सगळ्या भारतात बांगड्या पुरवणाऱ्या फिरोजाबादला देशात सुहागनगरी म्हणून ओळखलं जातं…

‘ ये चाय गरम चाय गरम चाय…ये बांगड्या गरम बांगड्या गरम बांगड्या गरम… ‘ हा डायलॉग प्रत्येकाला चांगलाच माहिती असेल. एलिजाबेथ एकादशी या मराठी चित्रपटातला हा फेमस डायलॉग आहे. दोन लहान भावंड आपल्या आईनं घेतलेलं कर्ज फेडता यावं, म्हणून होलसेल दुकानातून बांगड्या विकत घेऊन चोरून बांगड्यांचा व्यवसाय करतात आणि पैसे कमवतात.

असो, पण तुम्हाला माहितेय का, की लाखों लोकांच पोट भरण्याचं साधन असणाऱ्या या बांगड्या नेमक्या तयार कुठं होतात.

हा आता जागोजागी बांगड्यांचे कारखाने आहेत. पण फिरोजाबाद हे जगभरात बांगड्यांचं शहर म्हणून फेमस आहे. 

उत्तर प्रदेशातलं फिरोजाबाद इथं देशातलं सगळ्यात मोठं बांगड्यांचं मार्केट आहे. प्लेन पासून डिझायनर, सिंगल कलरपासून कलरफूल बांगड्यांसाठी फिरोजाबादला ओळखलं जातं.

बांगड्यांसोबतचं काचेच्या उद्योगासाठी देखील फिरोजाबाद फेमस आहे.

तसं पाहिलं तर फिरोजाबादचा इतिहास फार जुना आहे. या शहराला आधी चंद्रवारनगर नावाने ओळखल जायचं.

गेल्या दोनशे वर्षांपूर्वी पासून इथं बांगड्यांचा व्यवसाय सुरू आहे. प्राचीन काळात बाहेरच्या राज्यकर्त्यांनी काचेच्या अनेक वस्तू भारतात आणल्या. मात्र तेव्हा या काचेच्या वस्तू नाकारल्या गेल्या. त्यामुळे या सगळ्या वस्तू स्थानिक पातळीवर बनवलेल्या भट्ट्यांमध्ये वितळल्या गेल्या. या भट्ट्यांना स्थानिक भाषेत भैंसा भट्टी म्हणतात.

अशा जुन्या आणि पारंपारिक भट्ट्या आजही अलिगढजवळील ससाणी आणि पूर्दाल नगरमध्ये आहेत. त्याचाचं वापर बांगड्या बनवण्यासाठी केला जातोय. दरम्यान,आता काचेच्या उत्पादनात कोळशाऐवजी नॅचरल गॅसचा वापर केला जात आहे.

सोबतचं असंही मानलं जातं की,

फिरोजाबादमध्ये हा बांगड्यांच्या उद्योग हाजी रुस्तमने सुरू केला. ज्याची सुरुवात रुस्तम उस्तादने १९२० मध्ये केली होती. फिरोजाबादमध्ये काच उद्योगाचे जनक म्हणून हाजी रुस्तम यांना दरवर्षी श्रद्धांजली वाहण्यात येते आणि भल्यामोठ्या जत्रेचं आयोजनही केलं जातं. तर १९२० पासून फिरोजाबादमधले बांगड्यांच्या कारखान्यांचा विस्तार झाला. त्यानंतर १९८९ पासून इथं काचेच्या इतर वस्तूंचाही व्यवसाय होऊ लागला.

सुहाग नगरी म्हणून ओळख

इथे घरोघरी बांगड्यांचा व्यवसाय केला जातो. एवढेच आहे तर इथे बांगड्यांचे बरेच कारखाने पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहेत. इथल्या बहुतेक लोकांचं पोट -पाणी या बांगड्या विकूणचं चालतं. तुम्ही जर फिरोजाबादच्या गल्ली बोळात फेरफटका मारला तर दोन्ही बाजूला रंगीबेरंगी बांगड्यांचं दिसतील. 

हे शहर जगातील काचेच्या बांगड्यांचं सर्वात मोठे उत्पादक आहे. फिरोजाबादमध्ये जवळपास ४०० बांगड्यांचे कारखाने आहेत, ज्यांचा व्यवसाय दररोजच्या कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीनुसार केला जातो. इथं बांगड्यांचा रेटही वेगवेगळा आहे. १०, २० रुपयांपासून पाच हजार रुपयां पर्यंतच्या बांगड्या बाजारात उपलब्ध आहेत.

महत्त्वाचं म्हणजे फिरोजाबादच्या बांगड्या फक्त तिथल्या परिसर किंवा काही राज्यापुरत्या मर्यादित नाहीत तर परदेशातही या फिरोजाबाद च्या बांगड्यांची मोठी मागणी आहे. ज्यामध्ये अमेरिका आणि स्वीडन सारख्या देशांचा समावेश आहे.

कोरोनामुळे काचेच्या व्यवसायाला फटका

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनमळे लोकांचे जीवन मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले. याचा फटका फिरोजाबादच्या बांगड्या व्यवसायाला देखील बसला. इथे बरेचशे कारखाने बंद पडले. फिरोजाबाद जिल्ह्यातील सुमारे १२५ बांगड्यांचा व्यवसायही ठप्प झाला होता. ज्यामुळे बेरोजगारीचं प्रमाणं वाढलं. मात्र आता परिस्थिती हळूहळू सुधारतेय. बांगड्यांचा व्यवसायही पुन्हा सुरू झालाय. फिरोजाबादत हे काचेच्या उत्पादनाचं प्रमुख हब बनलयं.

हे ही वाचं भिडू :

The post सगळ्या भारतात बांगड्या पुरवणाऱ्या फिरोजाबादला देशात सुहागनगरी म्हणून ओळखलं जातं… appeared first on BolBhidu.com.Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

एकवचनी कर्णाला न्याय देण्याचं काम शिवाजी सावंतांनी केलं

कर्ण, राजकारण हा तुझा विष‍यच नव्हे! राजकारण केवळ दंडाच्या बलावर वा मनाच्या चांगुलपणावर कधीच चालत नसतं. ते बुद्धीच्या कसरतीवर चालत असतं! माजलेलं अरण्य नष्ट करायचं झालं, तर तुझ्यासारखा साधाभोळा वीर हातात परशू घेऊन जीवनभर ते एकटाच वेड्यासारखं तोडीत बसेल! पण… पण माझ्यासारखा एका ठिणगीतच त्याची वासलात लावील !

शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजयामधली अशी भेदक वाक्य अंगावर शहारे आणि मनात काहूर माजवतात.

भारताच्या साहित्यविश्वात एकदम डिटेलमध्ये महाभारतातला कर्ण मांडण्याचं श्रेय जातं ते म्हणजे मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांच्या लेखणीला.

पण या महाकादंबरीची निर्मिती कशी झाली आणि शिवाजी सावंत यांचं वैयक्तिक आयुष्य कसं होतं याबद्दल आपण जाणून घेऊया.

शिवाजी सावंत यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९४० रोजी कोल्हापूरच्या आजरा मधला. शेतकरी कुटुंब असल्याने सगळे सण उत्सव जोमात साजरे व्हायचे. आईच्या तोंडून पूर्ण कथांचे संदर्भ ऐकायला मिळायचे. शिवाजी सावंतांच्या मनात तेव्हाच या गोष्टींबद्दल कुतूहल जागं झालं होतं. पुढे शाळेत या कुतूहलाच वेडात रूपांतर झालं.

शाळेत कर्णावर नाटक होतं. लोकांच्या टाळ्या श्रीकृष्णाच्या वाक्यांवर पडत होत्या पण शिवाजी सावंत यांचं बालमन कर्णाच्या वाक्यांनी व्यथित होतं होतं, हीच काय ती बीजरोवणी झाली त्यांच्या मनात. इथून त्यांना कर्णाबद्दल जवळीक वाटू लागली.

१९५८ साली शिवाजी सावंतांनी मॅट्रिकची परीक्षा दिली व प्रथम वर्गात ते उत्तीर्ण झाले. कोल्हापुरातून १९६० साली टंकलेखन व शॉर्टहॅण्डचा डिप्लोमा त्यांनी पूर्ण केला. त्यामुळे त्यांना लगेचच कोल्हापूरच्या वरिष्ठ जिल्हा सत्र न्यायालयात नोकरी मिळाली.

कोर्ट कचेरीच्या कामात त्यांचं मन रमेना कारण त्यांना कर्ण खुणावत होता. त्यांनी न्यायालयाची नोकरी सोडली आणि शिक्षक म्हणून काम सुरु केलं. १९६२ साली राजाराम हायस्कुलमध्ये ते नोकरी करू लागले आणि याच काळात त्यांनी कर्णाविषयी जितकं काही मिळेल ते वाचायला सुरुवात केली. कर्ण, महाभारत आणि त्यांचे संदर्भग्रंथ अश्या प्रकारचं तगडं वाचन त्यांनी केलं.

हिंदीतील प्रख्यात कवी प्रभात ऊर्फ केदारनाथ मिश्र यांनी लिहिलेलं कर्ण हे खंडकाव्य शिवाजी सावंतांच्या हाती पडलं आणि त्यांच्या डोक्यात कर्णाबद्दल लिहिण्याचं मत तयार झालं. १९६३ मध्ये शिवाजीरावांनी प्रदीर्घ चिंतन, मनन, वाचन केल्यानंतर मृत्युंजय ही कादंबरी प्रत्यक्ष लिहायला घेतली. त्यावेळी ते कोल्हापुरात पोलीस क्वार्टर्समध्ये थोरले बंधू विश्वासराव यांच्यासोबत चाळीत राहत होते. ते काय लिहीत होते हे त्यांच्या भावाखेरीज कुणालाच माहीत नव्हतं.

एके दिवशी शिवाजी सावंतांनी त्यांचे सहशिक्षक आर.के.कुलकर्णी यांना आपली संकल्पना आणि त्याबद्दल लिहलेलं लिखाण वाचून दाखवलं. हे लिखाण वाचून दाखवत असताना आर.के.कुलकर्णी पुन्हा पुन्हा सावंतांना वाचायला लावत होते. कारण त्यातले प्रत्येक संवाद हे कमालीच्या ताकदीचे होते. आर.के. कुलकर्णी यांनी हस्तिनापुरात जाऊन प्रत्यक्ष तिथली तेव्हाची वर्णन कशी असेल याचा आढावा घेण्यासाठी त्यांना उत्तर भारतात जाण्याचा सल्ला दिला.

आता तिकडं जायचं म्हणल्यावर पैशाची गरज होती. तेव्हा शिवाजी सावंतांना तुटपुंजा पगार होता. बरीच जमाजमव केली तरी पुरेशी रक्कम जमा झाली नाही तेव्हा दिग्दर्शक भालजी पेंढारकरांनी भक्कम रकमेचा चेक शिवाजी सावंतांना देऊ केला. तिथे जाऊन दोन महिने शिवाजी सावंत अभ्यास करत होते. अनेक भेटीगाठी झाल्या आणि कर्ण साकारला गेला.

१९६७ साली गणेशोत्सवात शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय प्रकाशित झाली. या कादंबरीने अनेक रेकॉर्ड मोडले. अनेक भाषेत तिचे अनुवादही झाले. पहिल्यांदाच इतक्या सखोलपणे कर्ण मांडला म्हणून शिवाजी सावंतांचं बरंच कौतुक झालं. हे वादळ आजही मराठी आणि भारतीय साहित्यविश्वात रोरावत आहे. शिवाजी सावंत यांनी मृत्युंजय व्यतिरिक्त छावा, युगंधर, कवडसे नावाच्या दर्जेदार कादंबऱ्या लिहिल्या.

हे हि वाच भिडू :

The post एकवचनी कर्णाला न्याय देण्याचं काम शिवाजी सावंतांनी केलं appeared first on BolBhidu.com.Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

ठाण्यात मनसेनं फोडली निर्बंधांची हंडी; राजकीय संघर्ष पेटणार?

ठाणेः करोना निर्बंधांचा निषेध म्हणून ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पहिली फुटली आहे. ( 2021) करोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका असल्याने राज्य सरकारने सार्वजनिक दहीहंडी उत्सवावर निर्बंध घालत हा उत्सव साजरा करण्यास मनाई केली आहे. मात्र, मनसेनं ठाण्यात दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन राज्य सरकार विरुद्ध मनसे असा संघर्ष गेले काही दिवस पाहायला मिळत आहे. ठाण्यातील वर्तकनगर येथे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्या मार्गदर्शनानुसार मनविसे विभाग सचिव मयूर तळेकर व उपशहरअध्यक्ष संदीप चव्हाण यांनी लक्ष्मी पार्क वर्तकनगर येथे दहीहंडी उभारली होती. गोविंदांनी हे निर्बंध झुगारत ही हंडी फोडुन मनसेचा झेंडा फडकवला. तर, ठाण्यातील नौपाडा येथे मनसेचं मुख्य कार्यालय आहे येथे देखील मनसैनिकांनी थर रचत दहीहंडी फोडली आहे. दरम्यान, दहीहंडी उत्सव साजरा न करण्याबाबत पोलिसांनी नोटीस बजावूनही ठाण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उत्सवाची तयारी सुरू करत नौपाड्यातील भगवती शाळेच्या येथील मैदानात स्टेजही उभारला होता. मात्र, सोमवारी सकाळी पोलिसांनी या ठिकाणी धाव घेत स्टेज काढण्यास सांगितले. यावरून पोलिस आणि मनसे पदाधिकारी एकमेकांच्या समोरासमोर आले होते. तसेच, पदाधिकाऱ्यांनी स्टेजवरच आंदोलन करत उपोषण सुरू केले. परंतु पोलिसांनी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र, स्टेज असो किंवा नसो आम्ही दहीहंडी उत्सव साजरा करणारच, असे जाधव यांनी सांगितले होते.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

तालिबान बड़े पॉजिटिव… लेडीज को जॉब, क्रिकेट को सपोर्ट: शाहिद अफरीदी, शिखर धवन से मिला था ‘गब्बर’ जवाब

तालिबान क्रिकेट शाहिद अफरीदी

--- तालिबान बड़े पॉजिटिव… लेडीज को जॉब, क्रिकेट को सपोर्ट: शाहिद अफरीदी, शिखर धवन से मिला था ‘गब्बर’ जवाब लेख आप ऑपइंडिया वेबसाइट पे पढ़ सकते हैं ---

“देखिए… नो डाउट… तालिबान आए हुए हैं इस वक्त… और बड़े पॉजिटिव फ्रेम ऑफ माइंड के साथ आए हुए हैं, ये चीज हमें पहले नजर नहीं आई और माशाअल्लाह ये चीज बड़ी जबरदस्त पॉजिटिविटी की तरफ चीजें नजर आ रही हैं… कि लेडीज को काम करने की इजाजत… पॉलिटिक्स में… बाकी जॉब्स की तरह उनको… मतलब इजाजत है… ऐंड देन (और/इसके अलावा) क्रिकेट को सपोर्ट कर रहे हैं, क्रिकेट सीरीज हो जाती लेकिन श्रीलंका में मेरे ख्याल से कोविड की सिचुएशन ठीक नहीं थी, इसकी वजह से सीरीज नहीं हुई, तो मैं समझता हूँ कि तालिबान क्रिकेट को बहुत ज्यादा पसंद करते हैं।”

ऊपर वाली बात शाहिद अफरीदी ने कही है। एक बार फिर पढ़िए, जितनी बार “…” का प्रयोग किया गया है, उतनी बार शाहिद अफरीदी ने अपनी लड़खड़ाती जबान को संभालने के लिए ऐं-वें-उ-ऊ से शब्दों के खाली स्थान को भरा है।

गौर कीजिए। क्रिकेट पर बात के दौरान शाहिद अफरीदी की जुबान नहीं लड़खड़ाती है। यह सब कुछ महिला अधिकारों, महिलाओं को जॉब, महिलाओं के लिए पॉलिटिक्स में काम जैसे जुमलों पर होता है। क्यों? क्योंकि शाहिद अफरीदी खुद भी ‘तालिबान’ हैं। चौंकिए मत। सबूत है।

शाहिद अफरीदी की चमड़ी जितनी सुंदर है, दिल और मानसिकता उतनी ही काली है – कम से कम महिलाओं की स्वतंत्रता को लेकर। पाकिस्तान के एक गर्ल्स कॉलेज जाकर इन साहब ने तो लड़कियों को इस्लामी सिद्धांत अपनाने और जीवन सफल करने का मंत्र तक दे डाला।

और हाँ। शाहिद अफरीदी भेदभाव नहीं करते। जो सोच दूसरी लड़कियों को लेकर उनके दिल में है, वही सोच वो अपनी बेटियों तक के लिए रखते हैं। ‘गेम चेंजर’ नाम की ऑटोबायोग्रफी में अफरीदी लिखते हैं कि उनकी बेटियों के लिए क्रिकेट या किसी भी तरह के आउटडोर खेलों की मनाही है। इसके पीछे उन्होंने सामाजिक और धार्मिक वजह वाला तर्क दिया है।

दो उदाहरणों से गणित की तरह सिद्ध हुआ कि शाहिद अफरीदी खुद भी ‘तालिबान’ हैं।

महिलाओं को ‘जॉब’ देने वाले ‘पॉजिटिव तालिबानियों’ की शाहिद अफरीदी क्यों तारीफ कर रहे हैं, यह बड़ा सवाल है। जवाब तो सिर्फ और सिर्फ उनके पास होगा, हम सिर्फ कयास लगा सकते हैं कि शायद फट के फलावर हुई पड़ी है सभी पाकिस्तानियों की। क्यों? क्योंकि आम पाकिस्तानी तो छोड़िए, अफगानिस्तान पर शासन के बाद तालिबान अब तो डायरेक्ट पाकिस्तान के पीएम इमरान खान तक को धमकी देने लगे हैं।

एक और बात। खुशखबरी है शाहिद अफरीदी के लिए। उन्हें तालिबान का अगला प्रधानमंत्री बनाया जा सकता है। इसकी डिमांड शुरू भी हो गई है। देखिए ट्वीट। पावरफुल लोग शाहिद अफरीदी के लिए लॉबिंग कर रहे हैं।

शाहिद अफरीदी को शिखर धवन का जवाब

जम्मू कश्मीर के अवैध पाकिस्तानी कब्जे वाले हिस्से में एक बार शाहिद अफरीदी गए। वहाँ से भारत के लिए और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को भला-बुरा कहा था। हालाँकि रगड़ दिए गए थे। वैसे तो गौतम गंभीर, हरभजन सिंह, युवराज सब ने लताड़ लगाई थी लेकिन शिखर धवन ने अपने ‘गब्बर’ वाले अंदाज में बाउंड्री के पार मारा था शाहिद अफरीदी को।

शिखर धवन ने जवाब देते हुए लिखा था, “इस वक्त जब सारी दुनिया कोरोना से लड़ रही है, उस वक्त भी तुमको कश्मीर की ही पड़ी है? कश्मीर हमारा था, हमारा है और हमारा ही रहेगा… तुम चाहे पूरे 22 करोड़ लोगों को लेकर आ जाओ, यहाँ का एक-एक व्यक्ति सवा लाख के बराबर है।”IFTTT Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

डेडलाइन से पहले ही USA की सेना ने अफगानिस्तान छोड़ा, तालिबान के खतरे में ही छूट गए कई अमेरिकी: ‘डरपोक’ बायडेन निशाने पर

अमेरिका, अफगानिस्तान, जो बायडेन, सेना वापसी

--- डेडलाइन से पहले ही USA की सेना ने अफगानिस्तान छोड़ा, तालिबान के खतरे में ही छूट गए कई अमेरिकी: ‘डरपोक’ बायडेन निशाने पर लेख आप ऑपइंडिया वेबसाइट पे पढ़ सकते हैं ---

आखिरकार 20 वर्षों के युद्ध के बाद संयुक्त राष्ट्र अमेरिका ने अफगानिस्तान से अपनी सेना की वापसी की प्रक्रिया पूरी कर ली है। इसके साथ ही अब अमेरिका का अफगानिस्तान से लोगों को निकालने का अभियान भी थम गया है। सोमवार (30 अगस्त, 2021) को ये प्रक्रिया पूरी हुई। अमेरिका और उसके साथी देशों ने 15 दिनों से अपने लोगों को निकालने का अभियान छेड़ रखा था, जो खूब-खराबे और हड़बड़ी से भरा हुआ था।

हालाँकि, कई हजार ऐसे अफगानिस्तानी नागरिक अब भी वहाँ फँसे हुए हैं, जिन्होंने अमेरिका व उसके साथी देशों की तालिबान के खिलाफ युद्ध में मदद की थी। वहाँ से निकाले जाने के वो भी इच्छुक थे, लेकिन अमेरिका उन्हें खतरे में छोड़ कर निकल गया है। वहीं कई अमेरिकी नागरिक भी हैं जो अब भी वहीं फँसे हुए हैं। अमेरिका का मिशन पूरा होने के बाद तालिबान ने काबुल में गोलीबारी कर के जश्न मनाया।

मोठा दिलासा: 'या' ६ जिल्ह्यांत २४ तासांत करोनाचा एकही नवा रुग्ण नाही

चंद्रपूर: जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला असून बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. विशेष म्हणजे दोन आठवड्याच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी जिल्ह्यात एकही बाधित रुग्ण आढळून आला नाही. मागील २४ तासांत जिल्ह्यात ७ जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली, तर सोमवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, चंद्रपूर सोबतच भंडारा, अकोला, यवतमाळ, गोंदिया, या जिल्ह्यांतही २४ तासांत नवीन एकाही रुग्णाची नोंद झाली नाही.( ) वाचा: जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८८ हजार ६४२ वर पोहचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८७ हजार ६० झाली आहे. सध्या ४२ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ६ लाख ७३ हजार २१५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ५ लाख ८२ हजार ७७७ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ५४० बाधितांचे मृत्यू झाले आहेत. वाचा: बुलडाण्यात रुग्णसंख्येत वाढ विदर्भात सोमवारी दिवसभरात तपासण्यात आलेल्या अहवालांमध्ये ३१ नवे बाधित आढळले. यातील २० रुग्ण एकट्या जिल्ह्यात आढळल्याने चिंता वाढली आहे. जिल्हानिहाय रुग्णसंख्येत चार, गडचिरोली चार, अमरावती दोन तर वाशीममध्ये एक रुग्ण वाढला आहे. भंडारा, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा शून्य रुग्णाची नोंद झाली. या वाढीव आकड्यांमुळे विदर्भातील एकूण रुग्णसंख्या ११ लाख १८ हजार १९१ वर पोहचली. यातील १० लाख ९८ हजार २४० बरे झाले तर २१ हजार २३७ दगावले आहेत. वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

खडसे-महाजन एकमेकांशेजारी बसले आणि...; जळगावातील बैठक चर्चेत

जळगाव: निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलसाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सोमवारी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत अजिंठा विश्रामगृहात घेण्यात आली. या बैठकीत सर्वपक्षीय पॅनलबाबत एकमत झाले असले तरी जागावाटपाबाबत सर्वपक्षीय सदस्यांची कोअर कमिटीची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नेते शेजारी शेजारी बसले पण दोघांत संवाद मात्र झाला नाही. ( Update ) वाचा: अजिंठा विश्रामगृहात सोमवारी सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन, एकनाथ खडसे, डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, आमदार चिमणराव पाटील, किशोर पाटील, मंगेश चव्हाण, शिरीष चौधरी, अनिल पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, दिलीप वाघ, वाल्मीक पाटील, प्रदीप देशमुख, उदय पाटील, संतोष चौधरी, डी.जी.पाटील यांच्यासह राष्ट्रवादी व शिवसेनेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. या बैठकीत गिरीश महाजन यांनी जागावाटपासह अध्यक्ष-उपाध्यक्ष पद देखील वाटून घेण्याचे मत मांडले. यावर सव्वा-सव्वा वर्ष हे पद देण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली. तसेच याबाबत ठाम निर्णय कोअर कमिटीच्या पुढील बैठकीत घेण्याचे ठरले. वाचा: गिरीश महाजन उशिरा आणि चर्चांना उत सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीचे आयोजन दुपारी चार वाजता करण्यात आले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा बैठक व जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमुळे ही बैठक ५ वाजता सुरू झाली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी या बैठकीला सर्वात आधी उपस्थिती लावली. मात्र भाजपचा एकही पदाधिकारी या बैठकीला उपस्थित नसल्याने, बैठक लांबतच गेली. माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांना तब्बल एक तास प्रतीक्षा करावी लागली. सायंकाळी ६.३० वाजता गिरीश महाजन व आमदार मंगेश चव्हाण या बैठकीसाठी अजिंठा विश्रामगृहावर दाखल झाले. त्यांना उशीर झाल्याने काहीवेळ चर्चांना उत आला. खडसे-महाजन आले एकत्र! पहिल्या बैठकीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत निर्णय घेण्यासाठी चारही पक्षांच्या ८ सदस्यांचा समावेश असलेली कोअर कमिटी गठीत करण्यात आली आहे. कमिटीत शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील, भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजीमंत्री एकनाथ खडसे, गुलाबराव देवकर आणि काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी व ॲड. संदीप पाटील यांचा समावेश आहे. जिल्हा बँकेच्या सर्वपक्षीय पॅनलसाठी झालेल्या बैठकीत माजी मंत्री गिरीश महाजन व एकनाथ खडसे हे दोन्ही नेते एकत्र आले. दोघेही शेजारी शेजारीच बसले. मात्र, दोन्ही नेत्यांचा संवाद या बैठकीत झाला नाही. पत्रकार परिषदेत देखील या नेत्यांनी एकमेकांचे नाव घेणे टाळले. वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

ईडीची कारवाई: जयंत पाटील यांनी भाजपवर केला 'हा' गंभीर आरोप

मुंबई: माजी गृहमंत्री यांच्यावर आरोप असलेल्या वसुली प्रकरणात आता परिवहन मंत्री यांना ईडीने नोटीस बजावल्याने महाविकास आघाडीतून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री यांनी थेट शब्दांत निशाणा साधला आहे. सरकारच्या नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी ईडीचा वापर होतो आहे, असे जयंत पाटील म्हणाले. ( ) वाचा : निव्वळ महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनाच नव्हे तर देशातील भाजप विरोधी भूमिका घेणाऱ्यांना त्रास देणे व त्यांच्या त्रुटी असतील तर त्या हुडकून काढण्याचा प्रयत्न यंत्रणा करताना दिसत आहेत. ज्यांना नोटिसा आल्या आहेत ते नेते सडेतोड उत्तर देतील पण यामागे राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. अनिल देशमुख यांच्याबाबतीत एक नंबर कोण हे सचिन वाझे व इतरांच्या जबाबात सिद्ध झाले आहे. अनिल देशमुख यांचा या केसमध्ये संबंध नाही हे पुन्हा उघड झाले आहे. शिवाय परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणून स्टेटमेंट घेतले जातेय हे चुकीचे काम सुरू आहे, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला. वाचा: नेमकं काय आहे प्रकरण? राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी सचिन वाझे याला दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. या प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या निर्देशांवरून सीबीआय आणि नंतर या केंद्रीय तपास यंत्रणा तपास करत आहेत. ही चौकशी सुरू असतानाच देशमुख यांना सीबीआयने क्लीनचिट दिल्याच्या बातम्या रविवारी पसरल्या. सीबीआयचा फाइल बंद करण्याबाबतचा अंतर्गत गोपनीय अहवाल लीक झाल्याचेही बोलले जात होते. मात्र सीबीआयने त्यावर तातडीने स्पष्टीकरण देत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे आणि त्याची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. यावरून मोठं वादळ उठलं असतानाच सायंकाळी परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीकडून याच प्रकरणात नोटीस बजावण्यात आली. परब यांना उद्या (मंगळवार) सकाळी ११ वाजता मुंबई येथील ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. या दोन्ही घडामोडींनंतर महाविकास आघाडीतून आक्रमक प्रतिक्रिया येत आहेत. वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

तहसीलदार ज्योती देवरे यांच्यावर गंभीर आरोप; थेट लोकायुक्तांकडे तक्रार

अहमदनगर : आत्महत्येचा इशारा देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने चर्चेत आलेल्या येथील तहसीलदार यांच्याविरुद्ध आता लोकायुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध खातेनिहाय चौकशी आणि अन्य प्रकरणांच्या आधारे भ्रष्टाचार केल्याची तक्रार पारनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी दाखल केली आहे. देवरे यांच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनातून अद्याप मार्ग निघालेला नाही. त्यांच्याविरुद्धच्या चौकशीचे निर्णयही प्रलंबित आहेत. त्यातच आता थेट लोकायुक्तांकडे तक्रार दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ( ) वाचा: पारनेर तालुक्यातील , संदीप चौधरी, ज्ञानेश्वर लंके व सुहास सालके यांनी ज्योती देवरे यांच्याविरुद्ध लोकायुक्तांकडे तक्रार केली आहे. त्यांच्यावतीने पुण्यातील अ‍ॅड. असीम सरोदे, अ‍ॅड. अजित देशपांडे व अ‍ॅड. अक्षय देसाई यांनी ही ऑनलाइन याचिका सोमवारी दाखल केली आहे. महाराष्ट्राच्या लोकायुक्त पदावर नुकतीच न्यायमूर्ती यांची नियुक्ती झाल्यानंतर दाखल झालेले हे पहिलेच मोठे प्रकरण ठरले आहे. वाचा: या याचिकेत देवरे यांच्यावर तक्रारदारांनी अनेक आरोप केले आहेत. स्वतःच्या लोकसेवक पदाचा गैरवापर करून व्यक्तिगत हितासाठी, भ्रष्ट हेतुने अनेक पातळ्यांवर भ्रष्टाचार करणे, वाळूमाफियांना परस्पर कारवाईमुक्त करणे, बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांचे ट्रॅक्टर, डम्पर, जेसीबी मशीन्स व पोकलेन अशी वाहने कोणतीही तडजोड शुल्क सरकारला जमा न करता परस्पर सोडून देणे अशा अनेक प्रकरणात ज्योती देवरे यांनी तब्बल पाच कोटी, ९४ लाख रुपयांच्यावर घोटाळा केला आहे, असा आरोप लोकायुक्तांकडे केलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. यासंबंधी अनेक पुरावे याचिकेसोबत जोडण्यात आले आहेत. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी केलेल्या चौकशीच्या अहवालाचाही आधार घेण्यात आला आहे. नगरच नव्हे तर धुळे येथे कार्यरत असतानाच्या काळातील तक्रारींचाही यामध्ये समावेश आहे. वाचा: यासंबंधी याचिकाकर्त्यांचे वकील अ‍ॅड. सरोदे म्हणाले, ‘हे अतिशय दुर्दैवी आणि विरोधाभासी चित्र आहे की देवरे या सध्या ज्या तालुक्यामध्ये कार्यरत आहेत त्याच तालुक्यात समाजसुधारक आणि भ्रष्टाचार विरोधातील अग्रगण्य व्यक्तिमत्व यांचे गाव राळेगणसिद्धी देखील आहे. हजारे हे लोकपाल आणि लोकायुक्त कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी व भ्रष्टाचारमुक्त समाजासाठी लढत आहेत. लोकसेवेत असलेल्या व्यक्तीने विविध मार्गांनी भ्रष्टाचार करणे, झटपट पैसा मिळविण्यासाठी स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करणे, अपारदर्शक व्यवस्थापन असणे व जनतेच्या सेवेसाठी तयार करण्यात आलेल्या नागरिकांसाठीच्या सनदेचे पालन न करणे हा 'कुप्रशासनाचा' भाग आहे. काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण प्रशासन व लोकशाहीवरील सामान्य माणसाचा विश्वास कमी होणे धोकादायक आहे.' वाचा :

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

'त्या' वैमानिकाचा नागपुरात मृत्यू; विमानाचं केलं होतं इमर्जन्सी लँडिंग

नागपूर: मस्कत येथून येथे जाणारे विमान चालवत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने एअरलाइन्सचे वैमानिक (वय ४४) याला आपात्कालीन लँडिंग करत येथे दाखल करण्यात आले होते. मागील चार दिवसांपासून त्याचा आयुष्याशी संघर्ष सुरू होता. अखेर आज कय्युम यांची प्राणज्योत मालवली. ( ) वाचा: ढाक्याला जाणाऱ्या विमानाचे शुक्रवारी सकाळी ११.४० वाजता इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. सहवैमानिकाने परिस्थिती हाताळत विमानतळावर विमान सुरक्षित उतरविले होते. त्या विमानात १२६ प्रवासी होते. त्या सर्व प्रवाशांची पर्यायी व्यवस्था करत ढाका येथे सुरक्षितरित्या पोहचविण्यात आले होते. तर कय्युम याच्यावर किंग्जवे हॉस्पिटलमध्ये डॉ. सुब्रजित दासगुप्ता, डॉ. रंजन बोरकर, डॉ. वीरेंद्र बेलेकर यांच्या मार्गदर्शनात उपचार सुरू होते. वाचा: मेंदूमध्ये अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने कय्युम कोमात गेले होते. रविवारी ते ब्रेन डेड झाल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यांना वाचविण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही. सोमवारी सकाळी ११ वाजतादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, नौशाद कय्युम यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९७७ रोजी ढाका येथे झाला. २० सप्टेंबर २००२ मध्ये बिमान बांगलादेश एअरलाईन्समध्ये वैमानिक म्हणून रुजू झाले होते. वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

राज्यात करोना रुग्णसंख्येमध्ये घट; तिसऱ्या लाटेचा धोका असतानाच...

मुंबई: राज्यात संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असताना दुसरी लाट आता बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे. दैनंदिन रुग्णसंख्या आता हळूहळू कमी होऊ लागली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ३ हजार ७४१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर त्याचवेळी ४ हजार ६९६ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. आज करोनाने आणखी ५२ रुग्ण दगावले आहेत तर राज्यातील मृत्यूदर सध्या २.१२ टक्के इतका आहे. ( ) वाचा: राज्यात करोनाचा ग्राफ खाली येत आहे. नवीन बाधितांच्या तुलनेत करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आजच्या नोंदीनुसार राज्यात करोनाचे ५१ हजार ८३४ आहेत. यात मुंबईबाबत दिलासा देणारी बातमी म्हणजे मुंबईतील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता ३ हजार ५०४ इतकी खाली आली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक १२ हजार ७१७ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर जिल्ह्यात ही संख्या ७ हजार १५६ इतकी आहे. अहमदनगर जिल्ह्यात ५ हजार ९६१, सातारा जिल्ह्यात ५ हजार ४२१, सांगली जिल्ह्यात ४ हजार ३५६, सोलापूर जिल्ह्यात ४ हजार ६८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या जिल्ह्यातील स्थिती वेगाने सुधारत असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या १ हजार ४७० इतकी आहे. वाचा: करोना संसर्गाची राज्यातील आजची स्थिती - राज्यात आज ५२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. - सध्या राज्यातील करोना मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. - आज राज्यात ३ हजार ७४१ नवीन रुग्णांचे निदान. - आज ४ हजार ६९६ रुग्ण बरे होऊन परतले घरी. - राज्यात आजपर्यंत एकूण ६२,६८,११२ करोना बाधित रुग्ण झाले बरे. - राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.०२ % एवढे. - आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,३८,१२,८२७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,६०,६८० (१२.०१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले. - सध्या राज्यात २,८८,४८९ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर २,२९९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. - राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या सध्या ५१ हजार ८३४ इतकी. वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

'आमची ईडी लागली, आता...'; गिरीश महाजनांचं खडसेंना खुलं आव्हान

जळगाव: गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली आणि सीडी बाबतची चर्चा आता जुनी झाली आहे. मात्र, आता ईडी लागली असल्याने त्यांनी आता सीडी दाखवावी, असे आव्हान माजी मंत्री आमदार यांनी काँग्रेसचे नेते यांना दिले आहे. ( ) वाचा : जळगाव जिल्ह्यातील नेते गिरीश महाजन व राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यात मागील वर्षापासून ईडी व सीडी वरून जुगलबंदी सुरू आहे. काल एकनाथ खडसे यांनी माझी ईडीची चौकशी सुरू आहे त्यामुळे मी म्हटल्यानुसार योग्य वेळ आल्यावर सीडी लावणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्याच अनुषंगाने आज भाजप नेते गिरीश महाजन यांनी खडसेंवर पलटवार केला आहे. आज जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीनंतर गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वाचा: यावेळी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, ईडी अन् सीडीचा विषय आता बोअर झाला आहे, आमची ईडी तर चालली आहे, तुमची सीडी तर दाखवा. सीडी बाहेर येईल का नाही ते नेत्यांनाच विचारा? ते म्हणताहेत चौकशी करताहेत, तपासताहेत त्यामुळे आता समजेल योग्य वेळ कोणाची येते ते? अशा शब्दांत महाजन यांनी खडसेंचे नाव न घेता टोला लगावला. ...तर मंदिरे आम्ही उघडणार करोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे आता अनेक निर्बंध शिथील झाले आहेत. राजकीय कार्यक्रम मोठ्या संख्येने होत आहेत, तसेच इतर राज्यांमध्ये देखील मंदिरे उघडली गेली आहेत. मात्र राज्य शासनाकडून अजूनही मंदिरे उघडण्याबाबत कोणताही निर्णय घेतला जात नसल्याने आज भाजप कडून मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करून राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य शासनाने आता मंदिरे उघडली नाहीत तर आम्ही ती मंदिरे उघडू, असा इशारा गिरीश महाजन यांनी दिला आहे. वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

माझा स्टॅन स्वामी होऊ नये!; सचिन वाझेने कोर्टात व्यक्त केली 'ही' भीती

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या टॉवरजवळ कारमध्ये ठेवण्यात आलेली स्फोटकं आणि याच कारचा मालक याची ठाण्यात झालेली हत्या या प्रकरणात अटकेत असलेला आणि दलातून बडतर्फ करण्यात आलेल्या याला हृदयविकारावरील उपचारांबाबत कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. दरम्यान, वाझेला आणखी दोन दिवसांची एनआयए कोठडी देण्याची विनंती कोर्टाने फेटाळली आहे. ( ) वाचा : सचिन वाझेने हृदयविकारावर खासगी रुग्णालयात उपचार घेण्याविषयी विशेष एनआयए कोर्टाकडे परवानगी मागितली होती. त्यात कोकिलाबेन, सुराना किंवा सैफी रुग्णालय यापैकी एका रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी परवानगी मिळावी, असे नमूद करण्यात आले होते. माझी गत कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी फादर यांच्याप्रमाणे होऊ नये, अशी भीतीही वाझेने कोर्टासमोर व्यक्त केली. वाझेचे म्हणणे ऐकल्यानंतर विशेष एनआयए कोर्टाने खासगी रुग्णालयात उपचार घेण्यास परवानगी दिली. त्यानुसार आता वाझे याला सुराना रुग्णालयामध्ये उपचार घेता येणार आहेत. सचिन वाझे याच्यावर ओपन हार्ट सर्जरी करावी लागणार आहे. तसा रिपोर्ट मुंबईतील जे. जे. रुग्णालयातून देण्यात आला आहे. जे. जे. रुग्णालयात हृदयविकाराच्या अनुषंगाने विविध तपासण्या करण्यात आल्या. त्याचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर डॉक्टरांनी ओपन हार्ट सर्जरी करण्याचा सल्ला दिल्याचे वाझेच्या वकिलांनी कोर्टात सांगितले होते. वाचा: दरम्यान, सचिन वाझे याची आणखी चौकशी करण्यासाठी दोन दिवसांकरिता ताबा देण्याची विनंती एनआयएने केली होती. ही विनंती विशेष एनआयए कोर्टाने फेटाळली. वाझे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. स्टॅन स्वामींचे उदाहरण का दिले? एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी फादर स्टॅन स्वामी यांचा काही महिन्यांपूर्वीच मृत्यू झाला. निधनसमयी ते ८४ वर्षांचे होते. स्वामी यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. त्यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आले होते. तिथे असतानाच प्रकृती अधिक खालावल्यानंतर त्यांना वांद्रे येथील होली फॅमिली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हायकोर्टात स्वामी यांनी जामिनासाठी अर्ज केला होता मात्र न्यायालयीन कोठडीदरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी हायकोर्टाने दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. आज वाझे याच्या वकिलांनी खासगी रुग्णालयात उपचारांसाठी परवानगी मागताना याच घटनेचा दाखला दिला. वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

रस्त्यातच पत्नीसोबतचा वाद विकोपाला गेला आणि पतीने स्वत:चा गळा चिरला!

औरंगाबाद: मध्यवर्ती बसस्थानक परिसरात एकाने स्वतःचा गळा कापून (Suicide Attempt Case) केल्याची घटना मध्यरात्री घडली. या घटनेची माहिती मिळताच क्रांती चौक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सदर व्यक्तीला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक जोडपं मध्यवर्ती बस स्थानकात आलं होतं. या दोघांमध्ये वादावादी सुरू होती. काही काळानंतर हा वाद आणखीनच वाढला आणि संबंधित व्यक्तीने रागाच्या भरात स्वतःचा गळा चिरला. या पुरुषासोबत असलेल्या महिलेने ही घटना पाहताच आरडाओरडा करून आसपासच्या लोकांना जमवलं. मध्यवर्ती बस स्थानकातील पोलीस व वाहतूक पोलीस यांनी पुढाकार घेत सदर व्यक्तीला उपचारासाठी घाटी रुग्णालय दाखल केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर व्यक्ती आणि महिला हे दोघे पती-पत्नी असून काही कौटुंबिक वादामुळे सदर व्यक्तीने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, जखमी व्यक्तीवर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर झाल्यानंतर जबाब घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती क्रांती चौक पोलिसांनी दिली.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

सांगली जिल्ह्यातील एकाच गावात २ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

: आर्थिकदृष्ट्या सधन समजल्या जाणाऱ्या कृष्णा काठावर अंकलखोप (ता. पलूस) येथे वेगवेगळ्या दोन ठिकाणी शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. गणेश बाळासो सूर्यवंशी (वय ४०) आणि गणपती रावसो चौगुले (वय ४५, दोघेही रा. अंकलखोप, ता. पलूस) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. या घटनेची नोंद भिलवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. महापुरानंतर कृष्णाकाठावर तीन शेतकर्‍यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती आणि त्यातून वाढता कर्जाचा बोजा यामुळे शेतकऱ्यांची मानसिक स्थिती ढासळत असल्याचं यातून दिसत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गणेश सूर्यवंशी हे शेतीबरोबर गाडी भाडेतत्त्वावर चालवण्याचा व्यवसाय करत होते. मागील महिन्यात आलेल्या महापुरामुळे शेतीचं मोठे नुकसान झालं. लॉकडाऊनमुळे वाहन व्यवसायही ठप्प होता. त्यामुळे आर्थिक विवंचनेत असलेले सूर्यवंशी अस्वस्थ होते. गाडीचा व्यवसाय बंद झाल्यामुळे कर्जाचे हप्ते थकले होते. कर्जाला कंटाळून त्यांनी रविवार रात्री औदुंबर फाटा येथील रामफळाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी निदर्शनास आला. दुसऱ्या घटनेत अंकलखोप गावातील गहिणीनाथनगर येथील गणपती चौगुले यांनी रविवारी रात्री घरात कोणी नसल्याचे पाहून घरातील पंख्याला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी गणपती चौगुले त्यांच्या मुलगा लक्षात आली. गणपतीच्या मुलीचे बाळंतपण झाल्यामुळे गणपतीची पत्नी मुलीच्या सासरी गेली होती. तर मुलगा भावाच्या घरी झोपण्यास गेला होता. सकाळी मुलगा घरी आल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. बँकांचे कर्ज थकल्यामुळे गणपती चौगुले हे गेल्या काही महिन्यांपासून अस्वस्थ होते. या घटनेची फिर्याद भाऊ महादेव चौगुले यांनी दिली आहे. दरम्यान, सतत येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या महिन्यात येऊन गेलेल्या महापुरात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं. सरकारकडून अद्यापही मदत मिळाली नसल्याने शेतकरी नाराज आहेत.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

new action plan against corona: करोनाची तिसरी लाट रोखणार; मुंबई महापालिकेचा हा 'अॅक्शन प्लान' तयार

मुंबई: मुंबईला करोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेत मुंबई महानगरपालिका सावध झाली असून ही लाट थोपवून धरण्यासाठी महापालिकेने आपला कठोर नियमांचा ‘अॅक्शन प्लान’ तयार केला आहे. नव्या अॅक्शन प्लॅननसुरा आता करोना प्रतिबंधक नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यात महत्वाचे म्हणजे सील करण्यात आलेल्या इमारतींवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, अशा इमारतींमधील रहिवाशांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात येणार आहे. तसेच बाहेरील व्यक्तींना देखील इमारतीत प्रवेश करण्याला मनाई करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी या संदर्भात नवी मार्गदर्शक तत्वे जारी केली. या नव्या नियमांची कठोर अंमलबाजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले. (mumbai municipal corporation prepares new action plan to curb third wave of corona) क्लिक करा आणि वाचा- मास्क न लावणाऱ्यांवर होणार अधिक कठोर कारवाई आता मास्क लावण्याच्या नियमावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. मास्क न लावणाऱ्यांवर अधिक कठोर दंडात्मक कारवाई करण्यात यावी असे स्पष्ट निर्देशच आयुक्त चहल यांनी सर्व २४ प्रशासकीय विभागांना दिले आहेत. या नियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘क्लीन-अप मार्शल’ची तात्पुरती नियुक्ती करण्यात येणार आहे. पोलिसांनी देखील ‘विना मास्क’ विषयक कारवाई अधिक तीव्र करावी अशा सूचनाही चहल यांनी पोलिस दलाला केल्या आहेत. क्लिक करा आणि वाचा- काय आहेत महापालिकेच्या सूचना? > पाच किंवा पाचपेक्षा अधिक कोविड बाधित रुग्ण आढळून आल्याने इमारत ‘सील’ करण्याच्या नियमाची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे व अधिक कठोरपणे करण्यात यावी > बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सील करण्यात आलेल्या इमारतींमध्ये प्रवेश करण्यास कोणालाही अनुमती असणार नाही. > इमारतींमध्ये असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला बाहेर पडण्यास मनाई असणार आहे. त्याचबरोबर अशा इमारतींमध्ये विविध कामांसाठी येणारे कामगार, वाहन चालक यांना देखील सदर कालावधी दरम्यान इमारतीमध्ये प्रवेश असणार नाही. > सर्व सील इमारतींच्या गेटवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार. > कोविड प्रतिबंधाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या 'मास्क परिधान करणे', 'सामाजिक अंतर राखणे' आणि 'वारंवार योग्यप्रकारे साबणाने हात धुणे', या ३ बाबींचे परिपूर्ण पालन सर्व ठिकाणी योग्यप्रकारे होत असल्याची खातरजमा करण्यात यावी. तसेच त्याबाबत जनजागृती नियमितपणे करण्यात यावी. > योग्यप्रकारे मास्क परिधान न करणे, सामाजिक अंतर राखले न जाणे हे प्रकार आढळल्यास पुन्हा एकदा अधिक कडक निर्बंध लागू होऊ शकतात. > मास्क न लावणाऱ्यांवर करण्यात येत असलेली दंडात्मक कारवाई अधिक तीव्र करण्याचे निर्देश. त्यासाठी आवश्यक तेवढ्या संख्येतील ‘क्लीन-अप मार्शल’ ची तात्पुरती नियुक्ती करण्यात येणार. > मुंबई पोलिसांद्वारे करण्यात येत असलेली ‘विना मास्क’ विषयक कारवाई देखील अधिक तीव्र करणार. यासाठी मनपा क्षेत्रात दररोज अधिकाधिक व्यक्तींवर कठोरपणे दंडात्मक कारवाई करण्यात येणार. > करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता महानगरपालिकेची सर्व रुग्णालये आणि जम्बो कोविड रुग्णालये यांना सतर्क व सुसज्ज ठेवण्याचे महापालिका आयुक्तांचे निर्देश. > ऑक्सिजनची केंद्रे सुरू करण्यात आलेल्या रुग्णालयांमध्ये व जम्बो कोविड रुग्णालयांमध्ये क्षमतेची चाचणी घेण्यात यावी, तसेच रुग्णालयांमधील प्रत्येक ऑक्सिजन बेडपर्यंत ऑक्सिजन योग्यप्रकारे व योग्य प्रमाणात पोहोचत असल्याची खातरजमा करणे. > करोना चाचण्या लवकरात लवकर व्हाव्यात यासाठी महापालिका क्षेत्रात २६६ कोविड चाचणी केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. > तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये कार्यरत असणारे नियंत्रण कक्ष (वॉर्ड वॉर रुम) अद्ययावत करण्यात यावेत. > महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये असणाऱ्या सार्वजनिक शौचालयांचे दिवसातून ५ वेळा निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) करावे. > महानगरपालिका क्षेत्रातील १८ वर्षे आणि त्याहून अधिक वय असणाऱ्या सुमारे ७४ टक्के नागरिकांचे एक लसीकरण झालेले असून उर्वरित २६ टक्के नागरिकांचे लसीकरण करण्यात यावे. > कोविड व्यतिरिक्त हिवताप (मलेरिया), डेंग्यू या आजारांबाबत देखील सजग व सतर्क राहावे. क्लिक करा आणि वाचा-

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

मासेमारी करण्यासाठी गेलेल्या महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू

: कुटुंबियासोबत मासेमारी करण्यासाठी गेलेल्या महिलेचा नदीत झाला आहे. समोती गोपाल पटोरकर (५५) असं या मृत महिलेचं नाव आहे. तब्बल दोन दिवसांनंतर कारदा येथून समोती यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून शवविच्छेदनानंतर कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. पटोरकर कुटुंबातील काही सदस्य सिपना नदीवर मासेमारी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी समोती पटोरकर या पाण्याच्या प्रवाहासोबत दूरपर्यंत वाहून गेल्या. त्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला. कुटुंबियांकडून गावकऱ्यांच्या मदतीने समोती यांचा शोध घेण्यात आला. मात्र पाण्याच्या अथांग प्रवाहामुळे सायंकाळपर्यंत शोधमोहीम राबवूनही समोती यांना शोधण्यात अपयश आलं. या दरम्यान कुटुंबियांकडून पोलीस पाटलांच्या मदतीने धारणीच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. धारणी पोलिसांकडून महिलेचा शोध घेणे सुरू असताना सोमवारी त्यांचा मृतदेह कारदा येथून वाहणाऱ्या सिपनेच्या पात्रात तेथील गावकऱ्यांना आढळला. ही माहिती स्थानिक पोलीस पाटलांकडून पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्यापर्यंत भ्रमणध्वनीमार्फत पुरवण्यात आली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योत्सना महाजन, पोलीस उपनिरीक्षक करूणा मोरे, बिट अमलदार रवि पाखरे, महेश कळे, गणेश घुले यांच्याकडून लगेच घटनास्थळी पोहोचून समोती यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. घटनेचा पंचनामा उरकून घटनास्थळीच वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत मृतदेहाची उत्तरीय तपाणी आटोपण्यात आली. पोलीस दप्तरी आकस्मिक मृत्यूची नोंद करून सदर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी पटोरकर कुटुंबियांच्या स्वाधीन केला आहे. महिलेच्या मृत्यूने चिपोली गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

लाखाची लाच घेताना तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात; शिपायावर देखील कारवाई

म. टा. प्रतिनिधी, ठाणे जमिनीबाबतच्या हरकतीवरील सुनावणीचे निकालपत्र देण्यासाठी लाच घेणाऱ्या कल्याणच्या तहसीलदारासह शिपायाला सोमवारी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( takes action against the tehsildar of ) तक्रारदाराच्या बांधकाम कंपनीने कल्याण तालुक्यातील वरप येथे जमीन घेतली असून या जमिनीबाबतच्या हरकतीवरील सुनावणीचे निकालपत्र देण्यासाठी कल्याणचे तहसिलदार दिपक आकडे यांनी स्वत:साठी एक लाखांची लाच मागितली. तसेच लाचेची रक्कम कार्यालयातील शिपाई बाबू उर्फ मनोहर हरड यांच्याकडे देण्यास सांगितले. हरड यांनीही स्वत:साठी आणि कर्मचाऱ्यांसाठी २० हजारांची लाच मागितली होती. याबाबत २५ ऑगस्ट रोजी तक्रारदाराने एसीबीकडे दिलेल्या तक्रारीनंतर लाचेबाबत एसीबीने पडताळणी केली. क्लिक करा आणि वाचा- लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एसीबीने सोमवारी कल्याण तहसिलदार कार्यालयात लावलेल्या सापळ्यात आकडे आणि हरड अडकले. तक्रारदार यांच्याकडून आकडे यांच्यासाठी एक लाख आणि हरड यांनी स्वत:साठी २० हजार असे एकूण १ लाख २० हजारांची लाच घेताना आकडे आणि हरड यांना रंगेहात पकडण्यात आले. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Jyoti Deore: तहसीलदार ज्योती देवरे यांच्यावर गंभीर आरोप; थेट लोकायुक्तांकडे तक्रार

अहमदनगर : आत्महत्येचा इशारा देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने चर्चेत आलेल्या येथील तहसीलदार यांच्याविरुद्ध आता लोकायुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध खातेनिहाय चौकशी आणि अन्य प्रकरणांच्या आधारे भ्रष्टाचार केल्याची तक्रार पारनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी दाखल केली आहे. देवरे यांच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनातून अद्याप मार्ग निघालेला नाही. त्यांच्याविरुद्धच्या चौकशीचे निर्णयही प्रलंबित आहेत. त्यातच आता थेट लोकायुक्तांकडे तक्रार दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ( ) वाचा: पारनेर तालुक्यातील , संदीप चौधरी, ज्ञानेश्वर लंके व सुहास सालके यांनी ज्योती देवरे यांच्याविरुद्ध लोकायुक्तांकडे तक्रार केली आहे. त्यांच्यावतीने पुण्यातील अ‍ॅड. असीम सरोदे, अ‍ॅड. अजित देशपांडे व अ‍ॅड. अक्षय देसाई यांनी ही ऑनलाइन याचिका सोमवारी दाखल केली आहे. महाराष्ट्राच्या लोकायुक्त पदावर नुकतीच न्यायमूर्ती यांची नियुक्ती झाल्यानंतर दाखल झालेले हे पहिलेच मोठे प्रकरण ठरले आहे. वाचा: या याचिकेत देवरे यांच्यावर तक्रारदारांनी अनेक आरोप केले आहेत. स्वतःच्या लोकसेवक पदाचा गैरवापर करून व्यक्तिगत हितासाठी, भ्रष्ट हेतुने अनेक पातळ्यांवर भ्रष्टाचार करणे, वाळूमाफियांना परस्पर कारवाईमुक्त करणे, बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांचे ट्रॅक्टर, डम्पर, जेसीबी मशीन्स व पोकलेन अशी वाहने कोणतीही तडजोड शुल्क सरकारला जमा न करता परस्पर सोडून देणे अशा अनेक प्रकरणात ज्योती देवरे यांनी तब्बल पाच कोटी, ९४ लाख रुपयांच्यावर घोटाळा केला आहे, असा आरोप लोकायुक्तांकडे केलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. यासंबंधी अनेक पुरावे याचिकेसोबत जोडण्यात आले आहेत. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी केलेल्या चौकशीच्या अहवालाचाही आधार घेण्यात आला आहे. नगरच नव्हे तर धुळे येथे कार्यरत असतानाच्या काळातील तक्रारींचाही यामध्ये समावेश आहे. वाचा: यासंबंधी याचिकाकर्त्यांचे वकील अ‍ॅड. सरोदे म्हणाले, ‘हे अतिशय दुर्दैवी आणि विरोधाभासी चित्र आहे की देवरे या सध्या ज्या तालुक्यामध्ये कार्यरत आहेत त्याच तालुक्यात समाजसुधारक आणि भ्रष्टाचार विरोधातील अग्रगण्य व्यक्तिमत्व यांचे गाव राळेगणसिद्धी देखील आहे. हजारे हे लोकपाल आणि लोकायुक्त कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी व भ्रष्टाचारमुक्त समाजासाठी लढत आहेत. लोकसेवेत असलेल्या व्यक्तीने विविध मार्गांनी भ्रष्टाचार करणे, झटपट पैसा मिळविण्यासाठी स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करणे, अपारदर्शक व्यवस्थापन असणे व जनतेच्या सेवेसाठी तयार करण्यात आलेल्या नागरिकांसाठीच्या सनदेचे पालन न करणे हा 'कुप्रशासनाचा' भाग आहे. काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण प्रशासन व लोकशाहीवरील सामान्य माणसाचा विश्वास कमी होणे धोकादायक आहे.' वाचा :

from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

सांगलीत मानसोपचार तज्ज्ञाच्या घरावर हल्ला; 'या' कारणातून दहशत माजवण्याचा प्रयत्न

: इस्लामपूर शहरातील ओंकार कॉलनी येथे मानसोपचार तज्ज्ञ कालिदास पाटील यांच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तसंच घरातील वस्तूंची तोडफोडही केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. कोयता, हॉकीस्टिक व काठ्या हातात घेऊन जमावाने परिसरात दहशत माजवली. दुचाकी, कॉम्प्युटर, सीसीटीव्ही आणि दरवाजाच्या काचा फोडून तब्बल ५ लाख रुपयांचं नुकसान करण्यात आलं आहे. याप्रकरणी कालिदास पाटील यांच्या फिर्यादीनुसार माणिक मोरे, जयदीप मोरे यांच्यासह ५० अनोळखी इसमांवर इस्लामपूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. इस्लामपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २००९ मध्ये कालिदास पाटील यांनी प्रदीप अग्रवाल यांच्याकडून साडेतीन गुंठे जमीन विकत घेतली होती. त्या जागेवर इमारत उभारून कंपाऊंड केले होते. कंपाऊंडच्या दक्षिणेला असणारी १५ बाय ६० फुटांची मोकळी जागा कालिदास पाटील यांच्या मालकीची आहे. परंतु ही जागा वडिलोपार्जित असून आम्ही त्या जागेचे मूळ मालक आहोत, असं माणिक व जयदीप मोरे यांचं म्हणणं आहे. सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास कालिदास पाटील यांच्या घराबाहेर अचानकपणे ३० ते ४० जणांचा जमाव जमला. त्यांनी आरडाओरडा करत घरातील व परिसरातील वस्तूंची तोडफोड केली. पाटील यांच्या क्लिनिकमध्ये माणिक मोरे, जयदीप मोरे यांच्यासह सुमारे ५० जणांनी हातामध्ये कोयता, हॉकीस्टिक व काठ्या घेऊन तोडफोड केली. पाटील यांच्या कंपाऊंडला लावलेले लोखंडी गेट जमावाने तोडलं. तसंच आवारातील दोन दुचाकींची मोडतोड केली आणि झाडांच्या कुंड्याही फेकून दिल्या. दरम्यान, डॉक्टर कुठे आहे, त्याला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी यावेळी देण्यात आली आहे. या प्रकाराने परिसरात दहशत निर्माण झाली असून कालिदास पाटील यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ५२ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

धक्कादायक! गळा दाबून मुलीला ठार मारण्याचा प्रयत्न; अभियंत्याला अटक

नागपूर: अभियंत्याने गळा दाबून १२ वर्षीय केला. ही थरारक घटना जुना सुभेदारमधील चक्रधरनगर येथे रविवारी रात्री घडली. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करून केली. अतुल नरेंद्र अतकर वय ४३, असे अटकेतील अभियंत्याचे तर चवी अतुल अतकर वय १२,असे मुलीचे नाव आहे. ( for trying to end life of his girl in nagpur) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अतुल याचे वडील नरेंद्र (वय ७८) हे कृषी विभागाचे निवृत्त अधिकारी असून, ते पोलिसांविरुद्ध सुरू असलेल्या प्राथमिक चौकशीचे खटले चालवितात.अतुल हा खासगी कंपनीत काम करायचा. २०१८ मध्ये त्याची नोकरी सुटली. तेव्हापासून तो बेरोजगार आहे. अतुल याला दोन मुली आहेत. कौटुंबीक कलहामुळे त्याची पत्नी लहान मुलीला घेऊन माहेरी गेली. क्लिक करा आणि वाचा- यादरम्यान, अतुलला दारूचे व्यसन जडले. रविवारी रात्री अतुल हा दारू पिऊन घरी आला. मुलीसह तो खोलीत झोपायला गेला. याचदरम्यान चवीने आरडाओरड केली. नरेंद्र खोलीत गेले. चवी उलटी करीत होती. नरेंद्र यांनी तिला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारानंतर ती शुद्धीवर आली. वडिलाने गळा आवळ्याचे तिने नरेंद्र यांना सांगितले. नरेंद्र यांनी हुडकेश्वर पोलिसांत तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सार्थक नेहते यांनी गुन्हा दाखल करून अतुल याला अटक केली. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

धक्कादायक! पैसे दुप्पट करण्यासाठी ४ लाख रुपये गरम पाण्यात टाकायला सांगितले आणि...

: पैसे दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने फळ विक्रेत्याला चार लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या पश्चिम बंगालच्या टोळीतील दोन भामट्यांना पारडी पोलिसांनी अटक केली आहे. सौमिक सुजयकुमार घोष (वय ३७) आणि इद्रिस युनूस मिस्त्री (वय ४८ दोन्ही रा. दक्षिण परगना, पश्चिम बंगाल ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. जुलै महिन्यात आरोपींचा साथीदार खैरुल शेख हा फळविक्रेते लीलाधर मनोहर शाहू (वय ३९,रा.शिवनगर) यांच्या दुकानात आला. त्याने शाहू यांना पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवलं. २५ जुलैला शेख व त्याचे तीन साथीदार शाहू यांच्या घरी गेले. त्याने शाहू यांना बादलीत गरम पाणी आणायला लावले. भामट्यांनी पाण्यात रसायन टाकले. त्यात शाहू यांनी दिलेल्या चार लाख रुपयांच्या नोटा टाकण्याचा बनाव केला व बादलीवर झाकण ठेवले. काही वेळाने झाकण उघडून बघा, असं सांगून शेख व त्याचे साथीदार पैसे घेऊन फरार झाले. काही वेळाने शाहू यांनी बादलीचे झाकण उघडून बघितले असता त्यात केवळ १०० रुपयांच्या आठ नोटा होत्या. याप्रकरणी शाहू यांनी पारडी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलीस उपायुक्त निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पारडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कोटकाने, निरीक्षक शिंदे, सहायक निरीक्षक मारुती शेळके, शिपाई विजय दासरवार, कृष्णा इवनाते, भूषण झरकर यांनी भामट्यांचा शोध सुरू केला. पोलिसांनी त्यांचे मोबाइल लोकेशन तपासले. त्यावेळी भामटे पश्चिम बंगालमध्ये असल्याचं स्पष्ट झालं. त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचं पथक बंगालमध्ये गेलं आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने पारडी पोलिसांनी दोघांना अटक केली.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

नारायण राणे हे भाजपला मुंबई जिंकून देऊ शकतील?

राज्यातील मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. प्रत्येक पक्षानं आपापल्या परीनं महापालिकांची तयारी सुरू केली आहे. त्यातही मुंबई महापालिकेची निवडणूक नेमकी कशी होणार, याकडं सर्वाचं लक्ष असेल. कारण, राज्यातील सध्याचे दोन कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले शिवसेना आणि भाजप हे दोन पक्ष मुंबई जिंकण्यासाठी अटीतटीची लढाई लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिपदी लागलेली वर्णी हा भाजपच्या याच रणनीतीचा एक भाग असल्याचं बोललं जात आहे. भाजपनं खेळलेली ही चाल यशस्वी होईल का? नारायण राणे भाजपला मुंबई जिंकून देऊ शकतील का? याचा घेतलेला हा वेध...

नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिपदी लागलेली वर्णी हा भाजपच्या मुंबई जिंकण्याच्या रणनीतीचा एक भाग असल्याचं बोललं जात आहे. भाजपनं खेळलेली ही चाल यशस्वी होईल का? याचा हा वेध...

नारायण राणे हे भाजपला मुंबई जिंकून देऊ शकतील?

राज्यातील मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. प्रत्येक पक्षानं आपापल्या परीनं महापालिकांची तयारी सुरू केली आहे. त्यातही मुंबई महापालिकेची निवडणूक नेमकी कशी होणार, याकडं सर्वाचं लक्ष असेल. कारण, राज्यातील सध्याचे दोन कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले शिवसेना आणि भाजप हे दोन पक्ष मुंबई जिंकण्यासाठी अटीतटीची लढाई लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिपदी लागलेली वर्णी हा भाजपच्या याच रणनीतीचा एक भाग असल्याचं बोललं जात आहे. भाजपनं खेळलेली ही चाल यशस्वी होईल का? नारायण राणे भाजपला मुंबई जिंकून देऊ शकतील का? याचा घेतलेला हा वेध...​पुन्हा शिवसेना विरुद्ध भाजप
​पुन्हा शिवसेना विरुद्ध भाजप

मुंबई महापालिकेची निवडणूक ही आजवर शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी होत आली आहे. २०१७ ची निवडणूक त्यास अपवाद ठरली होती. राज्यात सत्तेत असतानाही शिवसेना व भाजप हे एकमेकांच्या विरोधात लढले होते. त्यावेळी भाजपनं शिवसेनेला अटीतटीची लढत दिली होती. मात्र, निकालानंतर भाजपनं नमतं घेत शिवसेनेला महापालिकेत महापौर बसवण्याची संधी दिली. अर्थात, त्यावेळी राज्यातील सत्तेत काही गडबड होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता. आता मात्र युती तुटल्यानंतर आणि शिवसेनेनं थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत संसार थाटल्यानंतर भाजप निर्णायक लढाईसाठी सज्ज झाला आहे. नारायण राणे हे त्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असा भाजपचा होरा आहे.नारायण राणेच का?
नारायण राणेच का?

मागील निवडणुकीत भाजपनं शिवसेनेला 'काँटे की टक्कर' दिली होती. मात्र, स्वबळावर सत्ता मिळवण्याचे सोडाच, मुंबईत भाजपला शिवसेनेपेक्षा जास्त जागाही मिळवता आल्या नव्हत्या. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतानाही भाजपला ते शक्य झालं नव्हतं. ही उणीव भरून काढण्यासाठी भाजपला एका आक्रमक नेतृत्वाची गरज होती. ती उणीव राणे भरून काढतील, असं भाजपला वाटतं. भाजपनं अधिकृतपणे कुठलीही घोषणा केली नसली तरी राणे हे मुंबईत भाजपचे स्टार प्रचारक असणार हे आता स्प्ष्ट झालं आहे.​मुंबई हेच कार्यक्षेत्र
​मुंबई हेच कार्यक्षेत्र

राज्य पातळीवर भाजपमध्ये अनेक नेते असले तरी मुंबईतील मतदारांना आकर्षित करेल, असा एकही नेता नाही. मुंबईतील कोकणी माणूस हा शिवसेनेचा पारंपरिक मतदार आहे. नारायण राणे हे मुंबईतील कोकणी माणसाला भाजपकडं वळवू शकतात. सुरुवातीच्या काळात राणेंचं कार्यक्षेत्र मुंबई होतं. ते मुंबई महापालिकेत नगरसेवक होते. बेस्ट समितीचे अध्यक्ष होते. त्यामुळं महापालिकेतील आणि मुंबईतील राजकारणाच्या सगळ्या खाचाखोचा त्यांना माहीत आहेत. ते शिवसेनेच्या कारभाराला नेमकेपणाने लक्ष्य करू शकतात, असाही एक अंदाज आहे.​नारायण राणे आणि राज ठाकरे
​नारायण राणे आणि राज ठाकरे

मुंबई महापालिका निवडणुकीतील मनसेची भूमिका व कामगिरी निवडणूक निकालावर परिणाम करणारी ठरणार आहे. भाजप-मनसे युतीची चर्चा सध्या दबक्या आवाजात सुरू आहे. ही युती झाली नाही तरी भाजप व मनसे या दोन्ही पक्षांचे लक्ष्य शिवसेना हेच असणार आहे. अशा परिस्थितीत दोन्ही पक्ष परस्परांवर टीका न करता निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी पडद्यामागे बरंच काही घडू शकतं. अशा वेळी देखील राणे हे भाजपसाठी उपयुक्त ठरू शकतात. नारायण राणे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर राग असला तरी राज ठाकरेंशी त्यांचे उत्तम संबंध आहेत. हे संबंध महापालिका निवडणुकीत छुप्या राजकीय सहकार्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.​१५ वर्षांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय!
​१५ वर्षांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय!

नारायण राणे हे अभ्यासू, आक्रमक आणि संघटन कुशल नेते आहेत, याबाबत कुणाचंही दुमत नाही. शिवसेना सोडल्यानंतरही काही वर्षे राणेंचा राजकीय प्रभाव टिकून होता. त्या जोरावर त्यांनी काँग्रेसमध्ये मंत्रिपद मिळवलं. मात्र, त्यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारता आली नाही. उलट उत्तरोत्तर त्यांचा प्रभाव कमी होत गेल्याचं दिसतं. सिंधुदुर्गात त्यांना पराभव पत्करावा लागला. मुंबईत वांद्रे येथील विधानसभा पोटनिवडणुकीतही त्यांचा पराभव झाला. राणेंचे पुत्र नीलेश राणे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. केंद्रीय मंत्री झाल्यामुळं त्यांचं वजन वाढल्याचं बोललं जात असतानाच, त्यांना अटकही करण्यात आली. हे सगळं बघता नारायण राणे यांचा मुंबईतील मतदारांवर कितपत प्रभाव पडेल, याबाबत साशंकता आहे.​शिवसेनेचं संघटनात्मक जाळं
​शिवसेनेचं संघटनात्मक जाळं

मुंबई महापालिकेत शिवसेनेला मात देणं ही सहजसोपी गोष्ट नाही. मागील निवडणुकीत भाजपनं सर्व प्रकारची ताकद लावूनही ते शक्य झालं नाही. शिवसेनेची मुंबईतील संघटनात्मक बांधणी हे त्याचं मुख्य कारण आहे. अन्य पक्षांच्या तुलनेत शिवसैनिक व शिवसेनेचे पदाधिकारी मुंबईकरांना सहज उपलब्ध असतात. गटप्रमुखांपासून ते शाखाप्रमुखांपर्यंत प्रत्येकाचा सामान्यातल्या सामान्य माणसाशी संपर्क असतो. गेल्या काही वर्षांपासून युवा सेनेनंही मुंबईत चांगलंच बस्तान बसवलं आहे. त्यामुळं मनसेकडं गेलेला युवा वर्ग पुन्हा शिवसेनेकडं आला आहे. मुंबईत गेल्या वर्षभरापासून शिवसेनेच्या नगरसेवकांनी छोटीमोठी कामं सुरू केली आहेत. त्यातच नारायण राणे यांच्या अटक प्रकरणानंतर शिवसैनिकांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळं यावेळच्या निवडणुकीत शिवसैनिक अधिक त्वेषानं उतरण्याची शक्यता आहे.​मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
​मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व हे देखील मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महत्त्वाचं ठरणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी संघटनेची धुरा यशस्वीरित्या सांभाळली आहेच, शिवाय मुख्यमंत्री म्हणूनही ते लोकप्रिय ठरले आहेत. करोना काळात त्यांनी संयमानं व खंबीरपणे केलेलं कामही चर्चेचा विषय ठरलं आहे. त्यांच्या या प्रतिमेचा फायदाही शिवसेनेला निश्चितच होणार आहे. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर नेतृत्वाखाली यावेळी मुंबईची निवडणूक लढविली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं युवा शिवसैनिकही जोमानं कामाला लागण्याची शक्यता आहे. परिमाणी नारायण राणेंना व पर्यायानं भाजपसाठी ही निवडणूक हे मोठं आव्हान असणार आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

सण साजरे करायच्या नादात केरळनं स्वतःला कोरोना रुग्णांच्या यादीत टॉपला नेऊन ठेवलंय…

देशभरता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, मागच्या काही दिवसात या तिसऱ्या लाटेची सुरुवात केरळमधून होतीय कि काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. कारण केरळमधली परिस्थिती सगळ्याच राज्यांपेक्षा वेगळी आहे. एकीकडे सगळीकडे रुग्णांची संख्या कमी होत असताना केरळमध्ये मात्र पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चाललीये.

राज्यात सलग चौथ्या दिवशी ३० हजारांहून अधिक प्रकरणांची नोंद झालीये. या संख्येने गेल्या ५८ दिवसांचा देशातला रेकॉर्ड ब्रेक केलाय.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच दिवसांत देशातील एकूण प्रकरणांपैकी ६६ टक्के प्रकरणं फक्त केरळमधलीचं आहेत.

गेल्या काही दिवसांपासून केरळच्या रुग्णांवर नजर टाकली तर २५ ऑगस्टला ३१ हजार ४४५ प्रकरणं, २६ ऑगस्टला ३० हजार ७७, २७ ऑगस्टला ३१ हजार ८०१ तर २८ ऑगस्टला ३१ हजार २६५ नवीन संक्रमितांची नोंद झाली. यासोबतच मृत रुग्णांच्या आकडेवारीकडे पाहिलं तर २५ ऑगस्टला २१५ रुग्णांचा मृत्यू झाला, २६ ऑगस्ट १६२, २७ ऑगस्ट १७९, तर २८ ऑगस्टला १५३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे.

आता या आकडेवारीवरूनच समजतंय की, केरळमधील परिस्थिती देशातील इतर राज्यांच्या तुलनेत खूपच गंभीर होत चाललीये. जिथे संक्रमित आणि मृत रुग्णांची संख्या दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांच्या तुलनेत खूप जास्त आहे.

आता केरळच्या तुलनेत महाराष्ट्र सारखं राज्य जिथं लोकसंख्या सर्वाधिक आहे आणि दोन्ही लाटेत राज्याला सर्वाधिक फटका बसला होता, तिथेही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालाय. इथे संक्रमितांची सांख्य ४ ते ५ हजारांच्या दरम्यान आहे.  तर मृतांच्या संख्येतही घसरण होताना दिसतेय.

एवढचं नाही तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान यासारख्या मोठ्या राज्यांमधील गेल्या काही  दिवसांचा रेकॉर्ड पहिला तर कोविडमुळे मृतांची संख्या मध्य प्रदेश आणि राजस्थानात शून्य, गुजरात आणि दिल्लीत एक आणि उत्तर प्रदेशात दोन अशी आहे. तर संक्रमितांच आकडा दिल्ली सोडला तर शंभरी कोणीच गाठलेली नाही.

अशा परिस्थितीत केरळ ही भारत सरकारसाठी समस्या बनली आहे. गुरुवारी भारताच्या गृह सचिवांनी राज्याच्या मुख्य सचिवांशी बोलून रात्रीच्या कर्फ्यूचा पर्याय स्वीकारण्याचा सल्ला दिला आणि राज्यातील सततच्या वाईट परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली.

मात्र केरळच्या या रुग्णवाढीसाठी प्रमुख कारण सांगितले जात आहे ते म्हणजे सण साजरे करण्याच्या हलगर्जीपणा.

कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरत असली तरी इतर राज्यांनी सार्वजनिक ठिकाणी जमा होण्याचे, कोणताही सण-उत्सव साजरे करण्यावर बंदी घातली होती. मात्र, केरळ सरकारने मनाचा मोठेपणा दाखवत ओणम आणि बकरी ईद साजरी करण्यास खूली सूट दिली. या उत्सवात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान त्यानंतर रूग्णांच्या संख्येचा आलेखही वाढतच चाललाय.  

महाराष्ट्रात गणेश चतुर्थी आणि दही हंडी सारख्या सणांना साजरी करण्याची मागणी होत असताना देखील, सरकारनं तिसऱ्या लाटेची खबरदारी घेत सन साजरी करण्याच्या आधीच कडक निर्बंध लादलेत. 

सुरुवातीच्या काळात केरळ मॉडेलला देशभरात नावजले गेले. मात्र सध्या सण आणि उत्सव साजरे करण्याच्या नादात केरळने स्वतःला कोरोना रुग्ण संख्येच्या यादीत टॉपला नेऊन ठेवलं आहे.  

सीएसआयआरच्या इन्स्टिट्यूट ऑफ जीनोमिक्स आणि इंटिग्रेटिव्ह बायोलॉजीच्या सर्वेक्षणानुसार,

९५ टक्के नमुन्यांमध्ये डेल्टा व्हायरस आढळला आहे, जो इतर प्रकारांपेक्षा खूपच संसर्गजन्य मानला जातो. डेल्टा व्हेरिएंट असलेल्या रूग्णांना रुग्णालयात दाखल होण्याचा धोका वाढतो आणि ते मृत्यूचे कारण असू शकते. म्हणूनच, २५ ऑगस्ट रोजी भारतात झालेल्या एकूण ६०५ पैकी २१५  आणि २८ ऑगस्ट रोजी भारतात ५०९ मृत्यूंपैकी १७९ मृत्यू एकट्या केरळमधले आहेत.  

देशभरातून केरळ राज्य आयसोलेट करण्याची मागणी होतेय

केरळमधली ही परिस्थिती पाहता इतर राज्यांना आपल्या भागात रूग्ण संख्या वाढण्याची भिती आहे. जी आता कुठं कमी झालीये. कारण पुन्हा जर रुग्ण संख्या वाढली तर अर्थव्यवस्थेला जबरदस्त फटका बसू शकतो. याच नुकसानाची धास्ती प्रत्येक राज्याने घेतलीये. म्हणूनच अनेक राज्यांकडून मागणी होते की, केरळच्या सीमा तिथली रुग्णसंख्या कमी होईपर्यंत सील करण्यात याव्यात.

तर अनेकांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांना ट्विट करून राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्याची विनंती केलीये.

आयसीएमआरने केलेल्या सेरो सर्वेक्षणात हे देखील स्पष्ट झालेय की,

केरळमध्ये केवळ ४२.७ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज आहे, त्यामुळे राज्याची सुमारे ५८ टक्के लोकसंख्या असुरक्षित आहे. आता केरळ सरकारला निर्बंधांत सूट देऊन राजकीय लाभ काय मिळाला हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे, पण यामुळे होणारे नुकसान तितकेच भयानक आहेत.

हे ही वाचं भिडू:

The post सण साजरे करायच्या नादात केरळनं स्वतःला कोरोना रुग्णांच्या यादीत टॉपला नेऊन ठेवलंय… appeared first on BolBhidu.com.Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

१० वर्षांपूर्वी लावलेल्या झाडांमूळे तो आज वर्षाला ३५ लाख रुपये कमावतोय

गुजराती माणूस म्हंटलं की, आपल्या डोळ्यासमोर येतो तो व्यापारी चेहरा. कारण व्यापार आणि गुजराती माणसाचं कनेक्शनचं वेगळये भिडू. एका चित्रपटात सुद्धा फेमस डायलॉग आहे, धंदा कुठलाही असो तो करायचा गुजराती माणसानेचं.

पण गुजराती माणूस आणि शेती हे समीकरण काय फारसं पचनी पडतं नाही. मात्र गुजरातमधल्या एका भिडूनं या समीकरणाला पण पचनी पडायला लावलं आहे. ते हि स्वतःच्या डोक्याने. त्याने चक्क ऑरगॅनिक शेती केलीये आणि त्यातून तो लाखो रूपये सुद्धा कमावतोय.

निर्मल सिंह वाघेला असं या गुजराती शेतकऱ्याचं नाव.

तो पाटण जिल्ह्यातला सामी तालूक्याचा रहिवासी. सुमारे १० वर्षांपूर्वी त्यांने आपल्या जमिनीच्या मोठ्या भागात ऑर्गेनिक खजूरची झाडं लावली होती.  आता ती झाडे तयार झाली असून त्याला फळ सुद्धा लागलीत. ज्यातून तो वर्षाला ३५ लाख रुपये कमावतोय.

निर्मल सिंह यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, १० वर्षांपूर्वी त्यांनी कच्छमधून खजुराची रोपे आणली होती, जी त्यांनी आपल्या नापीक जमिनीवर लावली होती. 

आता नापीक जमीन म्हंटल की, कुठलीही शेती सहजासहजी होत नाही, त्यात माती, पाणी, अशा पाच पन्नास अडचणी तर आहेच. पण आता गुजराती माणूस म्हंटल्यावर शांत थोडी बसेल?

खजूरांचे चांगले उत्पादन मिळवण्यासाठी आणि ते ऑरगॅनिक बनवण्यासाठी निर्मल यांनी अनेक प्रयोग केले. त्यासाठी अनेकांची मदत घेतली, त्याचा चांगला अभ्यास केला. यामुळे आज प्रत्येक झाडावर मोठ्या प्रमाणात खजूर तयार होत आहेत. त्यांनी फक्त गोमूत्र आणि शेण यांच्या मिश्रणातून तयार केलेले सेंद्रिय खत झाडांना दिले. यामुळे, झाडे केवळ वेगाने वाढली नाहीत, तर खजूरांना चांगला गोडवा देखील मिळालाय.

  ४०० रुपये किलोपर्यंत मिळतो भाव

निर्मल सांगतात की,

दरवर्षी आम्ही पाटण, राधानपूर, चाणस्मा आणि जवळच्या शहरांमध्ये खजूर विकतो. इतर खजूर ८० ते १०० रुपये प्रति किलोने विकले जात असले तरी ऑरगॅनिक खजूर २५० ते ४०० रुपयांना विकले जातात. कारण ऑरगॅनिक खजूरांना चांगल मार्केट आहे.

खासकरून अहमदाबाद आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये ऑरगॅनिक खजूरांना जास्त मागणी आहे.

ते सांगतात की,

पूर्वी आम्ही रासायनिक खतांचा वापर करायचो, पण आता आम्ही गोमूत्र आणि शेण यांच्या मिश्रणापासून तयार केलेले पूर्णपणे सेंद्रिय खत वापरण्यास सुरुवात केलीये. यामुळे पिकाचे उत्पादन थोडे कमी होईल, पण खजूर टेस्ट चांगली लागते.

एका झाडापासून तब्बल ८० किलो खजूर

खजूर पिकवणारे आणखी एक शेतकरी युवराज वाघेला सांगतात की, आमच्या शेतात सुमारे सात हजार नर आणि आठ हजार मादी खजूर रोपे आहेत. या दोन्ही प्रकारच्या वनस्पती वेगवेगळ्या टेस्टच्या खजूर देतात. प्रत्येक झाड ७० ते ८० किलो खजूर तयार करते.

तर निर्मल सांगतात की,

आम्ही डेट्स प्लास्टिकच्या पिशव्यांनी झाकतो, जेणेकरून बाहेरच्या वातावरणाचा पिकावर वाईट परिणाम होणार नाही. यामुळे, फांदीवर असलेलं एकही खजूर खराब होत नाही. या व्यतिरिक्त, हे कीटक आणि कोळीच्या हल्ल्यापासून सुरक्षित राहतं.

खजूरांना १२ ही महिने मागणी…

तसं पहायचं झालं तर खजूर हे पृथ्वीवर वाढणारे सर्वात जुने झाड आहे.  हे कॅल्शियम, साखर, लोह आणि पोटॅशियम समृध्द आहे. हे अनेक सामाजिक कार्यक्रम आणि सणांमध्ये वापरले जाते.  या व्यतिरिक्त, त्याच्या आरोग्यांना होणाऱ्या फायद्यांविषयी प्रत्येकाला माहित आहेच. जसे की बद्धकोष्ठता कमी करणे, हृदयरोग, अतिसार नियंत्रित करणे आणि गर्भधारणेमध्ये मदत करणे.  यासह, याचा वापर चटणी, लोणचे, जॅम, ज्यूस आणि इतर बेकरीच्या वस्तू बनवण्यासाठी देखील केला जातो.

निर्मलसिंह सांगतात की, 

खजूर लागवडीसाठी विशेष जमिनीची गरज नाही. नापीक जमिनीवरही त्याची लागवड करता येते. वर्षातून दोनदा याची लागवड केली जाते.  एकदा फेब्रुवारी ते मार्च दरम्यान आणि दुसरी वेळ ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान. रोपांमध्ये ६ ते ८ मीटर अंतर ठेवले जाते. झाडं परिपक्व होण्यासाठी ८ वर्षे लागू शकतात. त्यानंतर ते फळ देण्यास सुरुवात करते. त्यामुळे संयम महत्वाचा आहे. 

तसेच, सिंचनासाठी ठिबक सिंचन तंत्रज्ञान आजकाल वापरले जाते.  रासायनिक खतांऐवजी तुम्ही शेणखत आणि गांडूळ खत वापरू शकता. यामुळे पीक देखील चांगले होईल आणि जमिनीची सुपीकता देखील वाढेल.  बरही, खुंजी, हिल्लवी, जामली, खडरावी हे खजूरांचे मुख्य प्रकार आहेत.

कमी खर्चात जास्त फायदा

हे खरयं की खजुराच्या लागवडीला इतर पिकांपेक्षा जास्त वेळ लागतो, पण एकदा फळं पिकू लागली की उत्पन्नाचा वेग वाढतो. विशेष गोष्ट म्हणजे त्याच्या लागवडीसाठी कमी संसाधनांची आवश्यकता असते. यामुळे, फक्त बियाणे आणि थोडा देखभाल खर्चचं यात लागतो.

एका झाडापासून सरासरी ७० ते १०० किलो खजूर बाहेर येतो. एक एकरात ७० रोपे लावता येतात. म्हणजेच, एक एकर जमिनीतून ५० क्विंटलपेक्षा जास्त खजूर बाहेर येऊ शकतात. जर तुम्ही ते बाजारात १०० रुपये किलो दराने विकले तर तुम्ही वार्षिक किमान ५ लाख रुपये कमवू शकता. आजकाल खजूरांवर प्रक्रिया करून चांगले उत्पन्नही मिळतयं.

हे ही वाचं भिडू :

The post १० वर्षांपूर्वी लावलेल्या झाडांमूळे तो आज वर्षाला ३५ लाख रुपये कमावतोय appeared first on BolBhidu.com.Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

हुबेहूब तैमुरसारखा दिसतो सनी लिओनीचा मुलगा.. पाहून तुम्हालाही बसेल धक्का

बॉलिवूड स्टार कीड्स अनेक कारणांमुळे चर्चेत असतात. बाॅलिवूड मधील करिना कपूर ही नेहमीच तिच्या मुलांना घेऊन चर्चेचा विषय ठरते. तसेच सनी लिओनी देखील तीन मुलांची आई आहे.

तीने सर्वात आधी एका मुलीला दत्तक घेतले त्यानंतर सरोगसीच्या साहाय्याने डेनियल आणि सनी लिओनीने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. तिच्या जुळ्या मुलांचे नावं नोआ आणि आशेर अशी आहेत.

याच दोन जुळ्या मुलांमधील नोआ नावाचं मुलगा हुबेहूब करीना कपूरच्या मुलासारखा म्हणजेच तैमूर सारखा दिसतो. तैमूर नोआ पेक्षा २ वर्षांनी मोठा आहे. २०१६ मध्ये तैमूर याचा जन्म झाला होता तर नोआ आणि आशेर २०१८ मध्ये यांचा जन्म झाला होता.

तैमूर जन्माला आल्यापासुन तो नेहमीच चर्चेत राहिला आहे. त्याच्या नावापासून डोळ्यांपर्यंत अनेक वेळा तो चर्चेत आला आहे. याचबरोबर त्याला अजून एक भाऊसुद्धा तो नुकताच जन्माला आला असून त्याच नाव जहांगीर असं ठेवण्यात आलं आहे. दोन्ही भावांना कित्येत वेळा त्यांच्या नावांवरून ट्रोल केलं आहे.

सनी लिओनी बॉलीवूडमध्ये ‘जिस्म २’ या चित्रपटातून पदार्पण केलं होत. पॉर्नस्टार असल्यामुळे कोणताच निर्माता तिला आपल्या चित्रपटात घेत नव्हता. तिला बॉलीवूड चित्रपटात काम करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.

पण तिने अभिनयाच्या जोरावर तिने आता अनेक चित्रपटात काम केले आहे. सनी लिओनीने तिच्या करियरची सुरुवात बिग बॉस या छोट्या पडद्यावरील शो मधून झाले. नुकतचं तिने आपल्या सोशल मिडीयावर रक्षाबंधन निमित्ताचे फोटो टाकले आहेत.

महत्वाच्या बातम्या
‘खाकी वेषातील दरोडेखोर परमवीर सिंग यांच्या मुसक्या आवळणं गरजेचे आहे’
हनी सिंगला न्यायालयाचा दणका; तु मोठा असशील तुझ्या घरचा म्हणत झाप झाप झापले
‘रात्रीस खेळ चाले’मधील शेवंताने साताऱ्यात सुरु केलाय नवा व्यवसाय; ग्राहकांची होतेय तुफान गर्दी

राष्ट्रवादीच्या आमदाराने केला शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा अपमान; भडकलेल्या मंत्र्याने उचलले ‘हे’ पाऊल

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

‘खाकी वेषातील दरोडेखोर परमवीर सिंग यांच्या मुसक्या आवळणं गरजेचे आहे’

मुंबई । माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने क्लीनचीट दिल्याच्या बातम्या सगळीकडे दाखवल्या गेल्या. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी वसुलीचे आरोप करणाऱ्या मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर हल्लाबोल केला आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

ते म्हणाले, चौकशी अहवालातून दूध का दूध पानी का पानी झाले आहे. आता खाकी वेषातील दरोडेखोर परमवीर सिंग याच्या मुसक्या आवळणं गरजेचे आहे, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. काल सीबीआयच्या प्राथमिक अहवालात आमचे नेते अनिल देशमुख यांना क्लिनचिट दिल्याची माहिती कळते आहे. यामुळे परमबीर सिंग यांनी केलेले आरोप बिनबुडाचे होते, असेही ते म्हणाले.

तसेच उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटाला परमवीर सिंगच जबाबदार आहेत. अनिल देशमुख निर्दोष आहेत, पक्षाला बदनाम करण्याच हे भाजपचे कारस्थान आहे, असे मी वारंवार सांगत होतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

आता सगळं समोर आले आहे, सीबीआयच्या अहवालाने पर्दाफाश केला, चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल करून देशमुख यांच्यावर अन्याय केला, असा आरोपही त्यांनी केला. हे प्रकरण राज्यात गाजले होते, अनिल देशमुख यांना याप्रकरणी राजीनामा द्यावा लागला होता.

सीबीआयच्या प्राथमिक अहवालाच्या बातम्या आज काही वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत, हा अहवाल सीबीआयच्या फाईलमधील किंवा खात्यातंर्गत आहे की बनावट करुन तो वायरल करण्यात आला आहे याची सर्वस्वी जबाबदारी सीबीआयची आहे, असे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

हनी सिंगला न्यायालयाचा दणका; तु मोठा असशील तुझ्या घरचा म्हणत झाप झाप झापले

कायद्यासमोर सगळे समानच, कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही; न्यायालयाने हनी सिंगला सुनावले खडेबोल

शेवंता साकारणाऱ्या अपूर्वा नेमळेकरचा साताऱ्यात आगळावेगळा बिझनेस; ग्राहकांचा तुफान प्रतिसाद

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

हनी सिंगला न्यायालयाचा दणका; तु मोठा असशील तुझ्या घरचा म्हणत झाप झाप झापले

हनी सिंग गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला आहे. त्याची पत्नी शालिनी तलवारने हनी सिंगवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे. तसेच हनीसिंगविरुद्ध त्याच्या पत्नीने महिला संरक्षण कायद्यांतर्गत घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी हनी सिंगला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. पण तो दुसऱ्यांचा सुनावणीला गैरहजर राहिला आहे. हनी सिंगने त्याच्या वकिलामार्फत दिल्ली न्यायालयात याचिका दाखल केली आहे की, तो अस्वस्थ असल्यामुळे न्यायालयात उपस्थित राहू शकत नाही.

तसेच पुढच्या सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी हनी सिंगने मागितली आहे. पण दुसऱ्यांचा सुनावणीतही न्यायालयात हजर नसल्यामुळे न्यायालयाने त्याला आणि त्याच्या वकिलांना खडेबोल सुनावले आहे.

तुम्ही कितीही मोठे सेलिब्रीटी असला तरी कायद्यासमोर सगळे समानच आहे. कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही, असे म्हणत दिल्ली न्यायालयाने त्यांना चांगलेच खडसावले आहे. तसेच पुढच्या सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले आहे.

आपली प्रकृती ठिक नसल्याचे हनी सिंगने म्हटले आहे. त्यामुळे त्याने आपल्या वकिलांच्या मार्फत न्यायालयात हजर राहता येणार नसल्याचे कळवले होते. त्यामुळे आता न्यायालयाने हनी सिंगचे मेडिकल रिपोर्ट आणि आयटी रिटर्न सादर करण्याचे आदेश दिले आहे.

दरम्यान, शालिनी तलवारने घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केल्यानंतर ही दुसरी सुनावणी होती. याआधी झालेल्या सुनावणीमध्येही हनी सिंग हजर नव्हता. पण आता न्यायालयाने त्याला सुनावल्यामुळे पुढच्या सुनावणीला आपण हजर राहणार, असे आश्वासन हनी सिंगने दिले आहे.

महत्वाच्या बातम्या-

अभिनेत्री गेहना वसिष्ठने शेअर केला ‘तो’ भयानक फोटो; मुंबई पोलिसांवर केले गंभीर आरोप
भारतातील ‘या’ मिनारवर भाऊबहिणींना जाण्यास आहे बंदी; मिनारवर जाताच ते बनतात नवरा-बायको
राणेंनी सांगितला ‘तो’ किस्सा, बाळासाहेबांच्या जीवाला धोका होता, साहेब मला म्हणाले…