
उत्तर प्रदेश सरकारने बेकायदेशीर बांधकामाविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आता बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेल्या झोपड्या गुरुवारी पाडण्यात आल्या आहेत. बेकायदेशीर रित्या रोहिंग्यांचा कॅम्प उभारण्यात आला होता. यावर सरकारने मोठी कारवाई सुरू केली आहे.
येथील जमीन आता योगी सरकारने ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. मदनपुर खादर परिसरामध्ये पहाटे चार वाजल्यापासूनच या बेकायदेशीर बांधकामाविरोधात योगी सरकारच्या आदेशानंतर अधिकाऱ्यांनी धडक कारवाई हाती घेतली. यामुळे काहींनी नाराजी व्यक्त केली आहे.
ही एकूण जमीन ५.२१ एकर एवढी आहे. यावर बेकायदेशीरित्या घरे बांधण्यात आली होती. या जमिनीची किंमत १५० कोटी रुपये असल्याची माहिती मिळत आहे. आता ही जमीन सरकारने ताब्यात घेतली आहे. याबाबत उत्तर प्रदेशचे मंत्री महेंद्र सिंग यांनी माहिती दिली आहे.
दिल्ली में फिर से चला योगी का बुल्डोजर,
योगी सरकार की दिल्ली में बड़ी कार्यवाही,
मदनपुर खादर में सुबह 4 बजे ही कार्यवाही कर सिंचाई विभाग की भूमि पर अवैध कब्जे से रोहंगिया केम्पों को हटाया गया एवं अवैध कब्जे तोड़े गए
उ.प्र.सिंचाई विभाग की 2.10 हेक्टेयर जमीन मुक्त कराई। pic.twitter.com/OIgvOmMqFF
— Dr. Mahendra Singh (@bjpdrmahendra) July 22, 2021
त्यांनी ‘दिल्ली मे फिर चला योगी का बुलडोझर’ असे म्हणत त्यांनी व्हिडीओ शेअर केला आहे. या ठिकाणी रोहिंग्यांच्या छावण्या होत्या असेही त्यांनी म्हटले आहे. यामुळे सरकारवर टीका केली जात आहे. पहाटेपासूनच सुरू केलेल्या या कारवाईमुळे अनेकांची पळापळ झाली.
कालिंदी कुंज मेट्रो स्थानकाजवळ मोठ्यासंख्येने रोहिंग्यांच्या छावण्या आहेत. येथील झोपडपट्ट्यांमध्ये शरणार्थी असलेले रोहिंगे राहतात. जमीन माफिया आणि बेकायदेशीर बांधकांमाविरोधात मागील काही महिन्यांपासून योगी सरकारने अनेक मोठ्या कारवाया सुरू केल्या आहेत.
ताज्या बातम्या
राज कुंद्रा प्रकरणातही आहे सचिन वाझे कनेक्शन; जाणून घ्या सचिन वाझेचा या प्रकरणातील रोल
काय सांगता! कोरोनाने मृत्यू होईल या भीतीने कुटुंबाने घेतले कोंडून, १५ महिन्यांनी झाली सुटका
ए आर रहमान कोण आहे मला माहित नाही?; साऊथ सुपरस्टारचे धक्कादायक वक्तव्य
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments