पुण्यात पुन्हा वीकेंड लॉकडाऊन; काय सुरू, काय बंद राहणार जाणून घ्या

June 19, 2021 0 Comments

पुणे: हद्दीत पुन्हा एकदा लावण्यात आला आहे. याबाबत महापालिकेने आदेश जारी केले असून महापौर यांनी ट्वीटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. शहरात करोना संसर्ग नियंत्रणात राहावा म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. वीकेंड लॉकडाऊनमधून अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना मात्र सूट देण्यात आली आहे. ( ) वाचा: महापालिका हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आणि वेलनेस सेंटर शनिवार आणि रविवार पूर्णतः बंद राहणार आहेत तर रेस्टॉरंट, बार, फूड कोर्टमधून शनिवार-रविवार केवळ पार्सल सेवा देता येईल, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. वाचा: महापालिका आयुक्त यांनी आज याबाबत आदेश जारी केला आहे. हा आदेश तत्काळ प्रभावाने लागू करण्यात येणार आहे. पुढील आदेशापर्यंत हा आदेश लागू असणार आहे. यासोबतच प्रतिबंधात्मक आदेशही जारी करण्यात आला आहे. त्यानुसार रात्री १० वाजल्यानंतर वैध कारणाशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही किंवा फिरताही येणार नाही. पुणे महापालिका हद्द, पुणे कँटॉनमेंट बोर्ड आणि खडकी कँटॉनमेंट बोर्ड या संपूर्ण भागासाठी हे आदेश लागू असणार आहेत. वाचा: नेमका आदेश काय आहे? - जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आठवड्याचे सर्व दिवस सायंकाळी सात वाजेपर्यंत खुली राहतील. - इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आणि वेलनेस सेंटर शनिवार व रविवार बंद राहणार. - रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट ग्राहकांसाठी शनिवार-रविवार बंद राहतील. केवळ पार्सल सेवेची मुभा. रात्री ११ वाजेपर्यंत पार्सल देता येईल. - रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील. - वीकेंड वगळता अन्य दिवशी मॉल ५० टक्के ग्राहक क्षमतेने सुरू ठेवता येतील. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: