Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

रेमडीसीवीरचा काळाबाजार उघडकीस, पत्रकारच करत होता काळाबाजार; लाखोंचा माल जप्त

नागपुर | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातलं आहे. कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णांना लस, बेड आॉक्सिजन यांचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. देशात कोरोना रुग्णांचा मृत्यू अत्यंत धक्कादायक तऱ्हेने होत असल्याचं समोर येत आहे.

आपल्या रुग्णाला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यासाठी रुग्णाचे नातेवाईक धावपळ करत असतात. रुग्णाला रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यासाठी रुग्णाचे नातेवाईक मिळेल त्या किंमतीत रेमडेसिवीर खरेदी करत आहे. यामुळे या रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याच्या घटना घडत आहेत.

नागपुरमध्ये कोरोनाचे चित्र भयंकर आहे.  अशातच रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या एका न्युज पोर्टलच्या पत्रकारासह नामांकित रुग्णालयातील वॉर्डबॉय यांच्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

नागपुरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना रेमडेसीवीरची चढ्या दराने विक्री होणार असल्याचं समजलं. पोलिसांच्या पथकाने ४ रेमडेसीवीरसह, कार आणि इतर सर्व मिळून लाखोंचा माल हस्तगत केला आहे.

पोलिसांनी विकास ढोकणे, अमन शिंदे, रोहित धोडे, ईश्वर मंडळ, महेश ठाकरे, रजत टेंभरे, मनोज नंदनकर या आरोपींना अटक केली आहे. विकास ढोकणे हा महाराष्ट्र न्यूज 7 या बातम्यांच्या पोर्टलचा पत्रकार आहे. तर काही आरोपी नागपुरातील  शुअरटेक हॉस्पीटलमध्ये वॉर्डबॉय म्हणून काम करतात आणि काहीजण फार्मा कंपनीत काम करतात

पोलिसांनी बनावट ग्राहक बनवून विकास ढाकणे याच्याकडे रेमडेसीवीर घेण्यासाठी पाठवलं. त्यानंतर विकासने ३३ हजार रुपयाला एक असे दोन इंजेक्शन मिळतील असं सांगितलं. पोलिसांनी जरीपटका येथे रेमडेसीवीरचा काळाबाजार करताना विकासला पकडले.

विकासची कसून चौकशी केल्यानंतर त्याने टोळीतील सदस्यांची नावे सांगितली. पोलिसांनी त्यांनाही अटक करून  बोलतं केलं. शुअरटेक हॉस्पीटलमध्ये कोरोना रुग्णांना रेमडेसीवीर आणायला सांगून त्यातील काही इंजेक्शन चोरून बाहेर चढ्या दराने विक्री करत असे असं पोलिसांना सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-
मोदी सरकारची मोठी घोषणा; कोरोना योध्द्यांना मिळणार सरकारी नोकरीत प्राधान्य
सकाळी एक कप चहा आणि सर्व आजारांपासून मुक्ती; जाणून घ्या कोणते पदार्थ मिसळायचे…
‘ऑक्सिजनचा टँकर पाठवला आहे. रोहित तू स्वतः थांबून तो उतरुन घे’; अजितदादांचा मध्यरात्री आबांच्या मुलाला फोन


Post a Comment

0 Comments