Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूरमध्ये होणार फेरनिवडणूक.? भाजपकडून गैरप्रकार झाल्याचा राष्ट्रवादीचा आरोप

पंढरपूर । नुकताच पंढरपूर पोटनिवडणूकीचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये भाजपने विजय मिळवून महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. भाजप उमेदवार समाधान आवताडे त्यांनी भागीरथ भालके यांचा पराभव केला.

निकाल जाहीर झाला असला तरी आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला हा निकाल मान्य नाही. या निवडणुकीत विजयासाठी भाजपा उमेदवाराकडून गैरप्रकार झाल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे, यामुळे पंढरपूरमध्ये फेरनिवडणूक घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

विजय मिळवण्यासाठी भाजपा उमेदवार समाधान अवताडे आणि विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक यांनी गैरप्रकार केला आहे. असे आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने पंढरपूरमध्ये फेरनिवडणूक घ्यावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य नितीन माने यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक आणि भाजपा उमेदवार समाधान अवताडे यांच्या कारखान्यात कार्यरत असलेले सर्व सभासद आणि कर्मचाऱ्यांना डांबून ठेवून भाजपाला मतदान करा अन्यथा कामावरून काढू, अशा धमक्या दिल्याचा संशय निर्माण होत आहे.

प्रशांत परिचारक आणि समाधान अवताडे यांच्या कारखान्याच्या तसेच कार्यालयाच्या सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे. दोन्ही नेत्यांचे फोन संभाषण रेकॉर्डिंग तपासण्यात यावे. समाधान अवताडे यांच्या कंस्ट्रक्शन कंपनीचे पूर्ण ऑडिट तपासण्यात यावे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

निवडणुकीदरम्यान प्रशांत परिचारक आणि समाधान अवताडे हे संचालक असलेल्या सर्व संस्था, कारखान्यातील आणि कंस्ट्रक्शन कंपनीच्या सर्व बँक खात्यांची चौकशी करावी. तसेच निवडणूक पुन्हा घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

रेमडेसीवीरचा काळाबाजार करणाऱ्या पत्रकारासह वॉर्डबॉयच्या टोळीला पोलिसांनी केली अटक

पराभूत झालो तरी संपलो नाही; पुढच्या वेळी पराभवाचे उट्टे काढील; भगीरथ भालकेंचा निर्धार

दोन वर्षांपासून BCCI ने थकवले पैसे; कोरोनाग्रस्त भावाच्या उपचारासाठी क्रिकेटपटू झालाय हतबल


Post a Comment

0 Comments