पंतप्रधानांवर गंभीर आरोप झाल्यास तपासासाठी दैवी शक्ती येणार का?: हायकोर्ट

मुंबई: गृहमंत्री यांनी सचिन वाझे आणि अन्य कनिष्ठ अधिकाऱ्यांना १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप करत सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या माजी मुंबई पोलीस आयुक्त यांच्या फौजदारी जनहित याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. यावेळी सिंगांवर हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींनी प्रश्नांची सरबत्ती केली. तसंच, राज्य सरकारने या प्रकरणात निवृत्त न्यायमूर्तींची चौकशी समितीही नेमली आहे. त्यामुळं हायकोर्टानं दखल घेण्याजोग हे प्रकरण आहे, असा युक्तीवाद सिंग यांचे वकील ननकानी यांनी केला आहे. परमबीर सिंग यांच्या जनहित याचिकेवर आज, बुधवारी हायकोर्टात सुनावणी सुरु आहे. यावेळी भोजन कालावधी पूर्ण झाल्यानंतर सिंग यांच्या वकिलांनी हायकोर्टात युक्तीवाद केला असता न्यायमूर्तींनी ननकानी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. एफआयआरविना सीबीआय चौकशीचे आदेश देता येतात. याविषयी सुप्रीम कोर्टाचे निवाडे तुम्ही का दाखवत नाही, असं मुख्य न्यायमूर्तीनं म्हटलं आहे. 'तुम्हाला राज्याच्या पोलिस यंत्रणेवर विश्वास राहिला नाही म्हणून तुम्ही सीबीआय तपासाची मागणी करताय, बरोबर? मग समजा, असे होऊ नये, पण समजा की एखादे पंतप्रधान किंवा केंद्रीय गृहमंत्री यांच्यावर गंभीर आरोप झाले मग त्याचा तपास करण्यासाठी कोणती दैवी शक्ती येणार आहे का? त्याचा तपास केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सीबीआय किंवा तत्सम तपास यंत्रणेलाच करावे लागणार ना? त्यामुळे तपास होणे महत्त्वाचे आहे, असं महत्त्वाचे निरीक्षण मुख्य न्यायमूर्तींनी नोंदवलं आहे. या प्रकरणात कोणी लेखी तक्रार केली आहे की नाही, अशी विचारणा हायकोर्टानं केली असता या प्रश्नी याचिका करणाऱ्या जयश्री पाटील यांनी आपली तक्रार दाखवली दाखवली असून २१ मार्चला मलबार हिल पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. तसंच, या लेखी तक्रारीच्या आधारावर एफआयआर दाखल केला की नाही? मुख्य न्यायमूर्तींची महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना विचारणा केली होती. मात्र, अद्याप एफआयआर नोंदवला नसल्याचे उत्तर त्यांनी दिलं आहे. एफआयआर नोंदवण्यापूर्वी पोलिसाने प्राथमिक चौकशी करायला हवी, या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने विशिष्ट मुदतीची प्रक्रिया घालून दिली आहे आणि पोलिसांनी चौकशीअंती एफआयआर केला नाही तर तक्रारदार न्यायदंडाधिकारी न्यायालयात कशी दाद मागू शकतो', असे म्हणणे महाधिवक्ता कुंभकोणी यांनी सुप्रीम कोर्टाच्या निवाड्यांच्या आधारे मांडले. पोलिस ठाण्यातून स्टेशन डायरी लगेच मागवा. पोलिस अधिकाऱ्याने कायद्याची कोणती प्रक्रिया पाळली आहे, ते आम्हाला पहायचे आहे? मुख्य न्यायमूर्तींनी महाधिवक्ता कुंभकोणी यांना तोंडी निर्देश दिले आहेत. पोलिसांनी त्वरित एफआयआर केला असता तर काय आभाळ कोसळले असते का? २१ मार्चच्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी एफआयआर का केला नाही? तसे करून केवळ फौजदारी कायदेशीर कार्यवाहीची प्रक्रिया सुरू झाली असती, असं निरीक्षण हायकोर्टानं मांडलं आहे. 'परमबीर सिंह यांनी केलेले सर्व आरोप हे त्यांच्या बदलीचा आदेश १७ मार्चला निघाल्यानंतरच.. आणि त्यांनी ज्या व्हाट्सअप संभाषणांचा आधार घेतला ते आदल्या दिवशीचे आणि त्यानंतरचे म्हणजे १९ मार्चचे. त्यापूर्वी एक वर्षापासून ते गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत काम करत होते. शिवाय सिंग यांनी रश्मी शुक्ला यांच्या अहवालाचा आधार घेतला आहे. मात्र, ते प्रकरण सप्टेंबरमध्येच चौकशी करून बंद करण्यात आले होते आणि त्याविषयी मुख्य सचिवांचा ताजा अहवालही आला आहे. त्यानुसार शुक्ला यांनी फोन टॅपिंग करत पोलिस बदल्यांत भ्रष्टाचाराचा आरोप केला असला तरी त्या कालावधीत एकही बदली झालेली नसल्याचे मुख्य सचिवांनी अहवालात निदर्शनास आणले', महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांचा युक्तिवाद.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

'निवृत्त न्यायाधीश विद्यमान गृहमंत्र्यांविरोधात चौकशी कशी करणार?'

मुंबईः मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री यांच्यावर केलेल्या गंभीर आणि खळबळजनक आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एक सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली आहे. उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्ती कैलास उत्तमचंद चांदीवाल यांची या समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर राज्याचे विरोधीपक्ष नेते यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. परमबीर सिंग यांनी गृहमंत्री देशमुख यांच्यावर आरोप करणारे पत्र २० मार्च २०२१ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिले होते. त्या पत्रात उल्लेख केल्याप्रमाणे गृहमंत्री देशमुख यांनी किंवा त्यांच्या कार्यालयातील कोणत्याही अधिकाऱ्याकडून कोणतेही गैरवर्तन किंवा गुन्हा झाल्याचे निष्पन्न होईल असा काही पुरावा परमबीर सिंग यांनी त्यांच्या पत्रात सादर केला आहे का, याबाबत ही समिती चौकशी करणार आहे. मात्र, या समितीवर बोट ठेवत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडे काही प्रश्न उपस्थित केले आहेत. 'राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील आरोपांची चौकशी करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या निवृत्त न्यायमूर्ती. के. यू. चांदीवाल समितीला साध्या समितीचा दर्जा देण्यात आला असून, न्यायालयीन आयोगाचे अधिकार देण्यात आलेले नाहीत, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. कमिशन्स ऑफ इन्क्वायरी अ‍ॅक्ट 1952 अंतर्गत ही समिती गठीत करण्यात आलेली नाही, ना त्यांना या कायद्यानुसार अधिकार प्रदान केले. आमच्या काळात न्या. झोटिंग समिती गठीत करताना त्यांना या कायद्यांतर्गत सर्व अधिकार प्रदान करण्यात आले होते,' असंही त्यांनी नमूद केलं आहे. 'त्यामुळे ही समिती म्हणजे निव्वळ धूळफेक आहे आणि या प्रकरणातील आरोपांची तीव्रता आणि गांभीर्य लक्षात घेता, त्यातून कोणताही हेतू साध्य होणार नाही. आता प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे कोणतेही अधिकार नसताना उच्च न्यायालयाचे एक निवृत्त न्यायाधीश विद्यमान गृहमंत्र्यांविरोधात चौकशी कशी करणार?,' असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

पुणेकरांनो, जरा सावधच राहा! दररोज होतेय चार वाहनांची चोरी

[email protected] Tweet : @ShrikrishnaKMT : पुण्यात वाहनचोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या तीन महिन्यांत ३५०पेक्षा अधिक वाहने चोरीला गेली आहेत. याचाच अर्थ दररोज किमान चार वाहने चोरीला जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नव्याने स्थापन केलेल्या वाहनचोरी विरोधी पथकाच्या कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुणे शहरात वाहनांची, विशेषत: दुचाकींची संख्या मोठी आहे. त्यामुळे पुण्यात वाहनचोरीत दुचाकीचोरीचे प्रमाण सर्वाधिक आहे. तीन वर्षांपूर्वी वाहनचोरीचा आकडा तीन हजारांपुढे गेला होता. चोरी रोखण्यासाठी पुणे पोलिस आयुक्तालयात स्वतंत्र वाहनचोरी विरोधी पथक आहे; पण वाहनांची चोरी रोखण्यात हे पथक पूर्ण अपयशी ठरले आहे. त्यामुळे दोन वेळा हे पथक बंद करून पुन्हा सुरू करण्यात आले आहे. गेल्या तीन महिन्यांत पुण्यात ३६५ वाहने चोरीला गेली आहेत. गेल्या वर्षी पहिल्या तीन महिन्यांत २५५ वाहने चोरीला गेली होती. २०२०मध्ये लॉकडाउन असतानाही ९७५ वाहने चोरीला गेली होती. त्यापैकी फक्त ३३० वाहने जप्त करण्यात पोलिसांना यश आले. त्यात ८७० दुचाकी, ७७ चारचाकी आणि २८ तीनचाकी वाहनांचा समावेश आहे. यंदा मात्र, पहिल्या तीन महिन्यांत वाहनचोरांनी धडाकाच लावल्याचे दिसून आले आहे. दिवसाला सरासरी सहा ते सात वाहने चोरीला जाऊ लागली आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना विनाकारण भुर्दंड सहन करावा लागत आहे. वाहनचोरीविरोधी पथके नावालाच पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अमिताभ गुप्ता यांनी वाहनचोरांचा बंदोबस्त करण्यासाठी वाहनचोरी विरोधी दोन स्वतंत्र पथके तयार केली आहेत. त्यांची उत्तर आणि दक्षिण अशी विभागणी करून कामाचे वाटपही करण्यात आले. या पथकांना गेल्या चार महिन्यांत म्हणावी अशी कामगिरी करता आलेली नाही. वाहनचोरीविरोधी पथके नावालाच स्थापन करण्यात आल्याचे चित्र आहे. दररोज चार वाहने चोरीला जात असताना ही पथके नेमके करतात काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वाहनचोरीची माहिती वर्ष चोरी उघड २०१९ १,६७६ ६३३ २०२० ९७५ ३३०


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

आगीत गहू व संत्रा जळून खाक; शेतकऱ्याचा वीज वितरण कंपनीवर आरोप

अमरावती / वरुड: तालुक्यातंर्गत येत असलेल्या मांगोना शेतशिवारातील भुपेश शर्मा रा. बेनोडा शहीद यांच्या शेतातील गहु व संत्रा झाडे शॉट सक्रिटमुळे जळून खाक झाल्याची घटना सोमवार दि. २९ ला दुपारी तीन वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे अख्खे शर्मा कुटुंब हवालदिल झाले असून त्यात त्यांचे लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे. शर्मा यांना विज वितरण कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी तहसीलदार किशारे गावंडे, ठाणेदार मिलिंद सरकटे व बेनोडा शहीद येथील विज वितरण कंपनीकडे केली असल्याची माहीती नुकसानग्रस्त भुपेश शर्मा यांनी दिली आहे. काही महीन्यांपासून शेतकरी भुपेश शर्मा यांच्या शेतातील लोंबकळत असलेल्या विद्युत तारा दुरूस्त करण्याची मागणी बेनोडा शहीद येथील विज वितरण कंपनीला लेखी व तोंडी तक्रारी केल्या असून विज वितरण कंपनीने हेतुपुरस्पर दुर्लक्ष करून त्या निवेदनावर कसल्याही प्रकारची कारवाई केली नाही आणि म्हणूच ही घटना घडली असे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जर वीज वितरण कंपनीने या निवेदनाची गंभीर दखल घेतली असती तर आज साडे चार एकरातील गहु व जवळपास १६० संत्रा झाडे जळली नसती असेही त्यांचे म्हणणे आहे. या नुकसानीस विज वितरण कंपनीच जबाबदार असल्याचेही शर्मा यांचे म्हणणे आहे. सुदैवाने कसल्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही हे विशेष. एकीकडे करोनाच्या या महामारीमुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. गहु आणी संत्रा यामधून दोन पैशाचे उत्पन्न घेवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न हे शेतकरी करीत आहे. परंतु शासनाचे कर्मचारी मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याचं चित्र आहे. केवळ मार्च महीन्याच्या वसुलीकडेच या अधिकाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. यामध्ये सर्वसाधारण शेतकऱ्यांचा बळी या ना त्या कारणाने हे अधिकारी घेत असल्याची चर्चा सुध्दा या निमीत्तानं परिसरात होत आहे. आतातरी सबंधित अधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला देण्यात यावा अशी मागणी शेतकरी भुपेश शर्मा यांनी केली आहे. घटनास्थळांचा पंचनामा करून मदतीसाठी प्रयत्न करणार मी बेनोडा सबस्टेशनला आता नव्यानेच आलो आहे. माझ्या कारकीर्दीत शेतकरी भुपेश शर्मा यांनी कसल्याही प्रकारचे लेखी वा तोंडी निवेदन दिले नाही. कदाचित अगोदर दिले असेल तर मला माहीती नाही. या प्रकरणाच्या माध्यमातून त्यांचा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न करणार तर आहोतच, मात्र घटनास्थळाचा पंचनामा करून शासनाकडून काही मदत करता यईल का यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बेनोडा शहीद विज वितरण कंपनीचे अधिकारी प्रदिप हिवे यांनी सांगीतले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

कडक निर्बंधांसाठी तयार राहा; राजेश टोपेंचं जनतेला आवाहन

मुंबई: ' लावण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही. त्याबाबत चर्चा निश्चितच सुरू असते. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकार अधिक कडक निर्बंध लादण्याचं पाऊल उचलणार आहे. त्यामुळं लोकांनी तशी मानसिक तयारी ठेवावी,' असं सूचक वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री यांनी केलं आहे. राज्यात रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. काल २७ हजारांहून अधिक रुग्णांची भर पडली. त्यामुळं राज्य सरकार अधिक सतर्क झालं आहे. संपूर्ण लॉकडाऊन न करता करोनाचा संसर्ग कसा थोपवता येईल यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी कठोर निर्बंधांचा मार्ग अवलंबला जाणार आहे. राजेश टोपे यांनी आज तेच संकेत दिले. 'गर्दी टाळणे हाच निर्बंध लावण्यामागचा मुख्य हेतू आहे. गर्दी कशी टाळता येईल. गर्दीच्या ठिकाणांवर कसे नियंत्रण ठेवता येईल होणारी जी काही ठिकाणं आहेत, याबाबतचं नियोजन केलं जात आहे. हे नियोजन अंतिम झाल्यावर त्याबाबतची माहिती देण्यात येईल. सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळलं जावं या दृष्टिकोनातून पावलं उचलावी लागणार आहेत. गरजेनुसार त्याबाबतचे आदेश निर्गमित केले जातात. यापूर्वी १५ मार्च आणि दोन दिवसांपूर्वी असे आदेश काढण्यात आले आहेत. करोना रुग्णांची संख्या अशीच राहणार असेल आणि लोक असेच बेफिकिरीनं वागणार असतील तर निर्बंधांमध्ये कठोरता आणावीच लागेल,' असं टोपे म्हणाले. वाचा: 'लॉकडाऊन टाळायचा असेल तर नियम पाळणे हा एकमेव उपाय आहे. त्यामुळं 'नियम पाळा, लॉकडाऊन टाळा', असंही टोपे यांनी सांगितलं. राज्यात काल एकूण २७ हजार ९१८ करोना रुग्णांची नोंद झाली. तर, १३९ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत १ कोटी ९६ लाख २५ हजार करोना चाचण्या झाल्या असून त्यापैकी २७ लाख ७३ हजार ४३६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १६,५६,६९७ व्यक्ती होमक्वारंटाईन असून १७,६४९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, एकूण २३ लाख ७७ हजार १२७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

किचनमध्ये झुरळं; नगरमधील प्रसिद्ध हॉटेलवर मोठी कारवाई

अहमदनगर: किचनमध्ये झुरळांचा वावर, काही मशीनरीमध्येही झुरळ मरून पडलेली, किचनमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, कच्चे अन्नपदार्थ मुदतबाह्य झालेली. सुधारण्याची संधी देऊनही सुधारणा केली नाही, अशा अवस्थेत नगर शहरातील हॉटेल औरस (हॉटेल कपिराज) चा परवाना सात दिवसांसाठी निलंबित करण्यात आला आहे. नगरच्या अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली. २६ एप्रिल ते २ मे २०२१ या काळात संबंधितांना हॉटेल बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. वाचा: अन्न व औषध प्रशासनातर्फे डिसेंबर महिन्यात हॉटेलची तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. ३० डिसेंबर रोजी नगर शहरातील मनमाड रोडवरील हॉटेल औरस (हॉटेल कपिराज) तपासणी करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त एस.पी. शिंदे व अन्न सुरक्षा अधिकारी एस. एम. पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही तपासणी केली होती. या हॉटेलमध्ये तपासणीवेळी अनेक गंभीर त्रुटी आढळुन आल्या. प्रामुख्याने किचनमध्ये झुरळांचा वावर मोठ्या प्रमाणात आढळून आला. काही मशीनरीमध्ये झुरळ मरून पडल्याचे आढळून आले. किचनमध्ये मोठया प्रमाणात अस्वच्छता आढळली. कच्चे अन्नपदार्थ मुदतबाह्य झाल्याचे आढळले. बारमध्ये मॉकटेल तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी वेगवेगळया फ्लेवरचे क्रश मुदतबाहय झाल्याचे आढळून आले. हॉटेलमध्ये वापरण्यात येणारे ब्रेड व इतर बेकरी पदार्थ यांच्यावर कोणत्याही प्रकारचे लेबलवर्णन नव्हते. हॉटेलमध्ये वेळोवेळी पेस्ट कंट्रोल न करणे, गोदामामधील अन्नपदार्थ अस्ताव्यस्त ठेवणे, मुदतबाह्य अन्नपदार्थाचा साठा, किचनमधील फ्रिज व डीप फ्रिजरमध्ये अन्नपदार्थ अस्ताव्यस्तपणे साठविणे, साठविलेल्या तयार अन्नपदार्थावर कोणत्याही प्रकारचे लेबल नसणे, कामगारांची अस्वच्छता अनेक असे दोष आढळून आले. त्यामुळे व्यवस्थापनाला ६ जानेवारी २०२१ रोजी सुधारण्याची नोटीस देण्यात आली. नोटिशीच्या मुदतीत हॉटेलकडून कोणताही खुलासा आला नाही. त्यामुळे १ फेब्रुवारीला पुन्हा तपासणी करण्यात आली. तेव्हा पूर्वी आढळून आलेल्या ३४ मुद्द्यांपैकी केवळ सहा मुद्द्यांची पूर्तता करण्यात आल्याचे आढळून आले. त्यावर सुनावणी ठेवण्यात आले. त्यासाठी २५ फेबुवारी तारीख देण्यात आळी. मात्र त्यावेळीही हॉटेल व्यवस्थापनाकडून समाधानकार खुलासा सादर करण्यात आला नाही. त्यामुळे हॉटेलचा परवाना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २६ एप्रिल ते २ मे या सात दिवसांसाठी परवाना निलंबित करण्यात आला आहे. या कालावधीमध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करु नये, असा आदेश व्यवस्थापनाला देण्यात आला आहे, अशी माहिती सहायक आयुक्त शिंदे यांनी दिली. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

जळगाव: फुटीर नगरसेवकांविरोधात भाजपची ३० हजार पानी याचिका

जळगाव: महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फुटून शिवसेनेच्या गोटात गेलेल्या भाजपच्या २७ नगरसेवकांवर पक्षादेशाचा भंग केल्याचा ठपका ठेवत अपात्र ठरवावे यासाठी बुधवारी नाशिकच्या विभागीय आयुक्तांकडे भाजपचे गटनेते यांनी तब्बल ३० हजार पानांची याचिका दाखल केली आहे. यावेळी नाशिक महापालिकेचे गटनेते जगदीश पाटील व अॅड. संदीप भगत आदी उपस्थित होते. पक्षांतर बंदीच्या कायद्यान्वये अपात्रतेसाठी दाखल करण्यात आलेली ३० हजार पानांची याचिका ही एकमेव असल्याचा दावा करण्यात येत आहे. महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीदरम्यान सत्ताधारी भाजपमध्ये फूट पडली होती. भाजपच्या २७ नगरसेवकांनी पक्षाचा व्हीप न जुमानता शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान केले. त्यामुळे भाजपचे महापौर पदाचे उमेदवार प्रतिभा कापसे व उपमहापौर पदाचे उमेदवार सुरेश सोनवणे यांचा पराभव झाला होता. महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन व उपमहापौरपदी भाजपाचे बंडखोर कुलभूषण पाटील हे विजयी झाले होते. भाजपच्या २७ नगरसेवकांनी पक्षादेश न जुमानता पक्षाशी गद्दारी केल्याने त्यांचे नगरसेवक पद करण्यात यावे याकरता मनपा गटनेता भगत बालानी यांनी आज बुधवारी दुपारी १ वाजता विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे याचिका दाखल केली. वाचा: भाजपमधून फुटलेल्या या २७ नगरसेवकांना भाजपने प्रत्यक्ष, मोबाईल, व्हॉट्सअॅप, वृत्तपत्र अशा वेगवेगळ्या माध्यमातून सहा प्रकारे पक्षादेश बजावला होता. मात्र, त्याचे उल्लंघन केल्याचा भाजपचा आरोप आहे. विशेष म्हणजे भाजपने महासभेचे इतिवृत्त, सीडी, महत्वाची कागदपत्रे, व्हीप बजावल्याचे पुरावे असे सर्व एकूण तब्बल ३० हजार पाने असलेली याचिका दाखल केली असल्याची माहिती भाजपचे गटनेते भगत बालाणी यांनी 'मटा'शी बोलतांना दिली आहे. वाचा: दरम्यान, महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीदरम्यान ऑनलाइन महासभेत नगरसेवक व मनपाच्या अधिकाऱ्यांनी व्यतिरिक्त इतर जण सहभागी झाल्यामुळे ही महासभा बेकायदेशीर असल्याबाबत देखील भाजपकडून न्यायालयात स्वंत्रत याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहितीही भगत बालाणी यांनी दिली आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

पाकिस्तान भारत के साथ करेगा व्यापार, कश्मीर से 370 हटने के बाद 19 माह से बंद है ट्रेड

डिजिटल डेस्क, नई दिल्ली/इस्लामाबाद। भारत-पाकिस्तान के बीच एक बार फिर से व्यापार शुरू होने जा रहा है। कश्मीर से धारा 370 हटाने के बाद बंद हुआ ये व्यापार अब 19 महीने बाद फिर से सुचारू होगा। पाकिस्तान में आर्थिक मामलों से जुड़ी कैबिनेट ने भारत के साथ ट्रेड को मंजूरी दी है। अब पाकिस्तान जून 2021 तक भारत से कपास का आयात करेगा। वहीं, चीनी को लेकर भी पाकिस्तान सरकार मुहर लगा सकती है। 

खबर में खास

 • पाकिस्तान की कैबिनेट इकॉनोमिक कॉर्डिनेशन कमेटी ने बुधवार को अपनी एक रिपोर्ट पेश की 
 • इस रिपोर्ट में भारत के साथ कपास और चीनी का ट्रेड शुरू करने की अपील की गई थी 
 • साल 2019 में अगस्त में जम्मू कश्मीर से धारा 370 हटने के बाद पाकिस्तान ने भारत के साथ ट्रेड बंद कर दिया था
 • दोनों देशों के बीच 19 महीने से बंद है व्यापार
 • पाकिस्तान चीनी और कपास के आयात के पक्ष में आया है 
 • पाकिस्तान को इन दोनों के लिए काफी मशक्कत करनी पड़ रही थी
 • मई 2020 में पाकिस्तान ने भारत से आयात होने वाली दवाइयों और रॉ मैटेरियल पर लगे प्रतिबंध को भी हटा लिया था 


.Download Dainik Bhaskar Hindi App for Latest Hindi News.
.
...
Pakistan will do business with India Imran khan government approved to do business with India
.
.
.


from दैनिक भास्कर हिंदी

किचनमध्ये आढळली झुरळं; नगरमधील प्रसिद्ध हॉटेलवर मोठी कारवाई

अहमदनगर: किचनमध्ये झुरळांचा वावर, काही मशीनरीमध्येही झुरळ मरून पडलेली, किचनमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, कच्चे अन्नपदार्थ मुदतबाह्य झालेली. सुधारण्याची संधी देऊनही सुधारणा केली नाही, अशा अवस्थेत नगर शहरातील हॉटेल औरस (हॉटेल कपिराज) चा परवाना सात दिवसांसाठी निलंबित करण्यात आला आहे. नगरच्या अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली. २६ एप्रिल ते २ मे २०२१ या काळात संबंधितांना हॉटेल बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. वाचा: अन्न व औषध प्रशासनातर्फे डिसेंबर महिन्यात हॉटेलची तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. ३० डिसेंबर रोजी नगर शहरातील मनमाड रोडवरील हॉटेल औरस (हॉटेल कपिराज) तपासणी करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त एस.पी. शिंदे व अन्न सुरक्षा अधिकारी एस. एम. पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही तपासणी केली होती. या हॉटेलमध्ये तपासणीवेळी अनेक गंभीर त्रुटी आढळुन आल्या. प्रामुख्याने किचनमध्ये झुरळांचा वावर मोठ्या प्रमाणात आढळून आला. काही मशीनरीमध्ये झुरळ मरून पडल्याचे आढळून आले. किचनमध्ये मोठया प्रमाणात अस्वच्छता आढळली. कच्चे अन्नपदार्थ मुदतबाह्य झाल्याचे आढळले. बारमध्ये मॉकटेल तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी वेगवेगळया फ्लेवरचे क्रश मुदतबाहय झाल्याचे आढळून आले. हॉटेलमध्ये वापरण्यात येणारे ब्रेड व इतर बेकरी पदार्थ यांच्यावर कोणत्याही प्रकारचे लेबलवर्णन नव्हते. हॉटेलमध्ये वेळोवेळी पेस्ट कंट्रोल न करणे, गोदामामधील अन्नपदार्थ अस्ताव्यस्त ठेवणे, मुदतबाह्य अन्नपदार्थाचा साठा, किचनमधील फ्रिज व डीप फ्रिजरमध्ये अन्नपदार्थ अस्ताव्यस्तपणे साठविणे, साठविलेल्या तयार अन्नपदार्थावर कोणत्याही प्रकारचे लेबल नसणे, कामगारांची अस्वच्छता अनेक असे दोष आढळून आले. त्यामुळे व्यवस्थापनाला ६ जानेवारी २०२१ रोजी सुधारण्याची नोटीस देण्यात आली. नोटिशीच्या मुदतीत हॉटेलकडून कोणताही खुलासा आला नाही. त्यामुळे १ फेब्रुवारीला पुन्हा तपासणी करण्यात आली. तेव्हा पूर्वी आढळून आलेल्या ३४ मुद्द्यांपैकी केवळ सहा मुद्द्यांची पूर्तता करण्यात आल्याचे आढळून आले. त्यावर सुनावणी ठेवण्यात आले. त्यासाठी २५ फेबुवारी तारीख देण्यात आळी. मात्र त्यावेळीही हॉटेल व्यवस्थापनाकडून समाधानकार खुलासा सादर करण्यात आला नाही. त्यामुळे हॉटेलचा परवाना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २६ एप्रिल ते २ मे या सात दिवसांसाठी परवाना निलंबित करण्यात आला आहे. या कालावधीमध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करु नये, असा आदेश व्यवस्थापनाला देण्यात आला आहे, अशी माहिती सहायक आयुक्त शिंदे यांनी दिली. वाचा:


from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times

Ahmednagar: अटक टाळण्यासाठी तो हॉस्पिटलमध्ये दाखल झाला, अन् तिथंच…

म. टा. प्रतिनिधी, नगर: खुनासह अन्य गुन्हे करणाऱ्या टोळीविरोधात पोलिसांना महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली. मात्र, या टोळीतील एक आरोपी पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर त्याने अटक टाळण्यासाठी रुग्णालयाचा आसरा घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली. येथील एका खासगी रुग्णालयात आरोपी दाखल झाला होता. पोलिसांनी तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. जिल्हा रुग्णालयात आणून तपासणी केल्यावर त्याचा बनाव उघड झाला आणि त्याला अटक करण्यात आली. त्याला आश्रय देणाऱ्या हॉस्पिटलवर काय कारवाई होणार, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. सुनील फक्कड आडसरे (वय २६, रा. शेडाळा, ता. आष्टी) याला पोलिसांनी अटक केली आहे. सुमारे सहा महिन्यांपासून तो फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके नियुक्त करण्यात आली होती. नगर आणि बीड जिल्ह्यात त्या शोध सुरू होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना आरोपी सुप्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलिस पथके पाठविली. पोलिसांना शोधाशोध सुरू केल्यावर सुप्यातील निरामय हॉस्पिटलमध्ये तो उपचारासाठी दाखल असल्याची माहिती मिळाली. मात्र, आडसरे याला गंभीर आजार नसावा, असा संशय त्याला पाहताच क्षणी आला. त्यामुळे पोलिसांनी त्याला तेथून ताब्यात घेतले. नगरच्या सरकारी रुग्णालयात आणून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. खात्री पटल्यावर त्याला नगर तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. गेल्या वर्षी वाळकी (ता. नगर) येथे ओंकार बाबासाहेब भालसिंग यांचा खून झाला होता. गावातील चौकामध्ये विश्वजीत प्रतिष्ठानच्या वतीने शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचे काम सुरू होते. त्यावेळी ओंकार याने विरोध केला होता. त्याचा राग मनात धरुन विश्वजीत कासार (रा. वाळकी) याने व त्याच्या इतर साथीदारांनी १७ नोव्हेंबर २०२० रोजी त्याच खून केला होता. ओंकार दुचाकीवरुन घरी जात असताना, त्याला समोरुन चारचाकी वाहनाने धडक देऊन खाली पाडले. त्यानंतर लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने मारहाण करुन त्याचा खून करण्यात आला. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करून गुन्ह्यातील मुख्य आरोपी विश्वजीत रमेश कासार व त्याचे चार साथीदारांना अटकही केली. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. मात्र, या टोळीतील आरोपी सुनिल आडसरे फरार झालेला होता. शेवटी त्यालाही अटक करण्यात पोलिसांना यश आले.


from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times

param bir singh vs anil deshmukh : गृहमंत्र्यांनी तुमच्यासमोर १०० कोटींची मागणी केली का? मुंबई हायकोर्टाचा परमबीर सिंगांना सवाल

मुंबई: गृहमंत्री यांनी सचिन वाझे आणि अन्य कनिष्ठ अधिकाऱ्यांना १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप करत सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या माजी मुंबई पोलीस आयुक्त यांच्या फौजदारी जनहित याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. यावेळी सिंगांवर हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींनी प्रश्नांची सरबत्ती केली. गृहमंत्र्यांनी केलेली कथित मागणी तुमच्यासमोर केली होती का? तुम्ही प्रत्यक्षददर्शी आहात काय? याबाबत पुरावे आहात काय? अशी विचारणा त्यांनी केली. परमबीर सिंग यांच्या जनहित याचिकेवर आज, बुधवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. यावेळी मुख्य न्यायमूर्तींनी सिंग यांचे वकील विक्रम ननकानी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. तत्पूर्वी ननकानी यांनी कोर्टात सिंग यांच्या वतीने आपले म्हणणे मांडले होते. 'मला माझ्या कनिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली आणि कर्तव्य म्हणून त्याची दखल घेऊन मी माझ्या वरिष्ठांना कळवले. मला कोणी अनोळखी माणसाने सांगितलेले नाही, असे ते म्हणाले होते. त्यावर "तुम्ही ज्या कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने आरोप केले आहेत, त्यांचे प्रतिज्ञापत्र तरी जोडले आहेत का याचिकेत? उद्या मलाही मूख्य न्यायमूर्ती म्हणून कुणाबद्दल काही तरी सांगेल, मग त्यावर विसंबून चौकशीचे आदेश केले जाऊ शकतात का? कारवाई केली जाऊ शकते का?, असा प्रश्न त्यांनी विचारला. परमबीर सिंग यांची फौजदारी जनहित याचिका ही सुनावणीयोग्यच नाही. ते सेवेत आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निवाड्यांप्रमाणे अशी जनहित याचिका सुनावणीयोग्यच नाही, असा युक्तिवाद राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी सुनावणीच्या सुरुवातीलाच करून आक्षेप नोंदवला. "सिंग यांच्या पत्रामुळे मुंबई पोलीस दलाविषयी झालेले संशयाचे वातावरण दूर करण्यासाठी राज्य सरकारही प्रयत्नशील आहे. मिडियामध्ये विविध प्रकारच्या बातम्या आल्या. त्यामुळे निर्माण झालेले संशयाचे धुके दूर करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. पण याचा अर्थ कोणीही काहीही म्हटले तर त्याची दखल घ्यावी असे नाही. याचिकादारांनी थेट हायकोर्टात धाव घेणे चुकीचे आहे. ते योग्य मंचासमोर आपल्या तक्रारी मांडू शकतात, असे कुंभकोणी म्हणाले. "मूळ तक्रार काय ते तरी आम्हाला ऐकू द्या, नंतर तुमच्या हरकतीचा विचार करू, असे मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता व न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने सांगितले. त्यानंतर ज्येष्ठ वकील विक्रम ननकानी यांनी सिंग यांचे मुख्यमंत्री यांना पाठवलेले पत्र आणि त्यातील तपशील वाचून दाखवण्यास सुरुवात केली. "तुमच्या याचिकेत पहिली विनंती, सीबीआय चौकशीची. पण या प्रकरणात एफआयआरच झालेला नसेल तर सीबीआय चौकशीच्या विनंतीचा विचार होऊ शकतो का? आणि बदलीचा मुद्दाही तुम्ही मांडला आहे. जनहित याचिकेत सेवाविषयक प्रश्न विचारात घेतला जाऊ शकतो का?, असा सवाल मुख्य न्यायमूर्तींनी ननकानी यांना केला. "एफआयआर नसताना हायकोर्टाने एफआयआर नोंदवण्याचा आदेश दिला आणि त्याप्रमाणे एफआयआर नोंदवून सीबीआय चौकशीचाही आदेश झाला, असे दाखवणारा सुप्रीम कोर्टाचा एक तरी आदेश आम्हाला दाखवा, अशीही विचारणा त्यांनी केली. महाधिवक्त्यांनी सांगितले की, "परमबीर यांची जनहित याचिका ही वैयक्तिक सूडबुद्धीने आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रातही उल्लेख केला होता की, गृहमंत्र्यांसोबत माझे संबंध बिघडले आहेत. खासदार मोहन डेलकर प्रकरणात त्यांनी माझा सल्ला ऐकला नाही.' सिंग यांच्यातर्फे ननकानी यांनीही बाजू मांडली. "आरोप कोणाविरुद्ध हे इथे महत्त्वाचे आहे. पोलीस दलाचे नेतृत्व करणाऱ्याकडूनच गुन्हा घडला. त्यामुळे मी सीबीआयकडे जाऊ शकत होतो. मात्र, विविध आवश्यक प्रकरणांचा तपास सीबीआयकडे जाण्याविषयी राज्य सरकारने पूर्वी सरसकट दिलेली संमती राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी मागे घेतलेली होती. म्हणून मी सीबीआयकडे तक्रार करू शकत नव्हतो. म्हणून मी सुप्रीम कोर्टात गेलो, असे ननकानी म्हणाले. त्यावर तुम्ही स्वतः वरीष्ठ पोलिस अधिकारी आहात. मग तुमच्या साहेबांनी गुन्हा केल्याचे तुम्हाला दिसत होते; तर तुम्ही स्वतःच एफआयआर का केला नाही. गुन्हा दिसला तर एफआयआर करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असते. इथे तर पोलीस अधिकारी म्हणून तुम्हीच एफआयआर केला नसेल, तर ती तुम्ही कर्तव्य पार पाडले नाही, असे गंभीर निरीक्षण मुंबई हायकोर्टाने नोंदवले. "कायदा फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठीच आहे का? त्यांनीच त्याचे पालन करायचे का? मंत्री, अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्यासाठी तो नाही का? तुम्ही स्वतः पोलीस आयुक्त होतात. त्यामुळे तुम्ही कायद्याचे पालन करून आधी एफआयआर दाखल करायला हवा होता. ते तुम्ही का केले नाही? असा सवाल मुख्य न्यायमूर्तींनी परमबीर सिंह यांना केला.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

sachin vaze : सचिन वाझेंचा नवी मुंबईत आणखी एक 'कार'नामा

म. टा. प्रतिनिधी, : निलंबित पोलिस अधिकारी यांची आणखी एक आलिशान गाडी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ताब्यात घेतली आहे. नवी मुंबईतील कामोठे येथील एका सोसायटीबाहेर ही गाडी उभी होती. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर गाडीत स्फोटके ठेवण्यापासून ते त्या गाडीचे मालक असलेले मनसुख हिरेन यांचा मृत्यू, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या 'एनआयए'ने सचिन वाझे यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे 'एनआयए'ने आतापर्यंत पाच आलिशान गाड्या जप्त केल्या आहेत. त्यामध्ये मर्सिडीजसह प्राडो या गाडीचाही समावेश आहे. त्यानंतर 'एनआयए'ने मंगळवारी मित्सुबिशी आऊटलँडर ही आणखी एक आलिशान गाडी जप्त केली. ही गाडी वाझे यांच्याच नावावर आहे. दरम्यान, रविवारी मिठी नदीतून बाहेर काढलेल्या सामानाचाही 'एनआयए'ने आता विस्तृत तपास सुरू केला आहे. वाझे यांनी मिठी नदीत फेकलेला लॅपटॉप 'डीकोड' करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा लॅपटॉप वाझे हे 'सीआययू' कार्यालयातील कामासाठी वापरत होते, असे समोर आले आहे. त्यानुसार या लॅपटॉपमध्ये नेमकी काय माहिती आहे व त्याचा या प्रकरणाशी कसा संबंध आहे, त्यात आणखी कोणी सहभागी आहे का, यासाठी आता लॅपटॉपमधील माहिती महत्त्वाची ठरणार आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

'बाळासाहेबांचे खरे वैचारिक वारसदार राज ठाकरेच; बाकी गोष्टी महत्त्वाच्या नाहीत'

मुंबई: शिवसेनाप्रमुख दिवंगत स्मारकाचं भूमिपूजन आज होणार आहे. स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्यातील आमंत्रितांच्या यादीवरून राजकारण रंगलं असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं बाळासाहेबांच्या वैचारिक वारशाचा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेला जोरदार टोला हाणला आहे. मनसेचे सरचिटणीस यांनी या संदर्भात ट्वीट केलं आहे. 'स्वर्गीय बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थानं पुढं नेण्याचं काम हे राजसाहेबच करत आहेत हीच मराठी माणसाची भावना आहे. आणि तीच महत्वाची आहे. बाकी भूमिपूजन कोण करतंय ते फारसं महत्त्वाचं नाही,' असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या विराट सभांनी गाजलेल्या शिवाजी पार्क मैदानापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जुन्या महापौर निवासाच्या ठिकाणी बाळासाहेबांचं राष्ट्रीय दर्जाचं स्मारक होत आहे. या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा आज होत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीची बंधने लक्षात घेऊन मोजक्या उपस्थितांसह हा सोहळा होणार असून त्याचे ऑनलाइन प्रक्षेपण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे यावेळी उपस्थित असतील. मात्र, आमंत्रितांच्या यादीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव नसल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. वाचा: भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी यावरून उद्धव ठाकरे यांना टोला हाणला आहे. आज बाळासाहेब असते तर पहिले आमंत्रण देवेंद्र फडणवीस यांना दिले असते. बाळासाहेब मनाचा राजा माणूस. राजा होण्यासाठी मन मोठं लागतं. त्यांच्यानंतर फक्त किस्से मोठे आहेत, मन खूप लहान झाली आहेत,' असं नीतेश राणे यांनी म्हटलं आहे. तर, एकनाथ शिंदे यांना आमंत्रण न दिल्याबद्दलही आश्चर्य व्यक्त केलं आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

पुण्यात लॉकडाउनची गरज भासणार नाही, कारण...

म. टा. प्रतिनिधी, महापालिका प्रशासनाने खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा नियंत्रित करण्याचा निर्णय घेतला असून, सगळ्या मिळून सुमारे पाच हजार खाटा ताब्यात आहेत. ऑक्सिजनसज्ज आणि व्हेंटिलेटर असणाऱ्या खाटा अशा आणखी अडीच हजार खाटा वाढविण्यात येत असून, लवकरच खाटांचा आकडा सात हजारांच्या घरात पोहचणार आहे. 'सध्या शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांत चार हजार ९०० रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातच आता दररोज वाढणारे रुग्ण आणि बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या समसमान येऊ लागल्याने रुग्णांना उपचारांसाठी खाटा उपलब्ध होण्याचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे शहरात लगेचच लॉकडाउन करण्याची गरज भासणार नाही,' असा दावा महापौर यांनी केला आहे. करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता महापौरांनी महापालिकेत तातडीची आढावा बैठक घेतली. महापालिका आयुक्त विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकताच लॉकडाउनला विरोध केला आहे. त्याची किनार या बैठकीला होती. महापालिकेत सध्या लॉकडाउन करण्याबाबत वारे वाहत असून, त्यास विरोध करायचा झाल्यास महापालिका प्रशासनाची काय तयारी आहे याचा अप्रत्यक्ष आढावा या बैठकीत घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. वाचा: पुणे महापालिका हद्दीतील चार हजार ८४९ रुग्ण सध्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. पिंपरी-चिंचवड आणि जिल्हा मिळून १४ हजार २४२ रुग्णांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. पुणे शहराचा विचार करता करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयांतील ८० टक्के खाटा नियंत्रित करण्यात आल्या आहेत. महापालिका आयुक्तांनी तसे आदेश काढले असले, तरी खासगी रुग्णालयांकडून या खाटा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे सध्या खाटांचा तुटवडा जाणवत असला, तरी येत्या चार ते पाच दिवसांत नव्याने दोन हजार ४०० खाटा करोनाबाधितांसाठी उपलब्ध होणार आहेत. महापालिका प्रशासनाने कोव्हिड केअर सेंटर्स तयार करण्यास सुरुवात केली असून, सध्या दोन हजार खाटा त्या ठिकाणी उपलब्ध केल्या आहेत. हा आकडा पाच हजारांपर्यंत नेण्यात येणार असून, त्यामध्ये ऑक्सिजनसज्ज खाटांची निर्मिती करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यातही वाढणारी रुग्णसंख्या गृहित धरून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पुरेशी व्यवस्था निर्माण करण्यात येत असल्याचा दावा महापौरांनी केला आहे. वाचा: शहरातील सध्याची रुग्णसंख्या सरासरी तीन हजार ४०० च्या प्रमाणात वाढत असून, तेवढेच रुग्ण आता बरे होऊ लागले आहेत. मध्यम लक्षणे असणाऱ्या रुग्णांना दहा दिवसांत घरी सोडण्याचे आदेशही खासगी रुग्णालयांना देण्यात आले असून, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांची हॉस्पिटलनिहाय नियुक्ती करण्यात आली आहे. दररोज वाढणाऱ्या रुग्णांमधील दहा टक्के रुग्णांना रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याची गरज भासते. त्याच वेळी दहा टक्के रुग्ण बरे होऊन घरी जाणार आहेत. हा समन्वय व्यवस्थित साधला गेल्यास आणि अतिरिक्त खाटांचा 'बफर' म्हणून वापर झाल्यास रुग्णांवर उपचार होणे सहज शक्य होणार असल्याचे महापौरांनी सांगितले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

बाळासाहेब ठाकरे स्मारक भूमिपूजन सोहळ्यातून फडणवीसांना डावलले?

मुंबई: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा आज पार पडणार आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मात्र, विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांना या सोहळ्याचे आमंत्रण नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विराट सभांनी गाजलेले शिवाजी पार्क मैदान आणि अरबी समुद्र यांच्या मध्यभागी असलेल्या जुन्या महापौर निवासाच्या ठिकाणी हे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक होत आहे. स्मारक प्रकल्पाच्या वास्तुशिल्पाचा आराखडा बनविण्यासाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विविध वास्तुविशारदांनी सादर केलेल्या आराखड्यांमधून मुंबईतील वास्तुविशारद आभा लांबा यांनी तयार केलेला आराखडा सर्वोत्कृष्ट ठरला. राज्य सरकारने या स्मारक योजनेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची प्रकल्प समन्वयीन यंत्रणा म्हणून नियुक्ती केली. वास्तू उभारणीचा पहिला टप्पा १४ महिन्यांमध्ये पूर्ण केला जाणार आहे. वाचा: दादर येथील जुन्या महापौर निवासात हा भूमिपूजन सोहळा होणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीची बंधने लक्षात घेऊन मोजक्या उपस्थितांसह भूमिपूजन समारंभ होणार असून, त्याचे ऑनलाइन थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , महसूलमंत्री यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. मात्र, आमंत्रितांच्या यादीत फडणवीसांचं नाव नसल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातच या स्मारकाची घोषणा झाली होती. स्मारकासाठी भू वापर व पर्यावरणासंबंधीच्या सर्व परवानग्या युती सरकारच्या काळातच मिळाल्या होत्या. फडणवीस व उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातील माहिती दिली होती. त्यानंतर आता प्रत्यक्षात काम सुरू होत असताना फडणवीसांना या कार्यक्रमापासून दूर ठेवलं गेलं आहे. वाचा: सत्तावाटपाच्या मुद्द्यावरून भाजप-शिवसेनेचं बिनसल्यानंतर शिवसेनेनं राष्ट्रवादी व काँग्रेससोबत राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. त्यानंतर भाजपनं सातत्यानं शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. भाजपच्या काही नेत्यांनी ठाकरे कुटुंबीयांवरही टीका केली आहे. सचिन वाझे प्रकरणात भाजपनं विशेषत: फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट आरोप केले होते. त्यामुळं त्यांच्यातील दुरावा वाढल्याचं बोललं जात आहे. आजच्या कार्यक्रमाचं आमंत्रण फडणवीसांना नसण्यामागे हेही एक कारण असल्याचं बोललं जात आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Nagpur: दारू पाजून विद्यार्थिनीवर अत्याचार, नृत्य शिक्षकाला केली अटक

म. टा. प्रतिनिधी, : नृत्य शिक्षकाने तणाव दूर करण्याच्या बहाण्याने दारू पाजून २२ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार केला. ही खळबळजनक घटना भागात उघडकीस आली. अजनी पोलिसांनी अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून शिक्षकाला अटक केली आहे. रोमियो गजानन गोडबोले (वय २५), असे अटकेतील नृत्य शिक्षकाचे नाव आहे. पीडित विद्यार्थिनी मूळ वर्धा येथील रहिवासी असून, तिचे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाले आहे. सध्या ती स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. काही दिवसांपूर्वी तिची इन्स्टाग्रामवर गोडबोले याच्यासोबत ओळख झाली. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासामुळे ती तणावात होती. गोडबोले याने तिला तणावमुक्त करण्याचे आश्वासन दिले. धुळवडीला तो तरुणीच्या फ्लॅटमध्ये गेला. तिला दारू पाजली. तरुणीने दारू प्यायली. ती मद्यधुंद अवस्थेत असताना गोडबोले याने तिच्यावर अत्याचार केला. मोबाइलमध्ये तिचे अश्लील छायाचित्र काढले. काही वेळाने तरुणी शुद्धीवर आली. अत्याचार केल्याने तिने गोडबोले याला जाब विचारला. त्याने छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी दिली. तरुणीने नागपुरातील एका नातेवाइकाला घटनेची माहिती दिली. नातेवाइकासोबत तरुणीने अजनी पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी अत्याचार, अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून गोडबोले याला अटक केली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

पुण्यात ज्वेलर्सवर दरोड्यासाठी ते विमानाने आले; १.३७ कोटींचा दरोडा उघडकीस

ठाणे: ठाण्यातील वारीमाता गोल्ड या ज्वेलर्स दुकानातून जानेवारीमध्ये तब्बल १ कोटी ३७ लाखांचे सोने, चांदीचे दागिने चोरीला गेले होते. या प्रकरणात पटना येथून विमानाने मुंबईत आलेल्या तीन आरोपींना कासारवडवली पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन ताब्यात घेतले आहे. मुळचे झारखंडचे असलेल्या आरोपींचा या गुन्ह्यामध्ये सक्रिय सहभाग आहे. शिवाय आरोपींचा पुण्यातही ज्वेलर्स दुकान फोडून चोरी करण्याचा डाव होता. त्यासाठी ते आले होते. मात्र वेळीच पकडले गेल्याने पुढील अनर्थ टळला. मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यात जानेवारीत वारीमाता गोल्ड पडला होता. या दरोड्यात चोरट्यांनी १ कोटी ३७ लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने चोरले होते. या दरोड्याच्या घटनेचा तपास सुरू होता. पोलिसांनी पाटणा येथून विमानाने मुंबईत आलेल्या तिघांना विमानतळावरून ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, या दरोड्यात त्यांचा सक्रिय सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुलतान आबुल शेख, अब्दुल भादू शेख हक, आलमगीर जब्बार शेख अशी या आरोपींची नावे आहेत. हे सर्व जण मूळचे झारखंडचे आहेत. महत्वाचे म्हणजे आरोपी पुण्यात ज्वेलर्समध्ये चोरी करण्यासाठी विमानाने आले होते, अशी माहिती चौकशीत उघड झाली आहे. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी सर्व पोलिस ठाण्याना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कासारवडवली पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी आरोपींच्या मागावर होते. दरम्यान वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर खैरनार यांना सुलतान आबुल शेख, अब्दुल भादू शेख हक, आलमगीर जब्बार शेख हे तीन आरोपी पटना येथून विमानाने मुंबईत येणार असल्याची माहिती मिळाली. तात्काळ पोलिस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या पथकाने या तिन्ही आरोपींना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. सर्व आरोपी मुळचे झारखंडचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वारीमाता गोल्ड ज्वेलर्स दुकानातून तब्बल १ कोटी ३७ लाखांचे सोने, चांदीचे दागिने चोरीला गेल्याच्या प्रकरणात या तिघाही आरोपींचा सक्रिय सहभाग असल्याची बाब समोर आली आहे. महत्वाचे म्हणजे आरोपी पुण्यात ज्वेलर्स दुकानात चोरी करण्यासाठी विमानाने आले होते, ही बाबही चौकशीत समोर आली आहे. भिंतीला भगदाड पाडून केली होती लूट ठाण्यातील शिवाईनगर परिसरात असलेल्या वारीमाता ज्वेलर्सचे दुकान चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास फोडले होते. दरोडेखोरांनी दुकानातून ३ किलो सोने आणि चांदी लूटून नेली होती. ज्वेलर्स दुकानाच्या बाजूच्या गाळ्यात चोरट्यांनी फळविक्रीचा व्यवसाय सुरू करून रात्रीच या ज्वेलर्सच्या भिंतीला भगदाड पाडून ही लूट केली होती. वर्तकनगर पोलीस ठाण्यात १७ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुकानाच्या बाजूचा गाळा एका फळविक्रेत्याने दोन महिन्यांपूर्वी २८ हजार रुपयांच्या मासिक भाड्यावर घेतला होता. परराज्यातील एका व्यक्तीला दुकान मालकाने फारशी चौकशी न करता केवळ अधिक भाडे मिळत असल्याने हे दुकान भाड्याने दिले होते. गेल्या दोन महिन्यांपासून फळविक्रीचा व्यवसाय केवळ नावापुरता केला जात होता. पहाटेच्या सुमारास फळविक्रेत्याने दुकान आणि ज्वेलर्समधील भिंत फोडून ज्वेलर्समध्ये प्रवेश केला. दुकानातील तिजोरी गॅस कटरने कापून त्यातून ३ किलो सोने घेऊन फरार झाले. पूर्वनियोजित हा दरोडा टाकण्यात आला होता.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

मनीष श्रीवासच्या हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे फेकले मध्य प्रदेशातील घाटात

म. टा. प्रतिनिधी, : कुख्यात हत्याकांडाचा घटनाक्रम जुळविण्यात गुन्हे शाखा पोलिसांना यश आले असून, हत्या केल्यानंतर श्रीवास याच्या मृतदेहाचे तुकडे मारेकऱ्यांनी मध्य प्रदेशातील कुरई घाटात फेकल्याची माहिती समोर आली आहे. खवासा सीमेपासून काही अंतरावर हा घाट आहे. दरम्यान, या हत्याकांडाचा सूत्रधार याच्या चार कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत. मनीष श्रीवास हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी कुख्यात शरद ऊर्फ कालू नारायण हाटे, त्याचा भाऊ भरत हाटे आणि हेमंत गोरखा या तिघांना अटक केली आहे. हाटे बंधूंना बुधवार, ३१ मार्चपर्यंत तर गोरखा याला ५ एप्रिलपर्यंत गुन्हे शाखेची कोठडी सुनावण्यात आली आहे. या हत्याकांडाचा सूत्रधार कुख्यात रणजित सफेलकर हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. एकनाथ निमगडे हत्याकांडातही सफेलकर हा पोलिस व सीबीआयला हवा आहे. सफेलकर फरार असल्याने पोलिसांनी त्याची संपत्ती व वाहने जप्त करण्यास सुरूवात केली आहे. श्रीवास याच्या मृतदेहाचे तुकडे कुरई येथे ज्या गाडीतून नेण्यात आलहे होते तिच्यासह सफेलकर याच्या चार कार व मोपेड पोलिसांनी जप्त केल्या आहेत. यशिवाय श्रीवास याच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या दोन तलवारीही पोलिसांनी जप्त केल्या आहेत. सफेलकर याने ही वाहने एका दलालाला विक्रीसाठी दिली होती. याबाबत कळताच पोलिसांनी दलालालकडून ही वाहने जप्त केली. ४ मार्च २०१२ ला तरुणीचे आमिष दाखवून सफेलकर, हाटे बंधू व त्याच्या साथीदारांनी मनीषचे अपहरण केले होते. जुनी कामठी परिसरातील पावनगाव (धारगाव) येथे मनीषची हत्या केली व नंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून ते कुरई घाटात फेकले होते. जुन्या वैमनस्यातून घराला आग नागपूर : जुन्या वैमनस्यातून सहा जणांनी अशोक किसन पाटील (वय ४५) यांच्या घराला आग लावली. ही घटना जरीपटक्यातील गौतमनगर भागात सोमवारी पहाटे घडली. सुदैवाने या घटनेत जिवितहानी झाली नाही. पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अभिजित नितीन नितनवरे व त्याच्या पाच साथीदारांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. सराफाला गंडा नागपूर : नकली दागिन्यांच्या मोबदल्यात एका महिलेने एक लाख २३ हजार रुपयांचे दागिने खरेदी करून सराफाला गंडा घातला. ही घटना हिंगण्यातील वानाडोंगरीतील बाजार चौकात घडली. हरिभाऊ के. रसाड (वय ५२ रा. झेंडा चौक) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगणा पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. रसाड यांचे बाजार चौकात रसाड ज्वेलर्स आहे. २५ मार्च रोजी सकाळी एक ४० वर्षीय महिला त्यांच्या दुकानात आली. तिने दुकानातील तरुणीला दागिने दाखवण्यास सांगितले. महिलेने स्वत:कडील दागिने देऊन एक लाख २३ हजार रुपयांचे दागिने खरेदी केली. रसाड यांनी महिलेने दिलेल्या दागिन्यांची तपासणी केली असता ते नकली असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी हिंगणा पोलिसांत तक्रार केली.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

काम की खबर: 1 अप्रैल से ये चीजें हो जाएंगी महंगी, यहां देखें पूरी लिस्ट

डिजिटल डेस्क, नई दिल्ली। कोरोना संकट काल में बुरे दौर से गुजर रहे देश में अब लोगों की परेशानियां बढ़ने जा रही है। पेट्रोल-डीजल के बाद अब 1 अप्रैल से कई दैनिक उपयोगी चीजें महंगी होने जा रही हैं। 1 अप्रैल से नए वित्त वर्ष का आगाज हो जाएगा। केन्द्र सरकार इस नए वित्त वर्ष में बहुत सारी चीजें महंगी करने जा रही है। आइये खबर में पढ़ते हैं क्या महंगा होने जा रहा है। 

सभी तरह के वाहन महंगे
केन्द्र सरकार दो पहिया, तीन पहिया और चार पहिया यानी सभी तरह के वाहनों के दम बढ़ाने वाली है। मारुति, बजाज समेत सभी ऑटो कंपनियों ने 1 अप्रैल 2021 से कार और बाइकों की कीमतों में बढ़ोतरी का ऐलान कर दिया है। 

ये हैं अहम बिंदु 

 • कीमतों में इजाफे के पीछे लागत बढ़ने का हवाला दिया गया है 
 • मारुति सुजुकी के अलावा Nissan और रेनॉ की कारें भी 1 अप्रैल से महंगी होंगी
 • हीरो ने टू-व्हीलर के दाम बढ़ाने का ऐलान कर दिया है 
 • किसानों का लगेगा झटका, ट्रैक्टर भी होंगे महंगे 

खबर में खास 

 • 1 अप्रैल 20201 से टीवी के दाम बढ़ जाएंगे
 • पिछले कुछ महीनों से लगातार टीवी के दाम बढ़ रहे हैं
 • 1 अप्रैल 2021 से टेलीविजन के दाम 2000 रुपये से लेकर 3000 रुपये तक बढ़ने की संभावना है
 • चीन से आयात के मोर्चे पर बैन के बाद टीवी की कीमतों में उछाल आया है
 • 1 अप्रैल से मोबाइल भी महंगे हो जाएंगे
 • वित्त मंत्री निर्मला सीतारमण ने बजट में इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट पर इंपोर्ट ड्यूटी बढ़ाने का ऐलान किया था
 • मोबाइल पोर्ट्स, मोबाइल चार्जर, एडॉप्टर, बैटरी और हेडफोन वगैरह शामिल हैं
 • इंपोर्ट ड्यूटी में बढ़ोतरी के बाद प्रीमियम रेंज स्मार्टफोन सबसे ज्यादा महंगे हो जाएंगे
 • नए वित्त वर्ष से एसी और रेफ्रिजरेटर के दाम बढ़ने वाले हैं
 • एयर कंडीशनर के दाम 1500 रुपये से लेकर 2000 रुपये तक बढ़ सकते हैं
 • पिछले महीने ग्लोबल मार्केट में ओपन-सेल पैनल के दाम में 35 फीसदी का इजाफा हुआ है
 • कंपनियों ने कच्चे माल के दाम में बढ़ोतरी का हवाला दिया है
 • नागर विमानन महानिदेशालय (DGCA) पहली अप्रैल से एयर सिक्योरिटी फीस (ASF) में बढ़ोतरी का ऐलान किया है
 • अब हवाई सफर महंगा हो जाएगा
 • डोमेस्टिक फ्लाइट्स में किराया कम से कम 5 फीसदी बढ़ जाएगा
 • घरेलू यात्रा करने वाले यात्रियों को एयरपोर्ट सिक्योरिटी फीस के नाम पर 200 रुपये और विदेशी यात्रियों को 12 डॉलर देने होंगे
 • एक अप्रैल से दूध की कीमतें भी बढ़ेंगी 
 • बीमा कंपनियां 1 अप्रैल से टर्म इंश्योरेंस प्रीमियम महंगा करने की तैयारी कर रही हैं
 • नए वित्त वर्ष 2021-22 में टर्म इंश्योरेंस के प्रीमियम में 10 से 15 फीसदी की बढ़ोतरी हो सकती है
 • असल में कोरोना संकट के दौरान कंपनियों की बीमा लागत और खर्च काफी बढ़ गई है
 • उत्तर प्रदेश में शराब की कीमतों में 1 अप्रैल 2021 से बढ़ोतरी होने जा रही है
 • उत्तर प्रदेश में 1 अप्रैल से नया आबकारी सेशन शुरू होगा, जिसके तहत अब नए दाम पर शराब बिकेंगे
 • राज्य में एक अप्रैल से देसी और विदेशी शराब महंगी हो जाएगी। राज्य सरकार ने दूसरे देश से आने वाली यानी इम्पोर्टेड शराब, स्कॉच वाइन और वोडका की परमिट फीस बढ़ा दी है
 • 1 अप्रैल में यूपी में बीयर सस्ती होने जा रही है
  स्टील बनाने वाली कंपनियां कीमतों में बढ़ोतरी की तैयारी में है
 • जेएसडब्ल्यू स्टील, जेएसपीएल, एम/एनएस और टाटा स्टील हॉट रोल्ड क्वायल यानी एचआरसी के दाम में 4000 रुपये टन की बढ़ोतरी हो सकती है
 • घरेलू मार्केट में कच्चे माल में तेज बढ़ोतरी और ओडिशा में उत्पादन में आई गिरावट की वजह से स्टील के दाम में तेजी आ रही है
 • पहले दिसंबर 2020 में स्टील के दाम 2500 रुपये प्रति टन की बढ़ोतरी हुई थी
   


.Download Dainik Bhaskar Hindi App for Latest Hindi News.
.
...
Vehicles TV mobile AC Air Travel Milk these things can be expensive from april 1
.
.
.


from दैनिक भास्कर हिंदी

Coronavirus in India: 24 घंटे में मिले 53 हजार नए केस, 355 लोगों की मौत, अकेले महाराष्ट्र में 139 लोगों की गई जान

डिजिटल डेस्क, नई दिल्ली। भारत में कोरोना संक्रमण बढ़ता जा रहा है। महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, पंजाब, केरल, तमिलनाडु समेत देश के कई राज्यों में स्थिति चिंताजनक होती जा रही है। कोरोना संक्रमण की रोकथाम के लिए कुछ राज्यों में नाइट कर्फ्यू लगाया गया है। वहीं, कुछ शहरों में लॉकडाउन लगाया जा चुका है।

केन्द्रीय स्वास्थ्य मंत्रालय की रिपोर्ट के मुताबिक देश में बीते 24 घंटे के भीतर 53 हजार 125 नए कोरोना केस सामने आए हैं। वहीं, 41 हजार 217 मरीज ठीक भी हुए हैं। मौतों का आंकड़ा पिछले कुछ दिनों की तुलना में बढ़ा है। रिपोर्ट के मुताबिक 24 घंटे में 355 लोगों ने जान गंवा दी है। इससे पहले 16 दिसंबर को 356 लोगों की मौत हुई थी। मंगलवार को अकेले महाराष्ट्र राज्य में 139 लोगों की जान गई है। राज्य में यह लगातार छठवां दिन था जब 100 से ज्यादा मौत हुई हैं। 

देश में अब तक 1 करोड़ 21 लाख 49 हजार 335 लोगों कोरोना से संक्रमित हुए हैं। वहीं, 1 करोड़ 14 लाख 34 हजार 301 लोग ठीक भी हुए हैं। कोरोना संक्रमण से अब तक 1 लाख 62 हजार 468 लोगों की जान जा चुकी है। वहीं, 5 लाख 52 हजार 566 मरीज ऐसे हैं जिनका इलाज देश की अलग-अलग अस्पतालों में किया जा रहा है। कोरोना संक्रमण से बचाव के लिए देश में 6 करोड़ 30 लाख 54 हजार 353 लोगों को टीका लगाया जा चुका है। 

महाराष्ट्र में मंगलवार को 27,918 नए मरीज मिले। 23,820 ठीक हुए, जबकि 139 की मौत हुई। बीते दो दिन से नए केसों में गिरावट दर्ज की जा रही है। इससे पहले रविवार को 40,414 और सोमवार को 31,643 लोग पॉजिटिव मिले थे। राज्य में अब तक 27.73 लाख लोग इस महामारी की चपेट में आ चुके हैं। इनमें से 23.77 लाख ठीक हुए हैं, जबकि 54,422 की मौत हुई है। यहां फिलहाल 3.40 लाख लोगों का इलाज चल रहा है।

मध्य प्रदेश में मंगलवार को 2,173 नए मरीज मिले। 1,279 लोग ठीक हुए, जबकि 10 की मौत हुई। राज्य में बीते 24 घंटे में नए केस में मामूली गिरावट देखी गई। सोमवार को यहां 2,323 मामले सामने आए थे। राज्य में अब तक 2.91 लाख लोग इस महामारी की चपेट में आ चुके हैं। इनमें से 2.71 लाख ठीक हुए हैं, जबकि 3,967 की मौत हुई है। फिलहाल 15,150 लोगों का इलाज चल रहा है।

खबर में खास 

 • 1 अप्रैल से 45 साल के ऊपर वाले सभी लोगों को वैक्सीन दी जाएगी
 • वैक्सीन लेने के लिए लोग CoWIN पोर्टल पर 1 अप्रैल यानी गुरुवार से दोपहर 3 बजे के बाद रजिस्ट्रेशन कर सकेंगे
 • सरकारी या निजी किसी भी अस्पताल में जाकर वैक्सीन ले सकेंगे
 • कोरोना संक्रमण के खतरनाक ब्रिटेन और ब्राजीलियन वैरिएंट के खिलाफ कोवैक्सीन और कोविशील्ड टीका प्रभावी है
 • दक्षिण अफ्रीकी वैरिएंट को लेकर रिसर्च जारी है और इसके रिजल्ट जल्द सामने होंगे
 • केंद्रीय स्वास्थ्य सचिव राजेश भूषण ने बताया कि अब तक भारत में 807 UK वैरिएंट, 47 दक्षिण अफ्रीकी वैरिएंट और 1 ब्राजीलियन वैरिएंट के केस मिले हैं
 • हेल्थ मिनिस्ट्री ने बताया कि देशभर में 10 जिलों में एक्टिव केस सबसे ज्यादा हैं
 • ज्यादा एक्टिव के वाले शहरों में पुणे, मुंबई, नागपुर, ठाणे, नासिक, औरंगाबाद, बेंगलुरु, नांदेड़, दिल्ली और अहमदनगर शामिल हैं।
 • महाकुंभ में 1 अप्रैल से 12 राज्यों के श्रद्धालुओं को RT-PCR निगेटिव टेस्ट रिपोर्ट दिखाना अनिवार्य कर दी गई हैयह रिपोर्ट 72 घंटे से पुरानी नहीं होनी चाहिए
 •  इन राज्यों में मध्य प्रदेश, महाराष्ट्र, केरल, पंजाब, कर्नाटक, छत्तीसगढ़, तमिलनाडु, गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली और राजस्थान शामिल है

केन्द्रीय स्वास्थ्य मंत्रालय द्वारा जारी किए गए आंकड़े

o. Name of State / UT Active Cases* Cured/Discharged/Migrated* Deaths**
Total Change since yesterday Cumulative Change since yesterday Cumulative Change since yesterday
1 Andaman and Nicobar Islands 43 29  4976   62  
2 Andhra Pradesh 6614 510  886978 480  7213
3 Arunachal Pradesh 4   16785   56  
4 Assam 1846 30  215413 23  1104  
5 Bihar 1456 32  262238 105  1574
6 Chandigarh 2831 85  23523 178  379
7 Chhattisgarh 22057 1876  318436 1197  4131 35 
8 Dadra and Nagar Haveli and Daman and Diu 166 3474 11  2  
9 Delhi 7429 600  642166 1591  11016
10 Goa 1419 10  55591 136  829
11 Gujarat 12263 222  288565 1988  4510 10 
12 Haryana 9437 125  277110 851  3147
13 Himachal Pradesh 2830 196  59445 137  1045
14 Jammu and Kashmir 2293 183  126304 175  1990
15 Jharkhand 2254 286  120141 129  1113
16 Karnataka 25560 1692  954678 1262  12541 21 
17 Kerala 24960 427  1092365 1946  4606 16 
18 Ladakh 222 87  9767 25  130  
19 Lakshadweep 39 678 1  
20 Madhya Pradesh 16034 884  273168 1279  3977 10 
21 Maharashtra 341887 3959  2377127 23820  54422 139 
22 Manipur 67   28952 374  
23 Meghalaya 45 19  13861 150  
24 Mizoram 28 4434 11  
25 Nagaland 7   12134   92  
26 Odisha 1769 97  336930 121  1921  
27 Puducherry 1011 20  39648 94  682
28 Punjab 23731 412  206246 2536  6813 64 
29 Rajasthan 8155 361  321275 304  2813  
30 Sikkim 48 6050 135  
31 Tamil Nadu 14846 863  856548 1463  12700 16 
32 Telengana 4965 287  301227 394  1697
33 Tripura 56 33055 392  
34 Uttarakhand 1696 28  96709 154  1713
35 Uttar Pradesh 9195 526  598001 382  8800 10 
36 West Bengal 5303 151  570303 475  10327
Total# 552566 11846  11434301 41280  162468 354 
*(Including foreign Nationals)
**( more than 70% cases due to comorbidities )
#States wise distribution is subject to further verification and reconciliation
#Our figures are being reconciled with ICMR


.Download Dainik Bhaskar Hindi App for Latest Hindi News.
.
...
Coronavirus infection live updates coronavirus Coronavirus live in India coronavirus new cases
.
.
.


from दैनिक भास्कर हिंदी

शरद पवार यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी; डॉक्टर म्हणाले...

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांच्या पित्ताशयावरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. पोटदुखीच्या त्रासामुळं त्यांना मंगळवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं काल रात्री उशिरा त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. वाचा: पोटदुखीचा त्रास झाल्यानं पवार यांना सोमवारी रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आलं होतं. पित्ताशयातील खडे हे त्यांच्या पोटदुखीचं कारण असल्याचं तपासणीतून पुढं आलं. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही शस्त्रक्रिया आज होणार होती. मात्र, मंगळवारी रात्री पुन्हा त्रास सुरू झाल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर एन्डोस्कोपीद्वारे त्यांच्या पित्ताशयातील खडे काढून टाकण्यात आले. त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्याची गरज असून ती कधी करायची याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, अशी माहिती डॉक्टर अमित मायदेव यांनी दिली. सध्या शरद पवार यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. शस्त्रक्रियेच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, आमदार रोहित पवार आदी रुग्णालयात उपस्थित होते. पवारांवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर सुप्रिया सुळे यांनी या सर्वांसोबत एक फोटो ट्वीट केला असून ब्रीच कँडी रुग्णालयाच्या डॉक्टरांचे आभार मानले आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

एमआयडीसीचा सर्व्हर हॅक; डेटा परत देण्याच्या बदल्यात ५०० कोटींची मागणी

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई अर्थात एमआयडीसीचा सर्व्हर हॅक करण्यात आला आहे. ही घटना मागील आठवड्यात घडली असून अद्याप प्रशासनाकडून त्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात आलेली नाही, याकडे सायबर तज्ज्ञ अॅड. डॉ. यांनी लक्ष वेधले आहे. एमआयडीसीसारख्या महत्त्वाच्या संस्थेचा सर्व्हर हॅक झाल्यामुळे राज्याची सर्व औद्योगिक माहिती हॅकर्सच्या हाती लागली आहे. ही माहिती परत देण्यासाठी हॅकर्सनी ५०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. यासंदर्भात अॅड. डॉ. प्रशांत माळी यांनी 'मटा'ला सांगितले की, २२ मार्चपासून एमआयडीसीचा सर्व्हर हॅक झाला आहे. परंतु शासकीय अनास्था एवढी आहे की, अद्याप साधी पोलिस तक्रारही केली गेलेली नाही. गेले आठवडाभर हॅकर एमआयडीसीच्या प्रत्येक फाइलमध्ये शिरून महत्त्वाची माहिती लांबवत असताना प्रशासनाला त्याची कल्पनाही नसावी, ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. मुळात एमआयडीसीसारख्या महत्त्वाकांक्षी आणि करोनाकाळात बिकट अवस्थेतील अर्थव्यवस्थेला प्रगतिपथावर नेण्याची क्षमता असलेल्या संस्थेची संवेदनशील माहिती चोरीला जाणे हे धोकादायक आहे. हॅकरनी एमआयडीसीकडे सर्व माहिती परत देण्यासाठी ५०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. पैशांची ही मागणी पूर्ण न झाल्यास हॅक केलेली माहिती पुसून टाकण्याची (डिलिट करण्याची) किंवा लीक करण्याची धमकीही हॅकरनी दिली आहे. ३१ मार्च ही शेवटची तारीख असणाऱ्या एमआयडीसीच्या अनेक महत्त्वाच्या निविदा प्रक्रिया यामुळे रखडणार आहेत, याकडेही माळी यांनी लक्ष वेधले आहे. महत्त्वाची माहिती चोरीला एमआयडीसीच्या १६ प्रादेशिक कार्यालयांचे कामकाज आठवडाभरापासून विस्कळित झाले आहे. हॅकरनी सर्व औद्योगिक वसाहतींची माहिती चोरली आहे. याखेरीज एमआयडीसीत कार्यरत उद्योजक, कंपन्या, सरकारी आस्थापने आणि एमआयडीसीशी संबंधित विविध योजना यांचीही माहिती हॅकरच्या हाती लागली आहे. हा खंडणी वसूल करणाऱ्या सॉफ्टवेअरचा अर्थात रॅनसमवेअरचा हल्ला आहे. एमआयडीसीमध्ये कोणताही संगणक सुरू केल्यानंतर व्हायरस दिसून येत आहे. तरीही सिस्टीम सुरू केल्यास माहिती गहाळ होण्याचा धोका निर्माण झाला आहे. माहिती निरुपयोगी हॅकरनी एमआयडीसीची चोरलेली माहिती अर्थहीन (एनक्रिप्ट) केली आहे. ही माहिती पुन्हा मिळवण्यासाठी ती अर्थपूर्ण (डिक्रिप्ट) करणे आवश्यक आहे. बॅकअप सर्व्हरमधून अजून माहिती (डेटा) काढून सिस्टीम सुरू करता आलेली नाही, हे अधिकच धोकादायक आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण: आरोपी शिवकुमारच्या अडचणी वाढल्या

जयंत सोनोने । अमरावती दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आलेला गुगामल वन्यजीव विभागाचा निलंबित उपवनसंरक्षक धारणी येथील कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. () नागपूरच्या रेल्वे स्टेशनवरून अटक करण्यात आलेल्या शिवकुमार बाला यास धारणी पोलिसांनी २६ मार्च रोजी अटक केली होती. दुसऱ्याच दिवशई त्याला एम. एस. गाडे यांच्या न्यायालयापुढे हजर करण्यात आल्यानंतर त्यास आधी २९ मार्चपर्यंत व नंतर ३० मार्चपर्यंत अशी सलग तीन दिवसांसाठी पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. हा कालावधी संपल्यानंतर काल पुन्हा शिवकुमारला कडेकोट बंदोबस्तात न्यायालयापुढे हजर करण्यात आले. तपास अधिकाऱ्यांकडून कोर्टापुढे वाढीव कोठडी मिळवून घेण्यासंदर्भात चार पानी पत्रासह मांडण्यात आलेल्या विषयान्वये असे स्पष्ट करण्यात आले की, मृतकाकडून हस्तगत करण्यात आलेले पत्र, संभाषणाच्या व्हाॅयरल क्लिप आणि आरोपींकडून जप्त करण्यात आलेला मोबाईल यांचा डीसीआर तज्ज्ञाच्या मदतीने तपासण्यात येत आहे. आरोपीच्या कार्यालयाकडून सक्षम पुरावे म्हणून जप्त करण्यात आलेल्या शासकीय दस्ताऐवजांचे अवलोकन अध्याप पूर्ण झाले नसून आरोपीच्या संभाषणाचे क्लिप आणि घटनेच्या अनुषंगाने आरोपीची विचारपूस पूर्व करणे, त्याप्रमाणे आरोपी सोबत इतर आरोपीचा सहभाग होता काय? हे तपासून पाहावे लागणार आहे. गुन्ह्याच्या दृष्टीकोनातून वेळमर्यादा, स्थळ आणि संभाषणे याची पृष्टी पुराव्यांसाठी एकत्रित करणे, पुराव्यांसाठी गोळा करण्यात आलेले संभाषणे, वॉइस रेकॉर्डिंग, डीसीआर पुरावे हे एक वर्षापेक्षा अधिक जुने असल्यामुळे त्यांची शहानिशा करावी लागणार आहे. त्यासाठी आरोपीची पोलीस कोठडी ही पुढील सात दिवसांसाठी वाढवून देण्यात यावी असा युक्तिवाद तपास अधिकारी पूनम पाटील आणि सरकारी वकील रझा सिद्दिकी यांच्या वतीने मांडण्यात आला. तर आरोपीच्या वतीने अॅड. सुशील मिश्रा यांनी कोठडीत वाढ करण्यास आक्षेप घेतला. वॉईस रेकॉर्डिंगची तपासणी अथवा डीसीआर सारख्या प्रक्रियेसाठी वाढीव पीसीआरची आवश्यकता नसून गेल्या तिन दिवसांपासून दस्ताऐवज, क्लिप आणि माझे क्लाईड ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यामुळे आता यापुढे वाढीव पोलीस कोठडी अजिबात नको असा युक्तिवाद न्यायालयापुढे मांडण्यात आला. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकून अखेर न्यायाधीश एम. एस. गाडे यांच्या कोर्टाकडून निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार बाला यास १४ दिवसांपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्याचे आदेश दिले. कोर्टासमोर अतिरिक्‍त सुरक्षा शिवकुमार बाला यास एम. एस. गाडे यांच्या कोर्टापुढे हजर करण्यात आले. त्यादरम्यान कोर्टाच्या परिसरात क्युआरटी पथकाचे जवान व विषेश पोलीस पथकाचे जवान तैनात करण्यात आले होते. २७ मार्च रोजी विनोद शिवकुमार यास कोर्टापर्यंत आणले गेले तेव्हा काही महिलांनी निदर्शने केली होती. तशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून अमरावती येथून अतिरिक्‍त पोलीस कुमक मागवण्यात आली होती. त्यामुळे काही काळ कोर्टाच्या परिसरात संचारबंदी सदृश वातावरण होते.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

मुंबईत दारोदारी जाऊन लसीकरण करण्याची परवानगी हवी: इक्बाल चहल

मुंबई: मुंबईतील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबईत काही लोकांसाठी घरोघरी जाऊन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिकेने या लसीकरणासाठी राज्य सरकारकडे परवानगी मागितली आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी ही माहिती दिली आहे. (we want permission to go door to door in mumbai for vaccination says commissioner ) पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी प्रसारमाध्मांच्या प्रतिनिधींशी बोलताना ही माहिती दिली. आयुक्तांनी वांद्रे कुर्ला संकुलातील जम्बो कोविड सेंटरमध्ये करोना प्रतिबंधक लस घेतली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. महापालिका आयुक्त यांनी माहिती देताना सांगितले की, मुंबईत १६ जानेवारीपासून पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. आता ४ एप्रिल रोजी फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात येईल. आतापर्यंत दहा लाखांच्या वर लसीकरण झालेले आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील जम्बो कोविड सेंटर हे देशातील सर्वात मोठे लसीकरण केंद्र असल्याचे ते म्हणाले. सध्या मुंबईत दर दिवशी ४० हजार जणांना लस देण्यात येत आहे. ही संख्या लवकरच एक लाखावर नेण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे, अशी माहिती आयुक्त चहल यांनी दिली आहे. त्यासाठी खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी देण्यात यावी अशी महापालिकेने केंद्र सरकारला विनंती केल्याचेही ते म्हणाले. मुंबईत लसीकरणाचा वेग वाढवण्याची आवश्यकता असल्याचे चहल म्हणाले. मुंबईतील खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी दिल्यास मुंबईत अतिरिक्त १३ हजार नागरिकांचे लसीकरण होऊ शकणार आहे. मुंबईतील खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण अधिक संख्येने केल्यास निश्चितच लसीकरणाचा वेग वाढवणार असल्याचे ते म्हणाले. काही लोकांचे लसीकरण दारोदारी जाऊनही केले जाऊ शकते. तशी परवानगी केंद्र सरकारकडे करण्यात आल्याचे ते म्हणाले. त्यावर लवकरच निर्णय झाल्यास लसीकरणाचा वेग वाढू शकेल. क्लिक करा आणि वाचा- मुंबईत ६९ हजारांहून अधिक लक्षणे नसलेले रुग्ण मुंबईत १० फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. गेल्या ४८ दिवसांमध्ये ८५ हजार कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यांपैकी ६९ हजार ५०० रुग्णांना करोनाची कोणतीही लक्षणे दिसली नव्हती. १० फेब्रुवारीला ३ हजार ५०० खाटा भरल्या होत्या. त्यानंतर काल रात्री ९ हजार ९०० इतक्या खाटा भरल्या गेल्या. खासगी रुग्णालयात २ हजार ४०० इतके बेड ठेवण्यात आले आहेत. ते वाढवून आता ४ हजार ९०० इतके करण्यात येणार आहेत, असे चहल यांनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा- २ हजार २०० खाटा खासगी रुग्णालये, १ हजार ५०० खाटा वांद्रे-कुर्ला संकुल आणि १ हजार खाटा नेस्को, अशा मिळून ७ हजार रिकाम्या खाटा तयार असल्याचेही चहल म्हणाले. या सोबत इतर व्यवस्थाही आपण वाढवणार असल्याचे ते म्हणाले. तसेच ९ हजार खाटा जम्बो कोविड सेंटरमध्ये देखील असतील, असे ते म्हणाले. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

भाजप आमदाराची कारागृहात रवानगी; महावितरणच्या अधिकाऱ्याला केली होती मारहाण

म. टा. प्रतिनिधी, जळगाव: जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह ४० ते ५० जणांच्या जमावाने शेतकऱ्यांचे शेती पंपाचे वीज कनेक्शन तोडल्याप्रकरणी जाब विचारत महावितरणचे अधिक्षक अभियंता माहेम्मद फारुख मोहम्मद युसूफ यांना खूर्चीत बांधून चपलांचा हार घालून मारहाण केली होती. या प्रकरणी दाखल गुन्ह्यात अटक केलेले आमदार चव्हाण यांच्यासह ३१ जणांची मंगळवारी नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली. आमदार चव्हाण यांच्यासह सुमारे ४० ते ५० जणांचा जमाव शुक्रवारी महावितरणच्या कार्यालयात गेला होता. यावेळी त्यांनी फारुख यांना दोरीने खुर्चीत बांधुन मारहाण केली. फारुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शुक्रवारी रात्री आमदार चव्हाण यांच्यासह ४० ते ५० जणांवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन चव्हाणांसह ३१ जणांना अटक केली हीती. अटकेतील सर्व संशयितांच्या पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपली. यामुळे त्यांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांकडून सर्व संशयितांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आली होती. वाचा: सुनावणीअंती न्यायालयाने सर्वांना न्यायालयीन कोठडी दिली. जिल्हा कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्यामुळे आणखी ३१ जणांना ठेऊन घेणे गैरसोयीचे होणार होते. त्यामुळे आमदार चव्हाण यांच्यासह सर्व ३१ संशयितांना नाशिक कारागृहात हलवण्यात आले.न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर आमदार चव्हाण यांच्यासह सर्व संशयितांतर्फे एकत्र जामीन अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

सरस्वती सन्मान पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ शरणकुमार लिंबाळे यांना जाहीर

सोलापूर: मराठीतले ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना २०२० या वर्षीचा सरस्वती सम्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या ‘सनातन’ या कादंबरीला हा पुरस्कार जाहीर झाला असून १५ लाख रुपये, प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचे स्वरुप आहे. दिल्लीच्या के. के. बिर्ला फाऊंडेशनकडून हा पुरस्कार दिला जातो. देशातल्या २२ भाषांतल्या पुस्तकांचे अवलोकन करुन दरवर्षी एका व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. डॉक्टर शरणकुमार लिंबाळे यांचा सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर या गावी जन्म झाला. जातीव्यवस्था आणि सामाजिक उतरंड यावर लिंबाळे यांनी सुरुवातीपासूनच आपल्या लेखणीने प्रहार केला आहे. या पुरस्काराविषयी बोलताना लिंबाळे म्हणाले, ''सनातन' ही कादंबरी मुघल आणि ब्रिटीश कालखंडातल्या इतिहासावर वेगळा प्रकाश टाकते. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात दलित आणि आदिवासींचे असलेले योगदान यावर फार काही उल्लेख आढळत नाही.' ही कमतरता दूर करण्याचा प्रयत्न या कादंबरीतून केल्याचे लिंबाळे यांनी यावेळी आवर्जून सांगितले. १९८६ ते १९९२ या दरम्यान ते सोलापूरच्या आकाशवाणी केंद्रावर उद्घोषक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून ते सेवानिवृत्त झाले. त्यांची ४० हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली असून 'अक्करमाशी' हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. 'अक्करमाशी'चे विविध भाषांत भाषांतरे झाली. याआधी १९९३ मध्ये विजय तेंडुलकर आणि २००२ मध्ये महेश एलकुंचवार यांना हा पुरस्कार मिळाला आहे. बार्शी येथे २०१०मध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय अंकुर मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद शरणकुमार लिंबाळे यांनी भूषवले होते.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

करोनाचा संसर्ग वाढला; राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय

मुंबई: राज्यात करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता वैद्यकीय वापरासाठी ऑक्सीजनचा पुरवठा ८० टक्के आणि औद्योगिक वापरासाठी २० टक्के ऑक्सीजन पुरवठा करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने राज्यातील उत्पादकांना दिले आहेत. या संदर्भात आरोग्य विभागाने आज अधिसूचना काढली असून ती ३० जून पर्यंत राज्यभर लागू राहणार आहे. राज्यात करोना रुग्णांना उपचारासाठी ऑक्सीजनची मोठ्या प्रमाणावर गरज भासत असून दैनंदिन रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता वैद्यकीय कारणासाठी ऑक्सीजनचे उत्पादन अनेक पटीने वाढविण्याचे निर्देश उत्पादकांना देण्यात आले आहेत. ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत राहण्याकरीता राज्यातील ऑक्सीजन उत्पादन केंद्रांच्या माध्यमातून होणाऱ्या ऑक्सीजन पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. राज्यातील ऑक्सीजनची वाढती गरज लक्षात घेता साथरोग नियंत्रण कायदा, आपत्ती व्प्यवस्थापन कायदा आणि महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा अधिनियमानुसार आरोग्य विभागाने राज्यात उत्पादित होणाऱ्या एकूण ऑक्सीजन पैकी ८० टक्के वैद्यकीय वापराकरीता तर उर्वरित २० टक्के औद्योगिक वापराकरीता पुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत. रुग्णालयांसाठी लागणाऱ्या ऑक्सीजन पुरवठ्याला प्राधान्य द्यावयाचे असून वैद्यकीय क्षेत्राला ८० टक्क्यापेक्षा जास्त प्रमाणात ऑक्सीजनची गरज भासल्यास त्याचा पुरवठा करायचा असे स्पष्ट निर्देश या अधिसूचनेत देण्यात आले आहेत. या निर्णयाच्या अंमलबजावणीकरीता राज्यस्तरावर आरोग्य आयुक्त आणि अन्न औषध प्रशासन आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले असून क्षेत्रीय स्तरावर विभागीय आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी करण्यात आले आहे. ही अधिसूचना ३० जून २०२१ पर्यंत लागू राहणार असल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी म्हटले आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

'एकनाथ खडसेंना 'ईडी'च्या तारखा पाहून करोना होतो, माझं तसं नाही'

जळगाव: मला जो होतो तो ‘ईडी’ च्या तारखा पाहून होत नाही. खडसे यांना ‘ईडी’च्या तारखा पाहूनच करोना होतो. माझे तसे नाही. मला एकदाच करोना झाला अशा शब्दांत भाजप नेते, आमदार यांनी यांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेतला. महाजन यांना करोना झाल्यानतंर खडसे यांनी इतक्या तरुण व व्यायाम करणाऱ्या नेत्याला करोना कसा झाला? असा प्रश्न उपस्थित केला होता. आज करोनामुक्त झाल्यानंतर जळगावात आलेल्या महाजन यांनी खडसेंवर पलटवार केला. ( Targets ) गेल्या दहा दिवसांपासून करोना झाल्याने गिरीश महाजन उपचार घेत होते. त्यांनी नुकत्याच केलेल्या करोना चाचणीचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानतंर महाजन यांनी आज जळगावात येऊन जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालायात पाहणी करून आरोग्य यंत्रणा व करोना उपाययोजनेचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. वाचा: सुरुवातीला एकनाथ खडसे यांना तीन-तीन वेळा करोना कसा होतो? याचे संशोधन झाले पाहिजे असे म्हणत महाजन यांनी खडसे यांना डिवचले होते. त्यानतंर महाजन यांना करोना झाल्यानतंर एकनाथ खडसे यांनी टोला हाणला होता. 'गिरीश महाजन हे नियमित व्यायाम करून फिट राहतात. यंग नेते म्हणून ते परिचित आहेत. गिरीश महाजन यांना झालेला करोना खरा आहे का? की, महापालिकेतील भाजपची सत्ता गेल्याचा हा करोना आहे. याचा तपास केला पाहिजे, असं खडसे म्हणाले होते. खडसेंच्या या वक्तव्याचा महाजन यांनी आज समाचार घेतला. वाचा: महाजन म्हणाले की, मला एकदाच करोना झाला. मी दहा दिवस सरकारी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होतो. माझे चार करोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. कालचा माझा रिपोर्ट निगेटीव्ह आला. मला जो करोना होतो, तो ‘ईडी’च्या तारखा पाहून होत नाही. सन्मानीय नेते खडसे यांना ‘ईडी’ची तारीख आली की लगेच करोना होतो आणि ते खासगी हॉस्पिटलमध्ये जातात किंवा घरीच क्वॉरंटाइन होतात, मुंबईत फिरतात. माझे तसे नाही. मला एकदाच करोना झाला. माझ्या पूर्ण कुटुंबाला झाला. आम्ही सर्व सरकारी दवाखान्यात अॅडमिट होतो. मी असे खोटेनाटे सर्टफिकेट जोडून बॉम्बे हॉस्पिटलला जात नाही. घरी क्वारंटाइन सांगून मुंबईत फिरत नाही, असा टोला महाजन यांनी लगावला. तरुण असो की पहेलवान, सर्वांनाच करोना होत आहे. माझा करोना ईडीचा नाही असल्याचे सांगत महाजन यांनी खडसे यांना चिमटा घेतला. राज्यातील करोना परिस्थिती गंभीर; सरकारचे दुर्लक्ष कोविड रुग्णलयात पाहणी केल्यानंतर गिरीश महाजन माध्यमांशी बोलताना म्हणाले की, राज्यात करोना संसर्ग झपाट्याने वाढत आहेत, त्याच बरोबर जळगाव जिल्ह्यात देखील करोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्ह्यात स्थिती अतिशय गंभीर बनली आहे. पण शासनाकडून पुरेशा उपाययोजना नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. करोना बाधित रुग्णांना इथं कुणी विचारायला तयार नाही, बेड्स नाही, व्हेन्टिलेटर नाहीत, ऑक्सिजन बेड्स नाहीत. त्यामुळं रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. सरकार याबाबत गंभीर नसल्याचा आरोपही त्यांनी केला. रेडमेसिवीरचा काळाबाजार आहे, डॉक्टरांचा पगार नाही, आठ ते दहा दिवस रिपोर्ट येत नसल्याने सर्व वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे. शासन करते काय? मी आरोग्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचेही महाजन म्हणाले. वनक्षेत्रपाल दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी बोलतांनाही त्यांनी शासनावर टीका केली. सध्या राज्यात कायद्याचे राज्य शिल्लक नसल्याचे ते म्हणाले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

कुमठेकर रस्त्यावर राज्य शिक्षण परिषदेच्या कार्यालयात आग

म.टा. प्रतिनिधी, पुणे रस्त्यावरील राज्य शिक्षण संशोधन परिषदेच्या कार्यालयातील आवारात ठेवलेल्या टाकाऊ फर्निचरला मंगळवारी दुपारी आग लागली. आगीत टाकाऊ फर्निचर जळाले असून अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली. ( on ) कुमठेकर रस्त्यावर राज्य शिक्षण संशोधन परिषदेचे कार्यालय आहे. तीन मजली इमारतीच्या आवारात तळमजल्यावर लाकडी फर्निचर, जुनी कपाटे ठेवण्यात आली आहेत. दुपारी पावणेदोनच्या सुमारास अचानक फर्निचरने पेट घेतला आणि मोठ्या प्रमाणावर धूर झाला. या घटनेची माहिती त्वरीत अग्निशमन दलाला देण्यात आली. क्लिक करा आणि वाचा- अग्निशमन दलाच्या कसबा पेठ आणि एरंडवणे केंद्रातील दोन गाड्या, टँकर घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या कसबा केंद्रातील अधिकारी सुनील नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तांडेल राजेंद्र पायगुडे, ढमाले, सुरेश पवार, अरगडे, पाण्याचा मारा करून दहा मिनिटात आग आटोक्यात आणण्यात आली. तळमजल्यावर स्वच्छतागृहाशेजारी मोठ्या प्रमाणावर टाकाऊ फर्निचर, लोखंडी कपाटे ठेवण्यात आली होती. त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होऊन आग लागली, अशी माहिती अग्निशमन अधिकारी नाईकनवरे यांनी दिली. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

यूपीएचं नेतृत्व शरद पवारांनी करावं?; बाळासाहेब थोरात म्हणतात...

मुंबईः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी युपीएचं नेतृत्व करावं, असं वक्तव्य शिवसेना नेते यांनी केलं होतं. संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उत आला होता. तर, काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेस नेते यांनीही संजय राऊतांना टोला लगावला आहे. 'युपीएचं नेतृत्व सोनिया गांधीच करणार आहेत. काँग्रेसहा देशव्यापी पक्ष आहे. कदाचित अडचणीच्या काळातून जात असेल, मात्र देशाचं नेतृत्व काँग्रेसकडे आहे आणि राहणार आहे. पुन्हा काँग्रेसचे दिवस येतील. त्यामुळं अशी कल्पना मांडणं योग्य वाटत नाही असं मला वाटतं,' असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आहे. 'युपीएच्या अध्यक्षपदाच्या चर्चांवरुन थोरात यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे. महाविकास आघाडी सरकार होण्यात संजय राऊतांचा मोठा सहभाग असल्याचं आम्ही जाहीरपणे सांगतो. पण संजय राऊत एका बाजूला राजकारणी आहेत. पण त संपादकही आहेत. कदाचित राजकारणी आणि संपादक यामध्ये त्यांची गल्लत होते का काय असं वाटून जातं,' असं थोरात यांनी म्हटलं आहे. 'आघाडीचं नेतृत्व त्यांच्याकडे आहे. आम्ही घटकपक्ष आहोत. त्यामुळं तीन पक्ष एकत्र असताना आणि चांगलं काम करत असताना त्यांना बळ देणं त्यांचं काम आहे. अशा वक्तव्यामुळं नाराजी होत असते,' असंही थोरात म्हणाले आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

अरेरे! सुनेला वाचवताना सासूचाही पाण्यात बुडून मृत्यू

मनोज जयस्वाल । सासू-सुनेच्या नात्याबद्दल नव्यानं सांगण्याची काही गरज नाही. एकमेकींना कमी कसं लेखता येईल याकडंच दोघींचा कल असतो. मात्र, काही सासवा-सुना यास अपवाद असतात. वाशिम जिल्ह्यात अशाच एका प्रेमळ सासूने आपल्या सुनेला वाचवताना स्वत:चा जीव गमावला आहे. वाशिम जिल्ह्यातील कोळी गावात ही घटना घडली आहे. तालुक्यातील कोळी गावात काल दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. काल दुपारच्या सुमारास वीटभट्टीची सर्व कामे आटोपून शीतल बुटके ही महिला तिची सासू जयंताबाई बुडके ह्या दोघी कपडे धुण्यासाठी जवळच असलेल्या तलावावर गेल्या होत्या. तिथं कपडे धूत असतानाच शीतलचा पाय घसरून ती पाण्यात पडली. ती पाण्यात बुडत लक्षात येताच सासूने सुनेचा हात धरून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नात जयंताबाईचाही पाय घसरला आणि त्या पाण्यात बुडू लागल्या. या दोघी बुडत असल्याचे त्यांच्या मुलाला दिसले. त्याने दोघींना वाचविण्याचा प्रयत्न केला. पोहता येत नसल्यामुळे त्याने आरडा ओरड केला, तेव्हा गावातील काही मुलं तिथं आली. त्यांनी पाण्यातून जयंताबाईला बाहेर काढले पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. तर, शीतलचा शोध लागला नव्हता. वाचा: घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पाण्यात बुडालेल्या शीतलचा मृतदेह काढण्यासाठी कोणीच सापडत नसल्यामुळे गावातील लोकांनी गळ आणून शोध घेतला आणि मृतदेह बाहेर काढण्यात आला. या प्रकरणी कारंजा शहर पोलिसानी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण: अखेर श्रीनिवास रेड्डी निलंबित?

अमरावती, म. टा वृत्तसेवा : मेळघाटातील वनरक्षक आत्महत्या प्रकरणी अमरावती येथून बदली करण्यात आलेले अपर मुख्य प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना निलंबित करण्यात आल्याची चर्चा आहे. गुगामल वन्यजीव परिक्षेत्राच्या वनरक्षक दीपाली चव्हाण यांनी गुरुवारी मेळघाटच्या हरिसाल येथे स्वतःच्या पिस्तुलने गोळी झाडून आत्महत्या केली होती. याप्रकरणी उपवन संरक्षक विनोद शिवकुमार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली होती. तर, आता रेड्डी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची चर्चा आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या हरिसाल वनपरिक्षेत्राच्या अधिकारी आरएफओ दीपाली चव्हाण यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी दीपाली चव्हाण यांनी सुसाई़ड नोट लिहिली होती. त्या नोटमध्ये त्यांनी अपर प्रधान मुख्य वन संरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना उद्देशुन लिहली होती. त्यामुळं श्रीनिवास रेड्डी यांचंही निलंबन करावं अशी मागणी होत होती. भाजपनंही रेड्डींच्या निलंबनांची मागणी उचलून धरली होती. आज, मंगळवारी अपर मुख्य प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयात भाजपने ठिय्या आंदोलन केले. रेड्डी यांच्या निलंबन व अटकेची मागणी करण्यात आली. यादरम्यान अमरावतीच्या पालकमंत्री तथा महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी रेड्डीच्या अटकेसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केल्याचे सांगितले जात आहे. यानंतर आज दुपारी श्रीनिवास रेड्डी यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर त्यांनी लिहलेल्या पत्रांची सध्या चर्चा होत आहे. दीपाली यांनी त्यांच्या पतीसाठी लिहलेलं एक भावनिक पत्र समोर आलं आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

पंढरपूर पोटनिवडणूक: भावनिक मुद्द्यांवर होणार लढत?

सोलापूर: पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करायचा आजचा शेवटचा दिवस असून भाजपचे समाधान आवताडे आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दिवंगत आमदार भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांनी भारत भालकेंसारखा पेहराव करून राष्ट्रवादीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावरून पंढरपूरची ही पोटनिवडणूक भावनिक मुद्द्यावरच लढवली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. यावेळी बोलताना भगीरथ यांनी, 'आज नाना आपल्यात नाहीत हे माझं कौटुंबिक दु:ख आहेच पण ज्या जनतेने नानांवर मनापासून जीवापाड प्रेम केलं त्यांना यापुढेही नानांच्या विचारांची गरज आहे. म्हणूनच निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहोत. माझा फक्त देह आहे बाकी माझ्या नसा-नसांत नानाचे रक्त आहे, असं भावनिक वक्तव्य भगीरथ यांनी यावेळी केले. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार प्रणिती शिंदे,आमदार संजय शिंदे यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. तर दुसरीकडे स्थानिक मुद्द्यांवर मोर्चेबांधणी करणाऱ्या समाधान आवताडे यांनी, 'या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आव्हान वाटत नाही. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होईल असा दावा केला आहे. समाधान आवताडे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, प्रशांत परिचारक, राम शिंदे, सुभाष देशमुख, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि सोलापूरचे खासदार डॉ जयसिद्धयेश्वर शिवाचार्य महास्वामी उपस्थित होते.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

अभिजित बिचुकले पंढरपूर पोटनिवडणुकीच्या रिंगणात

प्रवीण सपकाळ । सोलापूर छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस' या रिअॅलिटी शो मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले सातारकर हे मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उतरले आहेत. बिचुकले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बिचुकले यांनी निवडणुकीच्या रिंगणात अचानक घेतलेल्या उडीमुळं रंगत वाढली आहे. ( Files Nomination for ) स्वत:ला कवी मनाचा नेता म्हणवून घेणाऱ्या अभिजीत बिचुकले यांनी आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीही त्यानं प्रयत्न केले आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही त्यानं कित्येकदा खुलेआम आव्हान दिलं आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मुंबईतील वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना अवघी १५० मतं मिळाली होती. वाचा: बिचुकले यांनी आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या असल्या तरी त्यांना एकदाही यश आलेलं नाही. मात्र, तरीही हार न मानता त्याचे प्रयत्न सुरूच आहेत. '२०१९ चा मुख्यमंत्री मीच ठरवणार', असं बेधडक वक्तव्यही त्यानं केलं होतं. त्यानंतर आता त्यांनी पंढरपूरमधून नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी अनामत रक्कम म्हणून १२ हजार ५०० रुपयांची चिल्लर जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा केली होती. त्यामुळंही ते चर्चेत आले होते. वाचा: उद्धव ठाकरेंना आवाहन निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी ते एकटेच आले होते. शंका आल्यानं पोलिसांनी त्यांना अडवले असता मी उमेदवार असल्याचा खुलासा त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. 'फोन टॅपिंग प्रकरणात पोलिसांवर कारवाई व्हायला हवी. उद्धवदादा तुम्ही कारवाई करा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,' अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

दुसऱ्या लॉकडाऊनबाबत राजेश टोपेंचं महत्त्वाचं वक्तव्य

मुंबई: राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची चर्चा देखील सुरू झाली आहे. राज्यभरात लागू करण्यात आलेल्या रात्रीच्या जमावबंदीमुळं त्यात भर पडली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री यांनी अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. महाविकास आघाडी सरकारमधील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेससह आनंद महिंद्रा यांच्यासारख्या मान्यवरांनीही लॉकडाऊनला कडाडून विरोध दर्शवला आहे. त्या पार्श्वभूमीवर टोपे यांनी भूमिका मांडली. 'राज्यात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही परिस्थिती कशी हाताळावी हे आव्हान आमच्यापुढं आहे. अशा वेळी रुग्णवाढीचे प्रमाण आणि त्या तुलनेत आरोग्य सुविधा, औषधे या सगळ्याचं मोजमाप करणं आवश्यक असतं. रुग्णांच्या तुलनेत सुविधांचा अभ्यास करत राहावं लागतं. हा कुणालाच मान्य होण्यासारखा नाही. तो कोणालाही आवडत नाही. पण परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागतो. 'तहान लागल्यावर विहीर खणायची' अशी जी एक म्हण आहे. करोनाच्या बाबतीत तसं आपण करू शकत नाही. त्याची तयारी आधीच करावी लागणार आहे,' असं टोपे म्हणाले. वाचा: 'मुख्यमंत्री स्वत: सर्व अधिकाऱ्यांशी त्याबाबत चर्चा करत आहेत. निर्बंध कडक करायचे असतील तर कसे करायचे? उद्योग, बांधकाम क्षेत्राला झळ कशी बसणार नाही हेही पाहावं लागणार आहे, असं ते म्हणाले. सुरुवातीच्या काळात कठोर निर्बंध लादून करोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यावर सरकारचा भर आहे. त्यातूनही संसर्ग आटोक्यात न आल्यास लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल. अर्थात, त्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि तज्ज्ञांच्या चर्चेतून घेतला जाईल, असं टोपे म्हणाले. लॉकडाऊनचा कालावधी किती असावा याबाबतही सर्वंकष चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असं टोपे म्हणाले. वाचा: 'रुग्णांची वाढत जाणारी संख्या ही चिंतेची बाब नक्कीच आहे. त्यामुळं लोकांकडून योग्य प्रतिसाद हवा आहे. लक्षणे नसलेल्या लोकांची फार काळजी वाटण्याचं कारण नाही. मात्र, अशा रुग्णांपैकी अनेकांची घरं लहान आहेत. अशा परिस्थितीत ते संपूर्ण कुटुंबाला बाधा पोहोचवतात. त्यामुळं लक्षणे नसलेल्या, पण ज्यांची घरं लहान आहेत, अशा पॉझिटिव्ह रुग्णांनी स्वत:हून सरकारी कोविड सेंटरमध्ये दाखल व्हावं,' असं आवाहन टोपे यांनी केलं आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

मंदिरे पुन्हा बंद होणार? शिर्डी, शनिशिंगणापुरातील गर्दीचा ओघ आटला!

अहमदनगर: करोनाचा उद्रेक पुन्हा वाढल्यानंतर मधल्या काळात व येथे होऊ लागलेली भाविकांची गर्दी पुन्हा घटली आहे. शिर्डीत दिवसभरात सहा ते सात हजार तर शनिशिंगणापूरला पाचशे ते सातशे भाविक येत असल्याचे सांगण्यात येते. मागील वेळी सुरुवातीच्या टप्प्यातच मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय झाला होता. आता पुन्हा उद्रेक झाल्याने लॉकडाऊनच्या आधी असाच निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मंदिरांवर अवलंबून असलेले व्यावसायिक मात्र चांगलेच अडचणीत आले आहेत. करोनाची साथ येण्यापूर्वी शिर्डीत लाखो भाविक येत असत. गेल्यावर्षी करोनाच्या सूरवातीलाच मंदीर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जनता कर्फ्यूसारखे प्रयोग होण्याच्या आधीच मंदिरे बंद करण्यात आली होती. त्यानंतर अनलॉकच्या प्रक्रियेत सर्वांत उशिरा मंदीरे खुले करण्यात आली. अनेक बंधने घालून दर्शन व्यवस्था सुरू झाली. त्यामुळे बंद पडलेले व्यावसाय पुन्हा सुरू झाले होते. वाचा: या काळात शिर्डीत सुरवातीला दररोज पंधरा हजार तर अलीकडेच तीस हजार भाविक प्रतिदिन दर्शन घेऊ शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. अनलॉकनंतरच्या सुरवातीच्या काळात गर्दी रोखण्याचे आव्हान होते. आता मात्र, करोनाचा पुन्हा उद्रेक झाल्यापासून भाविकांची संख्या आपोआप घटली आहे. शिर्डीत सध्या दररोज पाच ते सात हजार भाविक येत आहेत. गुरूवार, शनिवार आणि रविवार या गर्दी होणाऱ्या दिवशी ही संख्या दहा हजारावर जात आहे. साईप्रसादलयात दररोज ४० हजार भाविकांची सोय करण्यात आली असली तर सध्या फक्त सहा ते सात हजार भाविक त्याचा लाभ घेत आहेत. मधल्या काळात बंद करण्यात आलेल्या बुंदी लाडू आणि प्रसादलयाच्या सुविधा पुन्हा सुरू करण्यात आल्या असल्या तरी भाविकांनी मात्र शिर्डीकडे पाठ फिरविली आहे. या परिणाम शिर्डीतील सर्व प्रकारच्या व्यावसायांवर झाला आहे. सतत गजबलेला दर्शनमार्ग, मंदीर परिसर, रस्ते पुन्हा ओस पडलेले दिसत आहेत. वाचा: शनिशिंगणापूरलाही गर्दी ओसरली आहे. तेथेही दररोज केवळ पाचशे ते सातशे भाविक येत असल्याचे सांगण्यात आले. तेथेही मंदिरावर अवलंबून असलेल्यांची संख्या मोठी आहे. त्यांचे व्यावसायही अडचणीत आले आहेत. सलग सुट्ट्या असूनही नेहमीच्या तुलनेत खूपच कमी भाविक दर्शनासाठी येत आहेत. मुख्य म्हणजे या दोन्ही ठिकाणी मुक्कामी येणाऱ्या भाविकांचे प्रमाण तर कमालीचे घटले आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसाय अडचणीत आला आहे. वाचा: असे असताना आता लवकरच पुन्हा मंदिरे बंद केली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्यातील काही प्रमुख देवस्थानांनी यापूर्वीच निर्णय घेऊन मंदिरे भाविकांसाठी बंद केली आहेत, तर कोठे अनेक निर्बंध आणले आहेत. आता शिर्डी, शनिशिंगणापूरसह सर्वच मंदिरे आणि धार्मिक स्थळांच्या बाबतीत राज्य स्तरावरूनच काय निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागले आहे. शाळांसह अन्य गर्दीचे उपक्रम आणि व्यावसायांवर कडक निर्बंध आणि काही बंद ठेवण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे मंदिरांसंबंधीही सरकार लवकर भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वी सरकारने येथील व्यावसायिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

नक्षल्यांसाठी मार्च महिना ठरला कर्दनकाळ

गडचिरोली: जिल्ह्याचं नाव ऐकताच डोळ्यासमोर चित्र येतं ते नक्षल कारवायांचं. सध्या दररोज चकमक, आत्मसमर्पण, बॅनरबाजी अश्या घटना समोर येत असून या महिन्याच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत घडलेल्या घटनांमध्ये नक्षल्यांचं मोठं नुकसान झालं असून मार्च महिना हा नक्षल्यांसाठी कर्दनकाळ ठरला आहे. छत्तीसगड-महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात अबुझमाड पहाडावर नक्षल विरोधी अभियान राबवितांना गडचिरोली पोलीस दलाच्या जवानांनी नक्षलवाद्यांचा शस्त्रांचा छोटा कारखाना उध्वस्त केला. पहिल्यांदाच नक्षल्यांचा घरात घुसून ही कारवाई करण्यात आली. नक्षली पळून गेले मात्र, सी-६० जवानांना अबुझमाड पहाडावर नक्षलवाद्यांचा शस्त्रांचा कारखाना उध्वस्त करण्यात यश मिळालं. अबुझमाडच्या यशानंतर सी-६० जवानांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. आत्मसमर्पण योजना, विविध चकमकीत नक्षल्यांचा खात्मा आणि हिंसाचाराच्या घटनांना कंटाळून नक्षलवाद्यांच्या प्लाटून ७च्या कमांडरसह एकूण ४ जहाल नक्षल्यांनी मंगळवारी २३ मार्च रोजी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. त्या सर्वांवर अनेक गुन्हे दाखल असून त्यांच्यावर राज्यशासनाने एकूण २२ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी शांततेचे प्रतीक असलेला पांढरा दुपट्टा आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. लगेच पुन्हा २९ मार्चला गडचिरोली पोलिसांच्या विशेष नक्षल विरोधी अभियान पथक सी-६०ने खोब्रामेंढा पहाडीवर अभियान राबवित असताना नक्षल नेता भास्कर सह पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घालून होळीच्या पर्वावर लाल यश संपादन केले.एकंदरीत गडचिरोली पोलिसांना मिळालेला खूप मोठा यश असून नक्षलयांसाठी मात्र, मार्च महिना कर्दनकाळच ठरला आहे. सदर काळ हा नक्षलवाद्यांचा प्रशिक्षणाचा असतो,त्यांचे प्रशिक्षण अत्यंत सुरक्षित ठिकाणी होते.त्याकरिता शेकडो एका ठिकाणी गोळा होतात.याच ठिकाणाहून मोठा घातपात व्युव्हरचना आखली जाते. मात्र,पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात सी-६० जवानांना मोठं यश मिळताना दिसत आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

मंदिरे पुन्हा बंद होणार? शिर्डी, शनिशिंगणापुरातील गर्दीचा ओघ आटला!

अहमदनगर: करोनाचा उद्रेक पुन्हा वाढल्यानंतर मधल्या काळात व येथे होऊ लागलेली भाविकांची गर्दी पुन्हा घटली आहे. शिर्डीत दिवसभरात सहा ते सात हजार तर शनिशिंगणापूरला पाचशे ते सातशे भाविक येत असल्याचे सांगण्यात येते. मागील वेळी सुरुवातीच्या टप्प्यातच मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय झाला होता. आता पुन्हा उद्रेक झाल्याने लॉकडाऊनच्या आधी असाच निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मंदिरांवर अवलंबून असलेले व्यावसायिक मात्र चांगलेच अडचणीत आले आहेत. करोनाची साथ येण्यापूर्वी शिर्डीत लाखो भाविक येत असत. गेल्यावर्षी करोनाच्या सूरवातीलाच मंदीर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जनता कर्फ्यूसारखे प्रयोग होण्याच्या आधीच मंदिरे बंद करण्यात आली होती. त्यानंतर अनलॉकच्या प्रक्रियेत सर्वांत उशिरा मंदीरे खुले करण्यात आली. अनेक बंधने घालून दर्शन व्यवस्था सुरू झाली. त्यामुळे बंद पडलेले व्यावसाय पुन्हा सुरू झाले होते. वाचा: या काळात शिर्डीत सुरवातीला दररोज पंधरा हजार तर अलीकडेच तीस हजार भाविक प्रतिदिन दर्शन घेऊ शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. अनलॉकनंतरच्या सुरवातीच्या काळात गर्दी रोखण्याचे आव्हान होते. आता मात्र, करोनाचा पुन्हा उद्रेक झाल्यापासून भाविकांची संख्या आपोआप घटली आहे. शिर्डीत सध्या दररोज पाच ते सात हजार भाविक येत आहेत. गुरूवार, शनिवार आणि रविवार या गर्दी होणाऱ्या दिवशी ही संख्या दहा हजारावर जात आहे. साईप्रसादलयात दररोज ४० हजार भाविकांची सोय करण्यात आली असली तर सध्या फक्त सहा ते सात हजार भाविक त्याचा लाभ घेत आहेत. मधल्या काळात बंद करण्यात आलेल्या बुंदी लाडू आणि प्रसादलयाच्या सुविधा पुन्हा सुरू करण्यात आल्या असल्या तरी भाविकांनी मात्र शिर्डीकडे पाठ फिरविली आहे. या परिणाम शिर्डीतील सर्व प्रकारच्या व्यावसायांवर झाला आहे. सतत गजबलेला दर्शनमार्ग, मंदीर परिसर, रस्ते पुन्हा ओस पडलेले दिसत आहेत. वाचा: शनिशिंगणापूरलाही गर्दी ओसरली आहे. तेथेही दररोज केवळ पाचशे ते सातशे भाविक येत असल्याचे सांगण्यात आले. तेथेही मंदिरावर अवलंबून असलेल्यांची संख्या मोठी आहे. त्यांचे व्यावसायही अडचणीत आले आहेत. सलग सुट्ट्या असूनही नेहमीच्या तुलनेत खूपच कमी भाविक दर्शनासाठी येत आहेत. मुख्य म्हणजे या दोन्ही ठिकाणी मुक्कामी येणाऱ्या भाविकांचे प्रमाण तर कमालीचे घटले आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसाय अडचणीत आला आहे. वाचा: असे असताना आता लवकरच पुन्हा मंदिरे बंद केली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्यातील काही प्रमुख देवस्थानांनी यापूर्वीच निर्णय घेऊन मंदिरे भाविकांसाठी बंद केली आहेत, तर कोठे अनेक निर्बंध आणले आहेत. आता शिर्डी, शनिशिंगणापूरसह सर्वच मंदिरे आणि धार्मिक स्थळांच्या बाबतीत राज्य स्तरावरूनच काय निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागले आहे. शाळांसह अन्य गर्दीचे उपक्रम आणि व्यावसायांवर कडक निर्बंध आणि काही बंद ठेवण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे मंदिरांसंबंधीही सरकार लवकर भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वी सरकारने येथील व्यावसायिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.


from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times

करोनाग्रस्त वृद्धाची आत्महत्या; ऑक्सिजनच्या पाइपने घेतला गळफास

नागपूर: करोनावर उपचार घेत असलेल्या एका वृद्धाने सोमवारी सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. (81 year old corona patient hangs self in Nagpur Hospital) पुरुषोत्तम गजभिये असं मृताचं नाव असून ते ८१ वर्षाचे होते. रुग्णांना ऑक्सिजन पुरविणाऱ्या बारीक पाइपने त्यांनी बाथरूममध्ये गळफास घेतल्याची माहिती आहे. रात्रीच्या ड्युटीवर असलेला सफाई कर्मचारी बाथरूम स्वच्छ करण्यासाठी गेला होता. दरवाजावर थाप मारूनही बराच वेळ कुणीही बाहेर येत नसल्यानं त्यानं ही माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर दरवाजा तोडण्यात आला तेव्हा गजभिये मृतावस्थेत आढळून आले. वाचा: गजभिये हे नागपूरच्या रामबाग परिसरातील रहिवासी होते. २६ मार्च रोजी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या आत्महत्येचे कारण अजून कळू शकले नाही. आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय आहे. घटनास्थळावर 'सुसाइड नोट' आढळलेली नाही. अजनी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. औरंगाबादमध्ये रुग्णाचा शौचालयात गुदमरून मृत्यू दुसरीकडे, औरंगाबदच्या जिल्हा रुग्णालयात एका बाधित रुग्णाचा शौचालयात गुदमरून मृत्यू झाला आहे. गुलाबराव ढवळे असं त्याचं नाव असून हा रुग्ण तब्बल साडेचार तास ऑक्सिजन विना शौचालयात पडून होता. रुग्णालयाच्या प्रशासनाच्या बेफिकीरीमुळं ढवळे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

'एनआयएनं राऊतांसारख्या बेताल बडबड करणाऱ्यांची चौकशी करावी'

मुंबई: शिवसेनेसोबत काँग्रेसनं आघाडी करण्यास सुरुवातीपासून विरोध असलेले काँग्रेसचे माजी खासदार यांनी शिवसेनेच्या विरोधात हल्ले सुरूच ठेवले आहेत. आता प्रकरणावरून निरुपम यांनी शिवसेनेचे खासदार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. (Sanjay Nirupam Targets ) सचिन वाझे यांची काम करण्याची पद्धत वादग्रस्त आहे. त्यांच्यामुळं सरकार अडचणीत येऊ शकते, असा इशारा मी वाझेंना पोलीस सेवेत पुन्हा रुजू करून घेतले गेले, तेव्हाच दिला होता. शिवसेनेच्या कोणत्या नेत्यांना मी हे सांगितलं होतं त्यांची नावं उघड करू इच्छित नाही, असं संजय राऊत काल मुंबईत पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते. वाचा: याच वक्तव्यावरून निरुपम यांनी ट्विटरच्या माध्यमातून राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. 'वाझेंना पुन्हा पोलीस सेवेत घेण्यास माझा विरोध होता असं आता संजय राऊत म्हणतात. कालपर्यंत हेच राऊत वाझेंचं समर्थन करत होते. वाझे हे प्रामाणिक आणि कार्यक्षम अधिकारी असल्याचं म्हणत होते. आता ते काहीही म्हणत असले तरी सचिन वाझे हा कोणाच्या पाठिंब्यानं पुन्हा सेवेत आला हे लोकांसमोर आलेच पाहिजे,' असं निरुपम यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय तपास संस्थेनं (एनआयए) संजय राऊत यांच्यासारख्या बेताल बडबड करणाऱ्या लोकांना उचलून त्यांची चौकशी केली पाहिजे आणि वाझेच्या कर्त्या-करवित्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे,' अशी अपेक्षाही निरुपम यांनी व्यक्त केली आहे. संजय निरुपम हे काँग्रेसचे माजी खासदार व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत. महाविकास आघाडीच्या संकल्पनेला त्यांचा ठाम विरोध होता आणि आहे. विशेषत: त्यांचा विरोध काँग्रेसनं शिवसेनेच्या सोबत जाण्याला होता. महाविकास आघाडी सरकारला दीड वर्षे होऊन गेल्यानंतरही त्याचा हा विरोध आजही कायम आहे. त्यातूनच ते महाआघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

अमरावतीमध्ये युवकावर लोखंडी रॉडने हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद

जयंत सोनोने । शहरातील अमरावती-परतवाडा मार्गावरील भागातील यश बार परिसरात सहा जणांनी एका तरुणाला मारहाण केली. जुन्या वादातून लोखंडी रॉड, काठ्या, चाकू आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात भूषण पोहकर (वय २१), नामक युवक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्राणघातक हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी सहा पैकी पाच आरोपींना अटक केली आहे. वाचा: अमरावती शहरासह जिल्ह्यात मागील काही दिवसांत हत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. २७ तारखेला अमरावती शहरातील नवसारी परिसरातील यश बार समोर तरुणाला मारहाणीची घटना घडली. आरोपींनी तरुणाला इतकी मारहाण केली की तो काही वेळ मरणासन्न अवस्थेत खाली पडला होता. या हल्ल्यात जखमी झालेल्या भूषणवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकारानंतर अमरावती शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times