`
6/ticker

सचिन (हरिशचंद्र) कोते नवे उपनगराध्यक्ष: पुन्हा एकदा 'खबर भारत' चा ओपिनियन पोल ठरला प्रभावी?खबर भारत चा ओपिनियन पोल पूर्ण झाला असून निकाल जाहीर करण्यात येत आहे

खबर भारत ने यापूर्वी सुद्धा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या वेळी ऐतिहासिक ओपिनियन पोल घेऊन जनतेच्या मनातला नगराध्यक्ष कोण हे दाखवून दिले आणि जो उमेदवार जनतेच्या मनात होता तोच उमेदवार नगराध्यक्ष पदाचा मानकरी ठरला. 
आता पुन्हा एकदा उपनगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत असलेले 2 उमेदवार खबर भारत ने जनतेसमोर ठेवले आणि जनतेचा 'मूड' जाणून घेण्याचा 'प्रामाणिक' प्रयत्न केला. 
29 डिसेंबर 2020 ला ऑनलाईन मतदानाला सुरुवात झाली आणि 31 डिसेंबर 2020 ला रात्री 11:99 मिनिटाला मतदान थांबविण्यात आले. 
आमच्या ओपिनियन पोल मध्ये एकूण 1001 लोकांनी आपले मत नोंदविले. त्यापैकी सचिन (हरिश्चंद्र) कोते यांना 799 लोकांनी मतदान करून 80% लोकांनी आपली पसंती दर्शविली तर दत्तात्रय कोते यांना फक्त 202 लोकांनी मतदान करून फक्त 20% लोकांनी पसंती दर्शविली आहे. 
यावरून शिर्डीकरांनी आपला मूड दाखवून दिला आहे. परंतु आज जेंव्हा प्रत्यक्ष मतदान होईल तेंव्हा जनतेने निवडून दिलेले 17 नगरसेवक आपल्या जनतेच्या मूड चा कितपत विचार करणार हे पाहणे आत्सुक्याचे ठरले होते. परंतु जनतेचा मूड लक्षात घेऊन शेवटी सचिन कोते यांची उनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

Post a Comment

1 Comments