Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

हिंदू मुस्लिम केल्यामुळे माणसं गमवावी लागताहेत; इरफानच्या बायकोचा सरकारवर आरोप

महाराष्ट्रात सध्या कोरोना महामारीने मोठ्या प्रमाणावर थैमान घातले आहे. ऑक्सिजनचा तुटवडा,रुग्णालयांमध्ये असणाऱ्या बेड्सची कमतरता आणि लसींचा तुटवडा यांमुळे महाराष्ट्र सध्या संकटात सापडला आहे.कोरोनाने फक्त सर्वसामान्य जनताच नाही तर सिनेसृष्टीतील अभिनेते,राजकीय नेते या सर्वांनाच ग्रासले आहे.

दिवसेंदिवस सिनेसृष्टीत देखील कोरोना चा कहर आता वाढत चालला आहे. दिवंगत अभिनेता आणि अनेक राष्ट्रीय पुरस्कारांचा मानकरी इरफान खान यांच्या पत्नीला आता या कोरोना संकटाला सामोरे जावे लागले आहे.

इरफान खान यांची पत्नी सूतापा सिकदरहिच्या एका नातेवाईकाला नुकतेच कोरोनाने ग्रासले होते. या नातेवाईकाला मोठे प्रयत्न करून देखील रुग्णालयात बेड भेटले नाही आणि त्याचा कोरोनाने मृत्यू झाला.

अत्यंत जवळच्या माणसाला कोरोनाने गमवावे लागल्याने इरफान खान यांच्या पत्नीला आपला संताप अनावर झाला. त्यांनी ट्विटर वर ट्विट करत तीव्र शब्दांमध्ये सरकारचा निषेध केला आहे. त्यांनी या ट्विट मध्ये सांगितले की, ” मी माझ्या जवळचा नातेवाईक समीर बॅनर्जीसाठी मदत मागत होते.

आज ते आम्हाला सोडून गेले आहेत. दिल्लीत घरात आयसीयू लावणे अशक्य होते आणि रुग्णालयात बेड मिळत नव्हता. मी समीर साठी बेड मिळवू शकले नाही याबाबदल मला कायमच दुःख राहील. आता शेख,दास अश्या कित्येकांना मारायचे आहे.

तुम्ही हिंदू आणि मुस्लिम सणांऐवजी देशातील आरोग्यव्यवस्थेवर लक्ष केंद्रित केले असते तर चांगले झाले नसते. तिने आपल्या ट्विट मध्ये दिल्ली सरकार,मोदी यांना टॅग केले आहे आणि आपला संताप व्यक्त केला आहे


Post a Comment

0 Comments