अन् औरंगाबाद शहरातील सर्वच पेट्रोल पंप तासाभरासाठी बंद; वाहन धारकांच्या रांगाच रांगा

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील सर्वच पेट्रोल पंप गुरुवारी सकाळी १२ वाजेच्या दरम्यान अचानक बंद झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली. तर पेट्रोल टाकण्यासाठी आलेल्या वाहनधारकांची रस्त्यावर लांबच रांगा लागल्याचे चित्र अनेक पेट्रोल पंपावर पाहायला मिळाले. कारवाईसाठी आलेल्या महानगरपालिका पथक आणि पेट्रोल पंप चालकात झालेल्या वादानंतर पेट्रोल पंप असोसिएशनने काही काळ पेट्रोल पंप बंद केल्याने हा सर्व गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे. झालं असे की, गुरुवारी साडेअकराच्या दरम्यान क्रांती चौकात असलेल्या पेट्रोल पंपावर महानगरपालिकेचे पथक कारवाईसाठी गेले होते. यावेळी पंपावरील सर्व कर्मचाऱ्यांची लसीकरणाची प्रमाणपत्रे मागितले असता, पंप चालकाने सर्व कर्मचाऱ्यांचे प्रमाणपत्र दाखवले. याचवेळी एक कर्मचारी कार्यालयात येताना विना मास्क आल्याचा आरोप करत पथकाने पाच हजाराचे दंड भरावा लागणार असल्याचे सांगितले. यावरून पंप चालक आणि पथकात वाद झाला. वाद सुरू असतानाच तुम्हाला पंप बंद करायचा का? असा प्रश्न पपं चालकाने विचारला. यावर तुम्हाला काय करायचं करा? असं उत्तर पथकातील कर्मचाऱ्यांनी दिल्याने,पंप चालकाने पेट्रोल विक्री बंद करण्याचे जाहीर केले. त्यानंतर काही वेळातच शहरातील अनेक पेट्रोल पंप सुद्धा बंद करण्यात आले. त्यामुळे जवळपास तासभर शहरातील पेट्रोल पंप बंद होती. वाहनधारकांचा संताप पाहताच.... पेट्रोल पंप चालक आणि महापालिका पथकात झालेल्या वादानंतर शहरातील अनेक पेट्रोल पंप बंद करण्यात आले. त्यामुळे पेट्रोलसाठी आलेल्या वाहनधारकांची मोठी रांग रस्त्यांवर पाहायला मिळाली. तासभर चाललेल्या गोंधळानंतर अखेर वाहनधारकांनी आक्रमक पवित्रा घेताच महापालिका पथकाने पेट्रोल पंपावरून काढता पाय घेतला, तर लोकांचा रोष पाहता पंप चालकांनी सुद्धा पुन्हा पेट्रोल पंप चालू केले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

लाल परीची चाकं अखेर फिरली, एका दिवसांत तब्बल ८ हजार प्रवाशांनी केला प्रवास

औरंगाबाद : गेल्या एक महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप सुरू आहे. पण संपात पडलेल्या फुटीमुळे अनेक कर्मचारी कामावर हजर राहत असल्याने पुन्हा एकदा लाल परीचे चाक फिरताना पाहायला मिळत आहे. एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी ९७ बसने तब्बल ८ हजार प्रवाशांनी प्रवास केला. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात औरंगाबाद जिल्हा आघाडीवर होता. पण महिना उलटूनही हाती काहीच पडत नसल्याने आणि संपात पडत असलेल्या फुटीमुळे अनेक वाहक- चालक कामावर हजर होत आहेत. त्यामुळेच गेल्या दोन दिवसात प्रवाशांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. गुरुवारी औरंगाबाद जिल्ह्यात एकूण ९७ बसने ३१३ फेऱ्या मारल्या, ज्यात ८ हजार ११० प्रवाशांनी प्रवास केला. कर्मचाऱ्यांना दंडाची नोटीस... संपातील एसटी कर्मचाऱ्यांवर अनेक दबाव आणून त्यांना कामावर हजर राहण्यासाठी एसटी महामंडळाचकडून प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत असताना, आता संपामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याची नोटीस कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे. औरंगाबाद येथील उल्हास चव्हाण यांना लाख रुपायांची नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पुढील सुनावणी ५ जानेवारीला मुंबई हायकोर्टात झालेल्या २२ डिसेंबर रोजीच्या सुनावणीत कोणताही निर्णय न झाल्याने,पुढील सुनावणी ५ जानेवारीला होणार असल्याचं कोर्टाने सांगितले होते. त्यामुळे ५ जानेवारीला तरी काही तोडगा निघेल अशी अपेक्षा एसटी कर्मचाऱ्यांना आहे. त्यामुळे ५ जानेवारीला हायकोर्ट काय निकाल देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

गारपीटीनंतर मराठवाडा गारठला, दिवसभर बोचऱ्या थंडीने नागरिक त्रस्त

हिंगोली : दोन दिवसापूर्वी झालेल्या गारपिटीमुळे मराठवाडा चांगलाच गारठला आहे. थंडीचा पारा घसरला असून बोचऱ्या थंडीचे वारे दिवसभर वाहू लागल्याने नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. आठवडाभरापासून सातत्याने वातावरणात सतत होणारे बदल अनुभवायला मिळत आहेत. कधी ढगाळ वातावरण, कधी, ऊन व पाउस असे वातावरण तयार होत आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या गारपिटीमुळे काही जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. दिवसभर थंड वारे वाहू लागल्यामुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी दिवसभर नागरिक उबदार कपड्यांचा वापर करत आहेत. सायंकाळ आणि सकाळी गावागावात शेकोटी सुद्धा पेटू लागले आहेत. सध्या वाढलेली थंडी ही रब्बीच्या पिकासाठी फायदेशीर ठरत आहे. दुसरीकडे या थंडीचा परिणाम मात्र नागरिकांच्या आरोग्यावर सुद्धा होऊ लागला आहे. थंडी ही बोचरी असल्यामुळे लहान बालके व वृद्धांना सर्दी खोकल्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वाढत्या थंडीमुळे सध्या रस्त्यावर उबदार कपडेसुद्धा विक्रीसाठी दाखल झालेत. खरेदीसाठी नागरिकांची दिवसभर असल्याचे बघायला मिळते. परिणामी दुग्ध व्यवसायावर सुद्धा या थंडीचा परिणाम जाणवतो आहे. जनावरांचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी धडपड करावी लागत आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

आधी मेकअपचं सामान बनवणारी LG आता जगातली टॉपची इलेक्ट्रॉनिक कंपनी कशी बनली?

आज जगभरात ब्रँडचाचं बोलबाला आहे. म्हणजे कुठली वस्तू घ्यायची झाली तर आपण फेमस ब्रँडकडेचं वळतो. कारण क्वालिटी बरोबर इतक्या वर्षांचा विश्वास कंपनीने मिळवलेला असतो. यातलचं एक नाव म्हणजे एलजी. ज्यांची प्रोडक्ट आज आपल्याला प्रत्येकाच्या घरात हमखास पहायला मिळतील.

कारण एखाद्याला टीव्ही घ्यायचे असो, वॉशिंग मशीन किंवा  कुठलही इलेक्ट्रोनिक प्रोडक्ट घ्यायचं असेल तर आपण ते एलजीचीचं निवड करतो. कारण स्पष्ट आहे इतक्या वर्षांन

जगातल्या सर्वाधिक विस्तारलेल्या कंपनीत एलजीचं नावं आघाडीवर घेतलं जात. तशी कंपनी सगळ्याचं क्षेत्रात उतरलीये, पण खास करून फेमस आहे ती आपल्या इलेक्ट्रॉनिक प्रोडक्टसाठी. पण फार कमी लोकांना माहीत असेल की, जेव्हा कंपनीची सुरुवात झाली तेव्हा ती इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट नाही तर आपल्या डेली यूजच्या वस्तू साबण, कॉस्मेटिक्स, क्रीमचं मॅन्युफॅक्चरिंग करायचीइनावानं 1947 साली ही कंपनी सुरू झाली. जसं आपण आधीच पाहिलं कंपनी डेली यूजची उत्पादन तयार करायची. प्रोडक्टची क्वालिटी एकदम भारी असायची त्यामुळं कोरियतल्या लोकल बाजारात कंपनीमे आपला जम बसवला.

पुढे कंपनीने प्लॅस्टिक म्यॅन्यूफॅक्चरींग कंपनी सुद्धा सुरू केली. जी साऊथ कोरिया मधली पहिली प्लास्टिक कंपनी होती. लॅक हूईचे प्रॉडक्ट इतके फेमस होते की, लोक त्यांना लकी प्रोडक्ट म्हणायला लागले.

पुढे 1958 मध्ये लॅक हूई कंपनीने गोल्ड स्टार नावाने कंपनी स्थापन केली. आणि अशाप्रकारे लॅक हूई आणि गोल्ड स्टार या नावांच्या कॉम्बिनेशनने एलजी नावानं कंपनी बाजारात उतरली. आणि कंपनीची टॅगलाइन ‘Life’s Good’ अशी ठेवण्यात आली.

या एलजी कंपनीचं पहिलं प्रोडक्ट होतं, रेडिओ जे काहीचं मोठं हिट झालं. त्यानंतर कंपनी उत्तर कोरीयातून बाहेर पडून इंटरनॅशनल ब्रँड बनण्याच्या दिशेनं वाटचाल करायला लागली.

त्यानंतर कंपनीने जगातला पहिला सीडीएमएम मोबाईल हेडसेट लाँच केला, जो कंपनीसाठी एक मास्टरपीस ठरला. त्याच्या 3 वर्षातचं जगातला पहिला प्लाझ्मा टिव्ही बाजारात आणला. जो जवळपास 60 इंचाचा होता. याच साखळीतं कंपनीने अल्ट्रा एचडी टिव्ही सुद्धा बनवला, जो जगातला सगळ्यात मोठा टीव्ही होता.

2013 पर्यंत एलजी सेकंड लार्जेस्ट टिव्ही मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बनली होती. जी जवळपास 30 पेक्षा जास्त कंपन्या चालवते. यात केमिकल इंडस्ट्रीज, होम अप्लायन्सेस, टेक्स्टाईल्स, कॉस्मेटिक प्रोडक्ट, मेडिकल, पाईप, आणि कोको कोला, पेप्सिको अशा कितीतरी उपकंपन्या आहेत. ज्या जवळपास 80 देशांमध्ये पसरल्यात. आणि जवळपास 220,000 पेक्षा जास्त कर्मचारी कंपनीसोबत जोडले गेलेत.

हे ही वाचा भिडू:

 

The post आधी मेकअपचं सामान बनवणारी LG आता जगातली टॉपची इलेक्ट्रॉनिक कंपनी कशी बनली? appeared first on BolBhidu.com.Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

चिंताजनक! मुंबईनंतर 'या' जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या वाढतेय, २ दिवसांची धक्कादायक आकडेवारी समोर

औरंगाबाद : महाराष्ट्राच्या राजधानीत करोनाचा आलेख चालला असताना, आता मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादमध्येदेखील करोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांची आकडेवारी औरंगाबादकरांच्या चिंतेत भर पाडणारी आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी (गुरुवारी ) १६ नव्या करोना रुग्णाची वाढ झाली आहे. ज्यात मनपा हद्दीतील १४ रुग्ण असून ग्रामीण भागातील २ रुग्ण आहेत. विशेष म्हणजे एक दिवसांपूर्वी सुद्धा ( बुधवारी ) जिल्ह्यात १६ रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे गेल्या दोन दिवसांची आकडेवारी पाहता औरंगाबादमध्ये करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, या सगळ्यावर घाबरून न जाता आपल्या आरोग्या काळजी घ्या, करोनाच्या नियमांचं पालन करा आणि सुरक्षित राहा. थर्टी फर्स्टचा जल्लोष घरीच! करोनाची परिस्थिती पाहता नागरिकांनी थर्टीफर्स्टचा जल्लोष घरीच साजरा करावा असे आवाहन प्रशासनाकडून देण्यात आला आहे. तर रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी असल्याने पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यावर बंदी राहणार आहे. तर थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर शहरात ३ पोलीस उपायुक्त, ५ सहायक पोलीस आयुक्त, १२ पोलीस निरीक्षक, ६० उपनिरीक्षक, ९०० पोलीस असा बंदोबस्त राहणार असून ३९ ठिकाणी नाकेबंदी केली जाणार आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

मुंबईच्या दंगलीत स्वतः विरोधी पक्षनेता हिंसाचार थांबवण्यासाठी रस्त्यावर उतरला…

६ डिसेंबर १९९२. भारताच्या इतिहासातला महत्त्वाचा दिवस. अयोध्येमध्ये वादग्रस्त बाबरी मस्जिद पाडली गेली आणि सगळ्या देशातलं वातावरण ढवळून निघालं. देशभरात उसळलेल्या दंगलीचा सगळ्यात मोठा फटका कुठल्या शहराला बसला असेल, तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईला. वेगवेगळ्या जाती धर्माची, भाषांची, संस्कृतीची माणसं एकत्र राहतात त्या मुंबई शहराच्या शांततेला या दंगलीमुळं तडा गेला.

डोंगरी आणि राधाबाई चाळ या भागांमध्ये झालेल्या हिंसाचारामुळं वातावरण आणखी तापलं. हिंसाचार करण्यासाठी अंडरवर्ल्डला फंडिंग होत असल्याची चर्चा होऊ लागली, त्यातच या हिंसाचाराचं समर्थन करण्याचं धाडस दाखवलं ते एका राजकीय पक्षानं, तो म्हणजे शिवसेना.

शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामना या वृत्तपत्रातून जहाल लेख प्रसिद्ध होऊ लागले. हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मियांची लोकं या दंगलीत होरपळत होती. कित्येक लोकांनी मुंबई सोडायचा निर्णय घेतला. कित्येकांना आपल्या घरी पोहोचण्यासाठीही कसरत करावी लागली. अनेकांनी नातेवाईकांकडे, अनोळखी लोकांकडे आसरा घेत आपला जीव वाचवला. परिस्थिती हाताबाहेर चालली होती.

मुंबईतली निष्पाप जनता भीतीच्या सावटाखाली वावरत होती.

त्यावेळी राज्यात काँग्रेसचं सरकार होतं. सुधाकरराव नाईक हे राज्याचे मुख्यमंत्री होते. तर विरोधी पक्षनेते होते गोपीनाथ मुंडे. दंगलीत अडकलेल्या लोकांची सुरक्षित जागी पोहोचण्यासाठी धावपळ आणि प्रयत्न सुरू होते. काही लोक अडकले होते, मुंबईच्या गोल देऊळ भागात.

गोल देऊळ हे मुंबईच्या मुस्लिमबहुल भागात आहे. तिथं काही हिंदू धर्मीय लोक अडकले होते. त्यातच अशी अफवा उठली की, बाबरीचा बदला म्हणून मुस्लिम लोक गोल देऊळ पाडणार आहेत. तिथं अडकलेल्या लोकांनी सुटकेचा मार्ग म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना फोन लावला.

गोल देऊळ परिसरातलं वातावरण इतकं तंग होतं की, सामान्य कार्यकर्तेच नाही, तर पोलिसांनाही इथं प्रवेश करणं अवघड झालं होतं. अडकलेल्या माणसांच्या सुटकेसाठी काहीतरी करणं गरजेचं होतं. अशावेळी बाळासाहेबांना एक गोष्ट आठवली. ती म्हणजे… इतक्या कठीण प्रसंगात गोल देऊळ प्रसंगात एकाच पद्धतीनं प्रवेश करता येऊ शकणार होता. ते म्हणजे लाल दिव्याची गाडी.

आता लाल दिव्याची गाडी सरकारमधल्या नेत्याकडे असणार.पण बाळासाहेब पडले विरोधी पक्षात. त्यांननी एक शक्कल लढवली, त्यांनी तत्काळ विरोधी पक्षनेते गोपीनाथ मुंडे यांना फोन लावला आणि त्यांना सांगितलं, ‘तुम्ही गोल देऊळ भागात जा आणि तिथं अडकलेल्या माणसांना सुखरूपपणे सोडवा.’

मुंडे विरोधी पक्षनेते असले, तरी अशा कठीण प्रसंगात बाहेर पडणं आणि गोल देऊळ परिसरात जाणं जोखमीचं होतं. मात्र मुंडे यांनी जोखीम पत्करली आणि ते दंगलग्रस्त भागात गेले, तिथल्या लोकांना सुखरूपपणे सोडवलंही. 

भर दंगलीत लोकांच्या सुटकेसाठी राज्याचा विरोधी पक्षनेता रस्त्यावर उतरला होता.

पुढे मुंबईत कर्फ्यू लावण्यात आला, तेव्हा शिवसेनेनं गोल देवळात महाआरती करण्यासाठी कर्फ्यू शिथिल करण्यात यावा अशी मागणी केली होती. सरकारकडून ती मागणी मान्य झाली आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता ही महाआरती पार पडली.

आजही दंगलीच्या अनेक कटू आठवणी लोकांच्या स्मरणात आहेत आणि सोबतच गोपीनाथ मुंडे यांनी दाखवलेलं धाडसही.

हे ही वाच भिडू:

The post मुंबईच्या दंगलीत स्वतः विरोधी पक्षनेता हिंसाचार थांबवण्यासाठी रस्त्यावर उतरला… appeared first on BolBhidu.com.Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

New Year Guidelines : नागरिकांनो, नववर्षाचे स्वागत घरीच करा; पालिकेचे नियम वाचलेत का?

औरंगाबाद : ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेऊन औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने ३१ डिसेंबर रोजी नववर्षाचे स्वागत साधेपणाने घरीच साजरे करावे असे आवाहन केले आहे. नववर्षाचे स्वागत करण्याबाबत अपर जिल्हादंडाधिकारी शशिकांत हदगल यांनी गुरुवारी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. करोनाच्या अनुषंगाने थर्टी फस्ट व नववर्षाच्या स्वागतानिमित्ताने नागरिकांनी घराबाहेर पडून गर्दी करू नये; त्याचप्रमाणे नववर्षाचे स्वागत शक्यतोवर घरीच साधेपणाने साजरे करावे, असे आवाहन या मार्गदर्शन सूचनेद्वारे करण्यात आले आहे. रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली असून, या आदेशाचे पालन करावे. त्याचप्रमाणे ३१ डिसेंबर व नूतन वर्ष स्वागतासाठी आयोजित कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसनक्षमतेच्या ५० टक्के पर्यंत व खुल्या जागेत आयोजित कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या २५ टक्के मर्यादेत उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. या ठिकाणी गर्दी होणार नाही सुरक्षित अंतराचे पालन करण्यासह मास्क, सॅनिटायझरचा वापर यासह अन्य दक्षता घेणे आवश्यक राहणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर ६० वर्षांवरील नागरिक व दहा वर्षांखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने घराबाहेर जाणे टाळावे. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारच्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनावर मनाई करण्यात आली आहे. मिरवणूक काढू नये; तसेच फटाक्यांची आतषबाजी करण्यात येऊ नये, ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करावे, असेही या मार्गदर्शक सूचनेत नमूद करण्यात आले आहे. . नागरिकांनो लक्षात ठेवा... - रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी. - फटाक्यांची आतषबाजी करण्यास मनाई - मिरवणूक काढण्यास बंदी - नववर्षाच्या स्वागतासाठी कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई. - करोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

ठाकरे सरकारची चिंता वाढली! महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनाही करोनाची लागण

अहमदनगर: राज्याचे महसूलमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते () यांना करोनाची लागण झाली आहे. ट्वीट करून त्यांनी गुरुवारी रात्री ही माहिती दिली. ओमिक्रॉन व्हेरिएंट राज्यात पसरू लागल्यानंतर करोना चाचणी पॉझिटिव्ह आलेले थोरात हे चौथे मंत्री ठरले आहेत. त्यामुळं ठाकरे सरकारची चिंता वाढली आहे. 'माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतीही लक्षणं नाहीत, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्यानं मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली करोना चाचणी करून घ्यावी. सर्वांनी मास्क वापरावा व आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून केलं आहे. नगर जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील व उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा करोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. तनुपरे यांना तर दुसऱ्यांदा करोनाची लागण झाली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड व आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांचे अहवालही करोना पॉझिटिव्ह आले आहेत. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनाला त्यांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळं चिंता वाढली आहे. वाचा: ओमिक्रॉन व्हेरिएंटचा (Omicron Variant) धोका टाळण्यासाठी राज्य सरकारनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी लोकांनी गर्दी करू नये व करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्यभरात काही प्रमाणात निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रकृतीच्या तक्रारी असल्यास प्रत्येकानं आपली करोना चाचणी करून घ्यावी असं आवाहन केलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर चाचण्यांचं प्रमाण वाढलं असून रुग्णांचं प्रमाणही वाढत आहे. वाचा: करोनाच्या दुसऱ्या व तिसऱ्या लाटेत अनेक राजकीय नेते व लोकप्रतिनिधींना करोनाची लागण झाली होती. त्यापैकी बहुतेकांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली होती. आता पुन्हा एकदा करोनाचा संसर्ग वाढू लागल्यानं काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.


from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

आधुनिक भारतात कुस्ती आणि व्यायाम क्षेत्रात क्रांती करण्याचं श्रेय एका मराठी माणसाला जातं

भारताने जगाला योगाचं, व्यायामाचं महत्व दाखवून दिलं आणि सुदृढ शरीर हाच खरा दागिना हेही जगाला पटलं. भारतात व्यायाम काय लेव्हलचा चालतो यात काय बोलायलाच नको. खेडोपाड्यात असणाऱ्या लाल मातीच्या तालमी आणि रंगणारे कुस्तीचे डाव, जोर ,बैठका, सपाट्या आणि खुराक यातच आपलं वैभव दिसून येतं. पण भारतात कुस्ती आणि व्यायाम क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली ती म्हणजे एका मराठी माणसाने. अनेक लोकांना प्रश्न पडतो की कुस्ती अचानक इतक्या वर कस काय आली तर त्याचं श्रेय जातं एका मराठी माणसाला. जाणून घेऊया या कुस्तीच्या भीष्माचार्य बद्दल.

माणिक राव यांना आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक व मल्ल. पूर्ण नाव गजानन यशवंत माणिक (ताम्हणे). 31 डिसेंबर 1878 रोजी त्यांचा जन्म बडोदे येथे झाला. उस्ताद जुम्मादादा यांनी त्यांना मल्लविद्येचे धडे दिले. वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी ३,००० दंड, ५,००० बैठका व सात तास कुस्तीची मेहनत ते करीत असत. अस्थिसंधान, शस्त्रास्त्रविद्या व युनानी वैद्यक यांतही त्यांनी प्रावीण्य संपादन केले. गुरू जुम्मादादा यांनी आपल्या झोपडीवजा आखाड्याचे उत्तरदायित्व माणिकराव यांच्यावर सोपविले व माणिकराव यांनी आपल्या कर्तबगारीच्या बळावर त्या आखाड्यांचे रुपांतर ‘श्री जुम्मादादा व्यायाम मंदिरा’च्या (१९०४) भव्य वास्तूत केले.

माणिकराव यांनी त्याला शिवाजी मंदिर, उमा सभागृह, अस्थिसंधानालय, सरस्वती व्यासपीठ आणि जलतरण तलाव यांची जोड दिली. त्यांनी महाराष्ट्र व गुजरातमध्ये गावोगावी व्यायामशाळा स्थापन केल्या. लाठी, लेझीम, फरीगदगा, जोडी, लकडी, बनेटी इ. अनेक देशी खेळ व व्यायामप्रकार यांना विविध पवित्रे देऊन, त्यांचे शास्त्र निर्माण करून, त्यांना सांधिक व्यायामांचे स्वरुप प्राप्त करून दिले.

त्यांनी बडोदे येथे ‘कन्या आरोग्य मंदिरा’ ची स्थापना केली व मुलींना व्यायामशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. सैनिकी संचलने व कवायती यांच्यासाठी इंग्रजी आज्ञांऐवजी त्यांनी आज्ञाशब्द तयार केले. बडोद्यातील १९१८ सालच्या फ्ल्यूच्या साथीत व १९२७ च्या महापुराच्या वेळी त्यांनी भरीव समाजकार्य केले. तसेच स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी क्रांतिकारकांना व्यायाम मंदिरात गुप्त आश्रय दिला, त्यांना शस्त्रविद्येचे धडेही दिले. त्यांनी बडोद्यात सार्वजनिक गणेशोत्सव व शिवाजयंती उत्सव सुरू केले. त्यांच्या समाजकार्याच्या गौरवार्थ बडोदे सरकारकडून त्यांना ‘राजरत्न’ व ‘राजप्रिय’ या पदव्या बहाल करण्यात आल्या.

माणिकराव हे आजन्म ब्रह्मचारी होते.

भारतीय व्यायामविद्येचे ‘भीष्माचार्य’ म्हणूनही त्यांना गौरवाने संबोधण्यात येते.

त्यांच्या शिष्यशाखेत ‘कैवल्यधाम’ चे संस्थापक स्वामी कुवलयानंद, नाशीकच्या ‘यशवंत व्यायामशाळेचे संस्थापक कृ. ब. महाबळ, दादरच्या ‘श्री समर्थ व्यायाम मंदिर’ चे संस्थापक प्र. ल. लाळे आदींच्या अंतर्भाव होतो. बडोद्याच्या लक्ष्मीविलास राजवाड्यात त्यांनी भव्य शस्त्रसंग्रह उभारला व त्याचा परिचय करून देणारा प्रताप शस्त्रागार हा ग्रंथही लिहिला. भारतीय व्यायाम (१९४१) हे त्यांचे पुस्तकही प्रसिद्ध आहे.

25 मे 1954 रोजी बडोदे येथे त्यांचे निधन झाले. पण भारताला त्यांनी व्यायामाच्या सवयीची जी शिदोरी पुरवली ती अजूनही गावखेड्यात टिकून आहे आणि जोमाने जोपासली जात आहे. कुस्तीचे भीष्माचार्य म्हणून त्यांचं नाव अजूनही इतिहासात अजरामर आहे.

हे ही वाच भिडू :

The post आधुनिक भारतात कुस्ती आणि व्यायाम क्षेत्रात क्रांती करण्याचं श्रेय एका मराठी माणसाला जातं appeared first on BolBhidu.com.Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

मोदींच्या गाडीवर टीका करण्याआधी पंतप्रधानांच्या सुरक्षिततेचं महत्व जाणून घ्या…

pandit jawaharlala neharu

भारतीय पंतप्रधानांची सुरक्षा हा गंभीर विषय असतो. पंतप्रधानांवर हल्ले करण्याची आणि त्यात पंतप्रधानांचा जीव जाण्याची वेळ ही भारताच्या दोन पंतप्रधानांच्या कारकिर्दीत घडलेली आहे. इंदिरा गांधी आणि त्यानंतर राजीव गांधी ज्याप्रकारे हल्ल्यांना बळी पडले ते संपूर्ण भारत देश कधीच विसरू शकत नाही. 

फक्त गांधी कुटुंबीयच नाहीत तर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर सुद्धा बऱ्याचदा जीवघेणा हल्ले झाले होते. पण नेहरु त्यातून बचावले होते. या घटना खरंतर त्यांच्या धीरोदात्त स्वभावाची ओळख करून देतात.

माउंटबॅटन यांना नेहमी ही भीती असायची की नेहरू यांचा सुरक्षेविना फिरण्याचा आवेश एखाद्या दिवशी त्यांच्या मृत्यूचं कारण ना ठरो. यासाठी त्यांनी पंतप्रधान होण्याआधीच नेहरूंवर लक्ष ठेवण्यासाठी काही सैनिक तैनात केले होते. 

सुरक्षाव्यवस्थेबद्दल पंतप्रधान नेहरूंनी जेवढी आदळआपट केली, तेवढी आदळआपट जगातील दुसऱ्या कुठल्या राजकारण्याने केली नसावी. सबळ कारण असूनही त्यांच्याइतका निर्धास्तपणा दुसऱ्या कुणाला वाटला नसेल. अगदी कमीत कमी सुरक्षाव्यवस्था ठेवण्यासही ते सातत्याने नकार देत असत. बंद टपाच्या गाडीतून प्रवास करायला त्यांचा नकार असायचा, तशा प्रकारच्या गाडीला ते ‘पिंजरा’ म्हणायचे आणि उघड्या टपाच्या गाडीतून मिरवायचे. जमावात धावत जायचे, सुरक्षा व्यवस्था मुद्दाम धुडकावून लावायचे.

असंच नागपुरात मार्च १९५५ मध्ये विमानतळावरून नेहरूंचा एका उघड्या गाडीतून प्रवास सुरू होता. पंतप्रधान गाडीत पाठच्या सीटवर मधोमध बसले होते. त्यांच्या उजवीकडे मध्य प्रांताचे राज्यपाल आणि डावीकडे मध्य प्रांताचे मुख्यमंत्री होते. पुढल्या सीटवर नेहरूंचे मुख्य सुरक्षा अधिकारी केएफ रुस्तमजी बसले होते. आणि त्यांच्या बाजूला राज्यपालांचे लष्करी सचिव पी. आर. राजगोपाल बसले होते.

तुरुंगाच्या जवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लोकांचे छोटेछोटे जमाव गोळा झालेले होते. ते जयजयकार करीत होते. अचानक एक रिक्षा समोरच्या बाजूनं नेहरूंच्या गाडीच्या पुढ्यात आली. चालकानं कचकन ब्रेक मारला. त्यासरशी नेहरू गाडीत मागे उभे होते ते पुढे बसलेल्या लष्करी सचिवांच्या आणि रुस्तमजी यांच्या अंगावर फेकले गेले.

पुढल्याच क्षणी एक माणूस धावत आला आणि गाडीच्या फुटबोर्डावर चालकाच्या जवळ चढून उभा राहिला. नेहरूंनी त्याला विचारलं,

“क्या चाहते हो भाई?”

रिक्षा रस्त्यावर मध्येच आडवी आल्याचं पाहताच रुस्तमजी आणि लष्करी सचिव उभे राहिले. घुसखोर जेव्हा फुटबोर्डावर चढला तेव्हा राजगोपालांनी पाहिलं की त्याच्या हातात चाकू आहे.

चाकू पाहून त्यांनी चालकाच्या बाजून गाडीबाहेर उडी घेतली आणि ते त्याच्याशी झटापट करू लागले. त्याच क्षणी पोलीस सार्जंट टेरन्स क्वीन मोटर सायकलवरून तिथून चालले होते. त्यांनी मोटारसायकल त्या माणसावर घातली.

त्याशिवाय त्या रस्त्यावर ज्यांची ड्यूटी होती त्या इन्स्पेक्टर दुब्यांनाही राजगोपालाप्रमाणेच धरलं. त्या माणसावर ताबा मिळवण्यापूर्वी ते तिघंही एक मिनिट जमिनीवर लोळले असतील. मग राजगोपाल गाडीकडे वळले. दुसराही कुणी माणूस त्या कटात सामील असेल आणि लक्ष दुसरीकडे नेण्यासाठीच त्यानं पहिला प्रसंग घडवून आणला असेल तर असं वाटून रुस्तमजी पंतप्रधानांच्या संरक्षणासाठी त्यांच्या अगदी जवळच उभा राहिले.

गाडी पुढे जाऊ लागली तेव्हा जमाव आरडाओरडा करू लागला,

“मारो, मारो, मार दो साले को”

मग रुस्तमजी पंतप्रधानांच्या गाडीतून खाली उतरले आणि त्या हल्लेखोराला मागून येणाऱ्या एस्कॉर्ट कारमध्ये बसवण्याचा प्रयत्न करू लागले. पण इतका वेळ ढिम्म बसून राहिलेले त्यातले अधिकारी त्या माणसाला आत घ्यायला तयार होईनात. सरतेशेवटी डि. आय. जी. बी. एम. शुक्ल आणि रुस्तमजी दोघांनी मिळून त्याला एका काळ्या मारियात म्हणजे कैद्यांना न्यायच्या व्हॅनमध्ये टाकलं आणि त्यानंतरच ते पुन्हा सुरक्षाकोडाळ्यात सामील झाले.

व्हॅनमध्ये नेताना त्या हल्लेखोराकडे रुस्तमजींनी पाहिलं होतं. हिरवा शर्ट आणि तांबड्या रंगाची पँट घातलेला तो एक फाटका इसम होता. त्याचं कपाळ अरुंद होतं, डोळे खोल गेलेले आणि कावेबाज दिसत होते. त्याच्या वागण्यात उन्माद दिसत होता. “तुझा हेतू तरी काय होता असं करण्यात?” असं त्याला विचारलं तेव्हा तो असंबद्धपणे बडबडला,

“सरकार माझ्याविरुद्ध आहे. पोलीस मला सतावतात. लोक मला षंढ म्हणतात. रिक्षा चालवण्यामुळे माझी तब्येत खालावली, रसातळाला गेली.”

त्या घटनेनंतर गुप्तहेर खात्यानं नेहरूंच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी एक विस्तृत प्रस्ताव पाठवला. त्या प्रस्तावाला दिलेल्या दीड पानी टंकलिखित उत्तरात नेहरूंनी सुरक्षा व्यवस्थेच्या गैरवाजवी प्रदर्शनाला त्यांची हरकत असल्याचं स्पष्टपणे सांगितलं होत.

हे ही वाच भिडू 

The post मोदींच्या गाडीवर टीका करण्याआधी पंतप्रधानांच्या सुरक्षिततेचं महत्व जाणून घ्या… appeared first on BolBhidu.com.Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

एसटी कर्मचाऱ्यांना आणखी एक धक्का; २ महिन्यापासून पगार नाही अशात महामंडळाचा नवा घाट

औरंगाबाद : मुंबई एसटी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. अशातच संपकरी कर्मचाऱ्यांच्या भविष्यातील पगारातून महामंडळाचे नुकसान वसूल करण्याचा 'घाट' महामंडळाने घातला असून याबाबतचे आरोपपत्र संपकरी कर्मचाऱ्यांना देण्यास महामंडळाने सुरुवात केली आहे. आधीच सरकारने आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची कारवाई केली. त्यानंतर आता एसटी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक धक्का आहे. एसटी नुकसानाला कर्मचारी जबाबदार असल्याचा ठपका आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे. इमामवाडा आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी अनधिकृत नियमबाह्य कामबंद आंदोलन केले. ७ ते २६ डिसेंबरदरम्यान ३०६३ फेऱ्या आणि ३,९२,२२२ किमी रद्द होऊन महामंडळाचे १,५८,२६,४६९ रुपयांचे नुकसान झाले. आपण या आंदोलनात पुढाकार घेत अन्य कर्मचाऱ्यांना चिथावणी दिली. नुकसानीला आपण जबाबदार आहात, असा मजकूर वाहक ईश्वर बालपांडे यांना महामंडळाने दिलेल्या आरोपपत्रात नमूद करण्यात आला आहे. औरंगाबाद आगारातील वाहक उल्हास चव्हाण यांना मिळालेल्या आरोपपत्रात, 'आगाराचे ९ लाख रुपयांचे नुकसान झाले असून त्याला आपण जबाबदार आहात,' असे स्पष्ट करण्यात आले. एसटी महामंडळाचे कर्मचाऱ्यांकडून आर्थिक नुकसान झाल्यास त्यांच्या पगारातून नुकसानभरपाई वसूल केली जाते. संपकरी कर्मचाऱ्यांना आरोपपत्रावर आपली बाजू मांडण्यासाठी १५ दिवसांचा वेळ संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला आहे, असे महामंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

मुलाच्या अपघाती मृत्यूची बातमी आईला काळाली अन्…

विजयसिंह होलम । एलआयसी एजंट असलेल्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला. याची माहिती त्याच्या आईला कळाली. याचा धक्का सहन न झाल्याने आईला हृदयविकाराचा झटका आला. यातच तिचाही मृत्यू झाला. शेवटी दोघांचाही अंत्यविधी एकत्रच करण्याची वेळ आली. या घटनेमुळे नगर जिल्ह्यातील परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. राजेंद्र दत्तात्रेय गागरे आणि त्यांची आई सेवानिवृत्त मुख्याध्यापिका नलिनी दत्तात्रेय गागरे (आहेर वस्ती लोणी खुर्द) या दोघांचा काही तासांच्या अंतराने मृत्यू झाला. राजेंद्र गागरे एलआयसी एजंट म्हणून काम करीत. लोणीहून दुचाकीवरून घरी परतत असताना राहाता तालुक्यातील लोणी-कोल्हार रस्त्यावर त्यांना अपघात झाला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात पाठविला. तेथे शवविच्छेदनानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार होते. वाचा: दरम्यान, आपल्या मुलाच्या अपघाती मृत्यूची माहिती आईला कळली. यामुळे तिला धक्का बसला. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांनाही ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांना वाचविण्यात यश आले नाही. त्यांचाही काही वेळातच मृत्यू झाला. इकडे मुलावरील अंत्यसंस्कारही करायचे राहिले होते. आता आईचाही मृत्यू झाल्याने दोघांवर एकत्रच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रवरानगर येथील स्मशानभूमित त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गागरे एलआयसी एजंट तर त्यांच्या आई प्रवरानगरच्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका होत्या. दोघांचाही परिसरात मोठा जनसंपर्क होता. त्यामुळे अंत्यविधीला मोठी गर्दी झाली होती. वाचा:


from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विजेचा झगमगाट पहायला मिळतोय तो दामुअण्णा पोतदार यांच्यामुळे

आज पुणे हे राज्यातल्याचं नाही तर देशातल्या टॉमच्या शहरांमध्ये गणलं  जात. इथले उद्योग धंदे, शिक्षण क्षेत्रातील पुण्याचा वाटा अशा सगळ्याचं गोष्टींमुळे पुणे आज विकसित शहरांकडे प्रचंड वेगाने  वाटचाल करतयं.

पण कोणत्याही शहराला त्याच्या विकासासाठी मुलभूत सुविधांवर भर देणं आवश्यक असतं. या मुलभूत सुविधा म्हणजे रस्ते, पाणी आणि वीज. तेव्हा कुठं जाऊन शहरं झगमगात. आणि पुण्याच्या याचं झगमगाटीत महत्त्वाचा वाटा आहे तो दामूअण्णा पोतदार यांचा.

आता बर्‍याच  जणांसाठी दामूअण्णा पोतदार हे नाव नवीन असेल. पण  मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या लोकांमध्ये या नावाची चर्चा आजही आहे. 

पण भिडू तूमच्या माहितीसाठी  पुण्याच्या विद्यूतीकरणात दामूअण्णा यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली. 

१९३४ साली चेंबरच्या सुरुवातीच्या काळातच संस्थापन वर्षातच ते चेंबरमध्ये आले. चेंबरच्या तीन संस्थापकांपैकी ते एक होते. चेंबरच्या प्रत्येक सभेत ते हजर असायचे.

अडचणीच्या वेळी सभा घ्यावी ती दामुअण्णांनीच! एखादा कटु निर्णय असला की दामुअण्णा त्याचे व्यवस्थित प्रतिपादन करून लोकांना ते पटवून देत  आणि असे निर्णय घेण्यास सर्वांना प्रवृत्त करीत. प्रसंगीं संस्थेच्या दृष्टीने एखादा निर्णय घेणे आवश्यक असले तर त्याची सर्व कटुता आपल्या अंगावर घेऊन असा निर्णय करीत.

त्यामुळेच दामू अण्णांची 1946 आली चेंबरच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली तेव्हापासून 1967 झाली म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत ते मंडळाचे कार्याध्यक्ष होते चेंबरच्या कार्याच्या वाढीचा त्यांनी अनेक प्रकारे हातभार लावला.

१९३५ साली ते बी.ई. इलेक्ट्रिकल ही परीक्षा उत्तीर्ण झाले आणि इलेक्ट्रिकल काँट्रॅक्टरच्या व्यवसायात पडले. त्यात त्यांनी पैसाही चांगला मिळविला. पण बी.ई. मेकॅनिकल असल्यामुळं त्यांना इंजिनिअरिंगचा एखादा व्यवसाय करण्याची इच्छा होती आणि त्यांनी त्यासाठी महाराष्ट्र इंजिनिअरिंग वर्क्स लिमीटेड या नावाची कंपनीही प्रवर्तित केली होती.

परंतु जेव्हा त्यांना आढळून आले की, इलेक्ट्रिकल कॉंट्रॅक्टरचा व्यवसाय संभाळून त्याच्या जोडीला नव्या विटीदांडूने खेळ यशस्वी रीतीने खेळता येणार नाही, त्या वेळी खोट्या इभ्रतीला बळी न पडता त्यांनी ती पुढे न चालवण्याचे ठरवून, ज्यांनी शेअर घेतले होते त्यांची पो शेअरपोटी भरलेली सगळी रक्कम परत करण्याची व्यवस्था केली. जे जमेल तेच करायचे, भलता आवाका घालावयाचा नाही असे त्यांचे धोरण असल्याने ते व्यवसायात यशस्वी झाले.

विद्युत्स्थापत्यामध्ये त्यांचा हात धरणारा कोणी नव्हता. अनेक बारीकसारीक तपशिलाचा विचार करून ते डिझाइन तयार करायचे. १९६० च्या सुमारास पूना इलेक्ट्रिक सप्लाय कंपनीच्या गणेशखिंड सबस्टेशनमध्ये स्फोट होऊन पुण्याच्या वीजपुरवठ्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या.

त्याच वेळी नवीन कारखाने पुण्यात येऊ घातले होते आणि सर्वांच्या पुढे वीजपुरवठ्याचा मोठा प्रश्न होता. त्या वेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण त्यावेळी चेंबरमध्ये आले होते. या वीजपुरवठ्याबद्दल त्यांच्या समोर दामुअण्णांनी कारखानदारांची बाजू फार चांगली मांडली. तांत्रिक अडचणी आणि त्यातून मार्ग कसा काढता येईल हे सांगितले, सरकारला अनेक सूचना केल्या.

सभा संपल्यावर यशवंतरावांनी दामुअण्णांना बाजूला घेऊन विचारले,

‘तुम्ही नुसती सरकारवर टीका करणार का काही जबाबदारी घेणार! हे राज्य आता आपल्या सर्वांचे आहे.”

त्यांनी दामुअण्णांची महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळावर तांत्रिक सदस्य म्हणून नेमणूक केली. दामुअण्णांच्या विद्युतस्थापत्य विषयक ज्ञानाचा तो राजगौरव होता. दामुअण्णांची वीज मंडळातील कारकीर्द फार गाजली. सर्व महाराष्ट्रभर फिरून त्यांनी वीजनिर्मिती व वीजपुरवठा ह्याचे उत्तम नियोजन केले आणि त्याची अंमलबजावणी केली. त्यावेळी त्यांनी राज्यात सगळीकडे दौरा केला.

The post महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विजेचा झगमगाट पहायला मिळतोय तो दामुअण्णा पोतदार यांच्यामुळे appeared first on BolBhidu.com.Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

लॉकडाऊननंतर रिअल इस्टेट क्षेत्राची बक्कळ कमाई, तिजोरीत भरघोस महसूल जमा

औरंगाबाद : करोनाचे संकटामुळे जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार काहीसे थंडावले होते. रिअल इस्टेट क्षेत्रावरही त्याचा परिणाम झाला होता, परंतु गेल्या काही महिन्यात रिअल इस्टेट क्षेत्र पूर्वपदावर येत असून नोंदणी व मुद्रांक विभागात ऑक्टोबरअखेर तब्बल ८९ हजार ९५ दस्त नोंदणी झाली आहे. यातून ३८१ कोटींचा महसूल शासन तिजोरीत जमा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. येथील नोंदणी उप महानिरीक्षक व मुद्रांक उप नियंत्रक विभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्याचा समावेश आहे. विभागाला यंदा ८४० कोटींच्या महसूलवसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यात औरंगाबादला ४४० कोटी रुपये, जालन्याला २५० कोटी रुपये तर, बीड जिल्हा कार्यालयास १५० कोटी रुपये महसूल संकलनाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यात ऑक्टोबरअखेर औरंगाबाद जिल्ह्यातून २३८ कोटी रुपये, जालन्यातून ६५ कोटी रुपये तसेच बीड जिल्ह्यातून ७७ कोटींवर असा एकूण ३८१ कोटी रुपयांचा महसूल विभागाला प्राप्त झाला आहे. महसूल उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विभागाकडे अद्याप चार महिन्यांचा कालावधी शिल्लक असून त्यात चांगली वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तर जालना जिल्ह्यात देण्यात आलेले २५० कोटींचे उद्दिष्ट कमी करून ते ११० कोटी रुपये करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, एप्रिल ते ऑक्टोबरअखेरपर्यत विभागात एकूण ८९ हजार ९५ दस्त नोंदणी झाल्या आहेत. यात औरंगाबादेत ४१ हजार ५२४, जालना जिल्ह्यात २१ हजार ९०७, बीडमध्ये २५ हजार ६६४ दस्त नोंदणी झाल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. गेल्या वर्षभरात ६१२ कोटींचा महसूल एप्रिल २० ते मार्च २१ या वर्षात नोंदणी व मुद्रांकच्या औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात मिळून १ लाख ६० हजारांवर दस्तनोंदणी झाली. यातून ६१२ कोटी रुपयांचा महसूल शासन तिजोरीत जमा झाला होता.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

एलियन व परग्रहावरील जीवन शोधण्यासाठी नासाने धर्मशास्त्रज्ञांची मदत घ्यायचं ठरवलंय…

आमच्या एका पिढीला एलियन म्हणजे काय असतं हे माहिती नव्हतं, म्हणजे हा शब्दच आमच्या गावी नव्हता पण मग एक चमत्कार झाला आणि हृतिक रोशनचा सिनेमा आला कोई मिल गया मग काय एलियन हा काय विषय असतो यावर चर्चा झडू लागल्या. कोण म्हणायचं जादूने जशी रोहितला जादू दिली तशी आपल्याला मिळायला पाहिजे मग त्यासाठी एलियनची तबकडी खाली उतरायला पाहिजे असं म्हणून निम्मं बालपण तर आकाशात रॉकेटचा धूर पाहण्यातच गेलं तर असो पण आपल्या या लहानपणच्या स्वप्नाला खरं करण्याचा डाव आजमावतय नासा.

याआधीही नासाने परग्रहावर जीवन म्हणा किंवा एलियन असल्याचा दावा केलाय. तसच जर तुम्ही युट्युबला सर्च केलं की एलियन म्हणून बऱ्याच लोकांना उडणारी तबकडी दिसल्याचे व्हिडिओ आहेत, कोणी तर प्रत्यक्षात एलियन पाहिले आहेत म्हणे असे अनेक किस्से ऐकायला मिळतात. आता नासाने अजून खोलात जाऊन हा विषय वर काढायचा असं ठरवलंय.

NASA इतर ग्रहांवर परकीय जीवन आढळल्यास मानव कसे प्रतिक्रिया देतील याचे मूल्यमापन करू इच्छित आहे आणि शोधामुळे देव आणि सृष्टीबद्दलच्या आपल्या कल्पनांवर परिणाम होऊ शकतो. अहवालानुसार, एजन्सी न्यू जर्सी येथील प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर थिओलॉजिकल इन्क्वायरी (CTI) च्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी २४ धर्मशास्त्रज्ञांची नियुक्ती करत आहे, ज्याला NASA ने 2014 मध्ये $1.1 दशलक्ष अनुदान दिले होते.

CTI चे वर्णन ‘धर्मशास्त्रज्ञ, शास्त्रज्ञ, विद्वान आणि धोरणकर्त्यांना एकत्र विचार करण्यासाठी बोलावून समजून घेण्याचे पूल बांधणे’ असे केले जाते. ‘जीवन म्हणजे काय? जिवंत असणे म्हणजे काय? आपण मानव आणि एलियन यांच्यातील रेषा कोठे काढू? इतर ठिकाणी संवेदनशील जीवनासाठी काय शक्यता आहेत?’

सध्या, नासाचे मंगळावर दोन रोव्हर आहेत आणि अनेक प्रोब्स गुरू आणि शनिभोवती फिरत आहेत. त्यांनी जेम्स वेब टेलिस्कोप देखील लॉन्च केले जे ब्रह्मांडातील आकाशगंगा, तारे आणि ग्रह निर्मितीचा अभ्यास करेल. एजन्सीला पृथ्वीबाहेरील जीवनाचा शोध लागण्याची आशा आहे. ऑक्सफर्डमधून बायोकेमिस्ट्रीमध्ये डॉक्टरेट असलेले केंब्रिज विद्यापीठातील कुलगुरू आणि शास्त्रज्ञ रेव्ह डॉ. अँड्र्यू डेव्हिसन, या कार्यक्रमासाठी निवडलेल्या २४ शास्त्रज्ञांपैकी एक आहेत.

डेव्हिडसनने केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या साइटवर ब्लॉग पोस्टमध्ये शेअर केले आहे की, ‘माणुसकी इतरत्र जीवनाच्या अशा कोणत्याही पुष्टीकरणाद्वारे कसे कार्य करेल यामधील धार्मिक परंपरा हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असेल. ‘त्यामुळे, प्रिन्स्टन येथील सेंटर ऑफ थिओलॉजिकल इन्क्वायरीसह विविध भागीदार संस्थांसोबत काम करत ‘अ‍ॅस्ट्रोबायोलॉजीचे सामाजिक परिणाम’ या विषयावर नासाच्या सुरू असलेल्या उद्दिष्टाचा एक भाग म्हणून हे वैशिष्ट्य आहे.

डेव्हिसन पुढील वर्षी एस्ट्रोबायोलॉजी अँड ख्रिश्चन डॉक्ट्रीन नावाचे एक पुस्तक प्रकाशित करणार आहे, ज्यात त्याचा विश्वास आहे की आपण इतर ग्रहांवर जीवन शोधण्याच्या जवळ जात आहोत. नासाने अनेक अशक्य वाटणारे शोध लावलेत म्हणा , आणि असंही जगातल्या प्रत्येक माणसाला परग्रहावरील जीवन काय असतं, याबद्दल उत्सुकता आहे, आणि काही अशीही लोकं आहेत की कशाला शोधायचं ,काय गरज आहे, इथं पृथ्वीवर काय कमी आहेत का ? पण भिडू ते नासा आहे काहीतरी जबऱ्या शोधून काढतील.

हे ही वाच भिडू :

The post एलियन व परग्रहावरील जीवन शोधण्यासाठी नासाने धर्मशास्त्रज्ञांची मदत घ्यायचं ठरवलंय… appeared first on BolBhidu.com.Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

घरासमोर खेळणाऱ्या सहा वर्षीय चिमुकलीवर परप्रांतीयाकडून अत्याचार; नागरिकांनी दिला चोप

औरंगाबाद : औरंगाबादच्या वाळूज भागात चीड आणणारी घटना समोर आली आहे. रांजणगाव शेणपुंजी येथे घरासमोर खेळणाऱ्या एका सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना मंगळवार २८ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी आता पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, हा तेलंगाणा राज्यातील असल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादच्या वाळूज परिसरातील रांजणगाव येथे किरायाच्या घरात राहणाऱ्या कुटुंबातील सहा वर्षीय चिमकुली तिच्या बहिणीसोबत घरासमोर खेळत होती. यावेळी शेजारी राहणारा तुकाराम परसराम जाधव ( वय ४५, रा. उर्मी जिल्हा आदिलाबाद तेलंगाणा ) नराधमाने गल्लीत खेळणाऱ्या या चिमुकलीला उचलून घरात नेले व तिच्यावर अत्याचार केला. यावेळी त्या चिमुकलीने आरडा ओरडा केला असता तिचा आवाज ऐकून तिची आई घराबाहेर आली. त्यावेळी बाहेर खेळत असलेली चिमुकली तेथे दिसली नाही. त्यामुळे शेजाऱ्यांना माहिती देत शोधाशोध सुरु केली. यावेळी बाजूलाच असलेल्या मुलीचा आवाज आल्याने त्या घरासमोर गेले असता, घराचा दरवाजा बंद होता. नागरिकांनी दरवाजा तोडला व आरोपी जाधव याला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. यावेळी पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक संदीप शिंदे हे करत आहेत. नागरिकांनी दिला चोप... मुलगी घराबाहेर दिसत नसल्याने पिडीत मुलीच्या आईने शेजाऱ्यांना आवाज देत तिला शोधण्याचा प्रयत्न केला. यावेळी परिसरातील नागरिक सुद्धा जमा झाले होते. त्याचवेळी आरोपी जाधवच्या घरातून मुलीचा आवाज आल्याने नागरिकांनी त्याच्या घराकडे धाव दरवाजा वाजवला. पण जाधव दरवाजा उघडत नसल्याने नागरिकांनी दरवाजा तोडत मुलीची सुटका केली. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी त्या नराधमाला चांगलाच चोप दिला, त्यांनतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

प्रणब मुखर्जींचं कुत्रं वाजपेयींना चावलं आणि पेपरात बातमी आली…

आमचा एक भिडू कार्यकर्ता परवा ८३ पिक्चरला गेला. आता तो गडी म्हणजे डायहार्ड क्रिकेट फॅन. जेवताना म्हणू नका, काम करताना म्हणू नका त्याच्या डोक्यात क्रिकेट सुरू असणार म्हणजे असणार. हा गडी पिक्चर बघून आला आणि आम्ही सगळे रिव्ह्यू ऐकायला आतुर होतो. पिक्चर लय भारी आहे, असं तो म्हणाला. पण त्यानं आमच्या डोक्यात एक पिल्लू सोडून दिलं.

भिडू म्हणला, “पिक्चर नुकता नुकताच सुरू झालेला. बीसीसीआयच्या ऑफिसमध्ये दोन कार्यकर्ते पेपर वाचत असतात. एक जण बातमी वाचतो, अरे ये वाजपेयीजी को प्रणब मुखर्जीजी के कुत्ते ने काटा. भाऊ पिक्चर राहिला बाजूला मी विचार करायला लागलो खरंच चावला असेल का?” आमच्याच भिडूला प्रश्न पडला म्हणल्यावर उत्तर शोधणं तर भाग होतं आणि आम्ही उत्तर शोधून आमच्याकडे ठेवत नसतोय, आम्ही तुम्हाला सांगणार हेही फिक्स.

तर हा, पिक्चरमध्ये दाखवतात ते सगळं खरं असणारच असं नसतंय. ते पाटी पण दाखवतात की, यात काही गोष्टींबाबत सिनेमॅटिक लिबर्टी घेण्यात आली आहे. त्यामुळं म्हणलं शोध घ्यायलाच हवा.

पिक्चरमध्ये दाखवलेली गोष्ट एकदम खरी आहे. याबाबतचा किस्सा स्वतः माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनीच सांगितला आहे.

सगळ्यात आधी तुम्हाला सांगायला हवं या दोन दिग्गज नेत्यांच्या मैत्रीबद्दल. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे मितभाषी आणि मनमिळाऊ नेते म्हणून देशात प्रसिद्ध आहेत. तर दुसऱ्या बाजूला माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची ओळखही संयमी राजकारणी अशीच. दोघेही आपापल्या पक्षाचे दिग्गज नेते, त्यांचे पक्ष आणि विचारधारा वेगळ्या असल्या तरी त्या मैत्रीच्या आड आल्या नाहीत.

दिल्लीच्या ल्यूटन्स एरियामध्ये या दोन्ही बड्या नेत्यांची घरं होती, बरं ही घरं अगदी शेजारी शेजारी. दोघांची दोस्ती इतकी घट्ट होती की एकमेकांच्या घरात जाण्यासाठी एक स्वतंत्र दरवाजाही करण्यात आला होता. मुखर्जी यांच्या पत्नीनं केलेल्या जेवणाची वाजपेयींना आवड होती. त्यांच्या परिवारातही इतका जिव्हाळा होता, की वाजपेयींची मानसपुत्री नमिताच्या लग्नाची तयारी करण्यात मुखर्जी यांच्या पत्नीनं पुढाकार घेतला होता.

या दोन दोस्तांची जोडी आपल्या पाळीव कुत्र्यांनाही एकत्रच फिरायला घेऊन जायची. एक दिवस मुखर्जी या सकाळच्या वॉकसाठी आले नाहीत. त्यामुळं दोघांच्याही कुत्र्यांना वाजपेयी यांनीच फिरवायला नेलं. मुखर्जीचं कुत्रं वाजपेयींच्या कुत्र्यापेक्षा मोठं होतं. हे मोठं कुत्रं जरा वांड निघालं आणि त्यांनी वाजपेयींच्या कुत्र्यावर हल्ला केला. साहजिकच कुत्र्यांवर प्रचंड जीव असलेले वाजपेयी मध्ये पडले आणि प्रणबदांचं कुत्रं त्यांना चावलंच.

वाजपेयींना काय या गोष्टीचा राग आला नाही, आणि ते प्रणबदांच्या घरी भांडणंही घेऊन गेले नाहीत. त्यांनी बँडेज बांधलं आणि संसदेत गेले, तिथं त्यांना भेटले प्रणबदा. त्यांनी वाजपेयींना त्या बँडेजबद्दल विचारलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की, हा तुमच्याच कुत्र्याचा प्रताप आहे.

साहजिकच या गोष्टीची बातमी पेपरात छापून आली आणि ही आठवण अगदी ३७-३८ वर्षांनंतर पुन्हा एकदा जागी झाली.

हे ही वाच भिडू:

The post प्रणब मुखर्जींचं कुत्रं वाजपेयींना चावलं आणि पेपरात बातमी आली… appeared first on BolBhidu.com.Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

यंदा देशातून साखर निर्यातीला मोठा संधी, पाहा किती झालं उत्पादन? कोणता जिल्हा अग्रेसर?

हिंगोली : सध्या सहकारी व खाजगी साखर कारखान्यांचे गळीप हंगाम सुरू असून मागील आठवड्यापर्यंत मराठवाड्यात ४ कोटी ६ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले. यातून ३.८८ कोटी क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून साखर उत्पादनाच्या सरासरीमध्ये कोल्हापूर विभाग अग्रेसर राहिला. हा साखरेचा उतारा १०.८५ टक्के इतका आहे. राज्यात यावर्षी ९५ सहकारी व ९३ खाजगी कारखान्यांनी गळीप हंगाम सुरू केला आहे. साधारणत ऑक्टोबर,नोव्हेंबर महिन्यापासून साखरगळापाला सुरुवात झाली आहे. त्यासाठी मराठवाड्यासह इतर ठिकाणाहून ऊस तोड मजूर कामाला लागले आहेत. दरम्यान, राज्यात गळप सूरू असेलल्या कारखाण्यांची दैनंदिन गळप क्षमता ७.६५ लाख मेट्रिक टन आहे. २३ डिसेंबरपर्यंत राज्यातील साखर विभागाच्या आठ विभागातून १८८ कारखान्यांच्या माध्यमातून ४.०६ कोटी मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. यातून ३.८८ कोटी क्विंटल साखरेचे उत्पादन यामधे सर्वात जास्त १.०८ कोटी क्विंटल साखरेचे कोल्हापूर विभागात उत्पादन झाले. राज्यात साखरेच्या उत्पादनात सोबतच काही कारखान्यांनी इथेनॉल उत्पादनाकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे राज्यात मागील दोन वर्षे शिल्लक असलेल्या ११० लाख टन साखरेचा साठा शिल्लक राहणार नाही, त्यातच ब्राझीलमध्ये साखरेचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे देशातून साखर निर्यातीला मोठी संधी आहे. साखर निर्यातीमुळे तसेच स्टॉक कमी राहणार असल्याने यावर्षी साखरेचे दर स्थिर राहतील अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ अध्यक्ष जय जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली आहे. राज्यातील साखर कारखान्यातील गाळप व उतारा - कोल्हापूर विभाग - ३५ कारखाने, उस गाळप ९९.६६ लाख मे. टन, साखर उत्पादन १.०८कोटी क्विंटल, टक्केवारी १०.८५ टक्के. - पुणे विभाग - २९ कारखाने, उस गाळप ८४.०९ लाख मे. टन, साखर उत्पादन ८२.३६ कोटी क्विंटल, टक्केवारी ९.७९ टक्के. - सोलापूर विभाग - ४३ कारखाने, उस गाळप ९७.६३ लाख मे. टन, साखर उत्पादन ८४.३१ कोटी क्विंटल, टक्केवारी ८.६४ टक्के. - अहमदनगर विभाग - २६ कारखाने, उस गाळप ५४.३६ लाख मे. टन, साखर उत्पादन .४८.९७ कोटी क्विंटल, टक्केवारी ९.०१ टक्के. - औरंगाबाद विभाग - २३ कारखाने, उस गाळप ३०.०९ लाख मे. टन, साखर उत्पादन २६.६६कोटी क्विंटल, टक्केवारी ८.८५ टक्के. - नांदेड विभाग - २६ कारखाने, उस गाळप ३६.७३ लाख मे. टन, साखर उत्पादन ३४.२८ कोटी क्विंटल, टक्केवारी ०९.३३ टक्के. - अमरावती विभाग - ३ कारखाने, उस गाळप ०२.९८ लाख मे. टन, साखर उत्पादन २.४९ कोटी क्विंटल, टक्केवारी ८ ३६ टक्के. - नागपूर विभाग - ३ कारखाने, उस गाळप १.२२ लाख मे. टन, साखर उत्पादन ९७.कोटी क्विंटल, टक्केवारी ७.९५ टक्के.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

पुण्यात सुरू झालेल्या रोल्समॅनियाने सगळ्या भारतात मार्केट खाल्लंय

उद्योगनगरी असलेल्या पुण्याला खवय्यांची नगरी म्हणून सुद्धा ओळखतात. इथं मोठ- मोठी हॉटेलं, प्रत्येक भागात एखादी खाऊ गल्ली नाहीतर रस्त्याला कडेला खाण्या-पिण्याच्या वेगवेगळ्या गोष्टी हमखास सापडतात.

आता कारण तर आपल्या प्रत्येकालाचं माहितेय, इथं बाहेरून शिकायला, नोकरीला येणाऱ्यांची संख्या जास्त त्यात अस्सल पुणेकरांच्या तोंडाला चटका काय कमी आहे. त्यामुळे हे शहरं हळूहळू खाद्यनगरी म्हणून वाढायला लागलयं.

आणि याचाचं फायदा घेत अनेक मंडळी पुण्यात येऊन खाण्याच्या व्यवसायात उतरायला लागलीत. त्यातलेचं तीन भिडू लोक पुनीत कंसल, गगन सियाल आणि सुखप्रीत सियाल. ज्यांनी आपल्या सगळ्यांचीचं इंस्टंट भूक भागवणारं रोल मॅनिया हे स्टार्टअप सुरू केलं. जे आज करोडोंची उलाढाल करतयं. ज्यांचे शॉप आपल्याला जागोजागी पहायला मिळतील. पण तुम्हाला माहितेय, या रोल मॅनियाची सगळ्यात आधी सुरूवात एका टेबल आकाराच्या किऑस्कवर झालेली.

2009 च्या आसपासची गोष्ट, पुणे हे खाद्य उद्योगासाठी एक वाढणारी बाजारपेठ होती. त्यात मूळ असणाऱ्या काठी रोलमध्ये नवनवीन व्हरायटी येत होत्या. मथुरेवरून आलेल्या पुनीतला ही चांगली ही संधी वाटली आणि तो या व्यवसायात उतरला.

सुरूवातीला 20,000 इन्वेस्ट करून त्याने मगरपट्टा भागातील एका रेस्टॉरंटच्या बाहेर टेबल-आकाराचे किऑस्क चालवायला सुरुवात केली, ज्याच्यासोबत फक्त एक आचारी होता. पण काही वेळातच पुनीतच्या या रोल अड्ड्यावर लोकांची गर्दी व्हायला लागली. त्याचा हा छोटा व्यवसाय झपाट्याने वाढला होता.

पुनीतने आता हा व्यवसाय वाढवायचा म्हणून आपले दोन मित्र गगन सियाल आणि सुखप्रीत सियाल यांच्याशी चर्चा केली. त्यांना अख्ख्या प्लॅन समजून सांगितला. दोघांना पुनीतची आयडिया आवडली आणि हे दोघे पुनीतचे पार्टनर बनले.

या तिघांनी मिळून रोल्स मॅनियाची रजिस्टर, कंपनी म्हणून स्थापना केली आणि 2010 मध्ये त्याचे दुसरे आउटलेट उघडले. त्यानंतर पुनीतने व्यवसाय आणि त्याच्या वाढीवरवर लक्ष ठेवलं, तर सुखप्रीत सियालने फायनान्शियल सपोर्ट केला आणि गगन हा मार्केटिंगमध्ये हुशार आहे. गगन हा मार्केटिंगमध्ये हुशार आहे.

पुण्यातल्या तीन भिडूंच्या या रोल्स मॅनिया व्यवसायाने सगळ्यांचचं मार्केट गुंडाळून खाल्ल. हळूहळू हा व्यवसाय देशभर नेण्याची वेळ आली. व्हेज आणि नॉन-व्हेज अशा दोन्ही खवय्यांसाठी हेल्दी आणि पॉकेट-फ्रेंडली रोल्समध्ये त्यांनी नवनवीन चवी अॅड केल्या. ज्याला चांगलाचं प्रतिसाद मिळाला.

तेव्हा या तिघांनी फ्रेंचायझी मॉडेल्ससाठी आपल्या व्यवसायाचे दरवाजे उघडले आणि 30 शहरांमध्ये याच्या ब्रँच उघडल्या. म्हणजे 2016 पर्यंत ते चार वरून 20 स्टोअर्स पर्यंत गेले होते आणि पुढच्याच वर्षी म्हणजे 2017 पर्यंत पुनीत आणि सियाल भावांचे 45 स्टोअर्स होते. आणि हळू हळू त्यांनी शंभरी सुद्धा गाठली, जो त्यांच्या व्यवसायातला आजपर्यंतचा सर्वात मोठा टप्पा होता

एका मुलाखतीत पुनीतने सांगितले की,

रोल्स मॅनिया ही सेल्फ फंडेड कंपनी आहे. रोल्स मॅनिया फ्रँचायझी घेऊन आमच्या कंपनीमध्ये विश्वास ठेवणाऱ्या आणि गुंतवणूक करणाऱ्या आमच्या फ्रँचायझी पार्टनरला 25 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.‍‍ त्यात स्वयंपाक करण्यात घालवलेला  वेळे कमी केल्यामुळे क्वीक सर्विस रेस्टोरंट QSR क्षेत्र वाढत आहे. आणि रोल्स मॅनिया आउटलेट्स QSRs असल्याने, ग्राहकांना ऑनलाइन ऑर्डर करणे किंवा आम्हाला कॉल करून 30 मिनिटांत डिलीव्हरी मिळवणं सोपं वाटतं.

पुनीत सांगतो की, ऐन टायमाला जर कोणता डिलीव्हरी पार्टनर किंवा कर्मचारी आले नाहीत, तेव्हा आम्ही तिघांनी डिलीव्हरी दिली आहे. या व्यवसायात आता हजारो लोकं जोडली गेलीत, आणि अनेकांचे स्वतःचे रेस्टॉरंट उघडण्याचे स्वप्न पूर्ण झालयं. आणि महत्वाचं म्हणजे आमच्या फ्रँचायझी मालकांपैकी 70 टक्के महिला आहेत.

सध्या रोल्स मॅनिया ऑनलाइन फूड डिलिव्हरी ॲप वर तर आहेच, पण त्यांचं स्वत: चं Android आणि iOS वर रोल्स मॅनिया अॅप देखील उपलब्ध आहे. ज्यावरून ते इन्स्टंट डिलिव्हरी सर्विस देतात.

आताच्या घडीला पाहिलं तर देशभरात रोल्स मॅनियाचे १३० पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत. जे करोडोंची उलाढाल करतयं. आणि आता देशात सोबतच देशाबाहेरही आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा प्लॅन त्यांनी सुरू केलाय.

हे ही वाचं भिडू :

 

The post पुण्यात सुरू झालेल्या रोल्समॅनियाने सगळ्या भारतात मार्केट खाल्लंय appeared first on BolBhidu.com.Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Breaking : तुळजापुरात २ दुकानांना भीषण आग, लाखोंचा माल आगीत जळून खाक

उस्मानाबाद : तुळजापूर शहरातील चेतना वाईन शॉप शेजारील चप्पल दुकान, मसाले दुकानला रात्री अचानक शॉट सर्किटमुळे आग लागली यात दोन्ही दुकाने जळून राख झाली असून दोन्ही दुकानातील लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शहरातील जुने बस स्टॅन्ड भवानी रोडवरील मुरली गौडा यांचे किंग्ज स्टार बिअर शॉपी आहे, तर शांतिलाल गाटे यांचे रॉयल चप्पल दुकान आहे. काल मध्यरात्री इलेक्ट्रिक वायरचा शॉट सर्किट झाला आणि होत्याचं नव्हतं झालं. दोन्ही दुकानातील लाखो रुपयांचा माल या आगीत जळाला आहे. नगर परिषदचे अग्निशमन वाहनाने आग विझवण्याचा प्रयत्न झाला. परंतु, आग एवढी तिव्र होती की काही क्षणात दुकानातील सर्व माल जळून गेला. शेजारील सर्व दुकाने सुरक्षित आहेत. पोलिसांनी लाईनमनला बोलावून शेजारील दुकानचा विद्युत प्रवाह खंडीत करुन टाकला. नगर परिषद कर्मचारी पोलीस निरिक्षक अजिनाथ काशिद स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

अखेर ठरलं! मुंबई-पुण्यानंतर ओमिक्रॉन रुग्णांचा अहवाल देणारी लॅब आता 'या' जिल्ह्यातही

औरंगाबाद : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ओमिक्रॉनचा धोका वाढताना पाहायला मिळत आहे. मात्र असे असताना ओमिक्रॉन रुग्णांचा अहवाल देणारी जिनोम सिक्वेन्सिंग लॅब सद्यातरी फक्त मुंबई पुण्यातच उपलब्ध असल्याने अहवाल येण्यासाठी बराच वेळ लागत आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये सुद्धा जिनोम सिक्वेन्सिंग लॅब सुरू करण्याचा प्रयत्न स्थानिक प्रशासनाकडून सुरू होता. मात्र जागेच्या मुद्द्यावरून दोन ठिकाणीची चाचपणी सुरू असताना आता घाटी रुग्णालयातच ही लॅब सुरू करण्याचं ठरलं असल्याचं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी माहिती दिली आहे. विदेशातून औरंगाबादमध्ये येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात आहे. तर ज्या रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला त्यांचा स्वॅब पुन्हा एकदा खबरदारी म्हणून जिनोम सिक्वेन्सिंग लॅबमध्ये पाठवला जात आहे, जेणेकरून ओमिक्रॉनची लक्षणे आहे की नाही याची खात्री होईल. मात्र जिनोम सिक्वेन्सिंग लॅब फक्त मुंबई-पुण्यात उपलब्ध असल्याने औरंगाबादचे अहवाल पुण्यात पाठवली जात आहे. मात्र जास्त भार असल्याने रिपोर्ट येण्यासाठी आठ ते दहा दिवस लागत आहे. त्यामुळे औरंगाबादमध्येच जिनोम सिक्वेन्सिंग लॅब सुरू करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू होत्या, पण जागेबाबत स्पष्टता नव्हती. जिनोम सिक्वेन्सिंग लॅब शहरात सुरू करण्याची परवानगी मिळाली तर यासाठी घाटी रुग्णालयातील प्रयोगशाळा किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पॉल हर्बर्ट सेंटर फॉर डीएनए बारकोडिंग अँड बायोडायव्हर्सिटी स्टडीज ची प्रयोगशाळा असे दोन पर्याय प्रशासनाकडे होती. त्यामुळे या दोन्ही पैकी कोणतं ठिकाण निवडावे यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती,ज्याचा अहवाल आला असून, घाटी रुग्णालयातच जिनोम सिक्वेन्सिंग लॅब सुरू करण्याचं ठरलं असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

अख्खी वखार उकरून काढल्यावर शिवरायांच्या नावाची दहशत इंग्रजांना कळली

शिवरायांचे आठवावे रूप,

शिवरायांचा आठवावा प्रताप

शिवरायांचा आठवावा साक्षेप, भूमंडळी ।

समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचं, ताकदीचं आणि बुद्धिचं वर्णन करताना लिहीलेल्या आपल्या साहित्यातील काही ओळी. ज्या वाचल्यानंतर अंगावर काटा आल्याशिवाय राहात नाही.

आपल्या गनिमी काव्यानं महाराजांनी अख्ख्या मुघलांच येडं पळवलं होत आणि दिल्लीपर्यंत मजल मारलेली. अनेक अडचणी आल्या, पण त्यावर युद्धाने मात करायची की बुद्धीने हे महाराजांना चांगलचं माहित होतं.

आणि मुघलचं काय शिवाजी महाराजांनी इंग्रजांना सुद्धा आपल्या पुढं नमतं घ्यायला लावलं होतं. तेचं इंग्रज ज्यांनी आपल्या देशावर कित्येक वर्षे हुकूम गाजवला, पण याचं इंग्रजांच महाराजां पुढं काहीचं चालायचं नाही. कारणं एकदाचं घडलेली अद्दलं इंग्रजांच्या चांगलीच लक्षात राहिलेली.

१६६० चं ते सालं. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता. ज्याची धास्ती सगळ्याचं मुघलं सरदारांना बसली होती. त्यामुळे महाराजांच्या विरोधात जाण्याची कोणाचीचं टाप नव्हती.

पण सिद्दी जोहरनं आपल्या पायावर धोंडा मारायच ठरवल, ३० ते ४० हजारांची फौज घेऊन तो स्वराज्यावर चालून आला. एक एक करत तो गावं उद्ध्वस्त करत होता.

याची खबर शिवरायांपर्यत पोहोचली, सिद्दी जोहरला अडवण्यासाठी महाराजांनी पन्हाळा गाठला. जेणेकरून त्याला बाहेरच्या बाहेर पळवून लावता येईल. सिद्दी जौहरला सुद्धा शिवाजी महाराज पन्हाळ्यावर असल्याची बातमी मिळाली, त्यामुळे त्यानं सगळ्या तयारीनिशी पन्हाळ्याला वेढा घातला.

हा वेढा खूप मजबूत होता. पण महत्त्वाचं म्हणजे पन्हाळ्याला वेढा घालण्यासाठी राजापूरच्या इंग्रज वखारवाल्यांनी सिद्दी जौहरला मदत केली होती.

हीच गोष्ट शिवाजी महाराजांना मनात खटकली. एवढचं नाही तर विशालगडाजवळ पालवणचा राजा जसवंतसिंग दळवी आणि शृंगारपूरचा राजा सुर्यराव सुर्वे ह्यांनी सुद्धा शिवाजी महाराजांच्या मार्गात अडखळा आणला होता. त्याचा रागही महाराजांच्या मनामध्ये होता.

महाराज लगेचचं राजापूरला पोहचले, तिथे आल्यानंतर शिवरायांनी सगळ्या स्थानिक अंमलदारांकडून आणि पाश्चात्त्य व्यापाऱ्यांकडून खंडण्या वसूल करायला सुरुवात केली.

पण इंग्रज व्यापाऱ्यांनी यात आडकाठी आणली. इंग्रज व्यापाऱ्यांनी खंडणी द्यायला टाळाटाळ केली. पन्हाळ्यावर तोफगोळा देऊन जौहरच्या मदतीला आलेला हेन्री रेव्हिंगटन हा त्या वेळी राजापूरलाचं होता. शिवाजी महाराजांनी त्याला आणि आणखी ७ इंग्रजांना कैद केले. इंग्रजांची वखार उकरून पुरून ठेवलेले द्रव्य महाराजांनी प्राप्त करून घेतलं.

त्यानंतर कैद केलेल्या इंग्रजांना सोनगडच्या किल्ल्यावर पाठविण्यात आलं. हे इंग्रज बरेच दिवस शिवाजी महाराजांच्या कैदेत होते. ईस्ट इंडिया कंपनीचा त्यावेळचा प्रेसिडेंट अॅण्ड्रयज याने या इंग्रज कैद्यांना कळविलं की, “तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात जाऊन जौहरला जी मदत केली त्याचे फळ तुम्ही भोगत आहात. ”

या सगळ्या इंग्रजांची बेक्कार अवस्था झालेली. त्यांच्या सुटकेसाठी कोणी प्रयन्त सुद्धा केले नाहीत, करणारं तरी कसं महाराजांच्या विरोधात जाण्याची कोणाच्यातं एवढी हिंमत होती. या कैदेत असलेल्या इंग्रजांनी पैकी दोघं तर कैदेतच मेले. बाकीच्यांची १६६३ च्या जानेवारीत सुटका झाली.

शिवाजी महाराजांच्याच्या या कृतीमुळे राजापूरचे इंग्रजवखारवाले इतके धास्तवले की पुढे त्यांनी शिवाजी महाराजांशी चांगले संबंध ठेवण्यासाठी सतत प्रयत्न केला. पण त्याआधी सिद्दी जौहरचं काय झालं, हे काय नव्यानं सांगायला नको.

हे ही वाचं भिडू :

The post अख्खी वखार उकरून काढल्यावर शिवरायांच्या नावाची दहशत इंग्रजांना कळली appeared first on BolBhidu.com.Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

इंडिकाच्या अपमानाचा बदला रतन टाटांनी पद्धतशीरपणे घेतला…

Happy Birthday Ratan Tata

सामान्य माणूस अपमान झाला की जागच्या जागी रोखठोक उत्तर देऊन बदला घेतो पण हुशार माणसं अपमानाला यशाचा रस्ता समजतात आणि शांतपणे काम करून एकदम वाढीव पद्धतीने त्याचा बदला घेतात. असाच एक किस्सा घडला होता इंडिका कारवरून. रतन टाटांनी ज्या पद्धतीने उत्तर दिलं होतं त्यावरून टाटा किती ग्रेट होते याची प्रचिती येते. तर जाणून घेऊया काय मॅटर झाला होता.

रतन टाटा यांचं व्यावसायिक क्षेत्र भरपूर मोठं आहे. 1998 ची ही गोष्ट. जेव्हा टाटा मोटर्सने एकदम जोशात टाटा इंडिका बाजारात उतरवली. खरंतर टाटा इंडिका हा रतन टाटांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. त्यांनी कठोर मेहनत घेऊन इंडिका लॉन्च केली होती. खेडोपाड्यात इंडिकाची क्रेझ दिसून येईल , अजूनही इंडिका लोकांच्या मनातून गेलेली नाहीए.

रतन टाटांच्या देखरेखीखाली, टाटा समूह खूप वेगाने विकसित होत होता, टाटा समूह आधीच व्यावसायिक आणि वाहने बनवत असे, परंतु सामान्य माणसाचे कारचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, रतन टाटा यांनी 30 डिसेंबर 1998 रोजी संपूर्णपणे भारतीय कार तयार केली. आलिशान कार इंडिका लाँच करणे हा रतन टाटांचा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि रतन टाटांनी त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत केली.

परंतु ऑटो अॅनालिस्टने या कारवर पूर्णपणे टीका केली आणि परिणामी, विक्रीवर असलेल्या टाटा इंडिकाला बाजारातून चांगला प्रतिसाद मिळाला नाही आणि 1 वर्षाच्या आत टाटा इंडिका फ्लॉप झाली, ज्यामुळे टाटा मोटर्सचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर रतन टाटा यांना निर्णयावर अनेकांचे टोमणे ऐकावे लागले.

त्यानंतर काही जवळच्या लोकांनी आणि गुंतवणूकदारांनी रतन टाटा यांना इंडिकामुळे झालेला तोटा भरून काढण्यासाठी त्यांचा कारचा व्यवसाय दुसऱ्या कंपनीला विकण्याचा सल्ला दिला, कारण रतन टाटा यांची कार लॉन्च करण्याची योजना होती आणि ती तोट्याची होती. टाटा यांनी ही सूचना योग्य समजली आणि ती स्वीकारली. आपली कार कंपनी भागीदारांसोबत फोर्ड कंपनीला विकण्याचा प्रस्ताव रतन टाटा आणि त्यांच्या भागीदारांची फोर्ड कंपनीसोबतची बैठक सुमारे 3 तास चालली.

फोर्ड कंपनीचे चेअरमन बिल फोर्ड हे रतन टाटा यांच्याशी असभ्य वागले. जमत नव्हतं तर कशाला हे कारचं प्रकरण उभं केलं, आता तुझी कंपनी विकत घेऊन मी उलट तुझ्यावरच उपकार करत आहे हे वाक्य रतन टाटा यांच्या मनावर बेतले, ते आपल्या जोडीदारासोबत रात्रभर मीटिंग सोडून परत आले आणि रतन टाटा यांना मीटिंगमध्ये घडलेली गोष्ट आठवत होती. आणि त्यांना अपमानित वाटत होते, आता त्याला त्याच्या यशाची किंमत मोजावी लागेल. फोर्डला उत्तर द्यावे लागले हा पक्का विचार टाटांनी केला होता.

त्या भेटीतून परत आल्यानंतर रतन टाटांनी आपले संपूर्ण लक्ष टाटा मोटर्सवर ठेवले आणि अनेक वर्षांच्या संशोधनानंतर आणि आपले सर्व आयुष्य रतन टाटांनी इंडिकामध्ये टाकल्यानंतर सुरुवातीच्या काही वर्षांच्या अडचणींनंतर रतन टाटांनी इंडिकाची नवीन आवृत्ती लॉन्च केली आणि कार व्यवसाय चांगला वाढू लागला. रतन टाटा यांना खूप फायदा झाला.

फोर्ड कंपनीला आपल्या जग्वार आणि लँड रोव्हरमुळे तोटा सहन करावा लागत होता आणि 2008 पर्यंत फोर्ड कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचली होती, त्यावेळी रतन टाटा यांनी फोर्ड कंपनीसमोर त्यांची लक्झरी कार जॅग्वार आणि लँड रोव्हर खरेदी करण्याचा प्रस्ताव मांडला जो फोर्ड कंपनीचे चेअरमन बिल फोर्ड यांनी स्वीकारला आणि पुन्हा एकदा फोर्ड कंपनीचे चेअरमन बिल फोर्ड, रतन टाटा आणि त्यांचे भागीदार यांच्यात रतन टाटा जसे फोर्ड कंपनीच्या मुख्यालयात गेले होते तशीच बैठक झाली. टाटांनी जॅग्वार आणि लँड रोव्हर मॉडेल्सची फोर्ड कंपनीकडून $2.3 अब्ज रुपयात खरेदी केली.

आणि पुन्हा एकदा फोर्ड कंपनीचे चेअरमन बिल फोर्ड हेच रतन टाटा यांना म्हणाले पण यावेळी ते थोडेसे सकारात्मक होते बिल फोर्ड म्हणाले की तुम्ही आमची कंपनी विकत घेऊन आमच्यावर खूप मोठे उपकार करत आहात. आणि आज जग्वार आणि लँड रोव्हर टाटाचे भाग आहेत आणि बाजारात चांगल्या नफ्यासह पुढे जात आहेत. रतन टाटांना हवे असते तर ते यावेळी बिल फोर्डकडून आपल्या अपमानाचा बदला घेऊ शकले असते, पण त्यांनी तसे केले नाही, फक्त हेच महान लोकांचे वैशिष्ट्य आहे की ते आपल्या अपमानाचा बदला यशाने घेतात.

हे ही वाच भिडू :

Webtitle : Ratan tata Birthday : Here’s how Ratan Tata took revenge on Ford for his ‘humiliation’ in 1999

The post इंडिकाच्या अपमानाचा बदला रतन टाटांनी पद्धतशीरपणे घेतला… appeared first on BolBhidu.com.Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

साताऱ्यात भयंकर अपघात; कारची सहा गाड्यांना धडक, चार जखमी

सचिन जाधव । मद्यधुंद कार चालकाने रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने कार चालवून राजपथावर दोन दुचाकी, चार चारचाकी व एका पादचार्‍याला धडक दिली. यात तीन ते चार लोक जखमी झाले असून संतप्त जमावाने दारूड्या कारचालकाला बेदम चोप दिला आहे. दरम्यान, या थरारक घटनेने राजपथावर खळबळ उडाली. वाचा: सोमवारी रात्री नऊच्या सुमारास सातार्‍यातील शाहू चौक ते रेमंड शॉपी (तालीम संघ) या मार्गावर मद्यधुंद कारचालकाने बेफाम गाडी चालवली. भरधाव वेगातील या कारने प्रथम दत्त मंदिराजवळ एका दुचाकीस्वाराला धडक दिली. ही धडक बसल्याने दुचाकीस्वार सुमारे २५ फूट फरफटत गेला. त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. यानंतर कार चालकाने वेगात पुढे जाऊन दोन चारचाकी वाहनांना व एका पादचार्‍यालाही धडक दिली. यावेळी स्थानिक नागरिक व काही वाहनचालकांनी मद्यधुंद कार चालकाचा पाठलाग केला. एका चारचाकी गाडीला ठोकरल्यानंतर ही कार रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन धडकली. संतप्त जमावाने या चालकाला बाहेर खेचून बेदम चोप दिला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी बघ्यांची तोबा गर्दी झाली होती. या ठिकाणी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. पोलिसांनी संबंधित कार चालकाला ताब्यात घेऊन जमावाला शांत केले. त्यानंतर हे सर्व प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले असून रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद झाली नव्हती. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

चंद्रकांत पाटलांनी शहराध्यक्षांना झापले, नवीन कार्यकारिणीवरून भाजपमध्ये गटबाजी?

औरंगाबाद : आगामी महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांनी सोमवारी पक्षाच्या कार्यकारिणी विस्ताराची घोषणा केली. मात्र, या नवीन कार्यकारिणीचा विस्तार करण्याचा निर्णय भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पचनी पडला नसून, त्यांनी केणेकर यांना यावरून चांगलेच झापले असल्याचं भाजपच्या गटात चर्चा आहे. सोमवारी केणेकर यांनी १० शहरउपाध्यक्ष, ०९ शहरजिल्हा सचिव आणि ०१ अध्यात्मिक आघाडी शहर संयोजक पदासाठी एकूण २० लोकांच्या नावाची घोषणा केली. मात्र यावरून आता पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्याची चर्चा असून, शहरातील अनेक भाजपचे जेष्ठ नेते या नवीन कार्यकारिणीवरून नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रकरण थेट प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्याकडे पोहोचले. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा भाजप आमदार अतुल सावे शहरात नसताना केणेकर यांनी कार्यकारिणीचा केलेला विस्तार चंद्रकांत पाटलांनाही पटलेला नाही. त्यामुळे यावरून चंद्रकांत पाटील यांनी केणेकर यांची खरडपट्टी केली असल्याचं बोलले जात आहे. तर केणेकर यांनी आपल्याच गटातील लोकांना संधी दिल्याचा सुरू शहरातील भाजप नेत्यांमध्ये पाहायला मिळत आहे. निवडणूकपूर्वी नाराजीनाट्य.... महानगरपालिका निवडणुका काही महिन्यांवर आल्यास असतानाच भाजपमधील गटबाजी पक्षाला परवडणारे नाही. आधीच शिवसेनेला राष्ट्रवादी-काँग्रेसचे बळ मिळाले असताना, एकट्या भाजपला या तिन्ही पक्षाविरोधात मैदानात उतरण्यासाठी संघटनेच बळ हवं आहे. मात्र, अशापद्धतीने गटबाजी सुरू राहिली तर भाजपच्या अडचणी वाढू शकतात.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

रोहिणी खडसेंच्या कारवर हल्ला; चंद्रकांत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

म. टा. प्रतिनिधी । जळगाव जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या () यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याचा येथील शिवसेना आमदार () यांनी निषेध केला आहे. या हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी विधानसभेत करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. सोमवारी रात्री रोहिणी खडसे या मानेगाववरून मुक्ताईनगरकडे येत असताना त्यांच्या कारवर (एमएच १९ सीसी-१९१९) अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. हा भ्याड हल्ला असून यामुळे मुक्ताईनगरच्या पावन भूमीच्या परंपरेला गालबोट लागले आहे, अशा प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. नेमके काय म्हणाले आमदार? चंद्रकांत पाटील म्हणाले की, रोहिणी खडसे यांच्यावर हल्ला झाल्याचे ऐकून धक्का बसला. यामुळे पावनभूमी असलेल्या मुक्ताईनगरच्या परंपरेला धक्का बसला आहे. मुक्ताईनगरात महिला नगराध्यक्षा, मुख्याधिकारी महिला आहेत, अनेक महिला ग्रामसेवक व तलाठी देखील आहेत. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई यांनीही या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. अशा या मतदारसंघात पहिल्यांदाच महिलेवर हल्ल्याची घटना घडली असून ती दुर्दैवी आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. हा हल्ला केला कुणी? या हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करावी व कठोर कारवाई करावी, अशी मागणी आज विधानसभेत करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

ओमिक्रॉनबद्दल आली मोठी बातमी, क्रिम्स हॉस्पिटलने केला खुलासा

नागपूर : 'तिसरी लाट आलीच तरी ती मुलांवर आघात करण्याची शक्यता कमी आहे. शिवाय, इतरांसाठीही ती फार घातक ठरणार नाही. रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण कमी राहील', असा विश्वास क्रिम्स हॉस्पिटलचे प्रबंध संचालक व विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशोक अरबट यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. करोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेतील क्रिम्समध्ये दाखल रुग्णांचा अभ्यास केल्यानंतर त्या पाहणीचे निष्कर्ष मांडताना डॉ. अरबट म्हणाले की, 'तिसरी लाट आलीच तर मधुमेह व इतर गंभीर आजार असणाऱ्यांनाच अधिक धोका होऊ शकतो. मुळात ओमायक्रॉनचा आजवर जो अभ्यास झाला, त्यानुसार तो अतिशय सौम्य स्वरूपाचा आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढली तरी त्यामुळे फार नुकसान संभवत नाही. दुसऱ्या लाटेत मृत्यूची संख्या अधिक होती. असे असले तरी संसर्ग झालेल्या रुग्णांच्या तुलनेत प्रमाण काढले तर मृत्यूची टक्केवारी पहिल्या लाटेतच अधिक होती. पहिल्या लाटेत मृत्यूचे प्रमाण ८.२ टक्के होते, तर दुसऱ्या लाटेत हेच प्रमाण ६.८१ टक्के होते.' कोव्हिडचे हे चक्र न संपणारे आहे. त्यामुळे आता प्रत्येकाला बुस्टर डोस देण्याची गरज असल्याचेही डॉ. अरबट म्हणाले. त्यांच्यासहच डॉ. समीर अरबट, डॉ. परिमल देशपांडे, डॉ. स्वप्नील बक्कमवार, डॉ. गौरी गाडगे यांचा अभ्यास करणाऱ्या पथकात समावेश होता.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

नगर-पुणे हायवेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

अहमदनगर: पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमाजवळील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी १ जानेवारीला मोठी गर्दी होते. त्यामुळे ३१ डिसेंबरच्या सायंकाळपासून १ जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत नगर-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. पुणे पोलिसांनी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. पुणे आणि मुंबईहूनही नगरकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहतुकीत २९ तासांसाठी हे बदल करण्यात आलेले आहेत. वाचा: दरवर्षी येथे मोठी गर्दी होत असते. करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी निर्बंध होते. यावर्षी निर्बंध काहीसे शिथील असल्याने पुन्हा गर्दी होण्याची शक्यता आहे. भाविकांनी गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आलेले असले तरी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे येणाऱ्या भाविकांसाठी ठिकठिकाणी वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, यामुळे नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प होते. त्यामुळे ती अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. यासाठी मोठा पोलिस बंदोस्तही तैनात करण्यात आला आहे. असे आहेत पर्यायी मार्ग
  • पुण्याहून नगरकडे जाणारी वाहतूक खराडी बायपास- केडगाव - चौफुली - न्हवरा - शिरूरमार्गे नगरकडे. नगरहून पुण्याकडे जाताना याच मार्गे वाहने जातील.
  • मुंबईहून नगरकडे येणारी जड वाहतूक वडगाव मावळ - चाकण - खेड - मंचर – नारायणगाव- आळेफाटा – नगर. नगरहून मुंबईकडे जाणाऱ्यांनाही याच रस्त्याने जावे लागेल.
  • मुंबईहून नगरकडे जाणारी इतर वाहने चाकण - खेड - पाबळ - शिरूरमार्गे नगरकडे.
  • सोलापूरहून चाकणकडे जाणारी वाहतूक खराडी बायपास- विश्रांतवाडी - आळंदीमार्गे चाकण


from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

ST Strike Update : एसटी संपामुळे सरकारही आक्रमक, कामावर न येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई

नागपूर : राज्यात एसटी कामगारांच्या मागण्या अद्यापही मान्य न झाल्यामुळे शासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आयुष्य संपवलं. पण तरीदेखील सरकार निर्णय घेत नसल्याने एसटीचा वाद आणखी वाढत चालल्याचं चित्र आहे. अजूनही कामावर रुजू न झालेल्या आणखी पाच कर्मचाऱ्यांना एसटी प्रशासनातर्फे सोमवारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. यापूर्वी १६ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. (st bus strike news today Notice of suspension to 5 more ST employees in Nagpur) एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी दिवाळीपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असल्यामुळे अपवाद वगळता एसटीची चाके थांबली आहेत. या संपामुळे राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा निर्णय घेतला. मात्र, 'आम्हाला वेतनवाढ नको तर विलीनीकरणच हवे', असे सांगत कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला. त्यानंतर कर्मचाऱ्यांचे निलंबन सुरू करण्यात आले. नागपूर विभागात आतापर्यंत ४३५ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले, तर रोजंदारीवरील ९० कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. आंदोलकांचे संप काळातील वेतनही कापण्यात आले. मात्र, 'तुम्ही कोणतीही कारवाई करा, आम्ही विलीकरणाच्या मागणीवर ठाम आहोत', असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. कर्मचारी रूजू न झाल्यास परिवहनमंत्री अनिल परब यांनी कारवाईचा इशारा दिला होता. मात्र, त्यांच्या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सुरुवातीला नागपूर विभागात १८ कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली. त्यांना या नोटीसला सात दिवसांत उत्तर द्यायचे होते. हा कालावधी संपल्यानंतर २४ डिसेंबर रोजी १६ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले होते. आता पुन्हा पाच कर्मचाऱ्यांना अशीच नोटीस बजावण्यात आली आहे. सोमवारी ५८ फेऱ्या सोमवारी नागपूर विभागात १८ बसेसद्वारे ५८ फेऱ्या झाल्या. यात गणेशपेठेतून पाच, इमामवाड्यातून दोन, घाटरोडमधून तीन, उमरेडमधून तीन, सावनेर व वर्धमाननगरातून प्रत्येकी दोन व रामटेक आगारातू एक अशा बसेस सुटल्या. या बसेसनी ३ हजार १६४ किमीचा प्रवास केला. याद्वारे १ लाख ४५ हजार ६७१ रुपयांचे उत्पन्न झाले व २,५१७ प्रवाशांनी प्रवास केला. (st bus strike news today Notice of suspension to 5 more ST employees in Nagpur) (st bus strike news today Notice of suspension to 5 more ST employees in Nagpur)


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

आयआयटीयन पोरीमुळे आता कंप्यूटरमध्ये देखील संस्कृत भाषा वापरली जाणारे

शाळेत अनेकांचा संस्कृत हा विषय एक तर खूप आवडीचा विषय असायचा तर काहींना अज्जीबात आवडायचा नाही कारण काय तर हि भाषा कायमच अवघड वाटत असायची. आजही शाळा-महाविद्यालयांमध्ये संस्कृतकडे गुण मिळणारी भाषा म्हणून संस्कृत विषय विद्यार्थ्यांकडून घेतला जातो.  शाळा सोडल्यानंतर काय भाषेचा फारसा संबंध आला नाही. पण हा समज फोल ठरू शकतो कारण आता हि भाषा दैनंदिन कामकाजात वापरली जाऊ शकते…हे बोलण्याचं निमित्त म्हणजे अलीकडेच यावर एक शोध लावण्यात येतोय…

संस्कृतची सर्वसामान्यांना ओळख म्हणजे देवांची भाषा. या समजामुळे या भाषेला त्याच कोशात ठेवले गेले. तिचा जास्त वापर करण्यात आला नाही. नेहमीच्या संवादातून आणि लिखाणातून ही भाषा पुसट होत गेली. नेहमी वापरली जाणं हि भाषा जिवंत असण्याचे लक्षण असतं..

संस्कृत भाषा ही सर्वात विकसित व प्राचीन भाषा आहे, असे विज्ञानही म्हणते. संगणकाच्या बायनरी प्रणालीनुसार, ही जगातील एकमेव भाषा आहे जी संगणकासाठी सर्वात उपयुक्त आहे. ही भाषा गणिती देखील आहे. त्यात जे बोलले जाते तेच त्यात लिहिले आहे. त्यामुळे आजच्या तंत्रज्ञानाने संगणकावर उच्चार लिहिल्यास इतर भाषांप्रमाणे त्यात त्रुटी राहणार नाहीत.

संस्कृत बद्दल अनेक अचंबित करणाऱ्या बातम्या आपल्या कानी येत असतात. अशीच एक बातमी आहे हरियाणा राज्यातील भिवानी जिल्ह्यातील ‘भेरा’ या गावची.

अनू आर्य नावाची या गावातील मुलगी आता आयआयटी मधील विद्यार्थ्यांना संस्कृतचे धडे देणार आहे. अनु आर्यने अमरोहा जिल्ह्यातील छोटीपुरा येथील श्रीमद दयानंद कन्या गुरुकुल महाविद्यालयात सहाव्या वर्गात प्रवेश घेतला होता. येथून बीए केल्यानंतर तिने एमजेपी रोहिलखंड विद्यापीठातून 2018 साली संस्कृतमध्ये एमए केले. २०२० मध्ये त्याच विद्यापीठातून इंग्रजी विषयात तिने एमए पूर्ण केले.

शिवाय तीने विद्यापीठ अनुदान आयोगाकडून नेट (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) आणि JRF (ज्युनियर रिसर्च फेलोशिप) संस्कृतमध्ये उत्तीर्ण केले आहे. अनु हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत या तिन्ही विषयांत प्रवीण आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर पीएचडीची तयारी करण्यासोबतच ती गुरुकुलमध्ये अध्यापनाचे कार्य करत आहे. तिने दोन महिन्यांपूर्वी आयआयटी मुंबईच्या संगणक विषयातील गणितीय कार्यावर संशोधनासाठी सादरीकरण केले होते.

सेल फॉर इंडियन साइंस एंड टेक्नोलाजी इन संस्कृत च्या विषय तज्ञासोबत प्रश्नोत्तरांमध्ये त्याच्या चांगल्या कामगिरीनंतर आयआयटीने त्याला संशोधनासाठी हिरवा सिग्नल दिला आहे. तिच्या यशाबद्दल, गुरुकुलच्या मुख्याध्यापिका सुमेधा सांगतात की, अनुची प्रत्येक वर्गातील कामगिरी प्रभावी आहे. आयआयटी मुंबईकडून संशोधनासाठी त्यांना आमंत्रण मिळाल्याचा संपूर्ण गुरुकुलला अभिमान आहे.

संस्कृत समजणारे कंप्यूटर येणार … 

केंद्रीय मनुष्यबळ मंत्री रमेश पोखरियाल यांनी आयटी मुंबई च्या पदवीदान समारंभात दावा केला होता कि , अमेरिकेची अंतराळ संस्था नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा) ने ओळखले आहे की, बोलणारा संगणक प्रत्यक्षात असू शकतो आणि याचे कारण संस्कृत भाषा आहे. 

पोखरियाल पुढे असंही म्हणाले की, संस्कृत ही एकमेव वैज्ञानिक भाषा आहे, ज्यामुळे संस्कृत भाषिक संगणक प्रत्यक्षात येऊ शकतात असा विश्वास नासाने व्यक्त केला आहे. पुढे ते म्हणाले होते कि नासा असे करत आहे, कारण संस्कृत ही एकमेव वैज्ञानिक भाषा आहे जिचे शब्द जसे बोलले जातात तसेच लिहिले जातात…त्यांच्या या दाव्यामुळे आता भविष्यात विज्ञान देखील संस्कृत भाषेत वाचायला आणि शिकायला मिळाले तर ती बाब निश्चितच अभिमानाची गोष्ट ठरेल हे मात्र नक्की. 

हे हि वाच भिडू :

 

 

The post आयआयटीयन पोरीमुळे आता कंप्यूटरमध्ये देखील संस्कृत भाषा वापरली जाणारे appeared first on BolBhidu.com.Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,