Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

‘तारक मेहता..’ मालिकेत दयाबेन कधी येणार? निर्माते असीम मोदींनी स्पष्टच सांगीतलं..

टीव्हीचा सर्वात लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ वर्षानुवर्षे लोकांचे मनोरंजन करत आहेत. या मालिकेतील प्रत्येक कलाकार ने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दयाबेन म्हणजे  दिशा वाकानी यांनी मालिकेतून सुट्टी घेतली आहे. त्यांच्या परत येण्याबद्दल बऱ्याच चर्चा सतत चालू असतात.

आता दिशा वाकानी यांच्या परत येण्याच्या प्रश्नावर निर्माता असिद मोदी यांनी साफ साफ भाषेत प्रेक्षकांना सांगितले आहे. इतक्यातच ईटाइम्सला दिलेल्या इंटरव्यू  मध्ये असिड मोडी म्हणाले की, त्याची परत येण्याची आम्ही वाट पाहत आहोत. परंतु त्या जर ही मालिका सोडणार असतील तरीही आम्ही तयार आहोत. तसे त्यांनी स्पष्ट भाषेत सांगावे.

तसेच असिद मोडी हसत हसत असेही बोलले की दयाबेन बद्दल मला इतके प्रश्न विचारतात की, असे वाटते मीच दयाबेन बनून रोल करावा. दयाबेनची सगळेच जन वाट पाहत आहे, परंतु दिशा वाकनी यांनी शो सोडला तर आम्ही नवीन दयाबेन घेऊन शोला पुढे चालू ठेऊ. आता सध्या तर आम्ही त्यांची येण्याची वाट पाहत आहोत.

असिद मोदी पुढे म्हणतात की, सध्या दयाबेनची वापसी किवा पोपटलालच लग्न मह्त्वाच नाही तर सध्या चालू असलेल्या कोरोनासारख्या महामारीपासून कस संरक्षण करता येईल हे महत्त्वाच आहे.प्रत्येकाने यासाठी प्रयत्न केले पाहिजे. मोदी सध्या कलाकारांच्या सेफ्टीचा विचार करून शुटींग करत आहेत.

असिद मोदी शुटींग बद्दल बोलतात की, सध्या शुटींगवर प्रतिबंध लावला असल्याने शुटींग दुसऱ्या शहरात हलवण्यात येणार आहे. आता सध्या त्यांच्याकडे अनेक एपिसोडचे शुटींग तयार आहे त्यांना लगेच दुसऱ्याशहरात जावून शुटींग करण्याची गरज नाही. लवकरच ते ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ चा सेट हलवण्याचा विचार करत आहेत.

काही दिवसांपूर्वी दिशा वाकानी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ च्या सेट वर आली होती, त्यामुळे प्रेक्षकांना वाटले की ती परत शुटिंगसाठी आली आहे. परंतु असे काही नाही तिचे काम होते तेव्हा ती आली होती. त्यामुळे ती परत कधी मालिकेत पाहायला मिळेल हे नेमक सांगता येणार नाही.

हे ही वाचा-

दिल्लीत परमबीर सिंग कुणाला भेटले? वेळ येताच संपूर्ण माहिती उघड करू; नवाब मालिकांचा इशारा

KKR च्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण, RCB विरुद्ध आजचा सामना रद्द

भारताच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या मोठ्या व्यक्तिने राजकारणाला ठोकला रामराम


Post a Comment

0 Comments