संगमनेर : गणेशमूर्ती खरेदी करणार्‍यांना जीएसटीचा फटका

https://ift.tt/l6p1SED

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : मागील वर्षी गणपतींच्या मूर्तीला पाच टक्के जीएसटी आकारला जात होता. मात्र, यावर्षी त्यामध्ये दुपटीने वाढ करून तो 12 टक्के झाला आहे. त्याचा सर्व भुर्दंड आता गणेशभक्तांवर पडणार आहे. आता महागड्या किमतीने गणेश भक्तांना गणेशमूर्ती खरेदी कराव्या लागणार आहे. त्यामुळे यावर्षीच्या गणेशोत्सवावर जीएसटी वाढत्या महागाईचे सावट असल्याचे चित्र आहे.
दरवर्षी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात खर्‍या अर्थाने गणेश मूर्तिकार गणेश मूर्ती बनविण्याचे काम सुरू करत असतात. जुलै महिन्यामध्ये गणेश मूर्तींवर शेवटचा हात मारण्याचे काम सुरू होत असते.

अन संपूर्ण मूर्ती बनवून तयार झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यांपासून गणपतीला रंगकाम करण्याचे काम सुरू केले जाते, तसेच गणेशोत्सवाच्या अगोदर आठ दिवसांत गणेश मूर्ती तयार करून ग्राहकांना विक्रीसाठी शेवट स्टॉल थाटले असल्याचे कुंभार आळा परिसरातील अनेक गणेश मूर्तिकारांनी सांगितले. गणेशोत्सव अवघ्या एका दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाही शहरातील गणेश मूर्ती बनविण्याचा परिसर असणार्‍या कुंभार आळी या परिसरातील गणेश मूर्तिकारांनी पीओपीच्या तसेच शाडू मातीपासून बनविलेल्या गणेशमूर्ती बनवून विक्रीसाठी दुकाने थाटले आहेत. मात्र, गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी गणेशभक्तांची फारशी गर्दी दिसत नसल्यामुळे भांडवल गुंतवून ठेवलेल्या गणेश मूर्तिकारांची चिंता वाढलेली आहे.

कोरोना महामारीमुळे मागील वर्षी सरकारने गणेशोत्सवास परवानगी दिलेली नव्हती. त्यामुळे आम्ही थोड्याच गणेश मूर्ती बनविलेल्या होत्या. मात्र, यावर्षी कोविडचे सावट कमी झाले असले, तरी शासनाने उशिराने परवानगी दिली असल्यामुळे मोठ्या गणेश मूर्ती बनविण्यास मूर्तिकारांना वेळ मिळाला नाही. ज्या मूर्ती बनविलेल्या आहे त्या मूर्तींना ग्राहक शोधण्याची वेळ गणेश मूर्तीकारांवर आली आहे. यावर्षी 6 इंचांपासून ते 6 ते 7 फुटांपर्यंत गणेश मूर्ती बनविण्यात आलेल्या आहेत.

चालू वर्षी पीओपी बनवलेल्या गणेश मूर्ती व शाडू मातीच्या गणेशमूर्तंच्या किमतीमध्ये सरासरी 60 ते 70 टक्के वाढ झालेली आहे, तसेच मागील वर्षी गणपतीवर 5 टक्के जीएसटी आकारला गेला होता. परंतु यावर्षी त्यात डबल वाढ करून थेट 12 टक्के जीएसटी केला आहे. त्यामुळे या वाढत्या जीएसटीचा भार गणेश भक्तांवर पडणार आहे. हे मात्र तितकेच खरे आहे. मागील वर्षापेक्षा चालूवर्षी गणेश मूर्ती बनविण्यासाठी लागणार साहित्य महागले आहेत.

The post संगमनेर : गणेशमूर्ती खरेदी करणार्‍यांना जीएसटीचा फटका appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/L1BJOwT
via IFTTT

राहुरी : वयोवृद्धास लाकडी दांड्याने मारहाण

https://ift.tt/JRWiHEk

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : झाडाची फांदी तोडण्याच्या कारणावरून तिघा जणांनी मिळून अशोक तमनर या वयोवृद्ध इसमाला लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना राहुरी तालुक्यातील धामोरी बुद्रूक येथे घडली. याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक गंगाधर तमनर शेती व्यवसाय करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. त्यांचा पुतण्या सचिन तमनर हा त्यांच्या शेजारीच कुटुंबासह राहतो.

तमनर हे त्यांच्या घराच्या जवळ असलेल्या बोअरवेलची मोटार चालू करण्यासाठी गेले होते. त्यावेळी बोअरवेलजवळील नारळाच्या झाडाची फांदी तोडत होते. त्यावेळी तेथे आरोपी आले व फांदी तोडण्याच्या कारणावरून त्यांना मारहाण करून जखमी केले. अशोक तमनर यांच्या फिर्यादीवरून आरोपी सचिन अप्पासाहेब तमनर, छाया सचिन तमनर, मंडण अप्पासाहेब तमनर यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

The post राहुरी : वयोवृद्धास लाकडी दांड्याने मारहाण appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/AVLIair
via IFTTT

भंडारदर्‍यात पर्यटकांसह अधिकार्‍यांचीही मौज!

https://ift.tt/HNtCYqA

अकोले : पुढारी वृत्तसेवा : पर्यटनस्थळ असलेले भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरण परिसरात निसर्ग सान्निध्यात मौजमजा व आनंद लुटण्यासाठी पर्यटक येतात, हे सर्वश्रूत आहे. मात्र, नगर जिल्ह्यासह विविध ठिकाणांवरून शासकीय वाहनांमधून अधिकारी व कर्मचारी शासकीय दौर्‍याच्या नावाखाली भंडारदरा परिसरात येत असल्याने या अनोख्या ‘सेवे’बद्दल जागरुक नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. विशेष असे की, या अधिकार्‍यांच्या दिमतीला अकोले तालुक्यातील पोलिसांसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी सज्ज असल्याचे वास्तव दिसत आहे.

अकोले तालुक्यातील पर्यटन स्थळ असलेल्या भंडारदरा, निळवंडे धरण परिसरात पर्यटक दरवर्षी हजेरी लावतात. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे पर्यटनस्थळे बंद राहिले. यंदा मात्र पर्यटनाला मोठी चालना मिळाली. नेकलेस, रंधा धबधबा, कोकणकडा, पांजरे फॉलकडे पर्यटक गर्दी करतात. शनिवार व रविवारी सलग सुट्टीसह इतर दिवशी अक्षरशः जत्रेचे स्वरूप आल्याचे चित्र दिसते.
कोल्हार-घोटी राजमार्गावर भंडारदरा, घाटघर परिसरात पर्यटकांच्या सुसाट गाड्यांची रेलचेल दिसत आहे. त्यातच रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांनी लहान-मोठ्या अपघाताची शृंखला सुरुच आहे. या रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

The post भंडारदर्‍यात पर्यटकांसह अधिकार्‍यांचीही मौज! appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/WK1xcTi
via IFTTT

45 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची अकोलेत धामधूम

https://ift.tt/n5VAet9

अकोले : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील तब्बल 45 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू असल्या तरी, राजूर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मात्र माजी आ. वैभवराव पिचड व आ.डॉ. किरण लहामटे या दोन आजी-माजी आमदारांना उमेदवार शोधण्यासाठी अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत असल्याने उमेदवार देता का कोणी उमेदवार, असे म्हणण्याची वेळ आली आहे. दरम्यान, तालुक्यात सुमारे 45 ग्रामपंचायत निवडणुकांची धामधूम सुरु आहे. ग्रामपंचायत सदस्यांसह थेट सरपंचपदासाठी 18 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यास बुधवारी (दि.24) सुरुवात झाली. 1 सप्टेंबर हा उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा अखेरचा दिवस आहे. दि. 2 सप्टेंबर उमेदवारी अर्ज छाननी व 6 सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. (दि.30) पर्यंत सरपंचपदासाठी 163 तर सदस्यपदासाठी 447 अर्ज दाखल झाले आहेत.

दरम्यान, नुकतेच आ. डॉ. किरण लहामटे यांनी बिनविरोध निवडणूक करणार्‍या मतदारसंघातील ग्रामपंचायतीस 26 लाख रूपये निधी दिला जाईल, अशी घोषणा केली. मागील वेळी अकोले मतदार संघात निवडणुकीत बिनविरोध ग्रामपंचायतीला 25 लक्ष रूपये निधी दिला. आदिवासी विभागाचे केंद्रबिंदू असलेल्या राजूर गावची लोकसंख्या 10 हजार 46, तर 17 ग्रा. पं. सदस्य आहेत. गेल्या पंंचवार्षिकमध्ये माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली राजूर ग्रामपंचायत निवडणूक होऊन सरपंचपदी हेमलताई पिचड, तर उपसंरपचपदी गोकुळ कानकाटे विजयी झाले होते.

कोविड कालावधीत राजूर ग्रामपंचायतीने उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. काही काळ प्रशासक होते. पण, होऊ घातलेल्या राजूर ग्रामपंचायत निवडणुकीत 6 वार्डांकरिता 17 सदस्य रणांगणात आहेत. जनतेतून सरपंच निवड होणार आहे. 17 ग्रामपंचायत सदस्य उमेदवारी करिता बहुतांश माजी ग्रामपंचायत सदस्यांनी उमेदवारी स्वतःहून नाकारल्याने नव्या उमेदवारांचा शोध घेण्यास आजी-माजी आमदारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

अनुभवी व तरुण उमेदवार ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याचे दिसते. परिणामी बळजबरीचा राम-राम करीत नवख्या उमेदवारांना ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी नेते, पुढारी व कार्यकर्ते घोड्यावर बसविताना दिसत आहेत. राजूर ग्रामपंचायतीच्या काही माजी सदस्यांवर जनतेमधून नाराजी व्यक्त होत आहे. मतदान मागायला आल्यावर त्यांना धडा शिकविणार असल्याचे बोलले जाते. दरम्यान, मंगळवारपर्यंत राजूर ग्रामपंचायत निवडणुकीत 16 उमेदवारांनी ग्रा.पं. सदस्य, तर फक्त 1 उमेदवाराने सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला.

गावोगाव रंगला निवडणुकांचा आखाडा..!
आंबितखिड, बाभुळवंडी, चिचोंडी, चिंचावणे, धामणवन, गोंदुशी, जामगाव, करंडी, कातळापूर, केळी कोतूळ, केळी ओतूर, केळी रुम्हणवाडी, केळुगण, खिरविरे, खुंटेवाडी, कोहडी, कोंदनी, लव्हाळी ओतूर, माळेगाव, मान्हेरे, मवेशी, म्हाळुगी, मुथाळणे, पाडाळणे, पाडोशी, पळसुंदे, पांजरे, पिंपरकणे, राजूर, रणदखुर्द- बु., समशेरपूर, सांगवी, सातेवाडी, सावरगाव पाट, सावरकुटे, शेलद, शेणीत, शिरपुंजे बु., टाहाकरी, तळे, तेरुंगण, टिटवी, उडदावणे, विठे व वारंघुशी या 45 गावांत निवडणूक आखाडा रंगला आहे.

The post 45 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची अकोलेत धामधूम appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/TN0UkdG
via IFTTT

राज-फडणवीस की सीक्रेट मीटिंग, उद्धव ठाकरे के खिलाफ बना बड़ा प्लान?

महाराष्ट्र नवनिर्माण सेना और भारतीय जनता पार्टी के बीच चुनाव के लिए गठबंधन को लेकर चर्चाएं जारी हैं। हालांकि, इसे लेकर दोनों दलों की तरफ से आधिकारिक तौर पर कुछ नहीं कहा गया है। लेकिन लगातार हो रही हाईप्रोफाइल मुलाकात ऐसे संकेत दे रही हैं। https://ift.tt/yS8qojl

Maharashtra Political Crisis: शिंदे-उद्धव की लड़ाई में शिवाजी पार्क में राज ठाकरे?

शिवसेना के उद्धव ठाकरे और सीएम एकनाथ शिंदे गुट के बीच अब दशहरा को लेकर सियासत शुरू हो गई है। इस लड़ाई में अब राज ठाकरे भी कूद गए है। https://ift.tt/yS8qojl

Mumbai: मुंबई में उत्तर भारतीय संघ भवन को मिलेगा पर्यटन स्थल का दर्जा

देश की आर्थिक राजधानी मुंबई में हिंदीभाषियों की शीर्ष संस्था उत्तर भारतीय संघ भवन को पर्यटन स्थल का दर्जा मिलेगा। साथ ही, भवन के परिसर में लॉ कालेज और कौशल विकास केंद्र खोला जाएगा। https://ift.tt/uiDHB9c

अकोले : ‘अगस्ती’साठी 25ला मतदान!

https://ift.tt/n5VAet9

अकोले : पुढारी वृत्तसेवा : अगस्ती सहकारी साखर कारखान्याची स्थगित झालेली निवडणूक 25 सप्टेंबरला होणार असून, मतमोजणी 26 तारखेला करण्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. या निकालामुळे अकोले तालुक्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापणार आहे. अगस्ती सहकारी साखर कारखान्याची 17 जुलै रोजी निवडणूक होणार होती. राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. या सरकारने 15 जुलै रोजी अचानक राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांना 30 सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे दोन दिवसांवर मतदान येऊन ठेपलेले असताना अगस्ती कारखान्याची निवडणूक स्थगित झाली. या निर्णयाने उमेदवार व ऊस उत्पादक सभासदांमधून नाराजी व्यक्त झाली.

माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळ विरुध्द आमदार डॉ. किरण लहामटे, जि.प. सदस्य अशोकराव भांगरे, कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम पाटील गायकर, कॉ.अजित नवले, कैलास वाकचौरे, मधुकर नवले यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे शेतकरी समृद्धी मंडळामध्ये चुरशीची सरळ लढत रंगात आली होती. निवडणूक स्थगित झाल्यामुळे शेतकरी समृद्धी मंडळाचे उमेदवार परबत नाईकवाडी व विकास शेटे यांनी औरंगाबाद खंडपीठात निर्णयाला आव्हान दिले होते. कारखान्याचे सभासद दिलीप मंडलिक यांनी याचिका दाखल केली.

दोन्हीही याचिकेवर मंगळवारी (दि.30) औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. न्यायालयाने निवडणुकीसाठी 25 सप्टेंबर रोजी मतदान घेण्याचा आदेश दिला. 26 सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. याचिकाकर्ते विकास कचरू पाटील शेटे यांच्या वतीने अ‍ॅड. रमेश धोर्डे, अ‍ॅड. अजित काळे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.

मात्र, उमेदवार तेच
निवडणुकीसाठी पूर्वी जे अर्ज भरले तेच कायम असणार आहे. जेथून निवडणूक प्रक्रिया स्थगित झाली तेथून पुढे प्रक्रिया राबविली जाणार आहे. उमेदवार तेच असल्याने प्रचाराचा धुरळा पुन्हा गाठीभेटीनिमित्ताने उडणार आहे. उमेदवारांनी निकालाची वार्ता समजताच गाठीभेटीवर जोर दिला आहे.

The post अकोले : ‘अगस्ती’साठी 25ला मतदान! appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/pnQ89Ts
via IFTTT

नगर : पालावरून त्याचा जीवनाचा श्रीगणेशा! डॉक्टर, आशा सेविकांचे धाडस!!

https://ift.tt/3RTqISM

वाळकी, पुढारी वृत्तसेवा : बाहेर धो-धो पाऊस पडत होता…गावापासून दिड-दोन किलोमीटर अंतरावर असणार्‍या डोंबारी वस्तीवर महिलेला सुरू झाल्या प्रसूती वेदना…पतीने आशा सेविकेला फोनवरून माहिती दिली..आशा सेविकेने रुग्णवाहिकेला फोन केला; मात्र तिला येण्यास विलंब होणार असल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आरोग्य विभागाच्या पथकाने हालचाली केल्या अन् पावसात पालात तिची सुखरूप प्रसूती करण्यात आली. यावेळी तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला असून, पालावरच या बाळाने जीवनाचा श्रीगणेशा केला..! ही सुखद घटना नगर तालुक्यातील दहीगाव येथे घडली.

असं म्हटलं जातं, की प्रसूती म्हणजे महिलेचा दुसरा जन्म असतो. ही वेळ गरोदर महिलेसाठी अत्यंत कठीण आणि तेवढीच घातकही ठरू शकते. त्यामुळे प्रसूती योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी होणं अत्यंत गरजेचे आहे. आरोग्य विभागाच्या गलथान कारभाराचे अनेक कारनामे आपण ऐकले आहेत. नगर तालुक्यातील टाकळी काझी आरोग्य केंद्रातील अधिकारी – कर्मचार्‍यांच्या गलथानपणामुळे एका गरीब महिलेची आरोग्य केंद्राच्या दारातच प्रसूती झाल्याची घटना महिना भरापूर्वी घडली होती. त्याच्या अगदी उलट अशी सुखद घटना दहिगावमध्ये पाहावयास मिळाली.

डोंबारी वस्तीत आनंदी आनंद

दहिगाव येथील गावापासून दीड- दोन किलोमीटर अंतरावर एक डोंबारी वस्ती आहे. तेथे राहत असलेल्या गरीब कुटुंबातील महिलेला सायंकाळी सहाच्या सुमारास प्रसूती वेदना सुरू झाल्या. महिलेचा पती विकास वाघ यांनी मध्यरात्री गावातील आशा सेविका आशा जाधव यांना तातडीने संपर्क केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बाहेर पाऊस चालु असताना देखील त्याचा विचार न करता पावसात भिजत आशा सेविका जाधव वस्तीवर पोहचल्या.

शिराढोण आरोग्य उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत यादव व आरोग्य सेविका मनीषा बनसोड यांना त्यांनी फोन करून माहिती दिली. तसेच, आपत्कालीन 108वर अ‍ॅम्बुलन्सला फोन केला; परंतु प्रसूती वेदना वाढलेल्या होत्या. त्यामुळे आशा जाधव यांनी घटनास्थळावरून महिलेच्या परिस्थीती बद्दल डॉ. यादव यांना माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महिलेची सुखरुप प्रसूती केली. तेवढ्या वेळात आरोग्य सेविका व समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. यादव ही दहिगाव येथील डोंबारी वस्तीवर पोहचून बाळांची आणि आईची तपासणी करून बाळांची नाळ कापली. प्रसूतीच्या सर्व प्रकीया पार पाडल्या, तसेच प्रसूतीनंतरच्या काळजी बदल सविस्तर माहिती देण्यात आली. बाळाच्या लसिकरणबाबतीत माहिती दिली. आरोग्य विभागाचे सहकार्य पाहून त्या महिलेचा पती विकास व त्याच्या कुटुंबीयांना आभार व्यक्त करण्यासाठी शब्द ही सुचत नव्हते.

कर्तव्यनिष्ठेचे सर्वत्र कौतुक

शिराढोण आरोग्य उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत यादव, आरोग्य सेविका मनीषा बनसोड, आशा सेविका आशा जाधव यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे एका महिलेच्या व तिच्या नवजात बाळाचे प्राण वाचल्याने त्यांच्या या कर्तव्यनिष्ठेचे आणि माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आरोग्य सेवेत ज्या दिवशी दाखल झालो, त्या दिवसांपासून जनसेवेचे व्रत घेतलेले आहे. ते माझे कर्तव्य आहे. माझ्या कार्यक्षेत्रात प्रत्येक व्यक्तीला चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करून देण माझे काम आहे. निष्ठा पूर्वक करत आलो. यामध्ये माझे सहकारी मला खुप मदत करतात. त्यामुळे मला ते शक्य होत आहे.

– डॉ. सूर्यकांत यादव, समुदाय आरोग्य अधिकारी, उपकेंद्र शिराढोण

The post नगर : पालावरून त्याचा जीवनाचा श्रीगणेशा! डॉक्टर, आशा सेविकांचे धाडस!! appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/2xm58iz
via IFTTT

जिल्ह्यात आणखी एक मंत्रिपद ! आमदार राम शिंदे यांची माहिती; स्वतःही इच्छुक

https://ift.tt/PF7KS6Q

नगर : पुढारी वृत्तसेवा :  राज्य मंत्रिमंडळात समावेश व्हावा, यासाठी प्रत्येक जण इच्छुक असतो. तसा मी देखील इच्छुक आहे. जिल्ह्यासाठी आणखी एक मंत्रीपद मिळणार आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष व नेतृत्वच काय तो निर्णय घेईल, असे मत माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केले. आमदार शिंदे सोमवारी कार्यकर्त्यांना घेऊन कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, थांबा आणि पहा. मी श्रद्धा आणि सबुरी पाळणारा माणूस आहे. प्रत्येक आमदाराला मंत्री व्हावेसे वाटते. त्यामुळे मी देखील मंत्रिपदासाठी इच्छुक आहे. मात्र, याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

राज्यसभेसाठी माझ्या नावाची चर्चा झाली. विधान परिषदेच्या सभापती पदासाठी देखील होत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्षपद जवळपास निश्चित झाले होते. राजकीय क्षेत्रात कोणत्या ना कोणत्या पदासाठी आपण चर्चेत असल्याचे त्यांनी सांगितले.

ईडी चौकशी; सूडबुद्धीचा प्रश्नच नाही
जामखेड-कर्जत मतदारसंघातील अनेक गावांतील लोकांनी पाणंद रस्त्यांबाबत तक्रारी केल्या आहेत. ईडी ही त्रयस्थ संस्था आहे. या संस्थेला चौकशीसारखे काही मुद्देे मिळाले असतील. त्यामुळेच पाणंद रस्त्यांच्या कामांची ईडीमार्फत चौकशी सुरू आहे. यामध्ये सुडबुद्धीने चौकशी लावण्याचा प्रश्नच नाही, असा टोला त्यांनी आमदार रोहित पवार यांना लागावला.

पाणंद रस्त्यांची कामे करताना ग्रामपंचायतींना विश्वासात घेतले नाही. जी कामे झाली, ती लोकांच्या उपयोगाची नाहीत. ज्यावेळी गावागावांतील कामांची चौकशी होईल, त्यावेळी भ्रष्टाचाराचे प्रकार पुढे येतील. या कामांत अपहार झाला नाही, तर मग घाबरता कशाला, असा सवाल देखील त्यांनी नाव न घेता आमदार पवार यांना केला.

The post जिल्ह्यात आणखी एक मंत्रिपद ! आमदार राम शिंदे यांची माहिती; स्वतःही इच्छुक appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/CMxTDag
via IFTTT

वाळकी : लष्करभरती परीक्षेत गैरप्रकार; 2 पकडले

https://ift.tt/UC3esVu

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : नगरमध्ये लष्कराच्या विविध पदांच्या भरतीसाठी आयोजित लेखी परीक्षेत इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या आधारे कॉपी करताना दोन परीक्षार्थींना लष्करी अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरुद्ध कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेले दोन्ही उमेदवार हरियाणातील आहेत. यामध्ये रवी रमेश संधू (वय 22 जि. हिस्सार, हरियाणा) व पूजा सुरेंद्र जलंदरा (वय 22 जि. जिढप, हरियाणा) यांचा समावेश आहे.

भिंगार येथे लष्करात विविध पदांची भरती सुरू आहे. त्यासाठी लेखी परीक्षा रविवारी (दि. 28) सकाळी 10 ते दुपारी 12 या कालावधीत आर्मी पब्लिक स्कूलमध्ये झाली. या परीक्षेत दोन्ही परिक्षार्थींनी ब्ल्यूटूथ, तसेच इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसच्या मदतीने कॉपीचा प्रयत्न केला. ही बाब लष्करी अधिकार्‍यांच्या लक्षात आल्याने त्यांनी या दोघांना रंगेहाथ पकडले. याबाबत कर्नल एल. सी. कटोजा (रा. मिल्ट्री हॉस्पिटल) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक किरण साळुंके करत आहेत.

The post वाळकी : लष्करभरती परीक्षेत गैरप्रकार; 2 पकडले appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/taGNBRq
via IFTTT

कल्याण-विशाखापट्टणम्; मंत्रालयात तोडगा!

https://ift.tt/YWmvt1q

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : कल्याण-निर्मल (विशाखापट्टणम्) या राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत तत्काळ संबंधित अधिकार्‍यांची बैठक लावण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पुढील आठवड्यात या संदर्भात विशेष बैठक होणार आहे.
या रस्त्याच्या कामाबाबत मराठवाड्यातील खासदार हेमंत पाटील व पाथर्डी येथील उद्योजक डॉ. बंडू भांडकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची मुंबईत भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. अहमदनगर जिल्ह्यासह पाथर्डी तालुक्यातून जाणार्‍या व अनेक वर्षांपासून रखडलेल्या या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले आहेत.

या राष्ट्रीय महामार्गाचे मागील आठ ते दहा वर्षांपासून ढिसाळपणे व अतिशय निकृष्टपणे काम सुरू आहे. सध्या रस्त्याचे काम कुठेही होताना दिसत नसून, रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नगर तालुक्यातील मेहकरी फाटा ते पाथर्डी तालुक्यातील फुंदे टाकळीपर्यंत पूर्ण खड्डेमय रस्ता झाल्याने याचा सर्वाधिक त्रास पाथर्डी तालुका व परिसरातील वाहनधारकांना होत आहे. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली व बीड या जिल्ह्यातील सर्व वाहनधारक या सोयीच्या महामार्गामुळे मुंबई, पुणे, अहमदनगरला जात असतात. मराठवाड्यातील प्रवाशांनाही याचा मोठा त्रास होत आहे.

रस्त्याच्या कामाकडे संबंधितांचे लक्ष वेधण्यासाठी सर्वच पक्षांनी वेळोवेळी निवेदने देत, रास्ता रोको, सत्याग्रह अशी आंदोलने करूनही दुर्लक्ष होत आहे. कागदी घोडे नाचवत ठेकेदार बदलले. मात्र, कामात कुठलीही प्रगती झाली नाही. रखडलेल्या या कामामुळे सुरू असलेली अपघातांची मालिका थांबविण्यासाठी महामार्गाचे खड्डे बुजवून तत्काळ काम पूर्ण होण्यासाठी मंत्रालयात वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेण्याची मागणी खा. हेमंत पाटील व डॉ. भांडकर यांनी केली. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढील आठवड्यात तातडीने बैठक लावून संबंधित महामार्गाचा प्रश्न मार्गी लावू, असे सांगितले.

पाथर्डीची बाजारपेठ झाली उद्ध्वस्त
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या रस्त्यावरून जाणारे प्रवासी कमी होत आहेत. देशभरातून येणार्‍या वाहनांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे तालुका व परिसराची बाजारपेठ उद्ध्वस्त झाली आहे. उद्योगधंद्यांवर परिणाम झाला आहे. पाथडी तालुका दुष्काळी असून, राष्ट्रीय महामार्गाची रहदारी संपुष्टात आल्यास उद्योग धंद्यांना फटका बसू शकतो, असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

अपघातांत 400 प्रवाशांचा बळी
अर्धवट अवस्थेतील खड्डेमय रस्त्यामुळे मागील काही वर्षांमध्ये शेकडो अपघात झाले असून, त्यात सुमारे चारशे वाहनधारक व प्रवाशांचा नाहक बळी गेला आहे. दीड हजाराच्या आसपास प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर, अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. तसेच, वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

The post कल्याण-विशाखापट्टणम्; मंत्रालयात तोडगा! appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/26VMGRs
via IFTTT

नगर : वाळूबाबत लवकरच सर्वंकष धोरण आणणार

https://ift.tt/73Dba9B

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात वाळूमाफियांनी वाळूउपसा करीत नदीचे वाळवंट तयार केले आहे. मात्र, या बोकाळलेल्या वाळूमाफियांना लगाम घालून त्यांचा बंदोबस्त केला जाईल. एक महिन्याच्या आत संपूर्ण राज्यामध्ये वाळूबाबत सर्वंकष धोरण आणले जाईल, अशी घोषणा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेरात केली.

मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये महसूल मंत्रिपदी निवड झाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांचे सर्व प्रथमच माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या वतीने जंगी स्वागत करीत शक्ती प्रदर्शन करण्यात आले, तसेच त्यांचा नागरी सत्कार व त्यांच्या वजनाइतकी पेढेतुला करण्यात आली. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना मंत्री विखे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते वसंतराव गुंजाळ होते.

यावेळी भाजप तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य रवींद्र थोरात, जिल्हाध्यक्ष सतीश कानवडे, महिला जिल्हाध्यक्ष सोनाली नाईकवाडी, बापूसाहेब गुळवे, डॉ. भानुदास डेरे, शिवाजी धुमाळ, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे, जावेद जागीरदार, मनीष मालपाणी, संदीप देशमुख, श्रीकांत गोमासे, लहानू नवले, संजय मोरे, डॉ. सोमनाथ कानवडे, अशोक कानवडे, शिवाजी कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते.

मंत्री विखे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये सर्वत्र वाळूमाफिया व भूमाफिया मोठ्या प्रमाणात वाढलेली होती. संगमनेर तालुक्यातील एका वाळूमाफियाने, तर एका अंध व्यक्तीच्या डोक्याला पिस्तूल लावण्यापर्यंत मजल गेली आहे. इतकी या वाळूमाफियांची मजल गेली आहे. या वाळूमाफियांची दहशत सरकार उतरवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी वाळू माफियांना दिला.

संगमनेरची जनता आता स्वतंत्र

महाविकास आघाडी सरकारच्या काळात संगमनेर तालुक्यातील जनता पारतंत्र्यामध्ये होती. मात्र, आता राज्यात आलेल्या सरकारमुळे ती स्वतंत्र झाली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जनतेची पिछेहाट झाली. मात्र, सध्याचे हे सरकार हे सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. त्यामुळे निश्चितच या सरकारकडून सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील. निळवंडे कालव्यांसंदर्भात ना. विखे म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या उपस्थितीत बैठकीनुसार पहिल्या 20 कि. मी. मध्ये कामाची सुरुवात झाल्यानंतरच पुढील काम सुरू झाले. अनेक जण आपल्या सह्याचे फ्लेक्स बोर्ड लावून पाणी देणार, असे सांगत होते, परंतू निळवंडे कालव्यांच्या कामाचे संपूर्ण श्रेय ना. फडणवीस व माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे असल्याचा उल्लेख करीत लवकरच कालव्यांना पाणी येणार असल्याचे ना. विखे म्हणाले.

मंत्री विखेंना 300 किलोंचा पुष्पहार..!

नाशिक रोडने मालपाणी लॉन्सच्या कार्यक्रमस्थळी येत असताना माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन या संपर्क कार्यालयाजवळ येताच ‘हमसे जो टकरायेगा मिट्टी में मिल जायेगा’ अशा कार्यकर्त्यांनी घोषणा देत परिसर दुमदुमवला. त्यानंतर 21 तोफांची सलामी देण्यात आली. 250 ते 300 किलो वजनाचा झेंडूच्या फुलांचा हार क्रेनच्या साह्याने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गळ्यात घालण्यात आला.

The post नगर : वाळूबाबत लवकरच सर्वंकष धोरण आणणार appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/KUhmFGd
via IFTTT

नगर : नैसर्गिक ओढे बुजविल्यानेच पूरस्थिती

https://ift.tt/iGIwrjf

नगर, सूर्यकांत वरकड : नगर शहरात साधारण सात ते आठ मोठे नैसर्गिक मोठे होते. मात्र, रहिवासी वसाहत वाढल्याने अनेक ठिकाणी नैसर्गिक ओढे बुजवून अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहेत, तर ओढ्यामध्ये पाईप टाकून ओढा बुजवून टाकला, तर अनेक ठिकाणी ओढ्याची नैसर्गिक रुंदी घटविली आहे. त्यामुळेच पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होऊन नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याचे प्राथमिक सर्वेक्षण अहवालात स्पष्ट झाले.

महापालिका हद्दीतील नालेगाव, बोल्हेगाव, सावेडी उपनगरमध्ये दरवर्षी पुराच्या पाण्याचा फटका नागरिकांना बसतो. नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासन आणि नगरसेवक धावा-धाव करतात. मात्र, पुराचा पाणी निघून गेल्यानंतर पुन्हा सर्वकाही विसरून जातात. दरवर्षी तीच परिस्थिती निर्माण होते. त्यावर कायमस्वरूपी कोणीही तोडगा काढत नाही. कारण नैसर्गिक ओढे-नाले नेमके कोणी आढविले. त्यात पाईप टाकण्यास कोणी परवानगी दिली. ओढ्या-नाल्यात बांधकामे करण्यास कोणी परवानगी दिली, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. दरवर्षी पावसाळ्यात पुराचे पाणी नागरिकांच्या घरात घुसते. त्यात संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान होते. मात्र, त्याची कोणालाही भरपाई दिली जात नाही.

गेल्या काही दिवसांपूर्वी शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. बोल्हेगाव, सावेडी उपनगरातील निर्मलनगर, गावडे मळा, नालेगाव, सर्जेपुरा रामवाडी आदी भागांमध्ये ओढ्या-नाल्याचे पाणी घरामध्ये घुसले. त्यामुळे नागरिकांना रात्र पाण्यात जागून काढावी लागली. नगरसेवक नागरिकांच्या मदतीसाठी धावधाव करीत होते. महापालिकेच्या नगररचना विभागाकडे अधिकृत बांधकामासाठी परवानगी मागितल्या जातात. सावेडी बोल्हेगाव, केडगाव या भागामध्ये अनेक ठिकाणी नैसर्गिक ओढे-नाले बुजून बांधकामे करण्यात आली आहेत, तर अनेक ठिकाणी ओढ्याचे रुंदी कमी करून बंद पाईपद्वारे पाणी काढून देण्यात आले आहे. त्यामुळे पाण्याला नैसर्गिकरित्या जाण्यासाठी जागा राहिली नाही. परिणामी पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरत आहे.

दरम्यान, अनेक ठिकाणी ओढे-नाले अरुंद करण्यात आले आहेत. दहा फुटांचा ओढा बुजवून अगदी चार ते तीन फुटांचा करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाईपमध्ये पाणी बसले नाही की तुंबले जाते आणि नागरिकांच्या घरांमध्ये शिरते. नुकत्याच झालेल्या महासभेमध्ये सुद्धा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, स्थायी सभापती कुमारसिंह वाकळे, ज्येष्ठ नगरसेवक विनीत पाउलबुधे यांनी हा प्रश्न उपस्थित केला आणि नगररचना विभागाची चौकशी करा, अशी मागणी केली. त्यासाठी चौकशी समिती नेमावी, असेही सूचित करण्यात आले.

इथे बुजविला ओढा

सूर्यानगर अभियंता कॉलनी, जुना पिंपळगाव रोड ते गावडे मळा, नरहरीनगर ते मंगल हौसिंग, कुष्ठधामजवळील ओढा, हॉटेल पंचशीलसमोरील नाला, विश्रामगृह ते कलेक्टर ऑफिसपर्यंतचा नाला, नवीन कलेक्टर ऑफिस ते मारुती मंदिरापर्यंत नाला, पंकज कॉलनी येथील नाला, राधाबाई काळे महाविद्यालयाजवळ नाला, पत्रकार वसाहतीजवळील नाला, केडगाव-नेप्ती रोड ओढा, केडगाव नेप्ती रोड, श्रीकृष्ण कॉलनी, आगरकर मळा, खोकर नाला, पोलिस हेडकॉटरमधील नाला, वैष्णवी कॉलनी येथील नाला.

मनपा पाईप काढणार

शहरात अनेकांनी ओढ्यात पाईप टाकून अतिक्रमण केेले आहे, तर अनेकांनी ओढ्यातच अनधिकृत बांधकाम केले आहे. त्यावर मनपा लवकरच ओढ्यातील पाईप काढण्याची मोहीम हाती घेणार असल्याचे सूत्रांकडून समजले.

समितीला मुहूर्त मिळेना

महासभेमध्ये ओढे-नाले बुजविल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरते. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी समिती नेमावी. त्यात दोषी आढळणार्‍या मनपा अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. मात्र, त्यास पंधरा दिवस झाले तरी अद्यापि मनपाने चौकशी समिती नेमलेली नाही.

The post नगर : नैसर्गिक ओढे बुजविल्यानेच पूरस्थिती appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/eznFQJU
via IFTTT

नगर : धावपटूंचं नगर...स्वप्न दुरापास्त!

https://ift.tt/WzJKM9g

नगर, अलताफ कडकाले : नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांचा विचार करता पाचही जिल्ह्यात खेळांचा विकास म्हणावा तसा झालेला नाही. खेळसंस्कृती चांगली रुजलेली असताना नगर पुरता विचार केला, तर नगर कुठेही उजवे नाही. धावपटूंचं शहर बनण्याचे स्वप्न उराशी घेऊन इथला प्रत्येक खेळाडू धावत असतो; परंतु या धावपटूंच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आवश्यकता आहे, ती म्हणजे सिंथेटिक ट्रॅकची…आता ही मागणी जोर धरताना दिसू लागली आहे. सिंथेटिक ट्रॅक झाला, तर नगरचेही धावपटू इतरांबरोबर स्पर्धा करू शकतील, अशी आशा प्रशिक्षकांनी क्रीडादिनानिमित्त ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केली.

आज 29 ऑगस्ट म्हणजेच, हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस. देशाभारात क्रीडा दिन म्हणून हा दिवस आयोजित केला जातो. नगर जिल्ह्यात एकही सिंथेटिक ट्रॅक नसल्याची खंत सचिव व प्रशिक्षक दिनेश भालेराव यांनी व्यक्त केली.

राज्यात होणार्‍या मैदानी स्पर्धा सिंथेटिक ट्रॅकवरच होतात. महाराष्ट्र राज्य अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या स्पर्धा किंवा राज्य शालेय मैदानी स्पर्धा सिंथेटिक ट्रॅकवरच आयोजित केल्या जातात. नगर जिल्ह्यात सिंथेटिक ट्रॅक नसल्याने धावपटूंना सराव करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. नगरचे सर्वच धावपटू सध्या मातीच्या मैदानावर सराव करतात. मड ग्राऊंडवर सराव करणारे खेळाडू राज्य स्पर्धेत सरळ सिंथेटिक ट्रॅकवर धावल्यामुळे ते अनेक वेळा घसरून पडले आहेत.

मातीच्या सरावामुळे त्यांना सिंथेटिक ट्रॅकवर धावणे अडचणीचे जाते. यामुळे नगर जिल्ह्यातील खेळाडूंना अपयश येते. नगर जिल्हा आजपर्यंत अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पदक खेळाडू आहेत. तरीसुद्धा आजपर्यंत जिल्ह्यात एकही सिंथेटिक ट्रॅक निर्माण झालेला नाही, हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे. साखर कारखान्याचा मोठा जिल्हा असूनही, तसेच आजपर्यंत या जिल्ह्यात खूप मंत्री होऊन गेले, तरीही जिल्ह्यामध्ये क्रीडा संकुल उपेक्षितच राहिलेले आहे. वाडिया पार्क येथे सिंथेटिक ट्रॅकची मागणी अहमदनगर जिल्हा अ‍ॅॅथलेटिक संघटनेकडून लावून धरली आहे. यासाठी वारंवार पत्रव्यवहार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सिंथेटिक ट्रॅकसाठी वारंवार पत्रव्यवहार

वाडिया पार्कच्या मैदानावर धावपटूंसाठी सिंथेटिक ट्रॅक बनविण्यात यावे, अशी मागणी तत्कालीन क्रीडामंत्री सुनील केदारे यांना करण्यात आली होती. यासंदर्भात त्यांना पत्र देण्यात आले होते. नगरचे वाडिया पार्कचे मैदान राज्यात दोन नंबरचे मोठे मैदान असून, यासाठी 400 मीटरचा सिंथेटिक ट्रॅक निर्माण करावा. या ट्रॅकअभावी खेळाडू पुणे, मुंबईकडे जातात. त्यामुळे या खेळाडूंना नगर जिल्ह्यातच सुविधा मिळाली, तर चांगली प्रगती करतील आणि नगरचे नावलौकिक वाढवतील, अशी आशा प्रशिक्षक दिनेश भालेराव यांनी बोलताना व्यक्त केली.

The post नगर : धावपटूंचं नगर...स्वप्न दुरापास्त! appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/H7KfpGd
via IFTTT

नगर : चोरट्यांचा हैदोस साडेतीन कोटींवर डल्ला..!

https://ift.tt/bL0OpVE

श्रीकांत राऊत :  नगर : दिवसा बंद घरे हेरायचे अन् रात्री घरफोडी करत किंमती ऐवजावर डल्लामारी करून पसार व्हायचे. घरफोड्या करणार्‍या टोळ्यांनी जिल्ह्यात हैदोस घातला असून पोलिसांना गुंगारा देऊन चोरटे पसार होत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होवू पाहत आहे. गत 7 महिन्यात जिल्हाभरात 433 घरफोड्या करत चोरट्यांनी दागिने, रोकड असा सुमारे 3 कोटी 44 लाख 63 हजार 722 रूपयांचा लंपास केला आहे. यातील मोजक्याच घरफोड्यांच्या गुन्ह्यांची उकल पोलिसांना करता आली. जिल्ह्यात सर्वत्र काही महिन्यांपासून दिवसाढवळ्या राजरोसपणे चोर्‍या, घरफोड्या होत आहेत. पोलिसांकडून गुन्हे दाखल करून घेतले जात आहेत. मात्र, गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण नगण्य आहे.

चोरटे शोधण्यात अन् घरफोड्या रोखण्यात अपयशी झालेल्या पोलिसांबद्दल आता नागरिकांत संतापाची भावना निर्माण होवू पाहत अहे. दिवसा हेरगिरी करायची अन् अंधार्‍या रात्री डल्लामारीचा डाव साधयाचा, चोरट्यांच्या या करामतीने पोलिसांच्या रात्र गस्तीवरही आता शंका उपस्थित होऊ पाहते आहे. पोलिसांची गस्तपथके करतात तरी काय ? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासोबतच गुन्हेगारी रोखण्याचे कार्य 32 पोलिस ठाण्यातून सुरू आहे. तरीही दिवसा होणार्‍या घरफोड्या, चोर्‍या काही केल्या थांबत नसल्याचे दिसून येत आहे. पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोर्‍या, घरफोड्यातून लाखोंचा ऐवज चोरटे लंपास करत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या नाकर्तेपणाबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

शहर पोलिसांच्या रात्रगस्तीवर प्रश्नचिन्ह
नगर शहरात गेल्या सात महिन्यांत तब्बल 66 घरफोड्या झाल्या आहेत. दिवसाढवळ्या होणार्‍या घरफोड्यांच्या घटनेने सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, शहर पोलिसांच्या ‘रात्रगस्तीवर’ प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

‘मौजमस्ती’साठी घरफोड्या
प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग अनेक सुशिक्षित तरूण चुकीच्या मार्गाने पैसा मिळविण्यासाठी घरफोड्या करत असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. घरफोड्यांच्या काही घटनांमध्ये ‘मौजमस्ती’साठी घरफोड्या केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

174 आरोपी जेरबंद
बदलत्या काळानुसार चोरटे आता ‘हायटेक’ झाले असल्याने आरोपींना जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर असते. 433 घरफोड्यांतील उघड केलेल्या गुन्ह्यांत पोलिसांनी 174 आरोपींना जेरबंद केले आहे.

जानेवारी 2022 पासून तब्बल 433 घरफोडीचे गुन्ह्यांची पोलिस दप्तरी नोंद आहे. यातील केवळ 104 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. नगर शहरात झालेल्या 66 घरफोड्यांपैकी फक्त 13 गुन्हे उघड झाले आहेत.
सात महिन्यांत तब्बल 433 घरफोड्या

 

 

The post नगर : चोरट्यांचा हैदोस साडेतीन कोटींवर डल्ला..! appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/fZP6awv
via IFTTT

शिंदे सरकार हाच हिंदूत्वाचा खरा चेहरा : धनंजय देसाई

https://ift.tt/tjwbeBY

नगर : पुढारी वृत्तसेवा : बाळासाहेब ठाकरे यांच्या सिद्धांताला काळिमा फासून शिवसेनेने मिळविलेली सत्ता, हा हिंदूंच्या मतदानाचा विश्वासघात होता. त्यामुळे राज्यात सत्तासंघर्ष निर्माण होऊन शिवसेनेच्या मूळ हिंदूत्ववादी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. सध्याचे शिंदे सरकार हेच हिंदूत्वाचा खरा चेहरा आहे, अशी प्रतिक्रिया हिंदूराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई यांनी व्यक्त केली. हिंदूराष्ट्र सेनेच्या एकदिवसीय अधिवेशन आणि राष्ट्रनिर्माण संकल्प सभेसाठी देसाई नगरला आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, मुळातच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ही नैसर्गिक युती नव्हती.

हिंदू मतदारांनी शिवसेना आणि भाजपाच्या युतीला मतदान केले होते. राज्यात हिंदूत्वाचे सरकार स्थापन होण्यासाठी जनादेश मिळाला होता. परंतु, अनैसर्गिक युतीचे सरकार राज्यात गेली अडीच वर्षे काम करीत होते. आता पूर्ण हिंदूत्वाचे सरकार अस्तित्वात आले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार निश्चितच दिशादर्शक ठरेल. नवाब मलिक जेलमध्ये गेल्यानंतरही मंत्रिपद कायम राहते. अतिरेक्याचे समर्थन करणार्‍या अस्लम शेख यांना मुंबईचे पालकमंत्री पद दिले जाते, कोविड काळातही हिंदूंसाठी सरकार आदेश काढते आणि इतरांसाठी मार्गदर्शक सूचना केल्या जातात.

हा प्रकार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणाना नक्कीच नव्हता. अशा सरकारला सत्तेवरून खाली खेचणे, हे नेहमीच समर्थनीयच असेल. पूर्ण हिंदूत्वाचे सरकार केंद्र आणि राज्यात सत्तेवर असणे गरजेचे आहे. राज्यात गेल्या दोन महिन्यांमध्ये तेच घडले. याच सरकारला बहुमत मिळेल, असा विश्वासही देसाई यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

आता राजकीय हिंदूत्व हवे!
आता केवळ अध्यात्मिक हिंदूत्व नकोय, तर राजकीय हिंदूत्व हवे. आजही देशात धर्मनिरपेक्षतेचा हिजाब पांघरून जिहादी आणि धर्मांध उन्मादाकडे दुर्लक्ष केले जात आहे. हिंदूत्वाला फॅसिझम आणि हिंदूत्वाविरोधात बोलणे किंवा कृती करण्यास अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हटले जाते. सांस्कृतिक अस्तित्वासाठी फ्रान्ससारख्या प्रगत राष्ट्रानेही कायदे बदलून अभिव्यक्ती स्वातंत्र्य संपविले आहे. आपल्यालाही फ्रान्सप्रमाणेच निर्णय घेण्याची गरज आहे.

The post शिंदे सरकार हाच हिंदूत्वाचा खरा चेहरा : धनंजय देसाई appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/NFrgAMw
via IFTTT

पाथर्डी : पाणबुडी चोर मुद्देमालासह ताब्यात

https://ift.tt/Ik6bPBX

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : विहिरींतील पाणबुडी विद्युत मोटारींची चोरी करणार्‍या टोळीचा पाथर्डी पोलिसांनी पर्दाफाश करत एका आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. फिर्यादी बाळकृष्ण शिवाजी भराट (वय 40, रा. तोंडोळी, ता. पाथर्डी) यांनी दि. 9 ऑगस्ट रोजी चोरीची फिर्याद दिली होती. त्यांच्या शेतातील तीस हजार रुपये किंमतीची पाणबुडी मोटार, तसेच शेजारी शेती असलेल्या रुख्मिणी राजेंद्र भराट यांच्या शेतातील पस्तीस हजारांची पाणबुडी मोटार चोरीस गेली होती.

पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांना हा गुन्हा गणेश नारायण पडळकर (रा. तोंडोळी, ता. पाथर्डी) याने केला असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलिस नाईक अनिल बडे, पोलिस कॉन्स्टेबल समीर शेख, अतुल शेळके, संजय बडे यांनी माहिती काढून संशयित आरोपी पडळकर याला तोंडोळी परिसरातून ताब्यात घेतले. त्याने हा गुन्हा साथीदार पांडुरंग विष्णू काकडे, राजेंद्र पालवे (दोघे रा. तोंडोळी, ता. पाथर्डी) यांच्यासह केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यातील मोटारी त्याच्या राहत्या घरात ठेवल्याची कबुली देत गुन्ह्यातील मोटारी काढून दिल्या.

The post पाथर्डी : पाणबुडी चोर मुद्देमालासह ताब्यात appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/PvCH03A
via IFTTT

येसवडी तलाव कुकडीच्या पाण्याने ओव्हरफ्लो

https://ift.tt/vMhJj7d

राशीन : पुढारी वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील येसवडी येथील तलाव गेल्या चार वर्षांपासून कोरडाठाक होता. आमदार प्रा. राम शिंदे यांच्या सूचनेवरून व मार्गदर्शनाने हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. आमदार शिंदे यांच्या उपस्थितीत कुकडीचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. काळे यांच्या हस्ते नुकतेच जलपूजन करण्यात आले. यामुळे येसवडी ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. उन्हाळ्यात या पाण्याचा परिसरातील सर्व शेतकर्‍यांना फायदा होणार आहे. येसवडीच्या सरपंच जयश्री त्र्यंबक पिसे, उपसरपंच कृष्णा मरळ व सर्व ग्रामस्थांच्या वतीने आमदार शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

आमदार राम शिंदे यांनी कुकडीचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. काळे यांना सांगितले की, जलपूजन तुम्हीच करा. म्हणजे येसवडी तलाव तुमच्या लक्षात राहील. या ठिकाणी नेहमी कुकडीचे आवर्तन सोडा. येसवडीकरांचे 25 वर्षांचे स्वप्न या वर्षी पूर्ण झाले आहे. कुकडीच्या ओव्हरफ्लोच्या पाण्याने येसवडी तलाव पूर्ण क्षमतेने पहिल्यांदाच भरला आहे. त्यामुळे उन्हाळ्यापर्यंत पाण्याची अडचण येणार नाही.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते शांतीलाल कोपनर, जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, तालुकाध्यक्ष सुनील गावडे, उपाध्यक्ष पांडुरंग भंडारे, राशीन शहराध्यक्ष एकनाथ धोंडे, दत्ता गोसावी, सुनील काळे, सोएब काझी, बंडाभाऊ मोढळे, तात्यासाहेब माने, योगेश शर्मा, अंकुश राऊत, कृष्णा मरळ, जयदीप पिसे, सुभाष सामसे, तुषार पिसे, मंगेश साळवे, उमेश भैलुमे, दगडू कांबळे, संदीप कांबळे, हिरामण उकिरडे, विलास काळे, रवींद्र दंडे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकांना वाटले आता मी पुन्हा येणार नाही. मात्र मी अडीच वर्षांतच पुन्हा आलो! मी नसल्याने गेली अडीच वर्षे कर्जत तालुक्याला कुकडीचे पाणी मिळाले नाही. आता मी आलो आणि पाणीही आले. अडीच वर्षांचा पाण्याचा अनुशेष भरून काढणार.
                                                    – प्रा. राम शिंदे आमदार, विधान परिषद

The post येसवडी तलाव कुकडीच्या पाण्याने ओव्हरफ्लो appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/pKJe5oh
via IFTTT

नगर : शहरातील उड्डाणपुलाचे दिवाळीत लोकार्पण

https://ift.tt/iA73xPY

नगर : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेत भाजपचे महापौर व उपमहापौर असताना नगर शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. विकासकामांची तीच परंपरा पुढे चालू ठेवण्यात येणार असून, शहरातील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा दिवाळीच्या दिवशी करण्यात येणार असल्याचे आश्वासन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले. नगर शहरातील मिसाळ गल्ली येथे काँक्रेट रस्त्याचे भूमिपूजन खासदार डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास माजी महापौर बाबासाहेब वाकळे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, माजी उपमहापौर मालनताई ढोणे, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, धनंजय जाधव, जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे हे उपस्थित होते. खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले, नगर शहरात विकासकामे सुरु आहेत. नागरिक विकासकामांचे साक्षीदार आहेत. ढोणे यांच्या वार्डातील विकासकामासाठी साडेतीन कोटीचा निधी देण्यात आला आहे. अहमदनगर महापालिकेच्या हद्दीतील विविध वॉर्डात 50 ते 60 कोटी रुपयांचा विकासनिधी देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

नगर शहरातील उड्डाणपुलाचे काम भाजपचे महापौर व उपमहापौर असतानाच सुरू झाले. दिवाळीच्या दिवशी या उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा केला जाणार आहे. आगामी सहा महिन्यांत शहरातील विकासकामांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली गती देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

The post नगर : शहरातील उड्डाणपुलाचे दिवाळीत लोकार्पण appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/4PRQgE1
via IFTTT

नेवासा : भरधाव कंटेनरने दोघा मजुरांना चिरडले

https://ift.tt/F4l6XQH
अपघात

नेवासा/सोनई : पुढारी वृत्तसेवा : नगर-संभाजीनगर महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे व दुभाजकावरील गवत काढत असताना डम्परला मागच्या बाजूने कंटेनरने चिरडल्याने दोन मजूर जागीच ठार झाले. या अपघातात चार मजूर गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी दुपारी साडेचार वाजता वडाळा बहिरोबा गावजवळ घडली.

घटनेची माहिती अशी की, नगर-संभाजीनगर महामार्गावरील वडाळा बहिरोबा गावाजवळ महामार्गावर काल शनिवारी आठ ते दहा मजूर रोजंदारीवर गवत काढण्याचे व खड्डे बुजविण्याचे काम करीत होते. संभाजीनगरवरून भरगाव नगरकडे जात असलेल्या कंटेनर (क्रमांक एम एच 46 बी एफ 9155) हा रस्त्यावर लावलेले बॅरिकेट ओलांडून समोर वेग नियंत्रित न झाल्याने मजुरांना उडवत कामासाठी असलेला टिप्पर (क्रमांक एम एच 16 सीसी 3292) जोरदार धडक दिली.

या दुर्घटनेत रमेश भगवान माने (वय 50, रा बाभूळखेडा), ऋषिकेश संजय निकम (वय 25, रा. सलबतपूर) हे दोघे मजूर ठार झाले असून, मेहबूब इब्राहिम शेख, संभाजी आसाराम वायकर, बाळासाहेब रघुनाथ पाटेकर हे जखमी झाले. जखमींना नेवासा रुग्णालयात उपचारासाठी हलवीण्यात आले आहे.

The post नेवासा : भरधाव कंटेनरने दोघा मजुरांना चिरडले appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/ElzT8eF
via IFTTT

सोन्याचे आमिषाने लुटणारा अटकेत

https://ift.tt/2DrOaY0

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : घोसपुरी शिवारात स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून लुटणार्‍या टोळीतील फरार दरोडेखोर अजय गजानन काळे यास नगर तालुका पोलिसांच्या पथकाने बुरुडगाव शिवारातील म्हात्रे मळा परिसरात शुक्रवारी (दि.26) रात्री सापळा लावून पकडले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली एक मोटारसायकल जप्त केली आहे. घोसपुरी शिवारात दि.20 जुलै 2021 रोजी चंद्रपूर येथील मिलिंद कान्हाजी काशिदे व त्याचा भाऊ यांना स्वस्तात सोन्याच्या आमिषाने बोलावून, त्यांच्या जवळील 8 लाख 34 हजारांचा ऐवज लुटला होता.

याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर या टोळीतील 7 जणांना पोलिसांनी पकडले होते. मात्र, सराईत दरोडेखोर असलेला अजय काळे हा फरार होता. शुक्रवारी (दि.26) रात्री तो बुरुडगाव शिवारातील म्हात्रे मळा परिसरात आल्याची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी पथकासह सापळा लावून त्यास शिताफीने पकडले. त्याला शनिवारी (दि.27) न्यायालयात हजर केले असता, सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

The post सोन्याचे आमिषाने लुटणारा अटकेत appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/Hq8iAB9
via IFTTT

नगर : 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास

https://ift.tt/pvOeFtq

नगर : पुढारी वृत्तसेवा : एसटी महामंडळाने 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सुविधा उपलब्ध केली आहे. जिल्ह्यात शुक्रवारपासूनच त्याची अंमलबजावणी सुरू झाल्याचे विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कोरोना संसर्ग आणि कामगारांचा संप, या दोन कारणांमुळे महामंडळाची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. महामंडळाला आर्थिक खाईतून बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी प्रवासासाठी एसटीलाच पसंती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी 850 बस होत्या. तर, आजमितीस 593 बस व 88 मालट्रक आहेत. दोन वर्षांच्या तुलनेत आजमितीस 183 बस कमी आहेत. बसची कमतरता आणि आहे त्या बसचा दैनंदिन बिघाड, यामुळे सद्यस्थितीत लांब पल्ल्यांच्या बस व ग्रामीण भागात बससेवा पुरविताना मोठी अडचण येत आहे. अशा परिस्थितीत आजमितीस दररोज 1 लाख 75 हजार किलोमीटर बस धावत आहेत. हळूहळू जास्तीत जास्त बस सुरू करू. प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न महामंडळ करीत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवाशांना सुरक्षितेची हमी देण्यासाठी प्रत्येक बसमध्ये आता अग्निशमन यंत्र बसविले जाणार आहे. त्यासाठी सध्या 360 यंत्र उपलब्ध झाले आहेत. गणेशोत्सवासाठी नगर विभागाच्या 125 बस कोकणात रवाना झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारने 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवास सवलत दिली. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिले. त्यानुसार सर्व अकरा आगारांत ही व्यवस्था केली असून, शुक्रवारपासून अंमलबजाणी सुरु झाली. आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास मोफत प्रवास उपलब्ध होणार असल्याचे विभाग नियंत्रक सपकाळ यांनी सांगितले.

रक्षाबंधनमध्ये पावणेचार कोटींचे उत्पन्न
रक्षाबंधन व 15 ऑगस्टच्या आसपास असणार्‍या सुट्ट्यामुळे बसला भरपूर गर्दी होती. त्यातून पावणेचार कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. दरम्यान, कोरोना काळात बससेवा ठप्प होती. त्यामुळे उत्पन्न नव्हते. त्यामुळे डिझेल, टायर व इतर खर्च असे एकूण पावणेदोन ते दोन कोटी रुपये पुरवठादारांची उधारी देणे बाकी होते. सध्या बससेवा सुरळीत सुरू असल्यामुळे पन्नास टक्के उधारी मिटविली असल्याचे सपकाळ यांनी सांगितले.

 

The post नगर : 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/RHQ8Now
via IFTTT

शिंगणापूरला भाविकांची मांदियाळी

https://ift.tt/ZmDugB2

सोनई : पुढारी वृत्तसेवा : शनिशिंगणापूर येथे शनिवारी (दि.27) दर्श पिठोरी अमावस्येनिमित्त भरलेल्या यात्रेस दिवसभरात चार लाख भाविकांनी हजेरी लावत, शनिदेवाचे दर्शन घेतले. अमावस्या दुपारपर्यंतच असल्याने सायंकाळनंतर गर्दीचा ओघ कमी झाला होता.
अमावस्येनिमित्त शनैश्वर देवस्थान ट्रस्टने वाहनतळ, दर्शन व्यवस्था, आरोग्य टीम, रुग्णवाहिका, सुरक्षा आदीबाबत नियोजन केले होते. शुक्रवारी रात्रीनंतर गर्दी वाढण्यास सुरुवात झाली. शनिवारी सकाळी नऊ वाजता सुरु झालेली गर्दी दुपारी तीन वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात होती. वाहनांची गर्दी वाढल्यानंतर मुळा कारखाना गेट व शनैश्वर रुग्णालय येथील वाहनतळावर वाहने लावून भक्तांना दोन किलोमीटर पायी जाऊन दर्शन घ्यावे लागले.

शुक्रवारी रात्री बारा वाजता राहुल गोडसे यांच्या हस्ते आरती सोहळा झाला. शनिवारी पहाटे साडेचार वाजता औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, मेहतानी व ऑस्ट्रेलियाचे शनिभक्त राकेशकुमार यांच्या हस्ते आरती झाली. दुपारची मध्यान्ह आरती झिम्बावे येथील शनिभक्त जयेश शहा यांच्या हस्ते झाली. सायंकाळची आरती ओरिसाचे आरोग्यमंत्री नब किशोरी दास यांच्या हस्ते झाली.
यात्रेनिमित्त खेळणी, मेवा-मिठाईचे स्टॉल लागले होते. पंकज मित्तल (दिल्ली), मेहता मंडळ (मुंबई), शनिदेव सेवा समिती(हरियाणा), विशाल भंडारा(दिल्ली), अशोक गर्ग (सिरसा) व बबलूभाई मित्र मंडळाने आलेल्या भाविकांना चहा, खिचडी, नाश्ता व जेवणाचा प्रसाद वाटला. माजी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्यासह अनेक मान्यवरांनी शनीदेवाचे दर्शन घेतले.

लटकूंकडून भाविकांची अडवणूक कायम
शनैश्वर देवस्थान ट्रस्टने सर्व व्यवस्था करूनही वाहनतळ ते शिंगणापूर या मार्गावर मोटारसायकलवरील लटकूंनी भाविकांची अडवणूक केली. वाहनतळापासून भाविकांना घेऊन जाणार्‍या रिक्षा ठराविक दुकानांवर नेऊन सक्तीने पूजेचे साहित्य देत होते. त्याचा मोठा त्रास अनेक भाविकांना सहन करावा लागला.

The post शिंगणापूरला भाविकांची मांदियाळी appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/FvD0HOk
via IFTTT

बोधेगावमध्ये दुकानांना लागली आग

https://ift.tt/l6dhQAR

बोधेगाव : पुढारी वृत्तसेवा : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील शेवगाव-गेवराई राज्यमार्गालगत बन्नोमाँ दर्ग्याशेजारील पुरोहित स्विट मार्ट, बन्नोमाँ हॉटेल आणि साईराज हेअर ड्रेसर्स या तीन दुकानांना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गावातील तरूणानी प्रयत्नांची पराकाष्टा करून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. सुमारे दीड तासाने गंगामाई साखर कारखान्याची अग्निशामक गाडी आल्यानंतर आग आटोक्यात आली. गुरुवारी बोधेगावचा आठवडे बाजार होता. पोळा सणामुळे बाजारात गर्दी असल्याने रात्री उशिरापर्यंत सर्वच दुकाने सुरू होती.

रात्री साडेअकरा ते बाराच्या दरम्यान पत्रकार उद्धव देशमुख आजारी असल्याने ते मित्र रवींद्र घोरतळे यांच्यासमवेत डॉ.भिसे यांच्या दवाखान्यात याच रस्त्याने जात होते. त्यावेळी त्यांना या दुकानाला आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ पुरोहित स्विट होमचे मालक हुकुमसिंग राठोड यांना फोन करून घटनेची माहिती दिली.तोपर्यंत बन्नोमाँ हॉटेलचे मालक बाबा पठाण, केदारेश्वर फोटोचे मालक पत्रकार बाळासाहेब खेडकर हे घटनास्थळी दाखल झाले. गावातील तरूणांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. टँकर पाण्याने भरून आणून तरुणांनी जीव धोक्यात घालून आग विझविण्याचा प्रयत्न केला.

दीड तासाने गंगामाई साखर कारखान्याची अग्निशमन गाडी आल्यावर आग आटोक्यात आली. या आगीत बन्नोमाँ हॉटेलचे सुमारे दोन लाखांचे, पुरोहित स्विट होमचे 9 लाखांचे नुकसान झाले. तर, कृष्णा खंडागळे यांचे साईराज हेअर ड्रेसर्स हे दुकान पूर्ण जळून खाक झाले.
आग विझविण्यासाठी दीपक गायकवाड, केदारेश्वरचे संचालक मयूर हुंडेकरी, माजी संचालक अनिल कांबळे यांच्यासह अनेक तरुणांनी मदत केली. माजी जि.प. सदस्य नितीन काकडे, माजी सरपंच राम अंधारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाण्याचे टँकर, जेसीबी तातडीने उपलब्ध करून बचाव कार्यात मदत केली.

The post बोधेगावमध्ये दुकानांना लागली आग appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/bRvufBq
via IFTTT

नगर-पुणे महामार्गावर तोडलेले दुभाजक पुन्हा बंद करणार..!

https://ift.tt/4EsihtO

सुपा : पुढारी वृत्तसेवा : नगर-पुणे महामार्गावर नगर ते शिरूरपर्यंत तोडलेले रस्ता दुभाजक (डिव्हायडर) पुन्हा पोलिस बंदोबस्तात बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धोक्याचे वळण असलेल्या ठिकाणी पांढरे पट्टे मारण्याच्या सूचना चेतक एन्टरप्रायजेस कंपनीला देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात खराब झालेल्या रस्त्यावरील साईडपट्ट्या मुरूम टाकून भरण्यात येणार आहेत. केडगावच्या वेशीजवळचा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्याने, तो सुटण्यास वेळ लागणार आहे. महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्याची जबाबादारी सुपा, नगर तालुका व महामार्ग पोलिसांवर टाकण्यात आली आहे.

नगर-पुणे महामार्गावर वारंवार अपघात घडत असून, आठवड्यात आठ लोकांचा बळी गेला आहे. बेजबाबदार प्रशासनामुळे अपघात वाढल्याबाबतचे वृत्त ‘दैनिक पुढारी’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर प्रशासन यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग, पारनेरचे तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, चेतक कंपनीचे अधिकारी, महामार्ग पोलिस, व स्थानिक सुपा पोलिस ठाण्याचे अधिकारी यांची संयुक्तरित्या तातडीची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये हे निर्णय घेण्यात आले.

आठ दिवसांपासून महामार्गावर रोज एक जणांचा अपघातात मृत्यू होतो. तरी प्रशासनावर जाग येत नव्हती. मागील महिन्यातही चार लोकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान काळात महामार्गावरील अपघात थांबता थांबेना, अशा आशयाचे वृत्त ‘दैनिक पुढारी’ने प्रसिद्ध केले होते. एका प्रशासकीय अधिकार्‍याने फक्त फोनवर माहिती घेतली होती. परंतु, प्रशासनाला उपाययोजना करता येईना. महामार्गावर दहा वर्षांत 450 लोकांचा मृत्यू झाला. अनेक लोक जखमी झाले आहेत. तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे.

महामार्गाचे चौपदरीकरण होऊनही अपघात थांबत नाहीत. महामार्गावर नगर शहराचे उपनगर केडगाव येथे भूसंपादनाचे काम अद्याप प्रलंबित आहे. पारनेर तालुक्यातील सुपा व नारायण गव्हाणजवळ सकाळी व सायंकाळी वाहनांची कोंडी कायम बघायला मिळते. या वाहन कोंडीचा प्रश्न दहा वर्षांत प्रशासनाला सुटलेला नाही. वाहन चालकांना महामार्गावर मोठी कसरत करावी लागते. महामार्गावर हॉटेल्ससमोर अनेकांनी डिव्हायडर तोडलेले आहेत. रस्ता क्रॉसिंग करताना अपघात होतात. चार दिवसांपूर्वी सुप्यातील उद्योजक बाळासाहेब पवार यांनाही मृत्यू सामोरे जावे लागले. महामार्गावर डिव्हायडर तोडणार्‍यांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई करणे अपेक्षित आहे.

महामार्गावर अपघात नेमके कुठे होतात व का होतात, यासाठी दहा वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन विभाग, राज्य परिवहन महामंडळ, स्थानिक पोलिस ठाणे व नगर तालुका पोलिस ठाणे, महामार्ग पोलिस यांनी अपघातांसंदर्भात बैठक घेतली होती. त्यावर उपाययोजना पण सुचविल्या होत्या. दरम्यान काळात प्रशासकीय अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या. त्यानंतर महामार्गावरील अपघातासंदर्भात कोणत्याही प्रशासकीय अधिकार्‍याने जोखीम पत्करली नाही. प्रशासनाने प्रवाशाची मोठी अग्निपरीक्षा घेतली.

पाच वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर दुभाजक टाकण्यास सुरुवात केली होती. परंतु, काही राजकीय मंडळींनी दबावतंत्र करून ते काम बंद पडले होते. डिव्हायडर तोडल्यामुळे अपघात तर होतात. पण, रात्रीच्या वेळी रस्तालूट करून चोरटे पटकन निघून जातात. पूर्वीसारखे वाहन अडवून तपासणी करण्यावर पोलिसांना मर्यादा आलेल्या आहेत. पोलिस लांबूनच फोटो काढतात. ऑनलाईन दंड भरण्याची कसरत करतात.

बैठकीस पारनेरचे तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता वसंत पारधे, महामार्गाचे पोलिस उपनिरीक्षक शशिकांत गिरी, सुपा पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन कुमार गोकावे, उद्योजक योगेश रोकडे, माजी उपसरपंच सागर मैड आदी उपस्थित होते.

गतिरोधक टाकण्याची मागणी
सुपा रस्त्यावर वाहन चालकांची संख्या वाढली. यातील बरीचसे वाहन चालक टोल चुकविण्यासाठी सुपा चौकातून जाण्याचा मार्ग अवलंबतात. अशा बेजबाबदार वाहन चालकांमुळे अपघात होतात. दहा दिवसांपूर्वी या अपघातात वाळवणेच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. अवजड वाहतुकीस आळा बसणे गरजेचे आहे. सुपा ते औद्योगिक वसाहत चौकापर्यंत जादा गतिरोधक टाकण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

शिवसेनेकडून प्रशासनाचे आभार
सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन विभाग, राज्य परिवहन महामंडळ विभाग, महामार्ग पोलिस, नगर तालुका व सुपा पोलिस ठाणे, प्रतिष्ठित नागरिकांना सोबत घेऊन प्रवाशांना न्याय देण्याची मागणी आपण केली होती. प्रशासनाने सुपा पोलिस ठाण्यात तातडीची बैठक घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्याबद्दल पारनेर तालुका शिवसेना उपप्रमुख आप्पासाहेब देशमुख यांनी प्रशासनाचे आभार मानले.

The post नगर-पुणे महामार्गावर तोडलेले दुभाजक पुन्हा बंद करणार..! appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/LDKcEeM
via IFTTT

नगर : पाणीपुरवठ्यातील कर्मचारी निलंबित

https://ift.tt/gKn6TCh

नगर : पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण पाणीपुरवठा विभागात जलजीवन मिशन अंतर्गत ई-निविदेच्या कामात गैरप्रकार व हलगर्जीपणा इत्यादी गैरवर्तन केल्याप्रकरणी कनिष्ठ सहायक प्रीतम दीपक बल्लाळ यांच्यावर जिल्हा परिषद सीईओ आशिष येरेकर यांनी थेट निलंबनाची कारवाई केली आहे. या संदर्भात काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, जेऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे कनिष्ठ सहाय्यक प्रीतम बल्लाळ यांनी कामकाजात हलगर्जीपणा करून कामकाज प्रलंबित ठेवून कर्मचार्‍याचे वेतन वेळेवर अदा केले नाही.

त्यामुळेे कर्मचार्‍यांना अतिरिक्त व्याज सोसायटीचे भरावे लागले. ऑडिट करावयाचे अभिलेखे हरवल्याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवून कामात केलेला हलगर्जीपणा, वरिष्ठांच्या आदेशाची अवमानता करून कार्यालयीन शिस्तीचे उल्लंघन करणे, ग्रामीण पाणीपुरवठा येथील जलजीवन मिशन अंतर्गत ई-निविदेच्या कामात गैरप्रकार व हलगर्जीपणा इत्यादी गैरवर्तन करून महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम 1967 मधील 3 चा भंग केलेला आहे.

त्यामुळे प्रीतम बल्लाळ यांना जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करीत असल्याचे सीईओ येरेकर यांनी म्हटले आहे. दरम्यान, बल्लाळ हे जेऊर आरोग्य केंद्रात कनिष्ठ सहायक असताना त्यांची नियुक्ती मार्चपासून पाणीपुरवठा विभागात केलेली होती.
त्यामुळे या कारवाईने विशेषतः जलजीवनसह अन्य महत्त्वाच्या विभागातील प्रतिनियुक्तीवरील कर्मचार्‍यांमध्येही खळबळ उडाली आहे.

The post नगर : पाणीपुरवठ्यातील कर्मचारी निलंबित appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/o8DSvmG
via IFTTT

राहुरी : कानडगावच्या 188 सभासदांना दणका

https://ift.tt/YMGN5rS

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील म्हैसगाव, तुळापूर सेवा संस्थेच्या सभासदांचे सदस्यत्व रद्दचा दणका बसल्यानंतर कानडगावच्या त्या 188 सभासदांनाही हादरा बसला आहे. 261 सभासदांच्या नावे 10 गुंठे क्षेत्र नसल्याने संबंधितांचे सभासदत्व रद्द व्हावे, अशी तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, राहुरीच्या सहाय्यक निबंधक कार्यालयामध्ये तक्रारदार व सभासदांना बोलावून घेत सुनावणी घेतली. काहींनी सात-बारा उतारे दाखल केले, तर काहींनी कर्ज काढल्याचे प्रमाणपत्र दिले. यानुसार 261 पैकी तब्बल 188 सभासदांचे सदस्यत्व सहकार अधिनियम 1960 कलम 11 आणि 25 अ अन्वये रद्द केल्याचा आदेश जारी झाल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

राहुरी तालुक्यातील कानडगाव येथील सेवा संस्थेच्या 261 सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याबाबत सहाय्यक निबंधक कार्यालयामध्ये अर्ज दाखल झाला होता. त्यानुसार सहाय्यक निबंधक नागरगोजे यांच्या मार्गदर्शनामध्ये वेळोवेळी सुनावणी घेण्यात आली. 18 एप्रिल 2022 रोजी तक्रार अर्ज देण्यात आला होता. यानंतर सहाय्यक निबंधक कार्यालयामध्ये 23 मे, 2 जून, 6 जून, 15 जून, 1 जुलै, 7 जुलै, 14 जुलै, 27 जुलै या तारखांना अर्जदार व सामनेवाले 257 सभासदांची सुनावणी झाली. यावेळी अर्जदार भगवान भाऊराव गागरे व इतर 2 (रा. कानडगाव ता. राहुरी) यांनी म्हणणे मांडले.

तक्रार करण्यात आलेल्या त्या 261 सभासदांच्या वतीने अ‍ॅड. अशोक तनपुरे यांनी म्हणणे सादर केले. यावेळी सहाय्यक निबंधकांच्या आदेशानुसार संबंधित सभासदांच्या नावे किमान 10 गुंठे क्षेत्र असल्याचे दाखले सादर करण्यास सांगितले होते. तलाठी यांच्याकडून प्रमाणित यादी सादर करण्यात आली. त्यामध्ये 69 सभासदांच्या नावे 10 गुंठे किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्र असल्याची माहिती निबंधक कार्यालयास देण्यात आली, तर कर्ज घेतलेल्या एका सभासदांचे तसेच गावठाण हद्दीमध्ये असलेल्या क्षेत्रावर इतर हक्कामध्ये नोंद असलेल्या त्या दोन सभासदांचे सभासदत्व रद्द न करण्याचा आदेश झाला, परंतु 10 गुंठे क्षेत्र नसलेल्या व सेवा संस्थेशी कोणताही व्यवहार नसलेल्या 188 सभासदांचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश सहाय्यक निबंधक नागरगोजे यांनी पारित केला आहे.

तक्रार अर्जानुसार 69 सभासद हे 10 गुंठे क्षेत्र असलेले, तर इतर दोघे कर्जदार असल्याने संबंधितांचे सभासदत्व वाचले. दरम्यान, कानडगाव परिसरामध्ये आदेश पारित होताच एकच खळबळ उडाल्याचे चित्र दिसले आहे. राहुरी तालुक्यातील म्हैसगाव व तुळापूर सेवा संस्थेमध्ये यापूर्वी सभासद अपात्रतेसाठी तक्रारी दाखल करण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार दोन्ही सेवा संस्थांतील अपात्र सभासदांना सहाय्यक निबंधक कार्यालयातून दणका बसला होता.

त्यानंतर कानडगाव सेवा संस्थेबाबतही वेळोवेळी सुनावण्या होऊन अखेर 188 जणांवर अपात्रतेचा शिक्कामोर्तब झाल्याने सहकार खात्यामध्ये चर्चेचे गुर्‍हाळ रंगले आहे. सेवा संस्थेच्या निवडणुकांचा बार सुरू आहे. अनेक सेवा संस्थांच्या निवडणुका तोंडावर असतानाच सभासद अपात्रतेचा दणका सुरू असल्याचेही चित्र आहे.

आता राहुरी खुर्द सेवा संस्थेकडे लक्ष..!
राहुरी खुर्द येथील सेवा संस्थेमध्ये 98 सभासदांचे सदस्यत्व रद्दचा अर्ज दाखल झालेला आहे. तुळापूर, म्हैसगाव व कानडगावप्रमाणेच याही संस्थेची सुनावणी घेऊन योग्य तो आदेश दिला जाणार असल्याची माहिती राहुरीचे सहाय्यक निबंधक दीपक नागरगोजे यांनी दिली.

सहकार क्षेत्रात भ्रष्टाचार नकोच : हिरगळ
सहकार क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी भ्रष्टाचार थांबणे गरजेचे आहे. अनेक संस्थांमध्ये अनधिकृतपणे सभासदत्व घेतलेले खर्‍या सभासदांवर अन्याय करतात. त्यानुसार सहकार खात्याने दिलेला आदेश हा सर्वांसाठी आदर्शवत असल्याचे सोपानराव हिरगळ यांनी सांगितले.

The post राहुरी : कानडगावच्या 188 सभासदांना दणका appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/amkKeGi
via IFTTT

नगर : स्वाईन फ्लूचा शिरकाव, आतापर्यंत तिघांचा बळी

https://ift.tt/FGv53ce

नगर/पारनेर/संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा शिरकाव झाला असून त्याने तिघांचा बळी घेतला आहे. आरोग्य यंत्रणेने ही बाब गांभीर्याने घेत तातडीने आरोग्य तपासणी सुरू केली आहे. पारनेर तालुक्यातील एकाचा, तर संगमनेरातील दोघांचा अशा तिघांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील संगमनेर, पारनेर, कोपरगाव, श्रीरामपूर तालुक्यात स्वाईन फ्लूचे रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

पारनेर तालुक्यातील पिंप्री जलसेन येथील शिवाजी पाराजी शिंदे (वय 60) यांचा स्वाईन फ्लूची बाधा झाल्याने नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी (दि. 23) मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांनाही बाधा झाली असून, मुलगा व सुनेला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सर्दी, खोकला जास्त जाणवू लागल्याने शिवाजी शिंदे यांना रविवारी पारनेरच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर पुढील उपचारासाठी नगर येथे नेण्यास सांगितले. त्यांनतर रविवारी रात्री त्यांना नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

परंतु, प्रकृती जास्त खालावल्याने मंगळवारी (दि.23) दुपारी दीड वाजता त्यांचा नगर येथे मृत्यू झाला. पिंप्री जलसेन येथील व्यक्तीचा स्वाईन फ्लूमुळे झालेल्या मृत्यूमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली. थंडीताप, खोकला आजाराने तालुक्यातील नागरिक त्रस्त असताना एका व्यक्तीचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्यातील नागरिक खबरदारी घेताना दिसत आहेत.

जिल्ह्यात स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या वाढू नये, यासासाठी प्रतिबंध व नियंत्रणासाठी तत्काळ विशेष उपाययोजना करण्याचे निर्देश आरोग्य संचालकांनी आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील स्वाईन फ्लू रुग्ण व संशयित रुग्णांवर तत्काळ उपचार करण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांना दिले आहेत.
                                            -डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी, नगर

श्रीरामपूर, कोपरगावतही रुग्ण
जिल्हा रुग्णालयात स्वाईन फ्लूचे दोन रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यातील एक रुग्ण श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव आणि दुसरा कोपरगाव येथील आहे. दोघेही कोरोना संसर्ग झाल्याच्या संशयातून जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते; मात्र तपासणी दरम्यान त्यांना स्वाईन फ्ल्यूची लागन झाल्याचे समोर आले.

तपासणीसाठी पथके तयार
तालुक्यात स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळून त्याचा मृत्यू झाल्याने तालुका प्रशासन खडबडून जागे झाले. आरोग्य विभागाने तालुक्यात सर्वत्र नागरिकांची आरोग्य तपासणीसाठी पथके तयार केले आहेत. त्या माध्यमातून गाव पातळीवर नागरिकांची तपासणी करण्यात येत असून, संशयित रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले जात आहे.

पिंप्री जलसेन येथील एका व्यक्तीचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला; त्यामुळे गावात नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तसेच, तालुक्यातील सर्वच गावांमध्ये आरोग्य तपासणीसाठी पथके तैनात करण्यात आले. तालुक्यातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, कोरोना व स्वाईन फ्लू सदृश्य लक्षणे असल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घ्यावेत.
                            – डॉ प्रकाश लाळगे, तालुका आरोग्य अधिकारी, पारनेर

संगमनेरात 13 संशयितांवर उपचार
संगमनेर तालुक्यात स्वाईन फ्लू सदृश आजाराने दोघांचा मृत्यू झाला आहे. या वृत्ताला पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी दुजोरा दिला आहे.तालुक्याच्या पठार भागातील येठेवाडी येथील 58 वर्षीय व्यक्तीचा 10 ऑगस्टला आणि गुंजाळवाडी येथील 55 वर्षीय व्यक्तीचा 15 ऑगस्टला मृत्यू झाला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्वेक्षणात तालुक्यातील निमोण (गाडेकर मळा), निमगाव भोजापूर, निमगाव जाळी, कासारा दुमाला, कोकणगाव, गुंजाळवाडीसह शहरातील देवाचा मळा भागात स्वाईन फ्लूचे 13 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून ते बरेही झाले आहेत. येठेवाडी आणि गुजांळवाडी स्वाईन फ्लूने मृत्यू झाला असल्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला आहे. सद्यस्थितीत आश्वी खुर्द येथील एका रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

संगमनेर तालुक्यातील दोघांचा स्वाईन फ्लूसदृश आजाराने मृत्यू झाला आहे. तसा वैद्यकीय अहवालही प्राप्त झाला आहे. स्वाईन फ्लूच्या संसर्गावर प्रभावी ठरणार्‍या टॅमी फ्लूू गोळ्यांचा तालुक्यात मुबलक साठा उपलब्ध करण्यात असल्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
 -डॉ. सुरेश घोलप, तालुका आरोग्य अधिकारी संगमनेर पंचायत समिती.

The post नगर : स्वाईन फ्लूचा शिरकाव, आतापर्यंत तिघांचा बळी appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/WayxkGq
via IFTTT

नगर तालुक्यात एकाच रात्रीत 30 शेळ्यांची चोरी

वाळकी, पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यात गावागावात शेतकर्‍यांच्या पाळीव जनावरांच्या चोर्‍यांचे सत्र गेल्या दीड-दोन महिन्यांपासून थांबता थांबेना. सोमवारी (दि.22) मध्यरात्री ते मंगळवारी (दि.23) पहाटेच्या दरम्यान तालुक्यात दोन गावांमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घालत गोठ्यातून 30 शेळ्या चोरून नेल्या आहेत. यातील 27 शेळ्या कोल्हेवाडी, तर तीन शेळ्या सारोळा कासारमधून चोरी झाली आहे. शेतकर्‍यांच्या पाळीव जनावरांच्या वाढत्या चोर्‍या पाहता … The post नगर तालुक्यात एकाच रात्रीत 30 शेळ्यांची चोरी appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SX8KNx

महाराष्ट्र विधानसभा परिसर में शिंदे गुट और विपक्ष में भिड़ंत हुई नारेबाजी

महाराष्ट्र में सियासी उठापटक के बीच अब विधानसभा में भिड़ंत होने लगी है. बुधवार को ऐसा ही नजारा देखने को मिला, जब शिंदे और उद्धव गुट के विधायक आपस में भिड़ गए. https://ift.tt/xB2tePJ

नगर : अरणगाव बायपास चौकात वाहनचालकांची लूटमार

वाळकी, पुढारी वृत्तसेवा : एकाच रात्री दोन वाहन चालकांना शस्त्रांचा धाक दाखवून लुटमार केल्याची घटना रविवारी (दि.21) पहाटे नगर-दौंड रस्त्यावरील अरणगाव बायपास चौकात (ता. नगर) घडली. या प्रकरणी सहा जणांविरोधात नगर तालुका पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. वाहन चालक गणेश प्रकाश राठोड (रा. पंढरपूर, वाळुंज ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली आहे. … The post नगर : अरणगाव बायपास चौकात वाहनचालकांची लूटमार appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SX5f7S

नगर : नव्या सरकारकडून 200 वर कामे स्थगित : आमदार पवार

जामखेड, पुढारी वृतसेवा : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील 200 पेक्षा जास्त कामांवर शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती आणली आहे. ही कामे बजेटमध्ये घेऊन मंजूर केलेली असताना देखील सरकारने त्यांना स्थगिती देत आगळावेगळा निर्णय घेतला आहे. मी मंजूर केलेल्या कामांचे श्रेय त्यांनी घेऊ नये, असा टोला आमदार रोहित पवार यांनी विरोधकांना लगावला आहे. आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून जवळा … The post नगर : नव्या सरकारकडून 200 वर कामे स्थगित : आमदार पवार appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SX597P

नगर : निपाणी-वडगाव येथे जबरी चोरीची घटना

https://ift.tt/cOPAjN9

श्रीरामपूर, पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथे दाम्प्त्यास मारहाण करून चोरी केल्याची घटना घडली. या ठिकाणी पोलिसांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

निपाणी फाटा येथे वास्तव्यास असणारे कनगरे यांच्या राहत्या घरी चोरट्यांनी रात्री सव्वादोन ते पावणेतीन दरम्यान कटवणीच्या साह्याने दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी कनगरे पती-पत्नी झोपलेले असताना चोरट्यांनी दोघांना दमबाजी करीत जीवे मारण्याची धमकी दिली, तसेच महिलेच्या गळ्यातील तसेच कानातील सोने ओरबाडून नेले. गळ्यातील सोने तुटत नसल्याने चोरट्याने दाताने तोडून घेतले.

यावेळी शेजारच्या खोलीमध्ये झोपलेले मुलगा व सूनबाई जागे झाले. याप्रसंगी घटनेचे गांभीर्य ओळखत दोघांनीही आरडा-ओरड करत पोलिस पाटलांना घटनेची माहिती दिली. पोलिस पाटील संजय गायधने यांनी मोबाईलवरून ग्राम सुरक्षायंत्रणा यांना घटनेची माहिती दिली. यावरून जवळजवळ दोन ते अडीच हजार नागरिकांना तत्काळ मेसेज गेला. या घटनेची परिस्थिती पाहता नागरिकांनी श्रीरामपूर शहर पोलिस ठाणे या ठिकाणी माहिती दिली. यावरून पोलिस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन बोरसे, पोलिस हवालदार संतोष परदेशी, रघुनाथ खेडकर, पोलिस नाईक किरण पवार, अमोल जाधव यांनी घटनास्थळी भेट देत घटनेची पाहणी करीत वरिष्ठ अधिकार्‍यांना माहिती दिली.

पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मच्छिंद्र खाडे, तसेच अहमदनगर येथील क्राईम ब्रँच पथकातील मेघराज कोल्हे, जालिंदर माने, शिवाजी ढाकणे, चालक संभाजी कोतकर यांनी घटनेची श्वान पथकाद्वारे पाहणी करून तपास केला. यावेळी परिसरातील संशयित वस्तूवरील हाताचे ठसे घेतले. पोलिस प्रशासनाने तत्काळ संपर्क करून ग्राम सुरक्षा यंत्रणा सज्ज असल्याचे यावेळी नागरिकांमधून समाधानाचे बोल ऐकू आले आहे.

The post नगर : निपाणी-वडगाव येथे जबरी चोरीची घटना appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/U7Q65YC
via IFTTT

नगर : घरामध्ये गळफास घेऊन दोघांनी केल्या आत्महत्या

https://ift.tt/la2m6kx

नगर तालुका / वाळकी,  पुढारी वृत्तसेवा : राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. यातील एक घटना नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे, तर दुसरी घटना नगर शहरातील बोरूडे मळ्यात घडली आहे. पहिल्या घटनेत अवघ्या चौदा वर्षे वय असलेल्या शाळकरी मुलाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तेजस बाळासाहेब कोकाटे (रा.चिचोंडी पाटील, ता.नगर) असे मृत मुलाचे नाव आहे. चिचोंडी पाटील गावात ही घटना घडली.

तेजस याने रविवारी (दि. 21) राहत्या घरात सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गळफास घेतला. तेजसने गळफास घेतल्याची माहिती त्याच्या कुटुंबियाला मिळताच त्यांनी त्याला उपचारासाठी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. दरम्यान, तेजसने आत्महत्या का केली, याबाबत माहिती समजू शकली नाही.
याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तेजसच्या आत्महत्येबाबत अधिक तपास नगर तालुका पोलिस करीत आहेत.

तरुणाची आत्महत्त्या

भाड्याने राहत असलेल्या घरामध्ये गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली. रामदास रभाजी मुखेकर (वय 30 मूळ रा. कोरडगाव, ता. पाथर्डी) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
येथील बालिकाश्रम रस्त्यावरील बोरूडे मळा येथे शनिवारी (दि.20) रात्री 10 वाजता ही घटना घडली. रामदास रभाजी मुखेकर हे बालिकाश्रम रस्त्यावरील बोरूडे मळा येथे आकांत लक्ष्मीकांत बोरूडे यांच्या घरामध्ये भाड्याने राहत होते. रामदास मुखेकर यांनी शनिवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली.

घरमालक आकांत बोरूडे यांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. घोगरे यांनी तपासणी केली असता ते उपचारापूर्वीच मयत झालेले होते. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दोन्ही घटनांमध्ये त्यांच्या आत्महत्येमागील कारण समजले नाही. पोलिस नाईक संतोष गर्जे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

The post नगर : घरामध्ये गळफास घेऊन दोघांनी केल्या आत्महत्या appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/NuAPhDO
via IFTTT

क्या शिवसेना की लड़ाई में उद्धव पड़ेंगे शिंदे पर भारी ?

शिवसेना पर किसका अधिकार है? ये सवाल अभी भी जिंदा है। इसके अलावा 16 बागी विधायकों की अयोग्यता का मामला भी अभी चल रहा है। बता दें कि इससे पहले महाराष्ट्र के सीएम एकनाथ शिंदे ने कहा था कि हमारे ऊपर अयोग्यता का आरोप गलत है। https://ift.tt/v5Pd1LI

बेलवंडी पोलिसांकडून पळाला अन् श्रीगोंदा पोलिसांच्या लागला गळाला!

https://ift.tt/9BmxNFq

श्रीगोंदा; पुढारी वृत्तसेवा: बेलवंडी पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेला आरोपी श्रीगोंदा पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतला आहे. गेल्या दीड वर्षांपासून तो फरार होता. संदेश उर्फ दौल्या संजय भोसले (वय 24, रा.कोळगाव, ता. श्रीगोंदा) असे आरोपीचे नाव आहे. दरोडा, घरफोडी करणारा सराईत आरोपी संदेश उर्फ दौल्या संजय भोसले हा कोळगाव शिवारात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व पोलिस कर्मचारी यांना कोळगाव येथे कोम्बिंग ऑपरेशन करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार या पथकातील अधिकारी व कर्मचार्‍यांंनी पहाटेच्या दरम्यान कोम्बिंग ऑपरेशन राबवून संदेश उर्फ दौल्या संजय भोसले यास ताब्यात घेतले.

सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, तो दीड-दोन वर्षांपासून वेशांतर करून पोलिसांना चकवा देत होता. कोळगाव शिवारात त्याला चोरी करताना रंगेहाथ पकडून ग्रामस्थांनी बेलवंडी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. बेलवंडी पोलिस या आरोपीला घेऊन पोलिस ठाण्यात जात असताना, या आरोपीने चालत्या गाडीतून उडी घेत पलायन केले होते. तेव्हापासून तो फरार होता. त्याच्याविरुद्ध सुपा, बेलवंडी, श्रीगोंदा, चांदवड (नाशिक) पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

The post बेलवंडी पोलिसांकडून पळाला अन् श्रीगोंदा पोलिसांच्या लागला गळाला! appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/wIRrTns
via IFTTT