खळबळजनक! कोरोनामुळे बापाचा मृत्यू झाल्याने मुलीने बापाच्या जळत्या चितेवर घेतली उडी

May 06, 2021 , 0 Comments

देशात कोरोनामुळे परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. दिवसेंदिवस अनेक रुग्णांचे मृत्यू होत आहेत. अनेकांची कुटूंब कोरोनाने विस्कटली आहेत. असे असताना अनेक ठिकाणी धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना राजस्थानमध्ये घडली आहे.

येथे एका ७३ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्या चितेवर उडी घेत त्यांच्या मुलीने जीव देण्याचा प्रयत्न केला. ही घटना राजस्थानच्या बाडमेरमध्ये घडली. दामोदरदास शारदा असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.

या घटनेत ही महिला ७० टक्के भाजली आहे. यामुळे तिची परिस्थिती नाजूक आहे. मात्र या महिलेने अचानक वडिलांच्या चितेवर उडी घेऊन जीव देण्याचा प्रयत्न का केला, याची माहिती अजूनही समोर आली नाही. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

याबाबत या मुलीचे वडील दामोदरदास यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात येत होता. यावेळी लहान मुलीने अंत्यसंस्काराठी येण्याचा हट्ट धरला.

यामुळे तिला सोबत नेण्यात आले होते, मुखाग्नी दिल्यानंतर मात्र अचानक तिने जळत्या चितेवर उडी घेतली. तिथे उपस्थित लोकांनी तिला ओढून बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत ती ७० टक्के भाजली गेली होती. यामुळे तिला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेमुळे मात्र परिसरात खळबळ उडाली आहे. देशात कोरोनाने हाहाकार उडवला असून अनेकांच्या घरातील आई- वडील, भाऊ- बहीण तसेच काहींची तर संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाली आहेत. यामुळे अनेकांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

ताज्या बातम्या

चाहत्याने केले मीनाक्षी शेषाद्रीसोबत लाजिरवाणे कृत्य; चिडलेल्या मीनाषीने वाजवली कानाखाली

कोरोनाने उद्धवस्त केली क्रांतीकारी चळवळ; मुकुंद खैरेंच अख्ख कुटुंबच संपलं

बापाची ढोर मेहनत पाहवली नाही; आठवीतील मुलाने जिद्दीने उभी केली कोट्यावधींची कंपनी


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: