Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

छताला बांधलेल्या झोपाळ्यात बाळाला झोपवलं; मोठं वादळ आलं अन् होत्याचं नव्हतं झालं

यवतमाळ: आर्णी तालुक्यातील लोणी येथे काल दुपारी आलेल्या वादळात घराच्या छतासहित छताला बांधलेला पाळणा व त्यातील बाळ सुमारे ७० फूट हवेत उडाले. या अजब दुर्दैवी घटनेत दीड वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील लोणी येथील सुनील राऊत यांचा दीड वर्षीय मुलगा मंथन हा पत्र्याच्या छताला बांधलेल्या पाळण्यात निवांत झोपी गेला होता. दुपारी १२ वाजताच्या दरम्यान एक विशाल वादळाने राऊत याच्या घराला विळखा घातला. वादळ इतके शक्तीशाली होते की त्यामुळं घरचे छप्पर व छप्परला बांधलेला पाळणा बाळासहित तब्बल ७० फूट वर आकाशात गिरक्या घेत उडाला. तब्बल १० मिनिटाने घराचे छप्पर एका दिशेने तर पाळण्यातील बाळ एका दिशेने फेकले गेले. वाचाः बाळ जमिनीवर पडताच जखमी अवस्थेत बाळाला त्याच्या आई वडिलांनी यवतमाळ येथे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले. या अजब दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गाव शोकाकुल झाले असून पिडीत राऊत कुटुंबीय बेघर तर झालेच मात्र त्यांचा वंशाचा दिवा सुद्धा अवकाळी वादळाने विझवला. नैसर्गिक आपत्तीने त्यांच्यावर ओढवलेल्या संकटाची प्रशासनाने नुकसान भरपाई प्राधान्याने करून द्यावी अशी मागणी जनतेतून होत आहे. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Post a Comment

0 Comments