रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अंडी खाणे शरीरासाठी ठरतय घातक; वाचा तज्ञ काय म्हणतात..

May 04, 2021 , 0 Comments

सध्या देशभरात कोरोनाने कहर घातला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून लोक कोरोनापासून बचाव करण्यासाठी आपली रोगप्रिकारक शक्ति वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी प्रत्येकजण आपल्या आहारात बदल करत आहे.

अशात अनेकजण हे कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी आहारा अंड्यांचा समावेश करत आहे. प्रोटीन असल्यामुळे अंडी खाणे गरजेचे आहे, असे सगळीकडे म्हटले जात आहे. चला तर मग जाणून घेऊया या गोष्टीत किती तथ्य आहे.

सध्या रोगप्रतिकारक शक्ति वाढवण्यासाठी अंडी खाण्याचा सल्ला दिला जात आहे. पण अंडी खाताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. गुणकारी ठरली नाही, तर आपल्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही आधी जाणून घेतले पाहिजे कि तुम्ही कीती अंडी खाल्ली पाहिजे.

जर तुम्ही कोरोनापासून बचाव करण्यासाठी अंड्याचा आहारात समावेश करत असाल, तर ते उकडून खाणे गरजेचे आहे. तसेच ते अंड्याचे कमी तेलात आम्लेट बनवून किंवा निम्मे शिजवून त्याचे सेवन केले पाहिजे.

एका अंड्यात ३७३ मिग्रा कोलेस्ट्रोल असते. तसेच कोणत्याही वक्तीने ३०० मिग्रा कोलेस्ट्रोल सेवन करणे गरजेचे असते. त्यामुळे ज्या लोकांना हाय कोलेस्ट्रोलचा त्रास आहे, अशा लोकांनी अंड्यातील पिवळे बलक खाणे टाळावे. त्यांनी फक्त अंड्यातील पांढरा भाग खावा, कारण त्यात प्रोटीन जास्त असते आणि कोलेस्ट्रोल कमी.

अंडी पौष्टीक असली तरी ती बेसुमार सेवन नाही केली पाहिजे. एका निरोगी व्यक्तीने दिवसातून २ ते ३ अंडी सेवन केली पाहिजे. तसेच ज्या व्यक्तींना मधूमेह किंवा हृदयविकाराचा त्रास आहे. त्यांनी दिवसाला फक्त १ अंड सेवन करावे.

लहान मुलांनाही अंडी खायला देताना काळजी घेतली पाहिजे. लहान मुलांना एका विशिष्ट वयानंतर अंडे खावू घालावे. ८ महिन्यांच्या बाळाच्या आहारात अंड्याचा समावेश केला तरी चालतो. पण अंड्यातील पांढरा भाग १ वर्ष वयानंतरच लहान बाळांना द्यावा.

महत्वाच्या बातम्या-

पॅट कमीन्सची घोषणा: पंतप्रधान मोदींच्या पीएम केअर फंडाला दिलेली मदत रद्द करणार, पण..
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी; “४ दिवस शिल्लक आहेत,जे करायचे आहे ते करा”
पंढरपूरमध्ये होणार फेरनिवडणूक.? भाजपकडून गैरप्रकार झाल्याचा राष्ट्रवादीचा आरोप


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: