मोठी बातमी! तीन न्यूज चॅनेल्सना दंड, माफी मागण्याचे निर्देश, तबलिगी प्रकरण आले अंगटल

June 19, 2021 , 0 Comments

नवी दिल्ली । गेल्यावर्षी देशात कोरोनाने शिरकाव केला. त्यावेळी दिल्लीत तबलिगी जमातचा धार्मिक कार्यक्रम झाला होता. मार्चच्या दरम्यान निजामुद्दीनमध्ये तबलिगी जमातच्या लोकांनी गर्दी करत भेट दिली होती. त्यानंतर हा परिसर सील करण्यात आला होता. यामुळे कोरोना वाढला असे सांगितले जात होते.

या काळात काही वृत्तवाहिन्यांनी आक्षेपार्ह वार्तांकन केल्याचे मत विविध न्यायालयांनी नोंदवले होते. त्यानंतर आता एनबीएसने ही कारवाई केली आहे. यामुळे त्यांना आता माफी देखील मागण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

देशात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली असतानाच या दरम्यान दिल्लीस्थित निजामुद्दीन येथे झालेले तबलिगी जमात मरकज चर्चेत आले होते. दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमानंतर उपस्थित असलेले लोक वेगवेगळ्या राज्यात परतले होते. त्यानंतर कोरोना प्रसारासाठी या घटनेला जबाबदार धरण्यात आले होते.

आता या घटनेबद्दल करण्यात आलेल्या वार्तांकनावरून तीन वृत्तवाहिन्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांची माफी मागण्यासही सांगण्यात आले आहे. यामुळे आता चर्चा रंगू लागली आहे.

‘एनबीएसए’ने ही कारवाई केली आहे. या काळातील वार्तांकन अत्यंत आक्षेपार्ह आणि केवळ अंदाजावर आधारित होते, असे एनबीएसएने म्हटले आहे. वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची भाषा असभ्य होती. तसेच कार्यक्रमातील भाषा चिथावणी देणारी होती, असेही त्यांनी म्हटले आहे

आणि धार्मिक भावनाचा विचार न करता सामाजिक तेढ निर्माण करून त्याला चिथावणी आणि प्रोत्साहन देणारी भाषा होती, असे एनबीएसएने म्हटले आहे. यामुळे लोकांच्या मनात एक वेगळे वातावरण निर्माण झाले होते. समाजातील लोकांकडे वेगळ्या नजरेने बघितले जात होते. अशा प्रकारच्या अनेक घटना यामुळे समोर आल्या.

ताज्या बातम्या

कोरोनामुळे शूटिंग बंद असल्याने ‘क्राईम पेट्रोल’ मधील दोन अभिनेत्रींनी केली चोरी, पोलिसांकडून अटक

ब्रेकिंग! फ्लाईंग शीख मिल्खा सिंग यांचे कोरोनाने निधन, ९१ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

धक्कादायक! मुल होत नसल्याने नवऱ्याने पत्नीला सोपावलं मांत्रिकाकडे अन् मांत्रिकाने जे केलं ते ऐकून बसेल धक्का


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: