसाचे क्षेत्र हुमणीस बळी पडते.

राज्य सरकारने 15 ऑक्टोबरला साखर कारखाने सुरू होतील अशी घोषणा केलेली आहे . ऊसास दरही 3 हजारांपेक्षा जास्त जाहीर केला आहे. परंतु सध्या हुमणीमुळे पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत असल्याने कारखाने किमान 15 ऑक्टोबरला तरी वेळेत सुरू व्हावेत,अशी अपेक्षा ऊस उत्पादक शेतकरी वर्गांमधून होत आहे. हुमणी अळीचा एकत्रितपणे बंदोबस्त साखर कारखान्यांनी करण्याबाबत काही पथदर्शक प्रकल्प उभारल्यास नक्कीच हुमणीस आळा बसू शकेल. परंतु तसे होताना मात्र दिसत नाही. हुमणीग्रस्त उसाचे क्षेत्र चार्‍यासाठी मोठ्या प्रमाणात नाविलाजाने देऊन आर्थिक नुकसान सोसावे लागते.

दहिगाव-ने कृषी विज्ञान केंद्राचा सल्ला

जैविक नियंत्रणामध्ये परोपजीवी मित्रबुरशी मेटारायझीम अ‍ॅनीसोप्ली व सूत्रकृमी हे हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहेत. त्यांचा वापर करून काही प्रमाणात हुमणीचे नियंत्रण करता येते. जमिनीतून फोरेट (10 टक्के दाणेदार) किंवा फिप्रोनिल (0.3 टका दाणेदार) 25 किलो प्रतिहेक्टर या प्रमाणात द्यावे. क्लोरपायरिफॉस (20 टक्के प्रवाही) 25 ते 30 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

The post नगर: हुमणीग्रस्त उसाला चौदाशे रुपये भाव, साखर कारखान्यांनी वेळेत गाळप हंगाम सुरू करण्याची शेतकर्‍यांची मागणी appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/NcVmIrM
via IFTTT

पीएफआयशी संबंधित दोघांवर नगरमध्ये कारवाई, नगर व संगमनेर येथून स्थानिक पोलिसांनी घेतले ताब्यात

https://ift.tt/uIeFh6t
Two people related to PFI arrested by police in ahmednagar

नगर, पुढारी वृत्तसेवा: पीएफआय अर्थात पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या विविध ठिकाणांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून धाडसत्र सुरू आहे. पीएफआयशी संबंधित असलेल्या दोघांपैकी एकाला नगर शहरातील मुकूंदनगर तर दुसऱ्याला संगमनेर येथून स्थानिक पोलिसांनी मंगळवार २७ सप्टेंबर रोजी सकाळी अटक केली आहे.

मोहम्मद खलील दिलावर शेख (संगमनेर), जुबेर अब्दुल सत्तार शेख (मुकूंदनगर, अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पीएफआयवर देशात हिंसाचार भडकवणे, दहशतवादी हल्ले करणे, दंगे भडकवणे आणि टेरर फंडिंगसारखे गंभीर आरोप आहेत. गेल्या आठवड्यात तपास यंत्रणांनी देशभरात छापेमारी करत या संघटनेच्या शंभरहून अधिक जणांना अटक केली होती. त्यानंतर आता अहमदनगर जिल्ह्यातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या इस्लामी संघटनेत कार्यरत असलेल्या दोघांना स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. सदरची कारवाई भिंगार कॅम्प, संगमनेर पोलिसांनी केली आहे. मात्र, या कारवाईत राष्ट्रीय तपास यंत्रणेचे कोणतेही पथक नसल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

The post पीएफआयशी संबंधित दोघांवर नगरमध्ये कारवाई, नगर व संगमनेर येथून स्थानिक पोलिसांनी घेतले ताब्यात appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/ScnwvQh
via IFTTT

कुकाणा : माजी आमदार मुरकुटेंची पुन्हा नामुष्की

कुकाणा : पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या देवगाव विविधि कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणुकीत माजी आमदार मुरकुटे यांना उमेदवारच न मिळाल्याने संस्थेची निवडणूक बिनविरोध सोडण्याची नामुष्की मुरकुटे गटावर आली. सत्तांतरानंतर झाल्याने सोसायटीच्या वार्षिक सभेते माजी आमदार मुरकुटे यांनी जयहरी विकास सोसायटी नवीन संस्था स्थापन करण्यासाठी ना हरकत दाखल्याची मागणी केली. नवीन संस्था स्थापनेला सभासद व … The post कुकाणा : माजी आमदार मुरकुटेंची पुन्हा नामुष्की appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SZ3X0T

मारहाण करुन चोरी करणारे आरोपी श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात

https://ift.tt/oI5LGzE

श्रीगोंदा; पुढारी ऑनलाइन: पारगाव शिवारात रस्तालूट करणारी टोळी श्रीगोंदा पोलीस पथकाने रांजणगाव ता. शिरूर येथुन जेरबंद केली असून त्यांच्याकडून सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शिवाजी वसंत क्षिरसागर रा. राशिन, ता. कर्जत हे ६ ऑगस्ट रोजी शिरुर आठवडे बाजारातुन फरसाण विक्री करुन त्यांच्या मालवाहु टाटा जीप गाडीने राशिनला येत असताना पारगाव ता. श्रीगोंदा येथे चार लुटारूंनी टेम्पोला मोटार सायकल आडवी लावुन टेम्पोतील लोकांना मारहाण करून खिशातील पैसे, मोबाईल बळजबरीने काढुन घेतले होते. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात रस्तालूट प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास चालु असताना पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना रांजणगाव येथील आरोपी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार श्रीगोंदा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सचिन बाळासाहेब कोल्हे रा.विट, ता. करमाळा, आप्पासाहेब काशीनाथ सोलंकर रा. करपडी, राशिन, ता. कर्जत ह. रा. कारेगाव ता. शिरुर, चेतन साहेबराव सांगळे रा. करंजी ता. पाथर्डी ह. रा. कारेगाव ता. शिरुर, सोनल साहेबराव चव्हाण वर्षे रा. गवखेल ता. आष्टी जि. बीड ह. रा. कारेगाव ता. शिरुर यांना कारेगाव येथुन ताब्यात घेतले. संशयितांकडे कसुन चौकशी केली असता गुन्हा केल्याची कबुली दिली.

आरोपीकडून मोबाईल आणि दोन मोटारसायकल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मा. आण्णासाहेब जाधव आणि पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग करीत आहेत. ही कारवाई श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, पोसई समीर अभंग, पोसई प्रदिप बो-हाडे, सहायक फौजदार अंकुश ढवळे (SDPOकार्या), पोना गोकुळ इंगवले, पोकॉ प्रकाश मांडगे, पोकॉ किरण बोराडे, पोकॉ दादासाहेब टाके, पोकॉ अमोल कोतकर, पोकॉ रविंद्र जाधव, पोकॉ प्रशांत राठोड यांनी केली आहे.

The post मारहाण करुन चोरी करणारे आरोपी श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/jzRZ7gx
via IFTTT

अगस्ती सहकारी साखर कारखाना संचालक निवडणुकीत सत्तांतर

https://ift.tt/JkEZ8pV

अकोले; पुढारी वृत्तसेवा: अगस्ती सहकारी साखर कारखाना संचालक निवडणुकीत माजी मंत्री मधुकर पिचड, आ. वैभव पिचड यांना सभासदांनी घरचा रस्ता दाखविला. सत्तांतराचा कौल देत सभासदांनी पिचडांची 29 वर्षाची सत्ता खालसा केली. राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे, सीताराम गायकर यांच्यावर सभासदांनी विश्वास टाकत कारखान्याची सत्ता सोपविली.

संचालक मंडळाच्या सर्वच्या सर्व 21 जागा आ. लहामटे-गायकर यांच्या शेतकरी समृध्दी मंडळाने जिंकल्या. पिचड यांच्या शेतकरी मंडळास खातेही उघडता आले नाही. या निवडणुकीत पिचड-पुत्रांच्या शेतकरी विकास मंडळाचा सभासद मतदारांनी सुपडा साफ केला. या निवडणुकीत मतदारांनी माजी मंत्री मधुकर पिचड व माजी आमदार वैभव पिचड दोघांनीही नाकारत त्यांचा पराभव केला.

अकोले अगस्ती सहकारी साखर कारखाना संचालक निवडणुकीत आ.डॉ.किरण लहामटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे, कॉ. डॉ. अजित नवले, काँग्रेसचे मधुभाऊ नवले, जिल्हा परिषदेचे माजी सभापती कैलास वाकचौरे, रिपब्लिक पार्टीचे विजयराव वाकचौरे, शिवसेनेचे मच्छिंद्र धुमाळ, माजी उपसभापती मारूती मेेंंगाळ या महाविकास आघाडीतील नेत्यांनी एकत्र येत पिचडांची सत्ता घालविली. आमदार किरण लहामटे यांचे वडील यमाजी लहामटे यांना सर्वाधिख 4 हजार 465 सर्वाधिक मते मिळाली आहेत.

अशोकराव भांगरे, सीताराम पाटील गायकर, डॉ. अजित नवले, विजयराव वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली हा विजय मिळाला. त्यांनी इंग्रजी नीतीने राजकारण केले, पण मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली.
                                                       – डॉ. किरण लहामटे, आमदार

तालुक्याची भाग्यलक्ष्मी अगस्ती साखर कारखाना समर्थपणे चालवू या शेतकरी समृध्दी मंडळाच्या विश्वासत्मक आवाहनाला सभासद मतदारांनी कौल दिला. मतदारांनी एकहाती सत्ता ताब्यात दिली. त्यांच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही. कारखाना सक्षमपणे चालवून दाखविणार.
                                              – सीताराम गायकर, माजी उपाध्यक्ष.

कारखाना निवडणुकीत शेंडी मतदार केंद्रावर मृत महिलेच्या नावावर बोगस मतदान करण्यात आल्याने प्रशासन झुकल्याचे दिसून आले. याबाबत शासनाकडे कारवाईची मागणी करणार असून न्यायालयात दाद मागणार आहे. अलीबाबाच्या खजिन्यापुढे आम्ही कमी पडलो. दडलेला खजिना निवडणुकीत बाहेर पडला.

                                                           -वैभव पिचड, माजी आमदार

विजयी उमेदवार व मते
बिगर उत्पादक, पणन संस्था प्रतिनिधी गट : सीताराम पाटील गायकर,
आगर गट: अशोक आरोटे (4414), परबत नाईकवाडी (4414), विकास शेटे (4138).
इंदोरी गट: अशोक देशमुख (4110), पाटीलबा सावंत (3991), प्रदिप हासे (3968).
अकोले गट : मच्छिंद्र धुमाळ (4253), विक्रम नवले (4219), कैलासराव वाकचौरे (4286).
कोतुळ गट : मनोज देशमुख (4306), यमाजी लहामटे (4465), कैलास शेळके (4353).
देवठाण गट : बादशहा बोंबले (4144), रामनाथ बापू वाकचौरे (41970), सुधीर शेळके (4007).
महिला राखीव : सुलोचना नवले (4546), शांताबाई वाकचौरे (4222).
इतर मागासवर्गीय गट: मीनानाथ पांडे (4283).
अनुसूचित जाती जमाती गट: अशोकर यशवंत भांगरे (4214).
भटक्या विमुक्त जाती गट : सचिन दराडे (4473).

The post अगस्ती सहकारी साखर कारखाना संचालक निवडणुकीत सत्तांतर appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/jqHVo5z
via IFTTT

शेवगाव : कारखान्यांनी ऊस दर जाहीर करावा, कार्यक्षेत्रातील उसाचे प्राधान्याने गाळप करण्याची ‘वंचित’ची मागणी

https://ift.tt/oL5Z27P

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा  : शेवगाव, पाथर्डी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांना ज्ञानेश्वर, वृध्देश्वर व केदारेश्वर या तिन्ही सहकारी कारखान्यांनी ऊस दर जाहीर करून, कार्यक्षेत्रातील ऊस प्राधान्याने गाळप करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत वंचितचेे राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार छगन वाघ यांना निवेदन देण्यात आले. गतवर्षी कारखानदारांनी बाहेरील ऊस कमी भावात आणल्यामुळे कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे हाल झाले. ऊस तोडणीसाठी शेतकर्‍यांना आर्थिक भुर्दंड सोसून मानसिक त्रास सहन करावा लागला.

या सर्व प्रकाराला शेवगाव, पाथर्डी तालुक्यातील तिन्ही कारखान्यातील पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी जबाबदार आहेत. यावर्षी कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस गाळपासाठी प्राधान्य द्यावे. जोपर्यंत कार्यक्षेत्रातील ऊस शिल्लक आहे, तोपर्यंत बाहेरील ऊस गाळपासाठी आणू नये. ऊस दर व कार्यक्षेत्रातील ऊसासंदर्भात तहसीलदार वाघ यांनी तिन्ही कारखाना प्रशासनाची बैठक बोलवावी. या मागण्या मान्य न झाल्यास शिष्टमंडळ साखर आयुक्तांना भेटणार आहे. तसेच, या प्रश्नसाठी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून आंदोलन करील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

यावेळी सोपान काळे, किसन पवार, राजू उगलमुगले, दीपक शिंदे, रवींद्र निळ, संजय उगले, कृष्णा काळे, महादेव बोडखे, प्रमोद गर्जे, वंचितचे तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख, भगवान काळे, नितीन जाधव, मनिषा आंधळे, सुरेश खंडागळे, लक्ष्मण मोरे, सागर गरुड, चांदभाई शेख, लक्ष्मण माळी, सलीम शेख, महादेव वाकडे, हरिभाऊ काळे, संदीप साळवे, ब्रम्हनाथ डाके, दत्ता घरवाढवे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

The post शेवगाव : कारखान्यांनी ऊस दर जाहीर करावा, कार्यक्षेत्रातील उसाचे प्राधान्याने गाळप करण्याची ‘वंचित’ची मागणी appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/KNsDntR
via IFTTT

करंजी घाटात कोसळला मळीचा टँकर

करंजी : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटात शनिवारी (दि.24) सकाळी नगरहून पाथर्डीकडे जाणारा टँकर खोल दरीत कोसळला आहे. चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने ही घटना घडली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; परंतु टँकर चालक किरकोळ जखमी झाला असून, टँकरचे मात्र मोठे नुकसान झालेे. नगरहून शनिवारी सकाळी पाथर्डीकडे मळीची वाहतूक करणारा एक टँकर करंजी … The post करंजी घाटात कोसळला मळीचा टँकर appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SZ0LFr

चैतन्य पर्वास आज प्रारंभ ! जिल्हाभरात सर्वत्र नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी

https://ift.tt/qwf4TJO

नगर : पुढारी वृत्तसेवा : चैतन्य पर्व असलेल्या नवरात्रोत्सवास आजपासून प्रारंभ होत आहे. त्यासाठी जिल्हाभरात सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजाभवानीचे माहेर असलेल्या बुर्‍हाणनगर, केडगावची रेणुकामाता, श्री क्षेत्र मोहट्याची मोहटादेवी, श्रीक्षेत्र राशीनची जगदंबा, कोल्हारची कोल्हूबाई, जेऊरची बायजाबाई, कोल्हारची भगवती माता, घोसपुरीची पद्मावती यासह सर्वच देवी मंदिरांमध्ये आणि घरोघर घट बसविण्याची जय्यत तयारी झाली आहे. देवीच्या स्वागतासाठी नगर जिल्हा सज्ज झाला आहे.
राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असणार्‍या राशीनच्या जगदंबा देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. आज (दि.26) घटस्थापनेपासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चालणार्‍या आनंद उत्सवासाठी राशीनगरी सज्ज झाली आहे.

हलत्या दीपमाळेसाठी प्रसिद्ध असणारे व स्वयंभू अशी ओळख असलेल्या जगदंबा देवी मंदिरात पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात येणार आहे. नऊ दिवस महावस्त्रालंकार पूजा, आरती, धुपारती, ललित पंचमी, दुर्गाष्टमी, पासोडी पोत, होम पूर्णाहुती, विजयादशमीला पालखी सोहळा, कोजागिरी पौर्णिमामेला ‘भळांदे’ इत्यादी धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. ट्रस्टच्या वतीने मंदिर व शिखरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. मंदिर परिसर परिसरातील पूजेच्या साहित्यांची दुकाने सजली असून, बालगोपाळांसाठी मनोरंजनाची साधने, हॉटेल्स, कपड्याचे दुकाने यांची तयारी झाली आहे.

ग्रामपंचायतीकडून पालखी मार्ग व मंदिर परिसराची स्वच्छता, स्ट्रीट लाईट व्यवस्था, रस्त्यांची दुरुस्ती, तसेच पाऊतकाच्या ठिकाणी जेसीबी, रोलरच्या साह्याने रस्त्याचे सपाटीकरण व साफसफाई करण्यात आली आहे. तसेच, मंदिर परिसर व पालखी मार्गावरील अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. तसेच, मंदिर परिसरामध्ये धुराळणी, फवारणी करण्यात आली आहे. कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी उपाययोजनांची पाहणी केली. मोहटा देवी मंदिरातही तयारी पूर्ण झाली असून, आज, जिल्हा न्यायाधीश तथा देवस्थानच्या अध्यक्षांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. बुर्‍हाणनगर, केडगावसह सर्वच देवी मंदिरे सजली आहेत. सार्वजनिक मंडळांकडूनही देवीची स्थापना केली जाणार आहे.

The post चैतन्य पर्वास आज प्रारंभ ! जिल्हाभरात सर्वत्र नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/qWCZbmA
via IFTTT

युवाओं ने नौकरी और बेरोजगारी को लेकर निकला तिरंगा मार्च

मध्य प्रदेश में बेरोजगार युवाओं की संख्या लगातार बढ़ती जा रही है। सरकारी नौकरी की प्रतीक्षा में अब इनका सब्र जवाब देने लगा है। इंदौर में नौकरी के लिए सत्याग्रह कर रहे हजारों युवा रविवार को हाथों में तिरंगा लेकर सड़कों पर उतर आए। https://ift.tt/NLTegIn

महाराष्ट्र: एकनाथ खडसे ने कही बड़ी बात, कहा 'बीजेपी में जाने का कोई इरादा नहीं'

महाराष्ट्र में बीजेपी की बुनियाद डालने वाले और अब विधान परिषद में एनसीपी के सदस्य एकनाथ खडसे को लेकर राज्य की सियासी हलकों में चर्चा गरम है। हाल में खडसे ने देश के गृह मंत्री अमित शाह से फोन पर बात की है।  https://ift.tt/NLTegIn

नगर : ‘नागेबाबा’च्या 36 खात्यांत अडीच किलो बनावट सोने, फसवणुकीचा आकडा पोहचला 76 लाखांवर

https://ift.tt/ZFYd5IQ

नगर : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील नामांकित असलेल्या श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह पतसंस्थेची बनावट सोनेतारणाखाली आतापर्यंत 76 लाखांनी फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. तपासणीत सुमारे अडीच किलो (2441 ग्रम) बनावट सोने आढळून आले असून, पतसंस्थेच्या कर्जखात्यांची तपासणी सुरूच असल्याने फसवणुकिचा आकडा आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शहर सहकारी बँकेतील बनावट सोनेतारणाची तपासणी सुरू असतानाच, संत नागेबाबा पतसंस्थेतील बनावट सोनेतारण प्रकरणाची व्याप्ती वाढत आहे. नागेबाबा मल्टिस्टेट पतसंस्थेची सुरूवातीला एकूण अकरा खाती तपासण्यात आली होती. त्यामध्ये 840 ग्रॅम बनावट सोने आढळून आले.

त्यावर 28 लाख 64 हजार रूपयांचे कर्ज घेण्यात आले आहे. तसेच इतर अकरा आरोपींची एकूण 25 कर्जखाती तपासली असता त्यामध्ये सुमारे एक हजार 600 ग्रॅम वजनाचे (सुमारे दीड किलो) बनावट सोने आढळून आले आहे. त्यावर 47 लाख 79 हजार रकमेचे कर्ज घेण्यात आले. त्यामुळे आरोपींनी पतसंस्थेची 36 कर्जखात्यांत सुमारे 2441 गॅ्रम बनावट सोने ठेवून 76 लाखांनी फसवणूक केल्याची तपासात समोर आले आहे.

दरम्यान, गोल्ड व्हॅल्युअर अजय कपालेसह त्याचे साथीदार सुनिल ज्ञानेश्वर अळकुटे, श्रीतेश रमेश पानपाटील, संदीप सिताराम कदम या चौघांना नागेबाबाच्या गुन्ह्यात वर्ग करून अटक करण्यात आली आहे. पहिल्या गुन्ह्यात जामीन मिळालेल्या पानपाटीलला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्याला दि. 27 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच कपाले, अळकुटे व कदम या तिघांना शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना दि.26 सप्टेंबर पर्यत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यागुन्ह्याचा तपास कोतवालीचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे करीत आहेत.

संत नागेबाबा पतसंस्थेच्या 36 खात्यांत 2441 ग्रॅम बनावट सोने आढळून आले आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून, चार दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
                                               -गजेंद्र इंगळे, पोलिस उपनिरीक्षक, कोतवाली

आतापर्यंत 16 आरोपी निष्पन्न
नागेबाबा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट पतसंस्थेत बनावट सोनेतारण ठेवून कर्ज घेतल्याच्या प्रकरणात आतापर्यंत 16 आरोपी निष्पन्न झाले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, बनावट सोनेतारण असलेल्या कर्जखात्यांची संख्या वाढणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

The post नगर : ‘नागेबाबा’च्या 36 खात्यांत अडीच किलो बनावट सोने, फसवणुकीचा आकडा पोहचला 76 लाखांवर appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/a0TRziV
via IFTTT

नगर : वाळू तस्करी झाल्यास सर्कल, तलाठी सस्पेंड : महसूलमंत्री विखे

नगर : पुढारी वृत्तसेवा :  अनधिकृत वाळूउपसा आणि वाहतुकीविरोधात कठोर पावले उचलण्याचे आदेश यापूर्वीच राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना दिले आहेत. तरीही उपसा आणि वाहतूक सुरु असल्याचे आढळून आल्यास संबंधित गावचे तलाठी आणि मंडलाधिकारी यांना तत्काळ निलंबित केले जाईल. तसेच संबंधित तालुक्यांच्या तहसीलदारांना देखील कारणे दाखवा नोटिसा बजावली जाणार असल्याचे राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व … The post नगर : वाळू तस्करी झाल्यास सर्कल, तलाठी सस्पेंड : महसूलमंत्री विखे appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SYxzW0

तरुणाचे जीपमधून अपहरण; पाच अटकेत, शेवगाव पोलिसांची कामगिरी

https://ift.tt/QtDOVLX

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा : अपहरण झालेल्या तरुणाची शेवगाव पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात सुटका केली आहे. अपहरण करून खंडणी मागणार्‍या पाच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. सोनाजी छबुराव बोरुडे (वय 30, रा. शेकटे बुद्रुक, ता. शेवगाव) असे अपहृत तरूणाचे नाव आहे. या तरुणाचे चार ते पाच जणांनी गुरुवारी (दि.22) शेवगाव-गेवराई रस्त्यावरील बालमटाकळी शिवारातील साई कोटेक जिनिंग जवळून बोलेरोमधून अपहरण केले होते. अपहृत तरूणाचा पुतण्या लक्ष्मण भीमराव बोरुडे यांच्या फिर्यादीवरुन शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तरुणाची सुटका करण्यासाठी पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी सहायक पोलिस निरीक्षक आशिष शेळके यांच्या नेतृत्वाखाली सहायक फौजदार बडधे, पोलिस नाईक संभाजी धायतडक, कॉन्स्टेबल राजेंद्र ढाकणे, वासुदेव डमाळे यांचे पथक रवाना केले.
या पथकाने गेवराई (जि. बीड) येथे शोध घेतला. यानंतर दि. 23 रोजी सकाळी सोनाजी बोरुडे याच्या चुलत भावाच्या मोबाईलवर संपर्क करून चार ते पाच लाख रुपयाची मागणी अपहरणकर्त्यांनी केली.

ही माहिती मिळताच पोलिस पथकाने मोबाईल लोकेशनच्या मदतीने जेजुरी, बारामती पोलिसांच्या मदतीने सापळा लावून भगवान प्रल्हाद ठोसर (वय 36, रा. सिंदखेड, ता. गेवराई), कैलास केरूजी धरंधरे (वय 50, रा. साठेनगर, गेवराई, ता. गेवराई), जीवन प्रकाश करांडे (वय 30, रा. सिंदखेड, ता. गेवराई), बाळासाहेब भास्कर करांडे (वय 50 रा. मोटेगल्ली गेवराई), ज्ञानेश्वर भगवान कांबळे (वय 27, रा. साठेनगर गेवराई, ता. गेवराई) यांना अटक केली. बोरूडे याची सुटका करत गुन्ह्यात वापरलेली बोलेरो (एमएच 23 ई 9713) ताब्यात घेतली. अवघ्या चोवीस तासांत अपहृत तरुणाची सुटका करत पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्याने पोलिस निरीक्षक विलास पुजारी व पथकाचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्यासह नागरिकांनी कौतुक केले आहे.

The post तरुणाचे जीपमधून अपहरण; पाच अटकेत, शेवगाव पोलिसांची कामगिरी appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/WBsLMYN
via IFTTT

लोणी : 8 दिवसांत 100 टक्के पंचनामे पूर्ण करा : ना. विखे

https://ift.tt/wXyrVZs

लोणी : पुढारी वृत्तसेवा :  महसूल, कृषी व ग्रामविकास विभागांनी समन्वयाने कामकाज करावे. अतिवृष्टीने बाधित क्षेत्राचे 30 सप्टेंबरपर्यंत 100 टक्के पंचनामे पूर्ण करावे, असे निर्देश देत अवैध वाळू उपसा, खडी क्रशर 100 टक्के बंद करा, अशा सक्त सूचना महसूल, पशुसंवर्धन व दूग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी केल्या.  राहाता, संगमनेर, श्रीरामपूर व राहुरी तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांबाबत आढावा बैठक महसूलमंत्री ना. विखे पा. यांच्या अध्यक्षतेखाली प्रवरानगर येथे पार पडली. यावेळी ते महसूल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व मंडलाधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

यावेळी शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, संगमनेर उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी अनिल पवार, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोरोले, तहसीलदार कुंदन हिरे, अमोल निकम, प्रशांत पाटील, फसियोद्दीन शेख, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, अनिल नागणे, श्रीरामपूर भाजपा तालुकाध्यक्ष दीपकराव पटारे आदी उपस्थित होते.
प्रारंभी तलाठी, ग्रामसेवक व महसूल अधिकारी- कर्मचार्‍यांना पंचनामे करताना उद्भवणार्‍या अडचणी महसूलमंत्री विखे पा. यांनी जाणून घेतल्या.

ना. विखे पा. म्हणाले, तूर्तास ई-पीक पाहणीच्या कामापेक्षा पीक पंचनाम्यांना प्राधान्य द्या. शेतकर्‍यांना संकटातून दिलासा देण्यासाठी अधिकारी – कर्मचार्‍यांनी सकारात्मक राहून कामकाज केले पाहिजे. फळबागांच्या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम कृषी विभागाने करावे, असा सूचना त्यांनी केल्या.  यावेळी राहाता, संगमनेर, श्रीरामपूर व राहुरीच्या तहसीलदारांनी पीक पंचनाम्यांच्या प्रगतीविषयी माहिती सांगितली. राहाता तालुक्यात साडेआठ हजार हेक्टर क्षेत्राचे 11,376 पंचनामे झाले, असे तहसीलदार कुंदन हिरे यांनी सांगितले.
संगमनेर तालुक्यातील कनोली येथील तलाठ्यांनी दाखल केलेल्या एका गुन्ह्याच्या कारणाने गावात काम करू दिले जात नसल्याच्या माहितीची ना. विखे पा. यांनी दखल घेत, या त्रासाची माहिती घाबरून दडवू नका. वरीष्ठांनीसुद्धा अशा प्रकारांना पाठिशी घालू नये, असे त्यांनी सूचित केले.

राजकीय दबावाला बळी पडू नका..!
अनधिकृत वाळू उपसा, खडी क्रशरबाबत कठोर भूमिका घेत कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता दोषींवर गुन्हे दाखल करा, असे निर्देश ना. विखे पा. यांनी महसूल यंत्रणेला दिले.

The post लोणी : 8 दिवसांत 100 टक्के पंचनामे पूर्ण करा : ना. विखे appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/blzxpsf
via IFTTT

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे ने इन 3 मौकों पर एकनाथ शिंदे को दिया बड़ा झटका

महाराष्ट्र में सरकार गिरने के बाद शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे ने इन 3 मौकों पर एकनाथ शिंदे को बड़ा झटका दिया है। https://ift.tt/dqRNOaY

'मुझे दोस्‍त बना कर देख' म्हणत विखेंनी नक्की कुणाला दिली मैत्रीची साद ? संगमनेरमध्ये रंगली चर्चा

संगमनेर पुढारी वृत्तसेवा :  ‘कभी खुद को मेरे प्यार मे भुलाकर देख…..दुश्‍मनी अच्‍छी नही, मुझे दोस्‍त बना कर देख’ हा शेर राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नेमका कोणाला उद्देशून करत कोणाला दोस्तीचं आवतनं दिलं याची चर्चा आता संगमनेरमध्ये रंगू लागल्या आहेत. एका पक्षातील सहकारी ते विरोधी पक्षातील पारंपरिक राजकीय विरोधक असलेले राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण … The post 'मुझे दोस्‍त बना कर देख' म्हणत विखेंनी नक्की कुणाला दिली मैत्रीची साद ? संगमनेरमध्ये रंगली चर्चा appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SYvf5G

शेवगाव : औषध फवारणीनंतर दोन शेतमजुरांचा मृत्यू

https://ift.tt/Kw0irYk

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा : कपाशीवर औषध फवारल्यानंतर दोन शेतमजुरांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथे घडली. मृतांच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त करत चौकशीची मागणी केली आहेे.
वैभव आबासाहेब बिडकर (वय 28 रा.आखेगाव ता. शेवगाव) आणि कृष्णा बबन काकडे (वय 30 रा.सोमठाणे ता. पाथर्डी) मृत्यू झालेल्या मजुरांची नावे आहेत. घटनेवेळी त्यांच्यासोबत अन्य चौघे होते, मात्र, दोघांंच्या मृत्यूनंतर हे चौघे पसार झाल्याने घातपाताचा संशय व्यक्त केल्याने पोलिस त्यादृष्टीने तपास करत आहेत.

आखेगाव परिसरात सहा मजुर गुरूवारी कपाशीवर औषध फवारणीसाठी गेले होते. सायंकाळी सहाच्या दरम्यान कपाशी फवारणीनंतर ते सोमठाणा शिवारातील एका शेतात बसले होते. कोणीच घरी आले नसल्याने कुटुंबियांनी मोबाईलवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मोबाईलवर दुसरीच व्यक्ती बोलली. दोघे येथे पडल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना शेवगाव येथील रुग्णालयात दाखल केले.

मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने कृष्णा काकडे यास शेवगावच्या रुग्णालयात, तर वैभव बिडकर यास नगर येथील रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. शेवगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, या दोघांबरोबर असणार्‍या फरार चौघांचा शोेध पोलिसांकडून सुरू आहे.

 

The post शेवगाव : औषध फवारणीनंतर दोन शेतमजुरांचा मृत्यू appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/xukCc5S
via IFTTT

केंद्र सरकारकडून भारताला पाकिस्तान बनवण्याचे काम : अशोक गहलोत

https://ift.tt/kMmpU14
अशोक गहलोत

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा : धर्माच्या नावावर पाकिस्तानची निर्मिती झाली होती. मात्र, आता हिंदू धर्माच्या नावावर देश बनविण्याचे काम केंद्रातील मोदींच्या सरकारने सुरू केले आहे, अशी टीका राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचे दावेदार अशोक गेहलोत यांनी केली. ते संगमनेरमधील एका कार्यक्रमात बोलत होते.

गेहलोत यावेळी म्हणाले की, सध्या देशामध्ये मोदी सरकारमुळे महागाई, बेरोजगारी वाढलेली आहे. ईडीचे हत्यार उपसल्यामुळेच महाराष्ट्रात शिवसेनेचे ५० आमदार पळाले. गोव्यात सुद्धा गुरा ढोरासारखे आमदार विकले गेले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल आणले, मात्र सध्या लोकपाल आणि अण्णा हजारे कुठे आहेत? यावर कोणी काहीच का बोलत नाही? असा सवालही गेहलोत यांनी मोदी सरकारला उद्देशून केला.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो आंदोलनाला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे देशातील वातावरण बदलू लागले आहे. गांधी परिवाराने होकार दिल्यानंतर मी अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार आहे. तसेच अध्यक्षपदाची माळ तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने माझ्याच गळ्यात पडणार असल्याचेही यावेळी गहलोत म्हणाले.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, देशात राष्ट्रवादीसह भाजप, शिवसेना व इतर कोणत्याही राजकीय पक्षाचा अध्यक्ष निवडला जात असताना फारशी चर्चा होत नाही. मात्र, काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीवेळी मोठी चर्चा का होते? असा सवाल उपस्थित करून, काँग्रेसला नेहरु, गांधी घराण्याचा इतिहास आहे. हा इतिहास घराणेशाहीचा नसून बलिदानाचा इतिहास आहे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचलतं का?

The post केंद्र सरकारकडून भारताला पाकिस्तान बनवण्याचे काम : अशोक गहलोत appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/WkKpZ21
via IFTTT

टूटी बाला साहेब की परंपरा, उद्धव ठाकरे के हाथ से निकली विरासत!

50 साल में पहली बार ऐसा हुआ है कि शिवसेना को बीएमसी ने शिवाजी पार्क में दशहरा रैली करने की इजाज़त नहीं दी है। https://ift.tt/dqRNOaY

'मुझे दोस्‍त बना कर देख' म्हणत विखेंनी नक्की कुणाला दिली मैत्रीची साद ? संगमनेरमध्ये रंगली चर्चा

https://ift.tt/uoDhFBN

संगमनेर पुढारी वृत्तसेवा :  ‘कभी खुद को मेरे प्यार मे भुलाकर देख…..दुश्‍मनी अच्‍छी नही, मुझे दोस्‍त बना कर देख’ हा शेर राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नेमका कोणाला उद्देशून करत कोणाला दोस्तीचं आवतनं दिलं याची चर्चा आता संगमनेरमध्ये रंगू लागल्या आहेत. एका पक्षातील सहकारी ते विरोधी पक्षातील पारंपरिक राजकीय विरोधक असलेले राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यातील विरोध सर्वांना माहीत आहे. हे दोन्ही नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडीत नाहीत.

संगमनेर तालुक्यातील२८ गावे शिर्डी विधानसभा मतदारसंघातील गावांचासमा वेश झाला आहे त्यामुळे राधाकृष्ण विखे यांचा संगमनेरशी संपर्क वाढलेला आहे. थोरातांचे संगमनेरातील राजकीय विरोधक कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विखे पाटील यांना पाचारण करत असतात. त्यातच गुरुवारी शहरातील सय्यदबाबा चौकात सुरू असणाऱ्या उर्स कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कव्वालीच्या कार्यक्रमाला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हजेरी लावीत दर्ग्याचे दर्शन घेवून चादर चढवली. त्यानंतर कव्वालीचा आनंदही घेतला.

कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव दोन शब्द बोलताना विखे यांनी हिंदीतून केलेल्या भाषणात हा उत्सव संगमनेरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक असून, विखे परिवाराने ही परंपरा कायम ठेवली आहे.त्यातून दिवंगत खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांशी जोडलेला ऋणानुबंध कायम राहिल्याकडे लक्ष वेधले. त्यांनी शिवसेनेतून निवडणूक लढविली तेव्‍हा सुध्‍दा सर्व समाज बांधवांनी त्‍यांना पाठबळ दिले. या दर्ग्याचे दर्शन घेतल्‍यानंतर एक नवी उमेद व प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले
यावेळी उद्योगपती मनिष मालपाणी भाजपचे शहराध्‍यक्ष ऍड श्रीराम गणपुले, तालुका अध्‍यक्ष डॉ. अशोकराव इथापे, अमोल खताळ, सतीष कानवडे, शौकत जहागीरदार जावेद जहागीरदार, राहुल भोईर यांच्‍यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

The post 'मुझे दोस्‍त बना कर देख' म्हणत विखेंनी नक्की कुणाला दिली मैत्रीची साद ? संगमनेरमध्ये रंगली चर्चा appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/yb52YT4
via IFTTT

श्रीगोंदा : ‘जजमेंट फेल..! ..तर येरवडा जेल’

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : पोलिसांना वेठिस धरण्यासाठी श्रीगोंदा कारागृहातील आरोपींनी अन्यत्याग करतानाच भांडी वाजविण्याचा केलेला उद्योग त्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. कोठडीतील 11 आरोपींची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. ‘जजमेंट फेल.. तर येरवडा’ जेल, या गुन्हेगारी जगतातील म्हणीचा प्रत्यय या प्रकरणात पहायला मिळाला. श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या जवळ ब्रिटिशकालीन दुय्यम कारागृह आहे. संघटित … The post श्रीगोंदा : ‘जजमेंट फेल..! ..तर येरवडा जेल’ appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SYrRlL