देशातील कोरोनाने लोक मरताहेत आणि इथे परदेशातून आलेली मदत धुळखात पडलीय

May 06, 2021 , 0 Comments

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतात एकदम भयानक परिस्थिती घडताना दिसून येत आहे. जगातील अनेक देशांनी भारताला मदत पाठवायला सुरुवात केली आहे. ऑक्सिजन आणि वैद्यकीय सामग्रीचा या मदतीत समावेश आहे. मदतीचा भारतात जगभरातून मोठ्या प्रमाणावर ओघ आहे.

देश परदेशातून भारतात मोठ्या प्रमाणावर मदत येत असून ती कुठे जात आहे असा प्रश्नच आता सगळ्या स्तरातून विचारला जात आहे. पहिल्यांदा विरोधक हा प्रश्न विचारत होते पण आता देश परदेशातून यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ राहिले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना पण हा प्रश्न एका पत्रकाराने विचारला. अमेरिकेकडून भारताला केली गेलेली मदत कुठे जात आहे? त्याबद्दल आपल्याकडून काही माहिती मिळू शकेल का? असा प्रश्न त्या पत्रकाराने बायडेन यांना विचारला.

भारतात आतापर्यंत तीन हजार टन वैद्यकीय मदत परदेशातून पाठवली गेली आहे. ऑक्सिजन सिलिंडर्स, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि इतर वैद्यकीय सामुग्री भारतात पाठविण्यात आली आहे. या सर्व घटनेवरून अझरुद्दीन ओवेसी यांनी सरकारवर संताप व्यक्त केला आहे.

ओवेसी यांनी म्हटले आहे की, “देशात लोक कोरोनाने मरत आहेत आणि इथे भारतात वैद्यकीय मिळालेली मदत धूळ खात पडली आहे.” अनेक परदेशी देशांनी भारताला मदत पाठवली आहे पण ती विमानतळावरच धूळ खात पडली आहे.

केंद्र सरकारने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. केंद्र सरकारने ही मदत ३८ रुग्णालयांमध्ये वाटल्याचे सांगितले आहे तर भाजपशासित राज्यांनी ही मदत मिळाल्याचे म्हटले आहे तर राजस्थान, पंजाब आणि झारखंड राज्यांनी ही मदत त्यांना न मिळाल्याचे सांगितले आहे.


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: